देव किती ? अगदी बोटांवर मोजण्या एवढेच
वेदातील तेहेतीस देवांवरून कल्पलेली " तेहेतीस कोटी " ही संख्या सोडून दिली तरी देव किती हा एक मजेदार प्रश्न शिल्लक रहातोच. मोजमाप करावयाच्या दृष्टीने त्यांची वर्गवारी करवयाचा प्रयत्न करू.
(१) वैदिक देवता : मरुत, इंद्र, वरुण, अग्नी,उषा, सूर्य,सोम, इत्यादी.( विष्णु ही एक तृतीय श्रेणीतील देवताही होती.) यांपैली कॊणाचीही पूजा आज केली जात नाही.
(२) पौराणिक देवता : पौराणिक काळात वैदिक देवता मागे पडून विष्णु, शंकर,देवी, गणपती, स्कंद या देवता पुढे आल्या.
(३) ग्रामदेवता व कुलदेवता : गावाचे रक्षण करणार्या देवता (बहुतांशी स्त्रीदेवता) उदा. सातेरी, भुमका, पिडारी, मरीआई, तसेच भैरोबा, रवळनाथ, वेताळ, अय्यनार इत्यादी. प्रत्येक कुलाच्या विशिष्ट उपास्य देवता, उदा. खंडोबा, ज्योतिबा, भवानी, योगेश्वरी, शांतादुर्गा, व्याघ्रेश्वर, इत्यादी. खरे म्हणजे या देवताच आदीमदेवता म्हणावयास पाहिजेत. पण उच्चवर्गीयांनी यांतील बर्याच जणांना शंकर, पार्वती, विष्णु यांचे अवतार वा सेवक असे रूप देऊन त्यांचा समावेश (२) मध्ये केला.
(४) क्षुद्र देवता : क्षुद्र व शूद्र यांचा घोळ घालू नका. क्षुद्र म्हणजे दुय्यम. हा शब्दप्रयोग पूर्वीपासून चालू आहे. यात कोणाला हिणवावयाचे असे नसून (२) मधील देवतांपासून वेगळे दाखवयाचे असते. गावाच्या सीमेवर, पडक्या भिंतीवर, एखाद्या शीळेवर शेंदूराने त्रिशूळ काढून त्या देवतेचे स्थान दाखवले असते. सामान्यत : या देवता उग्र-भयंकर असतात व त्या मांस-मद्याच्या नेवैद्याचा आग्रह धरतात.खेडोपाडी यांचा प्रभाव दांडगा असतो व संतांनी प्रयत्न करूनही त्यांचे ग्रामजीवनावरील अधिराज्य आजही लक्षणीय आहे.
आता देव किती या प्रश्नाचे उत्तर शोधावयास एक दंडक असा लावू की ज्यांची मोठ्या प्रमाणात देवळे आहेत व ज्यांची पूजा करणारे भक्त संख्येने जास्त आहेत त्यांचीच गणना करणे उचित ठरेल. तेव्हा (१) मधील देव बाद करू. (३) व (४) मधील देव मोजणे अशक्य आहे; तेही सोडून देऊ. शनी, सूर्य,नरसिंह इत्यादींची ५-१० देवळे सापडतील पण त्यांचाही विचार करण्याची गरज नाही. त्रिमूर्तीतील ब्रह्मदेव ज्येष्ट खरा पण माझ्या माहितीप्रमाणे त्याची देवळे नगण्य आहेत. उरले किती ?
विष्णु व त्याचे राम कृष्ण, विठ्ठल ( हा खरा (३) मधील देव पण त्याला बढती देऊन कृष्णाचा अवतार केला गेला, हा महाराष्ट्र व कर्नाटक या दोन प्रांतांतच लोकप्रिय आहे) इत्यादी अवतार. य़ांच्या भक्तांना म्हणावयाचे " वैष्णव ". सर्व हिंदुस्थानात याची देवळे आहेत व मोठ्या प्रमाणात भक्तही आहेत. यांतील पंथ व उपपंथ लक्षणीय आहेत.
शंकर यांनी अवतार घेण्याचे कष्ट घेतले नाहीत. ऊपासकांना " शैव " म्हणतात. शैवांत अनेक पंथ आहेत. आसेतुहिमाचल देवळे आहेत.( पसंती डोंगर-दर्यांची)र. विष्णूपेक्षा थोडा "कडक " देव. शांभवी चालते.
देवी (पार्वती व तिची रुपे) शक्ती ही एक प्राचिन व लोकमान्य देवता आहे, उपासकांना " शाक्त " म्हणतात. दानवमर्दिनी हे रूप जास्त आवडते असल्याने शंकरापेक्षाही जास्त उग्र रुप आढळून येते. तांत्रिक उपासनेत देवी व शिव यांना प्राधान्य दिले गेले आहे.
गणपती हा जरा सौम्यच देव आहे. थोडे दैत्य मारले हे खरे पण देवाने असे काही करावे अशी अपेक्षा असते म्हणून. बाकी कार्यारंभी वंदन करावयाचा मान असल्याने सर्वत्र संचार. उपासकांना "गाणपत्य " म्हणतात.
कार्तिकेय शंकर परिवारातला शेवटचा देव. दक्षिणेत जास्त उपासना केली जाते. सुब्रह्मण्य व मुरुग ही दुसरी नावे.
हनुमान रामाचा दास (दास हनुमान ) म्हणून प्रसिद्ध असला तरी यक्ष पूजेतून आलेल्या या देवाची " वीर हनुमान " ही ओळख ग्रामीण भागात आढळून येते.याची देवळे व भक्तगण मोठ्या संख्येने आढळतात.
जर वर सांगितलेली व्याख्या मानली तर विष्णु, राम कृष्ण, (विठ्ठल), शंकर, देवी, गणपती, कार्तिकेय व हनुमान एवढेच देव उरतात.एखादा राहिला असला तर तो धरूनही बोटांवर मोजता येतील एवढेच " देव " खरे.
शरद
आपले लेख मला नेहमी आवडतात. चांगला लेख. भुज मध्ये एक गायत्रीचे (गायत्री मंत्राचे) मंदीर आहे. आपला एक देव दत्त (त्रिमुर्ती) पण त्याची देवळे फार कमी. मला वाटते जसे प्रत्येक माणसाचे एक नशिब असते तसे देवांचे पण असावे. सध्या तिरुपती ह्या देवाची चलती आहे.
मला नेहमी प्रश्न पडतो सोम देवते बद्दल. बाकी वैदीक देवतांचे समजू शकतो - storm and dawn theory मुळे उत्पन्न झालेल्या ह्या देवता आता मागे पडल्या आहेत. सोमरसाचे काय गुपित आहे. हल्ली सोमरस म्हणजे दारू असे साधारण समजले जाते. माझ्या मते सोमरस म्हणजे अजून काहीतरी चांगली वनस्पती असणार त्या काळी - काही प्रकाश टाकू शकाल का ह्या वर.
सोमरसाचे काय गुपित आहे
सोमरस म्हणजे दारु नव्हे, मात्र हे उत्तेजक पेय नक्की आहे. सोमरस काही मुळ्यांपासुन आणि औषधी वनस्पतींपासुन बनवला जातो खासकरुन सोम नावाच्या वनस्पतीचा हा रस / अर्क असतो असे म्हणतात. त्याच्या उत्तेजक गुणामुळे त्याची तुलना दारु शी केली जाते. पुर्वी तो यज्ञात ज्वलनशील व आरोग्यदायी पदार्थ म्हणून वापरला जाई व पिण्यासाठीही वापरला जाई. सोमरसाचे नियमित प्राशन केल्यास शरीर सुदृढ होते आणि कांती सतेज होते तसेच चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात असे वाचले आहे. अशी गुणवैशिष्ट्ये असणारी वनस्पती अफ्रिकेच्या जंगलात मिळते असे ऐकिवात आहे.
देव दारु पीत नव्हते असाही एक गैरसमज आहे. प्रत्यक्षात रामायण महाभारतात मदिरा / मैरेयकाचे उल्लेख आहेत. तिथे सोमरस हा शब्द वापरलेला नाही आहे. अर्थात असाही एक मतप्रवाह आहे की राम कृष्ण इत्यादी मानव रुपधारी देव मदिरा / मैरेयकाचे प्राशन करायचे तर स्वर्गाधिष्ठीत देव आणि त्रिमुर्ती सोमरस प्राशन करायची.
वैदिक आणि पुराणिक काळ
वेदांचे निर्मिती साधारणत: इ.स.पूर्व ५००० ते इ.स.पूर्व २००० पर्यंत चालू होती. वाद नकोत म्हणून थोडी लहान मर्यादा घेत आहे. या काळात देवता मानवसदृश होत्या. इंद्र माणसांच्या लढाईत भाग घेत असे. हळुहळु या देवता विचारवंतांना अपूर्ण वाटू लागल्या. बुद्धानंतर (इ.स.पूर्व ५०० ते इ.स.पूर्व १००)देवतांची माणसाला भासणारी "गरज" निराळी होती. त्यामुळे पुराणांनी शंकर, विष्णु असे देव पुढे आणले.हे देव माणसांसारखे नव्हेत. या अमानवी देवांची तुम्ही भक्ती करू शकता, बरोबरी नाही. हा एक फार मोठा फरक आहे.
सोम रस म्हणजे दारू मव्हे. सोमवल्ली म्हणजे तंबाखू, अफू जशी तरतरी आणतो तशी उल्हसित करणारी वनस्पती. काही दिवसांपूर्वी अशी वल्ली अफगणिस्थान भागात सापडली असा दावा केला गेला होता.सोम या देवाचा व सोमरसाचा संबंध नाही. सोमरस यज्ञाच्या वेळी तयार करून पित व देवांनाही देत. अश्विनीकुमार हे देवांचे वैद्य, पूर्ण देव नव्हेत. त्यांना सोमप्राशनाचा अधिकार नव्हता. त्यांनी च्यवन ऋषींना तारुण्य प्राप्त करून दिले तेव्हा च्यवनांनी त्यांना सोमरस देण्याचे कबूल केले. यज्ञात त्यांना सोमरस मिळणार म्हटल्यावर इंद्र रागावला व च्यवनांवर वज्र घेऊन धावला. ऋषीनी त्याला खिळखिळे करून टाकल्यावर इंद्राने गुपचुप अश्विनीकुमारांचा हक्क मान्य केला.
मानव, असूर व देव ही भावंडेच. त्यात असूरांना ज्येष्ट मानले आहे. पण अशा बाबतीत पुराणांचे एकमत नसते.
(पुराणांवर एक लेख लिहीन म्हणतो. पण एक पुरणार नाही व या पुराणांतील वांग्यात किती जणांना इंटरेस्ट असणार ? असो.)
शरद
शरदराव,
लिहाच हो तुम्ही. आहेत बरेच जण पुराणातल्या वांग्यांचे चाहते.
आणि एक शंका:
साधारणपणे ८००-९०० वर्षांपुर्वीपर्यंत गणपती ह्या देवतेची गणना देवता
म्हणून नव्हे तर असूर किंवा विघ्नकर्ता म्हणून केली जायची असे ऐकिवात आहे.
तर, ह्यामध्ये बदल कधी आणि कसा झाला, गणपती विघ्नकर्त्यापासून विघ्नहर्ता
कसा झाला ह्याबद्दलही थोडं सांगा ना. :)
शिवाय, जशी शिवमंदीरं प्राचिन काळचीही आढळून येतात (अगदी हूण, मुस्लिम वगैरे आक्रमण काळातील किंवा त्याही आधीची) तशी गणपतीची किंवा विष्णूची जुनी मंदिरं आहेत का? त्याबद्दलही वाचायला आवडेल.
वैदिक देवता म्हणजे थोडक्यात पंचमहाभूते असेच दिसते. ह्याचा अर्थ वैदिक काळातील उपासना ही जास्त वास्तवाच्या आणि उपयोग्यतेच्या जवळ जाणारी असावी काय असा प्रश्न पडला.
अवांतरः ह्या आणि अशा विषयांमुळे धाग्यावर अवांतर घडत असल्यास आपण व्यनितून गप्पा मारुया. मला तरी चालेल. :)
वैदिक काळातील उपासना ही जास्त वास्तवाच्या आणि उपयोग्यतेच्या जवळ जाणारी असावी काय असा प्रश्न पडला.
मलाही हा प्रश्न पडला होता आणि माझे उत्तर तरी होय असेच आहे.
साधारणपणे ८००-९०० वर्षांपुर्वीपर्यंत गणपती ह्या देवतेची गणना देवता म्हणून नव्हे तर असूर किंवा विघ्नकर्ता म्हणून केली जायची असे ऐकिवात आहे. तर, ह्यामध्ये बदल कधी आणि कसा झाला, गणपती विघ्नकर्त्यापासून विघ्नहर्ता कसा झाला ह्याबद्दलही थोडं सांगा ना.
ह्यावर नानानी लिहिलेल्या गणरायावरील लेखनाची आठवण झाली. त्यात नानानी अतिशय सुंदर शब्दात ह्या सर्व प्रश्नांची माहिती दिलेली होती. पण सध्या त्याचे लिखाण इथे दिसत नसल्याने दुवा देणे शक्य होत नाहीये.
सुंदर लेखन शरद काका.
वैदिक आणि पौराणिक काळातला एक प्रमुख फरक म्हणजे वैदिक काळात देवादिकांना भेटणार्या मानवांची संख्या खुप जास्त होती. तैतिरीय ब्राह्मण संहितेत असे लिहिले आहे की देव लोक आणि मनुष्य प्राणी दोघेही आधी पृथ्वीवर रहायचे मात्र देवांनी यज्ञ करुन आणि वेदांचे अध्ययन करुन स्वर्ग लोक प्राप्त करुन घेतला तर ती विद्या मानवजातीत केवळ काही ऋषीमुनींपर्यंत मर्यादित राहिली आणि नंतर लुप्त झाली.
कदाचित चुकीचे असेल पण माझ्यामाहितीप्रमाणे सध्या वैश्ववत मन्वंतर चालु आहे आणि त्यातले हे २२ वे चक्र आहे (प्रत्येक चक्रात एक सत्य, त्रेता, द्वापार आणि कलीयुग असते). बहुधा या चक्राच्या आधीचा काळ वेदिक काळा तर त्यानंतरचा पौराणिक काळ म्हणुन ओळखला जातो.
पुराणांचे संकलन वेद व्यासांनी केले. त्यामुळे साधारण ५००० वर्षांपुर्वापासुन इसवीसनापर्यंत पौराणिक काळ अस्तित्वात होता असे मानायला हरकत नसावी.
उत्तम लेख.
सातवाहनकालात वैदिक देवतांचीच पूजा चालत होती. पूजा म्हणजेच हविस -
यज्ञसंस्कृती वगैरे. नाणेघाटातल्या त्यांच्या शिलालेखात सातवाहनांनी दोन
अश्वमेध व एक राजसूय यज्ञ केल्याचे म्हटले आहे. पण त्याचबरोबर
बौद्धधर्माच्या वाढत्या प्रसारामुळे ही प्रथा लयाला गेली व सातवाहनांच्या
अस्तानंतर गुप्त, राष्ट्रकूट, चालुक्य राजवटीत परत मूर्तीपूजा वाढू लागली,
बौद्धधर्माच्या वाढत्या प्रसाराला तोंड देण्यासाठी विष्णू, शंकर, देवी इ.
निम्न देवतांना महत्व देउन त्यांची मूर्तीरूपात उपासना सुरु झाली. हा
प्रसार वाढून पर्यायाने भारतातील बुद्ध धर्म हळूहळू लुप्त होत गेला.
विष्णु व त्याचे राम कृष्ण, विठ्ठल ( हा खरा (३) मधील देव पण त्याला बढती देऊन कृष्णाचा अवतार केला गेला, हा महाराष्ट्र व कर्नाटक या दोन प्रांतांतच लोकप्रिय आहे)
इत्यादी अवतार. य़ांच्या भक्तांना म्हणावयाचे " वैष्णव ". सर्व
हिंदुस्थानात याची देवळे आहेत व मोठ्या प्रमाणात भक्तही आहेत. यांतील पंथ व
उपपंथ लक्षणीय आहेत.
यातल्या बोल्ड केलेल्या भागाशी असहमत. तामिळनाडूमधेही पांडुरंगाचे भक्त
मोठ्याप्रमाणावर आहेत. यूट्यूबवर शोध घेतल्यास त्या पंथाचे तामिळी भक्त
देखील बरेच आहेत हे दिसून येईल. सदर माहीती माझ्या एका तामिळ मित्रानेच
पुरवली होती. "हैय्यो" जर इथे येत असतील तर ते अधिक प्रकाश टाकू शकतील.
वेदातील तेहेतीस देवांवरून कल्पलेली " तेहेतीस कोटी " ही संख्या सोडून दिली तरी देव किती हा एक मजेदार प्रश्न शिल्लक रहातोच.
कोटी हा शब्द प्रत ( दर्जा ,प्रकार) या साठे वापरलेला आहे उदा: उच्चकोटीचे , पराकोटीचे वगैरे.
यात मुख्य तीन देव ब्रम्हा विष्णू महेश (इन्क्लुडिंग त्यांची कुटुंबे)
,पंच महभूते ( पॄथ्वी आप तेज वायू, काल ) ,नवग्रह ( सूर्य ,चंद्र, शनी
वगैरे) अष्टदिशा , अष्टवसु , येतात
ग्रामदेवता वगैरे वैदीक काळात नसाव्यात. त्या नंतर गरजेनुसार निर्माण
झाल्या. किंवा त्या आर्यांच्या पूर्वीच्या संस्कृतीचा भाग असाव्यात.
अवतार ही संकल्पना देखील तशी नवीनच ( उदा रामायणात परशुरामाला देव मानलेले नाही)
ही संकल्पना इसवीसन १२०० च्या नंतर आली असावी.
नित्य उपासना करणार्या सच्च्या उपासकाला, निस्सीम भक्ताला त्याचे इष्टदैवत (एकच दैवत/ काही देवदेवता) पुरे होते. देवाचा दर्जा, प्रत वगैरे काहीही मधे येत नाही असे थोडेफार वाचन केल्याने दिसून आले. उदा. ज्ञानोबा आणि तुकोबारायाना विठ्ठल, मोरया गोसाव्याना गजानान, वासुदेवानन्द सरस्वतीना दत्त इ.
काळानुसार प्रतिकात्मकता बदलली तरी प्रचितीचे बोल बोलणारे एकदाचेच आणि कायमचेच आजतागायत नाहीसे झालेले नाहीत. याचे दोन अर्थ निघू शकतात. प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नसेल तरीही खरोखरच आत्मप्रचिती, ईश्वरी साक्षात्कार वगैरे काहीतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरी शक्यता - भ्रमिष्ट लोक पैदा होण्याची भलीमोठी परम्परा अजूनही खण्डित झालेली नाही.
माणसाला देवान्ची उपासना, भक्ती वगैरे करणे सोडून त्यान्ची खानेसुमारी करण्याची कल्पना इसवीसन पूर्व/ नन्तर कधी सुचली असावी असा एक मजेशीर प्रश्न मलाही पडला. बाकी चालू द्या.
मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट "उगीचच" या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे कि आपले ज्ञान कमी पडतेय. आता नमनालाच घडाभर तेल न ओतता मूळ विषयाला हात घालतो. ३३ कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे हे मी एक संस्कृतचा अभ्यासक म्हणून ठामपणे सांगतो. खर तर येथे कोटी या शब्दाचा अर्थ होतो Degree किंवा सोप्या भाषेत, "प्रकार". कोटी ज्यावेळी आपण पैशासंदर्भात वापरतो तेथेही हाच अर्थ मुळात अभिप्रेत असतो हे खोलवर विचार केल्यास कळते. शिवाय आपण गणितात "बैजिक पदांच्या कोटी" हि संज्ञा वापरतो तेथेही हाच अर्थ अभिप्रेत असतो.
आता प्रश्न असा येईल कि हे ३३ कोटी, म्हणजे ३३ प्रकारचे देवता नेमके कोणत्या?
तर त्यांची नावे देतो. धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६) धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे ८ वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८) हर, बहुरूप, त्रयम्बक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र. (संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२) आणि याखेरीज २ अश्विनीकुमार! असे सारे मिळून ३३ प्रकारच्या देवता होतात.(विक्रम श्रीराम एडके)
आज हयातीत जगातील एकही धर्म विज्ञान-निष्ठ नाही...किंबहुना अ-विज्ञाननिष्ठा हीच प्रत्येक धर्माची खरीखुरी मर्यादा आहे...जेंव्हा जेंव्हा अशी भाषा वापरणाय्रांना या विषयातली आव्हानं अंधःश्रद्धा निर्मुलन वाद्यांकडुन टाकली जातात...(जुन्या काळातल्या चार्वाकांपासुन ते आजच्या काळातल्या सर्व समाजसुधारक /अंधःश्रद्धा निर्मुलकां पर्यंत सर्व)...तेंव्हा कोणीही समोर येत नाहीत,आले तर नंतर कांगावा करुन पळुन जातात,काही जण हिंसक मार्गांचाही आश्रय घेतात.हाच आजपर्यंतचा ईतिहास आहे...धर्म विज्ञाननिष्ठ आहे असं म्हणणं,आपल्याच धर्माला कमीपणा आणणारं आहे,आपणही हिंदु आहात.मी ही हिंदु आहे..आपल्याला १ विनंती ....सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध एकदा काळजी पुर्वक वाचावेत...मला वाटते,आपला भ्रम दुर होईल....
वरील प्रतिक्रीयेत जे काही आपण सांगुन दिलं, त्यात विज्ञाननिष्ठ अस काय आहे? कुणी ३३हजाराची मांडणी करावी,कुणी ३३कोटी,कुणी ३३, कुणी ये सब झुठ...एकच ब्रम्ह आहे म्हणावं...धर्माचे १७शे६० आचार्य...आणी अजुन त्यांची खंडिभर मत आणी मतांतरंही...अहो पण याला सगळ्याला पुरावा काय?...ह्याला असं वाटतं,तर त्याला तसं वाटतं,या ''वाटण्याला'' विज्ञानात काही अर्थ(तोही प्राथमिक पातळीवरचा)असतो...पण पुढच्या चिकित्सेत हे सगळच ओमफस होतं,तरीही हिंदु धर्मातलं जे जे काही विज्ञाननिष्ठ आहे असं वाटत,त्याची १ यादी करा...आपण आणी आपले सर्व समर्थक हे आव्हान घेऊन महाराष्ट्र अंनिस कडे चला... त्यांच्यासमोर हे सर्व मांडा,,,,सांगा केंव्हा करताय हे सर्व?...ईथे वाद-प्रतीवाद करत बसण्यापेक्षा,खरा आखाडा तो आहे...येणार का?
मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट
"उगीचच" या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे कि
आपले ज्ञान कमी पडतेय.
असेच म्हणतो.
मी येथे
आपल्या वेदग्रंथांचा खूप गम्भिर्याने अभ्यास करण्याची गरज आहे हे सांगितलेच
होते. कुणी सांगाव कदाचित अशा अभ्यासातून प्रकाश वेगाने जाणारी याने कशी
बांधावी हे ही सापडेल (हा कदाचित "सापडेल" याला आहे. अशी माहीती ऑलरेडी
वेदात आहे यात तिळमात्र शंका नाही). भारत सुपर पॉवर होणार नुसतच म्हणत
राह्तात. पण असा जर अभ्यास केला नाही तर कसा होणार भारत सुपर पॉवर?
हे सगळ आधिच आपल्या धर्मवेत्यांना माहित होत...हा नेहमीच केला जाणारा खोडसाळ अपप्रचार आहे.(आणी अधीच शोध लागलेले आहेत,तर या पुढचे पुर्ण/अपुर्ण अवस्थेत असलेले सगळे शोध तुम्हीच लाऊन दाखवा ना..विज्ञान वाद्यांना कशाला चान्स शिल्लक ठेवता?) तुमच्या सारख्या लोकांना आत्मवंचनेचं अजिबात भय नसत,म्हणुन तर तुम्ही कायम अश्या वावड्या उडवीत असता.म्हणुन गेली ५ हजार वर्ष नुसता अभ्यासच करत बसला आहात,एकही शोध लागला नाही,आणी असा शोध लागण शक्य नाही याचा तुमच्या सारख्यांना बोध झाला नाही...विज्ञान जगातल्या सगळ्या धर्मांपासुन बाजुला निघाल,वेगळ झालं,ते काही उगाच नव्हे.मग आमच्या सारख्यांनी कीतीही नम्रपणानी आवाहन केली,किंवा कठोर पणानं निर्विष हेतुनी आव्हानं दीली,तरी तुम्ही लोक जुमानत नाही.कारण तुम्हाला तुमचा अंधळा अहंकार जपायचा असतो...तुम्ही वेदग्रंथांचा अभ्यास गांभीर्यानं करायचा सल्ला देता...तरीही तुम्हाला१सांगतो.हे असले समलाक्षणिक भ्रम दुर करायची किंवा तपासुन पाहण्याची ईच्छा असेल,म्हणजे प्रकाश वेगान जाणारी विमानांची सुत्र/अणुचा सिद्धांत वगैरे..,तर लेखक वि.शं.ठकार यांचे ''विज्ञान आणी आध्यात्मःमुळा पासुन द्रुष्टीक्षेप''...मऊज(mauj) प्रकाशन...हे पुस्तक नम्रपणे गांभीर्यानी वाचुन पहा...म्हणजे आपल्या धर्माची मर्यादा काय,हे तरी कळेल...तुमच्या सारख्यांशी माझं काही वैर नाही.फक्त मी ज्या अंधारातुन बाहेर आलो,त्यातुन तुम्हीही यावं ही १ आपली भाबडी ईच्छा...
ता क---ज्याला आपण हिंदु आहोत अस मनापासुन वाटतं,त्यानी प्रथम हिंदुत्ववादी असलेल्या सावरकरांचं तर सगळं लेखन वाचायला हव... सावरकरांचे ''विज्ञाननिष्ठ निबंध'' हे हिंदुंचं एंटिव्हायरस आहे...ते टाकलं नाही,तर धर्मवादाचे विषाणु आपली हयात असलेली समाज व्यवस्था बिघडवणार हे नक्की...
वरती मृत्यंजय म्हणतात त्याप्रमाणे काही काळापुर्वी देव आणि मानव पृथ्वीवर राहत होते.
मग मला प्रश्न पडतो देवांना काय फक्त भारतच दिसत होता काय ?
नाही. देव ही संकल्पना जगाच्या पाठीवर सगळीकडेच सापडते. ग्रीकांमध्ये सुद्धा आपल्यासारखे देवी देवतांचे भारी प्रस्थ होते. फक्त आपल्याकडे देव हा दायाळु, करुणानिधी, सज्जन तारणहार आहे तर ग्रीक देवी देवता प्रचंड शक्तिशाली परंतु मानवासारखे स्वार्थापोटी राग लोभ धरणारे आहेत. भारतात देवतांना राग येतो तोही अयोग्य कृत्य केल्याबद्दल. तर ग्रीक देवता या बर्यापैकी इन्द्राशी साधर्म्य साधणार्या आहेत की ज्या कधीकधी स्वार्थासाठीही चिडतात.
इंद्र आणि झ्युस (ग्रीक देवांचा राजा) यांत बर्यापैकी साम्य आहे. दोघेही पर्जन्य नियंत्रित करतात. दोघेही अस्त्र म्हणुन वज्र वापरतात. (वज्राचा आकार वीजेसारखाच दाखवला जातो बर्याचवेळा आणि महाभारताच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये तर त्याला थंडरबोल्टच म्हणले आहे. झ्युस देखील थंडरबोल्ट वापरतो.
ट्रॉयच्या कथेत आणि महाभारतातदेखील अनेक साम्ये सापडतील:
१. अचिलीस आणि कृष्णात साधर्म्य आहे की दोघेही पायाच्या खालच्या बाजुला बाण लागुनच मेले.
२. कृष्णाचे शरीर सांदिपनी ऋषींनी दिलेल्या लेपामुळे इतर अस्त्रांपासुन
सुरक्षित होते तर अचिलीसला त्याच्या आईने थेटीसने मंतरलेल्या पाण्यात
बुडवल्यामुळे त्याचे शरीर इतर अस्त्रांपासुन सुरक्षित होते. कृष्णाला
दिलेला लेप फक्त उजव्या पायाच्या अंगठ्याला लावता आला नाही तर थेटीसने
अचिलीसला पाण्यात बुडवताना त्याच्या टाचेला धरुन बुडवले त्यामुळे त्या
भागाला मंतरलेले पाणी लागले नाही अशी कथा आहे.
३. ट्रॉय मध्ये अचिलीसला देवांच्या राजाचा (झ्युस) आशिर्वाद होता तर महाभारतात अर्जुनाच्या पाठीशी इंद्र होता.
४. ट्रॉय मध्ये हेक्टरच्या पाठीशी सुर्य देवता होती तर महाभारतात कर्णाच्या पाठीशी देखील सुर्यच होता.
५. दोन्ही युद्धात देवांच्या राजाने पाठिंबा दिलेल्या योद्धाने सुर्याने पाठिंबा दिलेल्या योद्ध्याला हरवले.
६. झ्युसच्या वडिलांना असे कळाले होते की त्याचा मुलगाच त्याला मारेल.
त्यामु़ळे त्याने त्याची सर्व मुले खाउन टाकली एकता झ्युस वाचला (त्याच्या
वाचण्यात नदीच्या पाण्याचा हात होता). कंसाची कथाही अशीच आहे.
अजुन छिद्रान्वेषी अवलोकन केल्यास अशी बरीच साम्ये दिसतील.
देवांच्या खाणाखुणा जगभर पसरलेल्या आहेत. कॉकेसियन पर्वतरांगांमध्ये भलामोठा त्रिशूळ कोरलेला आहे. नाझ्का लाइन्स बद्दल सर्वांना माहिती आहेच. देव ही संकल्पना इजिप्शियन, ग्रीक, रोमन, मायन, सिंधु अश्या सर्व संस्कृतींमधुन दिसते. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मात एकेश्वरवाद आहे. पण वरील सर्व संस्कृतीत एकापेक्षा आधिक देव होते.
महाभारतातील व्यक्तीचित्रे-१ कुंती
राजमाता कुंती
"काही द्यायचंच असेल " या कवितेच्या सुरवातीलाच आपण कुंतीच्या मागणे पाहिले होते. एका सम्राटाच्या पत्नीने, पाच जगज्येत्या पुत्रांच्या आईने असे मागणे जरा विचित्रच वाटते नाही ? पण तुम्ही संपूर्ण महाभारत वाचले असेल, संस्कृतमध्ये म्हणत नाही मी, पण मराठी भाषांतर, तर तुम्ही तसे म्हणणार नाही. दुर्दैवाने ६००-७०० पानांचे सात खंड वाचणे सगळ्यांना शक्य नाही हे ही मला समजते. त्यामुळे काही फुटकळ गोष्टी, एखाददुसरी कादंबरी एवढ्यावरच आपण आपले वाचन संपविलेले असते. त्यामुळे काय होते आपण आपली मते तेवढ्याच ज्ञानावर बनवतो. त्यामुळे कर्णाचा बालपणीचा त्याग ही कुंतीची चूक, द्रौपदी वस्त्रहरणाच्यावेळी दुर्योधनाला न आवरणे ही भीष्मांची चूक, कर्णाला केवळ कृष्णाच्या मदतीनेच अर्जून मारू शकला, असे आपणास वाटू लागते. मी सगळे महाभारत सांगत बसणार नाही, ते अशक्यच आहे, पण काही महत्वाच्या व्यक्तींची चित्रे महर्षी व्यासांनी कशी रेखाटली आहेत ते पहाणे मनोरंजक आहे. काही नवीन माहितीही आपणास मिळण्याची शक्यता आहे. इथेच एक लक्षात घ्या. हे लेखन ३५०० वर्षांपूर्वीचे आहे. त्या वेळच्या समाजाच्या, धुरिणांच्या काही श्रद्धा होत्या, नीतिकल्पना होत्या, त्यांना धरूनच व्यक्ती वागत होत्या. आजच्या आपल्या धारणा निराळ्या आहेत; त्यांना समोर ठेवून त्या वेळच्या व्यक्तींच्या वागण्याला बरोबर -चूक म्हणणे योग्य ठरणार नाही. असो.
कुंती ही शूर राजाची मुलगी. श्रीकृष्णाची आत्या. शूराचा आतेभाऊ कुंतीभोज याला अपत्य नव्हते म्हणून शूराने त्याला सांगितले की माझे पहिले अपत्य मी तुला देईन. त्या प्रमाणे कुंती आपल्या लहानपणापासून दुसर्याच्या घरी वाढली. कुंतीभोजाकडे एकदा दुर्वास ऋषी रहावयास आले..राजाने कुंतीला त्यांच्या सेवेकरता ठेवले. कुंतीच्या मनोभावाने केलेल्या सेवेने प्रसन्न होऊन त्यांनी तिला एक मंत्र दिला व सांगितले की " या मंत्राने ज्या ज्या देवाला आवाहन करशील तो तो देव आपल्या प्रभावाने तुला पुत्र देईल ". कुंतीच्या दुर्दशेला येथूनच सुरवात झाली. बालसुलभ औत्सुक्याने, अजाणता तिने समोर दिसलेल्या सूर्याला आवाहन केले. तो समोर आल्यावर गोंधळून, काय करावयाचे म्हणून त्याला नमस्कार करून परत जावयास संगितले. त्याला ते शक्य नव्हते. सूर्याने तिला " तुझे कौमार्य अबाधित राहील " असे सांगून तत्काळ जो पुत्र दिला तो कर्ण. आता दुसर्याच्या घरात रहाणार्या , अविवाहित मुलीने काय करावयाचे ? ती काही विसाव्या शतकात अमेरिकेत रहात नव्हती. नातलगांच्या लक्षात येऊ नये म्हणून तिने एका पेटीत,धन, दागिने व कवचकुंडलेयुक्त मुलाला ठेवून ती पेटी नदीत सोडली. ती अधिरथ नावाच्या सूताला सापडली व त्याने मुलाला आपल्या घरी नेले. तेव्हा पासून कर्ण सूतपुत्र म्हणून ओळखला जाऊ लागला. कुंतीला पुढे अनेक वर्षे त्याची माहिती नव्हती.
नंतर कुंतीचे पाण्डूशी लग्न झाले व ती कुरुवंशाची साम्राज्ञी झाली. माद्रीवर तिचे धाकट्या बहिणीसारखे प्रेम होते. पाण्डूला मृगयेचा नाद असल्याने भीष्मांवर राज्याचा भार सोडून तो अरण्यातच विहार करत असे. तेथे त्याला एका ऋषीचा शाप मिळाला की शरीरसुखाकरिता तू स्त्रीला स्पर्श केलास की तू मृत्यु पावशील. निपुत्रिक मरावयाचे नाही म्हणून त्याने कुंतीला नियोग पद्धतीने पुत्र प्राप्त करून घे असे सांगितल्यावर कुंतीने त्याला आपल्याला मिळालेला वर सांगितला. आनंदित झालेल्या पाण्डूच्या सांगण्यावरून तिला प्रथम धर्म, तेवढ्याने पाण्डूचे समाधान होईना म्हणून मग भीम व नंतर अर्जुन हे पुत्र झाले. मग मात्र तिने पाण्डूला सांगितले की आता या पुढे पुत्र मिळवणे ही वेश्यावृत्ती होईल. मग माद्रीने तिला विनंती केली की तुला पुत्र नको असेल तर मला मंत्र दे ; मी निपुत्रिक रहाणार नाही. मोठ्या मनाने तिने ती विनंती मान्य केली व माद्रीला नकुल-सहदेव ही मुले झाली.
समभाव
पाण्डूच्या मृत्युनंतर कुंती सती जाणार होती तेव्हा माद्री तिला म्हणाली "
मी तुझ्या व माझ्या मुलांना सारखेच वागवीन याची मला खात्री देत येत नाही
पण मी सती गेले तर तू सगळ्यांना सारखेच वागवशील याची मला खात्री आहे "
सवतीच्या मनांत इतका विश्वास निर्माण करण्यासाठी तुमची वागवणुक किती थोर
असावयास पाहिजे ? आपल्या चांगुलपणाचा वारसा तिने पुढील पिढीतही पोचविला.
यक्षप्रश्नांच्या वेळी यक्ष प्रसन्न होवून युधिष्ठिराला तुझा एक भाऊ जिवंत
होईल असे सांगतो त्यावेळी धर्म अर्जुन किंवा भीमाला जिवंत कर असे न सांगता
नकुलाला जिवंत करावयास सांगतो. यक्ष चक्रावून त्याला विचारतो ज्यांच्या
जोरावर तू परत राज्य मिळवू शकशील असे अर्जुन वा भीम यांच्या ऐवजी तू नकुल
का निवडलास ? धर्म म्हणतो " माझ्या पित्याला दोन बायका होत्या. मला दोन्ही
समानच आहेत, जर कुंती पुत्रवती असणार तर माद्रीही पुत्रवतीच असली पाहिजे.
स्वत:सारखे इतरांना करणे जास्त महत्वाचे.
मोठा आघात
हस्तिनापूरला आल्यावर तिच्यापुढे दु:र्योधना-शकुनीपासून आपली मुले वाचवणे
याची काळजी घ्यावी लागली. भीमाला विषप्रयोग झाला तरी तिने त्याची वाच्यता
केली नाही. विदुराच्या मदतीने सर्व त्रास गुपचुप सहन केला. शिक्षण
संपल्यावर तिच्यावर एक मोठा आघात झाला. तिला आपला पहिला मुलगा इतक्या
वर्षांनंतर दिसला पण परिस्थिती काय होती ? मोठ्या मुलाने धाकट्या मुलाला
युद्धाचे आव्हान दिलेले ! या धक्क्याने ती बेशुद्धच पडली. या वेळीही
कर्णाची ओळख पटविणे शक्य नव्हते.
उपकाराची फेड प्रत्युपकाराने
नंतर लाक्षागृहाचा प्रसंग ओढावला. रानात कुंतीला तहान लागली तर पाणी
पिण्यास भांडे नाही म्हणून भीमाने जाड कापड भिजवून, ते पिळून कुंतीला पाणी
पाजले. पुढे एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी ते उत्ररले होते.
बकासूराला बळी म्हणून त्या कुटुंबावर पाळी आली तेव्हा कुंतीने " माझा
मुलगा भीम जाईल, तुम्ही काळजी करू नका " असे त्यांना सांगितले. याचा
धर्माला राग आला." दुसर्याकरता आपल्या मुलाचा बळी तू देत आहेस, तुझी
बुद्धी दुर्बळ झाली का ? " असे त्याने विचारल्यावर कुंतीने दिलेल्या
उत्तरात तिच्या हृदयाचे औदार्य दिसून येते. ती म्हणते " आपण यांच्या घरी
उतरल्याने त्यांचे आपल्यावर उपकार झाले आहेत. उपकाराची फेड दुप्पट
प्रत्युपकाराने करणे हेच पुरुषार्थाचे खरे कर्तव्य आहे. भीमाच्या बळाबद्दल
मला खात्री आहे".
द्युतानंतर पांडव वनवासाला निघाले त्यवेळी तिने द्रौपदीचा गौरव करून
तिला सांगितले " हे सद्गुणसंपन्न साध्वी, तू आपल्या बापाच्या व पतीच्या
कुळाला भूषविले आहेस. तू अत्यंत शीलाचारसंपन्न असून तुला स्त्रीयांचा धर्म
कळतो. संकटात धर्मच तुझे रक्षण करील व तुला लवकरच कल्याणकारक दिवस प्राप्त
होतील.
वनात सर्वांहून अधिक सहदेवाची काळजे घे.तो सर्वात धाकटा आहे ". या घोर दु:खातही तिला जास्त काळजी माद्रीच्या मुलाची आहे.
क्षात्राणी
कृष्णशिष्टाई नंतर कृष्ण कुंतीला भेटावयास आला त्यावेळी तिने त्याच्याबरोबर
मुलांना जो निरोप पाठवला त्यात प्रसिद्ध विदुलेची गोष्ट आहे. विदुला
आपल्या मुलाला सांगते की तू क्षत्रीय आहेस. युद्धात मरण पावलास तरी चालेल,
भ्याडपणे जिवंत राहू नकोस. मुलाला आश्चर्य वाटते की आपली आई असे कसे काय
म्हणते.पण विदुलेने त्याला त्याचा धर्म समजावून सांगितला व युद्ध करून तो
विजयी झाला. तोच संदेश कुंती आपल्या मुलांना पाठवते. युधिष्ठिराला ती
सांगते "भलत्या गोष्टीला धर्म म्हणून कवटाळून बसू नकोस.तुझे राज्य लढून
मिळव ; भीक मागून नको. राजाने योग्य ठिकाणी दंडनीतीचा उपयोग केलाच पाहिजे.
याच ठिकाणी ती
कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणं !
इति ते संशयो ना भुद्राजा कालस्य कारणं!!
हे सुप्रसिद्ध वचन त्याला सांगते.भिक्षा मागून पोट भरणे हा ब्राह्मणाचा
धर्म, शेती-व्यवसाय हा वैश्यांचा धर्म व सेवा हा शूद्रांचा धर्म ; हे
तुझ्याकरिता नाहीत. वाडवडीलांपासून प्राप्त झालेले राज्य तू लढूनच मिळव.
याच करिता मुलाची अपेक्षा आईवडीलांना असते. आपल्या पितामहांना शोकसागरात
अथवा अधोगतीत बुडवू नकोस. अर्जुन-भीमाला निरोप सांग की द्रौपदीची विटंबना
विसरू नका ."
आईचा शोक
युद्धाआधी कर्णाला भेटून तिने त्याला खरी परिस्थिती सांगून युद्ध
थांबविण्याचा प्रयत्न केला. पण आता फार उशीर झाला होता. युद्धानंतर मात्र
तिचा बांध फुटला व तिने पांडवांना कर्ण हा तुमचा मोठा भाऊ असल्याचे
सांगितले. शेवटचे विधी तरी योग्य तसे व्हावेत एवढीच इच्छा !
खरी आर्य स्त्री
कुंतीचा खरा मोठेपणा युद्धानंतरच दिसून येतो. राजधानीत तिने आपले आयुष्य
धृतराष्ट्र- गांधारी यांच्या सेवेत घालवले.ती दोघे वनात निघाली तेव्हा तीही
त्यांच्याबरोबर वनात गेली. भीम म्हणाला की " तुला जर वनातच जावयाचे होते
तर एवढे युद्ध करावयास आम्हास का सांगितलेस ?" कुंती म्हणाली "तुमचे
कर्तव्य तुम्ही करावे म्हणून मी तसे सांगितले. मला काही राज्योपभोग
घ्यावयाचे नव्ह्ते. राजा पाण्डूच्या काळात मी यज्ञ केले, दान दिले, उपभोग
घेतले. मला यांची आता काही इच्छा नाही." सासूसासर्या सारखे असलेल्या त्या
दोघा वृद्धांची सेवा करण्यात तिने उरलेले आयुष्य वेचले व त्यांच्या बरोबरच
ती वणव्यात नाहिशी झाली.
नियतीचे विचित्र खेळ कुंतीच्या आयुष्यात पहावयास मिळतात. असे व्हावयास नको होते एवढेच आपण म्हणू शकतो.
शरद
कुंतीचं आयुष्य असामान्यच म्हटलं पाहिजे. तिने कृष्णाकडे दु:ख मागून घेतलं असं म्हणतात, पण खरं तर तिला ते जन्माला आल्यापासून मिळालेलंच होतं. तिच्या संपूर्ण आयुष्याची उत्तम ओळख करून दिली आहेत.
हे लेखन ३५०० वर्षांपूर्वीचे आहे. त्या वेळच्या समाजाच्या, धुरिणांच्या काही श्रद्धा होत्या, नीतिकल्पना होत्या, त्यांना धरूनच व्यक्ती वागत होत्या. आजच्या आपल्या धारणा निराळ्या आहेत; त्यांना समोर ठेवून त्या वेळच्या व्यक्तींच्या वागण्याला बरोबर -चूक म्हणणे योग्य ठरणार नाही.
चर्चा करताना सर्वांनी हे लक्षात घेतलं तर फार बरं होईल.
ते विचित्र ऋषि दुर्वास ऋषी असल्याने त्याचा क्रोध टाळण्यासाठी काही ही न बोललेले बरे Smile !
सहमत!!!.. दुर्वास हे अत्यंत तापट स्वभावाचे "तपस्वी" होते. आपल्या योगसामर्थ्याने आपल्या शापाने अनेकांच्या आयुष्याची त्यांनी वाट लावली होती.. अर्थात "तपस्वी" लोकांचा तो गुणधर्मच असतो.. एखाद्याने त्यांच्यासाठी केलेली सेवा त्यांना आवडली, तर ते खूप चांगला आशीर्वादही द्यायचे. आणि एखाद्याने/ एखादीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर त्यास ते शाप देऊन मोकळे व्हायचे...
उदा.:- दशरथ-पत्नी कैकेयीने लहानपणी दुर्वासांची मनोभावे सेवा केली म्हणून त्यांनी ती'स ("ती'स म्हणजे तिला.. सन्दर्भः उंच माझा झोका. :) ) आशीर्वाद दिला,की "तुझ्या हातास यश येईल". आणि त्यानुसार कैकेयीने एका युद्धाच्या वेळेस दशरथाच्या रथाचे तुटलेले चाक हाताने तोलून धरले..व दशरथास जिंकवून दिले.
तसेच एकदा कैकेयीने दुर्वास तपा'स बसलेले असता गम्मत म्हणून काजळाचे हात त्यांच्या गालास लावले... पण तपा'तून बाहेर आल्यावर दुर्वासांना जेव्हा हे कळलं.. तेव्हा त्यांनी कैकेयीस शाप दिला, की "जगात तुझे तोन्ड काळे होईल".. आणि रामास वनवासास पाठवल्यामुळे कैकेयीला तो शापदेखील फळला..
अर्थात हे शाप-आशीर्वाद तपस्वी स्वतः स्पॉन्टेनिअसली देत असल्याने त्यांच्या वाचासिद्धीमुळे त्या बाधित व्यक्तीच्या हातून त्या त्या नुसार चांगली वाईट कर्मे घडत असतात.
तसेच दुर्वास'जींचे अजून एक उदाहरण म्हणजे शकुन्तला!!.. शकुन्तला जेव्हा गान्धर्वविवाहानन्तर तिच्या नवर्यास (पक्षी: राजा दुष्यन्तास) भेटायला चालली होती.. तेव्हाच नेमके दुर्वास'जी आश्रमात आले.. पण शकुन्तलेचे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही.. म्हणून ते चिडले आणि त्याचक्षणी तिला शाप दिला.. की "तू ज्यास भेटावयास चाल्लीयेस.. तो तुला ओळखणारही नाही..".. झालं... त्यानन्तर मग जलप्रवासात दुष्यन्ताने दिलेली अंगठी शकुन्तलेच्या बोटातून नकळत पाण्यात पडली.. आणि तिच्यापाशी दुष्यन्त राजा'ची एकही निषाणी उरली नाही... (सिवाय उसके पेटमे पलनेवाले बच्चे के..)... ;)
(ह्याच्च बच्च्या'च्या नावाने म्हणजे "भरता"च्या नावाने आपल्या देशाला "भारत" हे नाव पडले.. )
आणि इकडे दुष्यन्त राजालाही अल्झायमर'ने थोड्या काळासाठी पछाडलेले असल्याने त्यास शकुन्तलेची विस्मृती झाली... त्यामुळे शकुन्तलेस विन्मुख होऊन परतावे लागले..
अर्थात पुढे एका "ताईता" मुळे दुष्यन्त राजास कळाते, की "भरत" त्याचाच मुलगा आहे.. असो...
तात्पर्य असे, की दैवयोजनेनुसार आणि स्वतःच्या हातातील कर्माने
"दुर्वास"मुनींनी अनेक जणांना शाप देऊन बेजार केले होते... व स्वतःचा दबदबा
निर्माण केला होता. आणि अनेकांनी त्यांच्याबद्दल विष्णुकडे तक्रारीही
केल्या होत्या.. त्यापैंकीच एक म्हणजे "अम्बरीश राजा"...तो महान
विष्णुभक्त होता... दुर्वासांनी एकदा स्वतःच्या खोट्या अहंकारापोटी
अम्बरीशा'स शाप दिला.. तो शाप चुकवण्यासाठी अम्बरीश राजा विष्णुला शरण
गेला... अम्बरीशाचा शाप विष्णुने स्वतःवर घेतला... पण दुर्वासमुनींची खोड
कायमचीच मोडण्यासाठी विष्णुने त्यांच्यावर सुदर्शनचक्र सोडले..... आणि मग
मात्र त्या चक्रापासून स्वतःला वाचवण्यासाठी दुर्वास'जी धूम्म्म्म पळत
सुटले... आपल्या तपःसामर्थ्याच्या अति अहंकारापोटी अनेकांची आयुष्ये बरबाद
करणार्या दुर्वासांनी मग विष्णुपुढे शरणागती पत्करली..व स्वतःची जान बख्श
देण्याबद्दल विनन्ती केली... :)
पण विष्णुने मात्र त्यांना त्यांच्या अपराधांसाठी शाप दिला की, "दुर्वास
यापुढे अनेक जन्म सरपटणार्या प्राण्याच्या रूपात बिळात भीतीने लपून
राहतील.. व अत्यंत घाबरत घाबरत आयुष्य जगतील.."
तात्पर्यः आपल्याकडे कितीही शक्ती असली तिचा उगीचच दुरुपयोग करू नये.. नैतर विष्णु खूप वाईट शिक्षा देतो!.. (विष्णु- म्हणजे भगवान विष्णु- लक्ष्मीपती होय... नैतर कुणाला वाटायचं.. की पिन्जरा'तल्या तुसगावच्या आक्काचा अडाणी उजवा हात - विष्णु!!! ;) ;) )
ह्या दुर्वास ऋषींच आयुष्य किती असावं..म्हण्जे शाकुंतल मध्येही तेच, रामायणात तेच, आणि महाभारतातही तेच....
ह्म्म... खरंय.. हे दुर्वास मुनी म्हणजे चांगदेवांच्या वरताण होते..
चान्गदेवांनी त्यांचं आयुष्य १४०० वर्षांनी वाढवलं होतं..... पण
दुर्वास'जीं युगानुयुगं...तसेच्च होते... अर्थात आपल्या योगसामर्थ्याच्या
जोरावर!!!!
पान्डवांना या दुर्वास'जींचा फायदा झाला... कृष्णामुळे... :)
द्यूतात हरल्यानन्तर वनवासात पान्डवांच्या सूर्योपासनेमुळे सूर्यदेवाने
द्रौपदीला एक जादुई थाळी दिली होती...ती थाळी सूर्यास्तापर्यन्त पान्डवांना
पायजेल तेवढे जेवण देत असे.... पण सूर्यास्तानन्तर तिचा प्रभाव सम्पत असे.
ही गोष्ट कौरवान्ना माहित असल्याने दुर्योधनाने दुर्वासांना मुद्दाम
पान्डवांकडे रात्रीच्या वेळेस जेवण मागायला पाठवले.. त्यावेळी दुर्वास आणि
त्यांचे पाचशे शिष्य पान्डवांकडे रात्री जेवायला गेले.. प्रसन्गावधान
राखून द्रौपदीने त्या सगळ्यांना जेवायच्या आधी स्नान-सन्ध्या करण्यासाठी
जवळच्या नदीवर पिटाळले..
आणि तेवढ्या वेळात द्रौपदीने कृष्णास बोलाविले... व आपली व्यथा सान्गितली.. "कृष्ण" द्रौपदीचा भाऊ असल्याने आणि अर्थातच तो देव असल्याने तिने स्मरण केल्या केल्या तो यायचा... तेव्हा कृष्णाने त्या जादुई थाळीला चिकटलेले एक भाजीचे पान खाल्ले.. व दुर्वासांच्या आणि त्यांच्या शिष्याचे पोट भरले.. त्यांनी पान्डवांना भुरभुरुन (हा भरत जाधव'चा शब्द! ;) ) आशीर्वाद दिले...
कृष्ण नसता.. तर दुर्वासान्नी पान्डवांची वाट लावली असती.. हे नक्की... पण शेवटी देव तारी त्यास कोण मारी? :)
मलाहि हाच प्रश्न काही काळापूर्वी पडला होता. शोधा - शोध केली तेव्हा एक पुस्तक सापडले.कोणी " भारतीय विवाह संस्थेचा इतिहास" ह्या पुस्तका बद्दल ऐकले आहे कि नाही ते माहित नाही. पण ह्यात बर्याच गोष्टींचे स्पष्टीकरण दिले आहे आणि ते पटण्या सारखे आहे. खरे खोटे वि. का. राजवाडे ह्यांनाच माहित.तरी त्या पुस्तकाचे pdf लिंक इथे देत आहे. कोणाला हवे असल्यास वाचावे.
ह्यात राजवाडे ह्यांनी म्हटले आहे कि तेव्हा समाज
पितृसत्ताक नसून मातृसत्ताक होता. तेवा विवाह संस्था अस्तिवात नव्हती,
तेव्हा स्त्री ला आपल्या आवडत्या कोणत्याही पुरुषाशी शरीर संबंध ठेवता येत
असे. मुलांची नावे हि मातृ नामावरून असत. हे महाभारत लिहिताना महर्षी
व्यासांनी काहीतरी गडबड करून नवीन कथा रचल्या आणि हा व्यभिचार लपवला.
प्रेषक शरद ह्यांच्या म्हणण्यानुसार
हे लेखन ३५०० वर्षांपूर्वीचे आहे. त्या वेळच्या समाजाच्या, धुरिणांच्या काही श्रद्धा होत्या, नीतिकल्पना होत्या, त्यांना धरूनच व्यक्ती वागत होत्या. आजच्या आपल्या धारणा निराळ्या आहेत; त्यांना समोर ठेवून त्या वेळच्या व्यक्तींच्या वागण्याला बरोबर -चूक म्हणणे योग्य ठरणार नाही.
ह्याचा विचार करून मी माझे वैयक्तिक मत मांडत नाही. ह्या सर्व गोष्टी ह्या पुस्तकात राजवाडे ह्यांनी मांडल्या आहेत. विषय निघाला आहे तर सर्वांपर्यंत हि माहिती पोहोचावी म्हणून लिंक पण दिली आहे.
तो
समोर आल्यावर गोंधळून, काय करावयाचे म्हणून त्याला नमस्कार करून परत
जावयास संगितले. त्याला ते शक्य नव्हते. सूर्याने तिला " तुझे कौमार्य
अबाधित राहील "
ह्याबद्दल वेगळं ऐकलय.
http://www.misalpav.com/node/3866
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास (इतिहासकार राजवाडे)
वनपर्वाच्या ३०७व्या अध्यायात सूर्य म्हणतो, "हे कुंती, कन्या शब्दाची उत्पत्ती कम् धातूपासून झालेली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा धरू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे. स्त्रिया व पुरूष यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून, विवाहादिक संस्कार सर्व कृत्रिम आहेत. यास्तव तू माझ्याशी समागम कर. ..."
आता बोला!
हा भाग आदिपर्वातल्या संभवपर्व नावाच्या उपपर्वात येतो.
माहितीबद्दल आभार.
हे अभ्यासावतारी,हास्यमुख बालका वल्ली तुला सतत विविध ग्रंथांचे वाचन
करायचे व त्याचे मिपावर संदर्भ द्यायचे वरदानच मिळाले आहे. तुझा विजय असो.
मात्र माझ्या प्रतिसादातील माहिती म्हण्जे केवळ निरोप्याचे काम होय.
त्याच्या पूर्ण यशापयशाचे श्रेय हे त्या मूळच्या दागाकर्त्यांना व राजवाडे
ऋषींना जाते.
चला आता अंतर्धान पावीत आहे.
तुझा पुनश्च विजय असो.
त्या प्रमाणे कुंती आपल्या लहानपणापासून दुसर्याच्या घरी वाढली. कुंतीभोजाकडे एकदा दुर्वास ऋषी रहावयास आले..राजाने कुंतीला त्यांच्या सेवेकरता ठेवले. कुंतीच्या मनोभावाने केलेल्या सेवेने प्रसन्न होऊन त्यांनी तिला एक मंत्र दिला व सांगितले की " या मंत्राने ज्या ज्या देवाला आवाहन करशील तो तो देव आपल्या प्रभावाने तुला पुत्र देईल "
इति दुर्वास
आणि
"हे कुंती, कन्या शब्दाची उत्पत्ती कम् धातूपासून झालेली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा धरू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे. स्त्रिया व पुरूष यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून, विवाहादिक संस्कार सर्व कृत्रिम आहेत. यास्तव तू माझ्याशी समागम कर. ..."
इति सूर्य
यावरुन तरी असे वाटते की, महाभारत खरे जसे घडले आणि जेव्हा जसे लिहिले गेले त्यात अंतर आहे. ऋषि कुंतीला कोणत्या का भूमिकेतून होईना पण मंत्र देतो. यावरून तरी असे वाटते की महाभारत जसे घडले असेल त्याकाळी कामोपभोगांना आजच्यासारखे अदखलपात्र न मानता, तो जीवनाच्या इतर कुठल्याही अंगाइतकाच आणि तरीही इतर अंगांपेक्षा किंचीतही जास्त महत्व नसणार एक भाग असेल. आणि तो 'सोशल शेअरींगचाही' भाग असेल - नाहीतर ऋषिने असला मंत्र कशाला द्यावा आणि ऋषिच्या या असल्या मंत्रांनंतरही सूर्याने कुंतीला हा 'कन्येच्या' उत्त्पत्तीचा दाखला का द्यावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे कार्य पार पडूनच 'कर्णाची' उत्पत्ती व्हावी ? नीतीकल्पना जरुर असतीलच त्यामुळेच कदाचित सूर्याला हे असलं 'सायटेशन' द्यावं लागलं असेल ;-)
* अर्थातच सगळा प्रतिसाद निपुत्रिकास पुत्रवान करणार्या देवता, वर, चमत्कार असला कोणताही चमत्कारीक कंटेंट न मानता या सगळ्या पात्रांना सर्वसामान्यच लोक मानून लिहिला आहे.
मंत्र दिला - मंत्र दिला म्हणजे अमुक अमुक रचना तु म्हण म्हणजे जो हवा तो देव तुझ्या समक्ष हजर होईल असा अर्थ अगदीच गावंढळ वाटतो.
व्याकरणदृष्ट्या मंत्रणेला गुप्ततेचीही अर्थच्छटा आहे. हेतू साध्य होईपर्यंत मंत्रणेतील गोष्टी कुठे बोलायच्या नाही अर्थातच या गुप्त गोष्टी बोलणारे संबंधित लोक नंतर आपापल्या लोकव्यवहारात गुंतून पडत असतील आणि मंत्रणा पूर्ततेचा प्रसंग आला की योग्य तिथे निरोप पोचवून मंत्र सिद्ध करीत असतील ;-)
याबाबतीत मन ने दिलेल्या दुव्यावरील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास वाचायला सुरुवात केल्याने या प्रतिसादातील सर्व शंकांची उत्तर प्रतिसाद लिहिल्यानंतर मिळाली आहेत.' तेव्हा प्रतिवाद अपेक्षित नाही.
चांगले लिहिले आहे पण थोडे एकांगी झाले आहे.
महाभारत एक महान काव्य आहे हे मात्र मान्य करावे लागेल. ज्यांना त्यातील सत्यतेबद्दल खाती नसेल त्यांनी ती एक अजरामर साहित्यिक कलाकृती म्हणुन त्याकडे पहावे. काथ्याकूट काय हो साहित्यावर पडतातच की. वपुंवर हिरेरीने लोक मध्यमवर्ग्यीयांचा लेखक म्हणुन तुटुन पडतात तर पुलंची वैचारिक पातळी कमी असलेला लेखक म्हणुन संभावना करतात. जी ए अगम्य आणि बोर लिहितात अशी टीका होते तर दलित वाङ्मयावर दर दोन पानामागे ३ नवीन शिव्यांचा शोध लावल्याबद्दल टीका होते. थोडक्यात कल्पित लेखनावर काथ्याकूट आणि टीका करण्याचा आपल्याकदे उदंड अनुभव आहे. महाभारत खरे वाटत नसल्यासही त्यातील साहित्य आणी कथेवर काथ्याकूट होउ शकतोच की.
महाभारत जर कल्पित आहे असे मान्य केले तर मग उलट त्याचे साहित्यिक मूल्या लाखपटीन वाढते. अहो जो माणूस केवळ कल्पनेच्या बळावर इतके अद्भूत आणि मानवी नातेसंबंधांबद्दल, अध्यात्माबद्दल, तर्कशास्त्रावर, इतके खोल आणि सूक्ष्म विचार मांडू शकतो तो किती प्रचंड ताकदीचा लेखक असेल याचा जरा विचार तर करा.
असो. तुर्तास एवढेच. लेख आवडला.
*श्री.शरद यांनी मोजक्या शब्दांत नेमकी माहिती उत्तमप्रकारे दिली आहे.तसेच ती मूळ महाभारतानुसार विश्वासार्ह आहे.
*युधिष्ठिरादिकांचा जन्मदाता पंडू नाही.मात्र बीजक्षेत्रन्यायानुसार ते पांडव म्हणजे पंडूचे पुत्र आहेत.
*कर्णाचा जन्मदाता दुर्वास तर धर्माचा विदुर असे डॉ.इरावतीबाई कर्वे यांनी "युगान्त" कादंबरीत म्हटले आहे.
*पाच पांडवांचे जन्मदाते कोण याविषयी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी बराच ऊहापोह केला आहे.त्यांचे निष्कर्ष संभवनीय आहेत.
*आपल्या दोन्ही महाकाव्यातील महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्म नियोगपद्धतीने
झाले आहेत.अतिकामामुळे दशरथ नपुंसक झाला होता.पुत्रकामेष्टी यज्ञासाठी
विशेष आमंत्रित केलेला ऋष्यशृंग हा रामादि चार पुत्रांचा जन्मदाता असे
रामायणावरून दिसते.
*दुर्वासाने कुंतीला वर दिला,यज्ञकुंडातून प्रकट झालेल्या अग्नीने
दिलेल्या कुंभातील पायस भक्षण (प्राशन ) केल्याने राण्यांना गर्भ राहिले.
यांवर कुणाचाही विश्वास असणे शक्य नाही.इथल्या सदस्यांचा तर नाहीच
नाही.कारण सर्वजण उच्चशिक्षित आहेत.उपरोक्त गोष्टी केवळ श्रद्धेने खर्या
मानता येतील.मग क्षीरसागरात श्रीविष्णू पहुडले आहेत.त्यांच्या नाभिकमलात
चारतोंडी ब्रह्मदेव बसला आहे हेही खरे मानता येते.
महाभारतातीक व्यक्तिचित्रे-२ महामानिनी द्रौपदी
द्रौपदी व सीता ह्या दोन व्यक्तिमत्वांच्या रूपाने व्यास व वाल्मिकी या दोन दिव्य प्रतिभावंत कवींनी स्त्रीचे आदर्श निर्माण केले. (चुकलोच की, असे म्हणू "त्यांना त्या काळात वाटले असे " ) दोघींवर प्रचंड संकटे कोसळली तरी धैर्याने त्यांना तोंड देऊन दोघींनी आपली पतीवरील निष्ठा शेवटपर्यंत कायम राखली. या बलिदानाची छाया हजारो वर्षे भारतातील सर्व स्त्रीयांवर पडली आहे. दोघींचेही जीवन अत्यंत दु:खात गेले आहे, पण सीता व द्रौपदी यांच्यात एक फरक आहे. सीतेची दु:खे श्रीरामाच्या कर्तव्यनिष्ठेतून निर्माण झाली व सीतेला त्याची पुरेपूर जाणिव होती. श्रीराम आपल्याइतकाच हतबल आहे, दु:खी आहे हे माहित असल्याने ती श्रीरामाला कधीही दोष देत नाही. द्रौपदीची संकटे तिच्या पतीच्या चुकीच्या धर्मकल्पनेमुळे निर्माण झाली व हे ठाम माहित असल्याने ती पतीला दोष देते. त्यांच्याशी वादविवाद करते. जरूर तेव्हा त्यांच्या भावनेला हाक मारते.
या दोघींचे गुण इतके सर्वश्रेष्ठ आहेत की दोनही महाकवींच्या प्रतिभेला त्यांना मानवी जन्म देणे योग्य वाटले नाही. दोघीही अयोनिज आहेत. सीतेचा जन्म भूमीतून झाला व तिने आपल्या आईकडून क्षमा, वात्सल्यता, सहनशीलता असे गुण उचलेले. ती कोणावरही रागावत नाही. द्रौपदीचा जन्म यज्ञकुंडातून झाला. ज्वालेकडून तिने धगधगित क्रोध उचलला. ती महामानिनी आपली अवहेलना १३ वर्षे विसरली नाही. कृष्ण कौरवावांव्या दरबारात जायला निघाल्यावर तिने त्याला स्पष्ट सांगितले ," माझा अपमान माझे पती विसरले असतील व त्यांना आपल्या पत्नीच्या अब्रूची चाड नसेल ; तरी माझ्या पुत्रांना आपल्या मातेची अब्रू रक्षणीय खास वाटेल. माझे पाच पुत्र अभिमन्युला पुढे करून कौरवांशी लढतील. " लक्षात घ्या, आपल्या पाच मुलांपेक्षा आपला सावत्र मुलगा युद्धशास्त्रात जास्त निपुण आहे हे तिला चांगले माहीत आहे व तो आपल्या करिता प्राणपणाने लढेल हेही ती जाणून आहे. ती पुढे कृष्णाला भरीस घालते," अभिमन्युसारखे ते पाच तुझेच भाचे आहेत." कृष्णाला तिला आश्वासन द्यावे लागले की " शत्रूंचा विनाश होऊन पती वैभवास चढलेले तू पहाशील ".
उत्पत्ती
द्रोणांनी द्रुपदाचा पराभव करून त्याचे अर्धे राज्य घेतले हा अपमान द्रुपद
विसरला नाही.द्रोणांचा वध करणारा पुत्र मिळवण्यासाठी त्याने एक यज्ञ केला.
त्या वेदीतून धृष्टद्युम्न बाहेर पडला व त्यामागून द्रुपदाने न मागतलेली
आणि त्याला कल्पनाही नसलेली कुमारी, द्रौपदी, उत्पन्न झाली. तिच्या
अंगप्रत्यंगातून सौंदर्याचा मूर्तिमंत आविष्कार होत असून ती अत्यंत
लावण्यसंपन्न होती. सावळ्या रंगाची, निळ्या कमलाप्रमाणे विशाल नयन, लांबसडक
काळेभोर केस,धनुष्याकृति भिवया, यामुळे इहलोकी आलेली साक्षात देवताच वाटत
होती. ती इतकी सुंदर होती की अर्जुनाने पण जिंकला होता तरी सर्व भावांना
ती पत्नी म्हणून पाहिजे होती. मग तिला पाचही भावंडांशी लग्न करावे लागले व
तसे केले नाही तर आपणास अर्जुन मिळणार नाही जे जाणून तिने परिस्थितीचा
स्विकार केला.
महाभारतातील तीनही सौंदर्ययुक्त व्यक्ती कृष्ण, द्रौपदी व अर्जुन रंगाने सावळ्याच आहेत.
शिक्षण
महाभारतकाळी स्त्रीया शिकण्यासाठी गुरूगृही जात नसत. त्यांचे शिक्षंण घरीच
घरातले वृद्ध, मुद्दाम योजलेले गुरू यांच्याकडून होत असे. द्रुपदाने मुलीला
उत्तम शिक्षण दिले होते. महाभारतकार तिला "पंडिता " म्हणतात. युधिष्टराशी
ती वाद घालत असते तेव्हा याची खात्री पटते. (येथे उतारे देत नाही.)
स्वयंवर
द्रुपदाची इच्छा द्रौपदी अर्जुनाला द्यावी अशी होती. पण पांडव जळून मेले अशी बातमी आली म्हणून त्याने असा पण लावला की असला तर अर्जुन किंवा निदान त्याच्या समान योद्धाच तो पण जिंकेल. स्वयंवराच्यावेळी धृष्टद्युम्नाने घॊषणा केली की " हे धनुष्य, हे बाण. यांनी लक्ष्यवेध करावयाचा आहे. हे महान कृत्य करणारा जो कोणी आमच्या कुळाला योग्य असा कुळवंत, रूपवान व बलसंपन्न असेल त्याचीच भार्या माझी ही भगिनी कृष्णा होईल." अटी स्वच्छ शब्दात सांगितल्या आहेत. कर्णाने धनुष्याला हात घातल्यावर द्रौपदीने उच्च स्वरात सांगितले की " काय वाटेल ते झाले तरी मी सूताला वरणार नाही." यात कर्णाचा अपमान झाला हे खरे पण ती त्याने आपल्यावर ओढून घेतलेली आपत्ती होती.
द्युतप्रसंग
या प्रसंगी द्रौपदी प्रथम वकिली डावपेच खेळली. तिने भीष्म-द्रोणांना साक्षीला बोलाविले. चांडाळचौकडीपुढे त्याचा काही उपयोग झाला नाही व शेवटी गांधारीच्या सांगण्यावरूनच तिची सुटका झाली. धतराष्ट्राने तिला वर मागावयास सांगितल्यावर तिने युधिष्ठिराला दासमुक्त करण्यास सांगितले. ती म्हणते " माझा मुलगा अतिविंध्य याला लोकांनी दासपुत्र म्हणू नये. मोठमोठ्या राजांनी सम्राटाचा पुत्र म्हणून त्याचे कौतुक केले, त्याला दासपुत्र असे विशेषण कोणी लावावयाला नको ". धृतराष्ट्र तिला दुसरा वर माग म्हणाल्यावर तिने शस्त्रास्त्रांसहित भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांचे स्वातंत्र्य मागितले. तो तिसरा वर माग म्हणाल्यावर तिने त्याला नकार दिला. " लोभ धर्माचा नाश करतो. दुर्गतीतून पार पडून स्वतंत्र झालेले माझे पति स्वत:च्या भरवशावर गेलेले वैभव परत मिळवतील. " आता तिला वर मागून मिळवलेले राज्य नको आहे. स्वत:च्या पतींनी पराक्रम करून, कौरवांना धूळीत मिळवून मिळवलेले राज्य हवे आहे.
वनवास
वनवासात तिच्यावर संकटे कोसळली, दुर्वासांकडून सत्वपरिक्षेचा प्रसंग
ओढवला. जयद्रथाने पळवून नेले व इच्छा असूनही त्याला देहदंड देता आला नाही.
प्रिय पती अर्जुन याला युद्धाच्या वेळी उपयोगी पडणारी अस्त्रे देवांकडून
मिळवण्यासाठी दूर जाण्याची गरज निर्माण झाली म्हणून निरोप द्यावा लागला.
परंतु वनवासात एक असा प्रसंग घडला की व्यासांनी त्यात तिच्या अलौकिक
व्यक्तिमत्वाचा एक दैदिप्यमान पैलू दाखवून दिला.
पांडवांना भेटावयाला श्रीकृष्ण सत्यभामेसह वनात आला. तेव्हा एकांतात
असतांना भामेने द्रौपदीला विचारले की " हे द्रौपदी, लोकपालासारखे पराक्रमी,
एकमेकावर प्रेम करणारे पांडव तू स्वाधिन करून घेतले आहेस, ते तुझ्यावर
कधीही कृद्ध होत नाहीत, प्रत्येक महत्वाच्या गोष्टीत तुझ्याकडून मार्गदर्शन
होईल अशा अपेक्षेने तुझ्याकडे पाहतात, इतके वर्चस्व त्यांच्यावर
गाजवण्यासाठी तू कोणते व्रत, मंत्र, विद्या, औषध, अंजन इ,चा उपयोग करतेस ते
मला सांग. म्हणजे मी ही कृष्णावर त्याचा उपयोग करून त्याला कायमचे माझे
स्वाधीन करून घेईन." द्रौपदीने दिलेले उत्तर व्यासांनी ६०-७० श्लोकात दिले
आहे. आपण त्यातले काही पाहू.
" हे सत्यभामे, दुर्वृत्त व भ्रष्ट स्त्रीयांचा मार्ग तू विचारलास, मी
त्याचे काय उत्तर देऊं? श्रीकृष्णाची प्रिय महाराणी होण्याचे भाग्य
लाभलेल्या स्त्रीच्या तोंडी असा प्रश्न वा संशय शोभत नाही. मंत्र वा औषध
यांच्या सहाय्याने स्त्री आपल्याला स्वाधीन ठेवते असे पतीला कळले तर तिचे
दर्शनही त्याला त्रासदायक वाटेल. अन्नातून भलत्याभलत्या गोष्टींची प्रयोग
करून जलोदर, कुक्षीव्याधी,श्वेतकुष्ठ, जडत्व, अंधत्व बधिरपणा, नपुंसकत्व
असे भीषण रोग पतीला जडतात. असे आचरण पत्नीने कधीही करू नये.
पतीला स्वाधीन करून घ्यावयाचा खरा मार्ग आपल्या पतीला आवडणार नाही असे आचरण
पत्नीने कधीही न करणे हाच आहे. बसणे, जाणे,हावभाव वा अंत:करणचे निश्चय
यापैकी कोणत्याही बाबतीत यत्किंचित देखील त्यांच्या मनाला लागण्यासारखे
काहीही घडू नये यासाठी मी सदैव जपत असते. माझ्या पतींचे भोजन
झाल्याखेरिज,त्यांनी विश्रांति घेतल्याविना मी कधीही भोजन व विश्रांतीची
अपेक्षाही करत नाही. माझे पति कोठूनही आले तरी दासदासींऐवजी मीच उठून
त्यांना आसन व उदक देऊन, मी त्यांचे अंत:करणपूर्वक स्वागत करते.घर व उपकरणे
सदैव स्वच्छ राहतील,वेळेवर उत्कृष्ट अन्नाचे भोजन त्यांना मिळेल याची मी
स्वत: काळजी घेते.खूप हसणे, खूप रागावणे हे मी चुकुनही कधी करत नाही. माझे
पति खानापानात जी गोष्ट आणू इच्छित नाहीत, ज्या गोष्टींचा उपभोग ते घेत
नाहीत त्या गोष्टी मी पूर्णपणे वर्जित केल्या आहेत .व्रतनियमांचे मी
विनयपूर्वक, आळस न करता आचरण करते. मी नेहमी पतीपेक्षा जास्त निजणे,अधिक
खाणे वा स्वत:चा थाटमाट करणे या गोष्टी टाळते. उदार अंत:करणाच्या
कुंतीबद्दल कधीही वाईट बोलत नाही. ब्राह्मण, स्नातक,गडी माणसे, दासी
हजारोंनी होत्या, त्या सर्वांकडे माझे पूर्ण लक्ष असे. पांडवांच्या
आयव्ययाची मला पूर्णपणे माहिती होती. माझ्यावर कुटुंबांचा, राज्यातील
अंत:पुराचा भार टाकून पांडव आपापल्या कामात गढून राहात. दिवस आणि रात्री
पांडवांचे मन संभाळीत असता मला दिवस आणि रात्र सारखेच झाले आहेत. मी
पतीच्या आधी उठते व नंतर झोपते.पतीसारखे सर्व जगात दैवत नाहे. त्याच्या
प्रसन्नतेत सर्व इच्छा पूर्ण होतात व त्याच्या अप्रसन्नतेत सर्व इच्छांचा
विघात होतो." या नंतर तिने सत्यभामेला श्रीकृष्णाचे प्रेम मिळवण्याकरिता
काही tips दिल्या आहेत.त्यातील दोनतीन पाहू. " कृष्णाचे जे आवडते,
त्याच्यावर प्रेम करणारे लोक असतील त्यांना विविध उपायांनी भोजन घाल,
त्यांची व्यवस्था ठेव. जे कृष्णाचे द्वेष्य, उपेक्ष्य व त्याला अहितकारक
असे लोक असतील त्यांच्यापासून चार पावले दूर रहा, कृष्ण तुझ्यजवल जे काही
बोलेल ते त्याने गुप्त ठेवावयास सांगितले नसले तरी ते स्वत:च्या अंत:करणातच
ठेव. ते तू कोणाशी बोललीस व ते तुझ्या सवतींच्या कानावर गेले आणि ते
त्यांनी कृष्णाला सांगितले तर तो तुला वेंधळी समजून तुझ्याविषयी उदासिन
होईल "
(द्वापारयुग, दुसरे काय ?)
वज्राघातांची परंपरा
द्रुपद राजाची मुलगी, पाच जगद्जेत्या वीरांची पत्नी, श्रीकृष्णाची प्रिय भगिनी, सुंदर व सद्गुणी द्रौपदी; खरे म्हणजे तिला काहीच दु:ख भोगावे लागावयाचे कारण नव्हते. पण नियतीने तिच्यावर कठोर प्रहार केले. पहिला द्युतप्रसंग, गांधारीमुळे ती त्यातून सुटली. वनवासात जयद्रथाचे तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला,पांडव वेळेवर आल्याने तो फसला. खरे म्हणजे भीम त्याला मारूनच टाकणार होता. पण तो धतराष्ट्राचा जावई होता व आपली बहीण विधवा होऊ नये म्हणून युधिष्टिराने त्याला सोडून दिले. तिसरा विराटाच्या घरी कीचकाचा. तिने भीमाला सांगितले की " तुम्हाला अज्ञातवासाच्या काळात आपण प्रगट होऊ याची भीती वाटत असेल तर तुम्ही गप्प बसा. उद्या सकाळी कीचक मेलेला नसेल तर मी विष खाऊन जीव देईन." भीमाने रात्रीच कीचकाला ठार केले. शेवटचा, युद्ध संपल्यावर, अश्वत्थाम्याने रात्री तिची मुले मारून टाकली ! स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी !!
(लेख लांबला, मान्य. पुढील भीष्मांच्या लेखात काळजी घेईन.)
शरद
लेख लांबलेला नाही हो. अजुन थोड मोठा झाला असता तरी चालले असते.
द्रौपदीने अर्जुन मिळावा म्हणुन पाचही जणांशी लग्नाला संमती दिली हे चुकीचे वाटते. तिची संमती विचारण्यात आली होती पंरंतु त्याला फारशी किंमत होती असे वाटत नाही. काय करायचे हे कुंतीने आधीच ठरवुन ठेवले होते. माझे शब्द निष्फळ ठरण्यचा अधर्म माझ्या हातुन होउ नये असे बघा असा कावेबाज पणा कुंतीने केला यातच सगळे आले. काही ठिकाणी असाही उल्लेख आहे की पाच पती मिळणे यात द्रौपदीला उलट आनंदच वाटला.
द्रौपदी पाच पतींशी देखील एकनिष्ठ राहिल हे तिचे शत्रु देखील जाणुन होते. पांडवांमध्ये फूट पाडण्यासाठी द्रौपदीचा वापर करावा असे दुर्योधनाने सुचवल्यावर असा वेडेपणा चुकुनसुद्धा करु नकोस द्रौपदी पाचही पांडवांशी एकनिष्ठच राहिल असे त्याला कर्णाने सुनावले होते.
द्रौपदीची अजुन एक बाजू लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे कोणाच्याही भावभावनांना आणि अंतर्मनाला ती अगदी सहजपणे हात घालु शकत असे. जेव्हा तिची पाचही मुले मारली गेली तेव्हा तिने अश्वत्थाम्याला मारण्याची इच्छा व्यक्त केली. ते शक्य नाही हे लक्षात आल्यावर त्याही परिस्थितीत तिला अश्वत्थाम्याचा मणी काढुन घ्यावा हे सुचले आणि जे लोक मेले (तिची मुले सोडुन) ते स्वतः अन्य्यायाने लढले हे माहिती असुनही तो मणी काढुन घेण्यास तिने सर्वांना प्रवृत्त केले हे विशेष.
तिने सूडाचा विखार कधी शांत नाही होउ दिला हे ही विशेष. युधिष्ठिर सर्वात शांत आहे आणि युद्धाला तो घाबरतो हे ती निश्चितपणे जाणुन होती. त्यामुळे १२ वर्षाच्या वनवासात तिने त्याला सुखाने असे कधी जगु दिले नाही. ती त्याला द्युताबद्दल सतत टोमणे मारायची. स्वतःचे केसे १३ वर्षे मोकळे सोडुन तिने स्वतःच्या अपमानाचा विसर पाचही नवर्यांना पडु दिला नाही हे विशेष.
तिचा ज्या प्रकारे अपमान झाला त्यामुळे सुड घेण्याची भावना सहाजिकच आहे. बायकोच्या अपमानाचा सुड घेणारे दुसरे उदाहरण दिसत नाही. मुख्य म्हणजे बायकोचा अपमान न होउ देणे महत्वाचे.
कुंतीचं वागणं पटत नाही याचं हे एक अजुन उदा.
अजोनिज वगैरे तर अजिबात शक्यच नाही. भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासात उलगडा होईल.
बाकी अश्वत्थामा या पात्राबद्दल काही समजत नाही. कसलासा मणी कपाळावर असल्याने तो अमर कसा? अमर कोणीच नसतं त्यामुळे याचा उलगडा झाला तर आवडेल.
बाकी
अश्वत्थामा या पात्राबद्दल काही समजत नाही. कसलासा मणी कपाळावर असल्याने
तो अमर कसा? अमर कोणीच नसतं त्यामुळे याचा उलगडा झाला तर आवडेल.
अंमळ गल्लत होते आहे. तो मणी त्याचे विकारांपासुन संरक्षण करायचा आणि त्याच्या जखमा लवकर भरुन यायच्या तसेच त्याला नागांचे अथवा राक्षसांचे भय उरायचे नाही. तसेच त्याची भुक पण आटोक्यात रहायची (म्हणजे त्याचे भुकेवर नियंत्रण रहायचे) पण त्या मण्यामुळे तो अमर नव्हता.
अमरत्व हे त्याला मिळालेले वरदान नव्हते तर शाप होता. त्याने ब्रह्मशीर उत्तरेच्या गर्भावर वापरले म्हणुन कृष्णाने त्याला ३००० वर्षे वणवण भटकण्याचा शाप दिला. ३००० वर्षे संपुन गेली असली तर इतर पुराणांनुसार कृष्णाच्या शापाने तो अमर झाला असे मानण्यात येते,
सप्त चिरंजीव
अश्वत्थामा अमर म्हणजे चिरंजीव होता.
अश्वत्थामा बलीर्व्यासो हनुमानस्च बिभीषण: !
कृप:परशुरामस्च सप्तैता चिरजीविन: !!
अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, बिभीषण आणि कृपाचार्य, हे सात चिरंजीव मानले जातात.
शरद
तुमची शोधाशोध करुन झालीये का? तुम्ही खात्रीने म्हणताय म्हणुन विचारलं इतकंच. राग नसावा ही विनंती.
@शिल्पा ब'-
आमच्यासारख्या काही लोकांचा सप्तचिरंजीवी आणि त्यांच्या माहात्म्यावर पूर्ण
विश्वस आहे. परन्तु आपल्यासारख्या (राग नसावा! हं) काही लोकांचे असे
म्हणणे आहे की
मुळात "सप्तचिरंजीवी म्हणजे सात वृत्ती आहेत, सप्तचिरन्जीवी अस्तित्वातच नव्हते / नाही" ही संकल्पनाच चुकीची आहे.
त्यामुळे जर या खरोखर "सात वृत्ती" आहेत.. किन्वा सप्तचिरन्जीवी काल्पनिक आहेत..असे जर वाटत असेल तर ते कसे... तर ते आम्हालाही कळू द्यात, असे आम्ही कपिलमुनीं'ना सांगितले...
कारण "त्या" खरोखरच सात वृत्ती वगैरे असतील आणि कुणाला माहित असतील .. तर त्या इथे टंकायला असा फारसा वेळ लागत नाही! :) नाही का? ;) ;)
पण आता इतके दिवस होऊनही अजून त्यांनी काही प्रतिसाद न दिल्याने आणि ते
कामात व्यग्र असून सवडीने त्या "सात वृत्तीं"बद्दल सांगणार असल्याचे
कळल्यावर आम्हाला वाटले, की बहुधा कपिलमुनींनाही या सप्तचिरन्जीवीबादल आणि
तथाकथित सात वृत्तींबद्दल फारसे माहित नसावे! :)
पण आता सात वृत्तींबद्दल सांगायचेच ठरवले, म्हटल्यावर त्यांचा मुळापासून शोध घेण्याचा प्रयत्न नक्की होणार.. हे ओघानेच आले..
आणि काहीच माहित नसलेल्या गोष्टी शोधण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे "वेबसाईट- लिक्न्स" वगैरे शोधून माहिती गोळा करणे! ..-अर्थात या मार्गात :ताकाला जाऊन भान्डे लपवण्यासारखे काहीच नाही. :)
त्यामुळे आमच्या संशोधनानुसार कुणी याही मार्गाने गेल्यास यश मिळणार नाही.. उगीच वेळ वाया जाईल..असा निष्कर्ष काढला... कारण आडातच नाही तर पोहर्यात कुठून येणार? नाही का!!! शिल्पा ब!..
असो.- या सप्तचिरन्जीवींच्या सश्रद्ध उपासनेचा लोकांना फार फायदा होतो बरंका!.. नवर्याशी न पटणार्या किन्वा न पटवून घेणार्या बायकांनी या सप्तचिरन्जीवींची उपासना जरूर करावी.. उचित लाभ होतो.. :)
हे सप्तचिरंजीवी वगैरे समजा अस्तित्वात होते असं मानलं, बरं का मृगनयनी, तरी ते खरोखरंच चिरंजीवी म्हणजे मरण न येणारे सजीव आहेत असा तुमचा समज असेल तर ते कसं हे सांगितलं तर आम्हालाही कळेल. त्यापेक्षा सात वृत्ती आहेत वगैरे खुलासा पटण्यासारखा वाटतो.
आता समजा तुम्हाला एखादी गोष्ट नाही सापडली, संशोधनकरुनसुद्धा याचा अर्थ ती नाहीच असा होत नाही..फक्त तुम्हाला शोधता आली नाही असा अर्थ होतो..नाही का? मृगनयनी!
असो, तुम्हाला या चिरंजीवीउपासनेचा फायदा झाल्याचे वाचुन आनंद वाटला. जालावरच्या लोकांशी पटण्यासाठी किंवा पटवुन घेण्यासाठी कोणतं व्रत करत आहात? कितपत फायदा झाला? म्हणजे तुम्हीच विषय काढला म्हणुन विचारतेय!!
हे सप्तचिरंजीवी वगैरे समजा अस्तित्वात होते असं मानलं, बरं का मृगनयनी, तरी ते खरोखरंच चिरंजीवी म्हणजे मरण न येणारे सजीव आहेत असा तुमचा समज असेल तर ते कसं हे सांगितलं तर आम्हालाही कळेल. त्यापेक्षा सात वृत्ती आहेत वगैरे खुलासा पटण्यासारखा वाटतो.
:) बिभीषण, कृपाचार्य, परशुराम, हनुमान, वेदव्यास, बलि, अश्वत्थामा हे सप्तचिरंजीवी आहेत.. अर्थात वर यांचा उल्लेख केला गेला आहेच!.. परन्तु आधी विचारलेल्या प्रश्नानुसार "त्या सात वृत्ती" कोणत्या?.. हा प्रश्न मात्र सोईस्करपणे टाळला जात आहे!! :) आणि "त्या" सात वृत्तींबद्दल काहीही कवडीइतकी माहिती नसतानादेखील आपल्याला "सात वृत्ती आहेत वगैरे खुलासा पटण्यासारखा वाटत असेल." तर मग शेवटी ज्याची त्याची बौद्धिक / मानसिक कुवत आणि समज!! :) :)
आता समजा तुम्हाला एखादी गोष्ट नाही सापडली, संशोधनकरुनसुद्धा याचा अर्थ ती नाहीच असा होत नाही..फक्त तुम्हाला शोधता आली नाही असा अर्थ होतो..नाही का? मृगनयनी!
ठ्ठॉSSSSठ्ठॉSSSSठ्ठॉSSSS
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
सारवासारवीचा पुन्हा एकदा क्षीण प्रयत्न!!! ;)
असो.. त्या सात वृत्तींबद्दल काय म्हणणे आहे मग? ;)
असो, तुम्हाला या चिरंजीवीउपासनेचा फायदा झाल्याचे वाचुन आनंद वाटला. जालावरच्या लोकांशी पटण्यासाठी किंवा पटवुन घेण्यासाठी कोणतं व्रत करत आहात? कितपत फायदा झाला? म्हणजे तुम्हीच विषय काढला म्हणुन विचारतेय!!
जालावरच्या लोकांबरोबर पटवून घेण्याचा प्रश्नच नाही.. समविचारी लोकांशी माझी मते पूर्वीही पटत होती. आणि आजही पटतात..
काही अश्रद्ध, देवाचे- गुरुंचे अस्तित्व नाकारणार्या, त्यांची कुचेष्टा
करणार्या लोकांबरोबर माझे पटवून घेणे.. तर कदापि शक्यच नाही...माझी तशी
इच्छाही नाही.. कारण या लोकांची पात्रता, कुवत वगैरे गोष्टींवर मिपावर
याआधीही उहापोह झाला आहे. स्वतःला अतिशहाणे समजाणार्या तथाकथित
बुद्धिवाद्यांबरोबर फक्त त्यांच्या कम्पूबाझांचे पटते.. माझे किन्वा माझ्या
समविचारी लोकांचे यांच्याबरोबर पटणे शक्यच नाही...
आणि शिल्पा ताई- पटण्याबाबतच म्हणत असाल. तर स्वतःच्या "टोकदार" मतांमुळे
इथल्या लोकांबरोबर पटत नसल्याचे काही लोकांनी ऑलरेडी खरडवह्यांवर डिक्लेअर
केलेलं आहे...
"बाहेर भाव मिळेल" या आशेने इथून बाहेर पडलेले लोक्स २ महिन्यांतच "आशाभंग" झाल्याने पुन्हा इकडे कार्यरत झालेले आहेत..
असो..
अॅक्चुली दोनेक वर्षांपूर्वी मिसळ्पाववर नवीन आलेल्या एका परदेशस्थ ( बहुधा अमेरिका स्थित) महिलेने माझ्याशी ओळख करवून घेताना मला "संदेश" माध्यमातून असा सल्ला /निरोप पाठवला होता, की- "माझे (त्या "श" महिलेचे) आणि माझ्या नवर्याचे बिल्कूल पटत नाही.. लग्न करून मी पस्तावलेय... उगीच काहीच विचार न करता मी लग्न केलं.. पण तू ( पक्षी:- मी) मात्र नीट विचार करून लग्न कर हं!!!.." वगैरे वगैरे.. अनाहुत सल्लेही दिले गेले!... ;) ;) ;)
त्यामुळे "सप्तचिरंजीवीं"ची उपासना करण्याचा सल्ला मी त्या बिच्चार्या परदेशस्थ महिलेसाठी दिला आहे.. :) अर्थात "त्या" महिलेचा या सगळ्यावर विश्वास असला.. तरच तिने ही उपासना करावी... विश्वास नसेल.. तर ती बिच्चारी "सात वृत्ती"च शोधत बसायची! ;) ;) ;)
आणि मला सध्यातरी या स्पेश्शल उपासनेची गरज नाही! :) :) :)
एवढं मोठठं लिहुन तात्पर्य काहीच नाही. तुम्ही म्हणताय ते सात जण चिरंजीवी आहेत याचाच अर्थ अजुनही जिवंत आहेत असा होतो...अन ते कधीही मरणार नाही असापण होतो. याविषयी काहीही न लिहिता फाटे फोडणं चालु आहे. वर मलाच प्रश्नाला बगल दिली म्हणताय!!
मला त्या सात वृत्तींबद्दल काहीच म्हणायचं नाही कारण कपिलमुनींचा प्रतिसाद येईपर्यंत अशी काही भानगड आहे हेच माहीत नव्हते....पण सात सजीव कधीही मरणार नाहीत यापेक्षा सात वृत्ती कधीही मरणार नाहीत हे पटण्याजोगंच आहे. अर्थात ही आमची समज आहे.
आता बाकीच्या लोकांनी त्यांच्या खवत काय केलंय याचा अन माझा काडीचाही संबंध नाही...अन कोणी तुम्हाला काय व्यनि केला त्याचं उत्तर इतक्या वर्षांनी या धाग्यावर देण्याचं प्रयोजनही समजलं नाही.
असो..आपला देवभोळेपणा अन आपल्या गुरुंनी आपल्यावर केलेले संस्कार पाहुन मन आनंदीत झाले हे वेगळे सांगायची आवश्यकता नाहीच.
तुम्हाला उत्तर मिळाला असेल अशी आशा करतो..
मि काही दिवस व्यग्र होतो तसा प्रतिसाददेखील दिला होता ..पण २-४ लिंका
बघून ...शब्द टंकून गुगल केले म्हणजे "संशोधन " केले असा समज असणार्या
बद्दल काय बोलायचे ...
प्रॅक्टीकली कोणताही माणूस अमर असणे शक्य नाही ..
बाकी माझे मत मांडले आहे ..कोणताही प्रश्न सोयीस्कररीत्या न टाळता..
आपले "सप्तचिरंजीवीं" बद्दल काय मत अहे ?? ते सजीव असून अजुन जिवंत आहेत का ?? कि तुम्हाला सात वृतींचे मत पटते ?
की काहीच मत नाही ??
अभ्यास वाढवा ..(जालासोबत पुस्तके पण वाचत चला...पुढेतोंडघशी पडणार नाहीत)
बाकी शेवटी ज्याची त्याची बौद्धिक / मानसिक कुवत आणि समज!
या साठी मिपाकर शरद यांनी मोलाची मदत केली ..
श्री. दाजी पणशीकरांच्या "महाभारत एक सुडाचा प्रवास " यातील ९ व्या लेखात त्यांनी ही कल्पना मांडली आहे.
हे पुस्तक मिळणे शक्य असेल तर उत्तमच. थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे :
(१) अश्वत्थामा --- अतिरिक्त दरिद्री माणुस बुद्धिमत्ता असूनही जेव्हा
त्याची महत्वाकांक्षा अपूरी राहते तेव्हा जी व्रुत्ती निर्माण होते ती.
(२) बळी -- अतिरिक्त दानवृत्ती
(३) महर्षी व्यास --अत्युत्कट प्रतिभा
(४) हनुमान -- दास्यवृत्ती
(५) बिभीषण -- भ्याडवृत्ती
(६) कृप -- लाचारव्रुत्ती
(७) परशुराम -- अविवेकी सूडवृत्ती
अवांतर : सगळे ज्ञान वेबसाईटवर मिळते हा समज चुकीचा आहे..जालावर शोधले म्हणजे संदर्भ शोधून झाले असे समजणे त्याहून चुकिचे आहे ..
असो!.. अभ्यास वाढवा....
'शिल्पा ब'नी मला दिलेल्या अर्थहीन प्रतिसादावरून तुम्हाला असे वाटत
असेल.. की मला उत्तर दिले गेले आहे.. तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण 'शिल्पा
ब' यांना त्या सात वृत्ती किन्वा सप्तचिरन्जीवींबद्दल काहीही घेणेदेणे
नाही. कारण एखाद्या लेखात देव्,पुराण,गुरु इ.शी संबंधित गोष्टी दिसल्या की
त्यावर आगपाखड करून खिल्ली उडवणे, इतकेच त्यांना येते. बाकी धर्मिक,
अध्यात्मिक गोष्टींवर त्यांचा विश्वास नसल्याने निर्जीव असलेल्या सात
वृत्ती.. मग त्या कोणत्या का असेनात..त्या माहित नसल्या तरी.. शिल्पा ब' यांचा त्या वृत्तींवर विश्वास आहे!
..अर्थात वरच्या कुठल्याश्या प्रतिसादात त्यांनी स्वतःच हे कबूल केले आहे! :)
असो! .. कपिलमुनी... मुळात 'सात चिरन्जीवीं' अमर असू शकतच नाहीत. या ठाम (अन्ध)विश्वासामुळे '१२ एप्रिल रोजी आपण आपल्या प्रतिसादात "सात वृत्तींचा" उल्लेख केलेला होता. पण फक्त "सात वृत्ती"- असा उल्लेख!.. त्या कोणत्या आहेत..त्यांचा आणि सप्तचिरन्जीवींचा सम्बंध काय.. याबद्दल तुम्हाला कवडीचीही माहिती नव्हती. उगीचंच ते सात नरश्रेष्ठ चिरंजीव असू शकत नाहीत.. हे नाकारण्यासाठी आपण सात वृत्तींचा उल्लेख केला.
बरं आपल्या १२ एप्रिल'च्या प्रतिसादानन्तर १४ एप्रिल'ला मी आपल्याला
विचारले, की "कृपया सात वृत्ती कोणत्या ते सान्गा.. म्हणजे आमच्याही
ज्ञानात भर पडेल!"..
परन्तु त्याव्रर आपला कोणताही प्रतिसाद आलेला नव्हता! त्यानन्तर पुन्हा २६
एप्रिल' रोजी त्या सत वृत्तींबद्दल मी आपल्याला रिमाईन्ड केले.. व "उचित
सन्दर्भ सापडत नाहीत का" असाही प्रश्न विचारला..
नॉर्मली कसे असते.. की जेव्हा माणूस एखाद्या गोष्टीबद्दल ठामपणे बोलतो..
तेव्हा त्यास त्या गोष्टीबद्दल माहिती असावी.. असे गृहीत धरले जाते.
त्यामुळे तुम्हालाही सात वृत्तींबाद्दल माहिती असेल.. असा माझा (गैर) समज
झाला!
कारण २ दा विचारणा करूनदेखील तुमचा प्रतिसाद थन्ड होता.
माझ्या माहितीनुसार २६ एप्रिल'ला हा प्रश्न विचारल्या गेल्यानन्तर २ मिनिटांत आपण लॉगिन झालात.. आणि बराच वेळ लॉगिनच होतात!!
पण त्या दिवशीदेखील "सात वृत्तीं"बद्दल माहिती मिळालीच नाही की!
शेवटी अगदीच पिच्छा पुरवल्यावर सोईस्करपणे ३० एप्रिल'ला "व्यग्र
आहे...या विषयीचे विवेचन नक्की लिहीन" असा सौम्य प्रतिसाद लिहून आपण शान्त
राहिलात. त्यामुळे मला असे वाटले, की मी एवढा पाठपुरावा करायला लागल्यावर
तुम्ही नक्कीच त्या सात वृत्तींचे सन्दर्भ शोधयला लागणार!!!...
आणि नक्कीच या सात वृत्तींचा शोध आधी सहज उपलब्ध असणार्या इन्टरनेटवर
घेतला जाणार.. हे ओघानेच आले!!..इन्टरनेटवरही त्याबद्दल उचित माहिती न
सापडल्याने आपणास सन्दर्भ पुस्तकांचा आधार घ्यावा लागला!!!.. आणि तोही
'सप्तचिरंजीवीं'ची स्तोत्राद्वारे स्तुती करणार्या शरद'जींच्या मदतीने!
=))
शरद'जींना याच लेखात मी दिलेल्या एका प्रतिसादातल्या सन्दर्भाबद्दल शन्का
होती. विराटराजाची पत्नी- सुदेष्णा आणि कीचक यांचे नाते बहीण भावाचे
कसे?.. याबद्दल शरद'जी साशंक होते. तसा त्यांनी मला 'सन्देश"ही केला होता. व
मी उचित सन्दर्भ त्यांना देऊन शन्का निरसनही केले होते. असो.. शरद'जींकडे
अजून रिलेटेड पुस्तकांबद्दल तुम्ही सन्दर्भ विचारले असते.. तर कदाचित
तुमच्याही ज्ञानात अधिक आणि उचित भर पडली असती!!!
बाकी सप्तचिरंजीवींबद्दल माझे मत विचारत असाल, तर हो!.. माझा पूर्ण विश्वास आहे की परशुराम, अश्वत्थामा,बली, व्यास, हनुमान, बिभीषण आणि कृपाचार्य हे सर्वजण अमर आहेत!.. आणि ते अमर आहेत.. म्हणूनच त्यांना "चिरंजीवी" असे सम्बोधले जाते. या सात जणांच्या व्यतिरिक्त "नारद" आणि "मार्कंडेय" यांनादेखील चिरंजीवी मानले जाते.
मी वाचलेल्या विष्णुपुराण, मार्कंडेय पुराण, पद्म पुराण, शिवपुराण, नारद
पुराण, भागवतपुराण, वामनपुराण, रामायण, महाभारत (ओरिजिनल), दुर्गा
सप्तशती यांमध्ये
वर नमूद केलेल्या सप्तचिरंजीवींचा आणि मार्कंडेय ऋषींचा देखील उल्लेख आहे.
तसेच काही ठिकाणी हरिभक्त "नारदमुनी"देखील चिरंजीवी मानले गेले आहेत.
कपिलमुनी, मला वाटले होते, की इन्टरनेटव्यतिरिक्त सप्तचिरिन्जीवींबद्दल माहिती घेण्यासाठी तुम्ही एखाद्या पुराणाचा किन्वा धार्मिक ग्रन्थाचा आधार घ्याल. पण तुम्ही तिथेही गोची केली.. "महाभारत एक सुडाचा प्रवास" सारखे पुस्तक प्रेफर केले!.. =)) =)) =)) =))
मुळातच या पुस्तकात "सुडाचा प्रवास" दाखवला गेल्याने यामध्ये लेखक- दाजी
पणशीकरांना महाभारता'बद्दल काय वाटते..हेच सांगितले गेले आहे. साहजिकच
तुम्हीही सात वृत्तींबद्दल या पुस्तकात थोडीफार माहिती मिळाल्यावर त्या
व्यतिरिक्त कुठेही काहीही सन्दर्भ न बघता..ती माहिती जशीच्या तश्शी इथे
उतरवली! अर्थात तुम्ही अजून इथे सांगितलेलं नाही, की या पुस्तकात
मांडलेल्या सात चिरंजीवींच्या सात वृत्तींव्यतिरिक्त तुम्हाला त्यांच्या
बद्दल अजून काही माहिती आहे!
"ही माहिती इन्टरनेटवर सापडणार नाही.." असे वारंवार तुम्हाला सांगण्याचा
माझा उद्देश कदाचित तुम्हाला आत्ता कळला असेल. त्याचा गर्भ्रितार्थ असा
होता.. की या सप्तचिरंजीवींचे मूळ सन्दर्भ असलेली "पुराणे" जर तुम्ही
प्रेफर केली असती.. तर कदाचित त्यांच्याबद्दल सर्वांगीण माहिती तुम्हांस
मिळाली असती... आणि वर नमूद केलेल्या त्यांच्या वृत्ती आणि त्याबद्दल
तुम्हाला मिळालेली अर्धवट आणि काही अंशी चुकीची माहिती कदाचित तुम्ही टाईप
केली नसती!! अॅटलिस्ट सहज उपलब्ध होणारे 'रामायण', 'महाभारत' तरी वाचायला
हवे होते.
"जालावर माहिती शोधण्यापेक्षा पुस्तकेही वाचत चला!.." असे डोस मला देण्यापेक्षा कपिलमुनी.. तुम्ही ते स्वतः अमलात आणले असते.. तर बरे झाले असते...कारण प्रतिसादासाठी जवळजवळ १५-२० दिवस मिळून देखील शोधुन शोधून तुम्हाला सूडाच्या प्रवासाचेच पुस्तक मिळाले.. आणि तेही फक्त महाभारताच्या! वास्तविक उल्लेखले गेलेले "चिरन्जीवी" हे काही महाभारताच्या व्यतिरिक्त देखील आहेत.. उदाहरणार्थ- मार्कंडेय ऋषी...नारद मुनी... यांचा किमान उल्लेख देखील तुमच्या प्रतिसादात दिसत नाही.. असो.. बरं इतर सात वृत्तींचे वर्णन करनाही .. प्रत्येकी दोनच शब्द वापरलेलेले आहेत. किमान तिथे तरी जरा विस्तृत माहिती दिली असती..(पक्षी: पणशीकरांच्या पुस्तकातून कॉपी केली असती) तर किमान तुम्ही ते 'सूडाच्या प्रवासाचे' पुस्तक तरी पूर्ण वाचले आहे..असे वाटले असते!!! ;)
कधी कधी माणूस असा अर्धवटज्ञानाने तोंडघशी पडल्यानन्तरही दुसर्याला शहाणपणा शिकवायला जातो.. हे पाहून अम्मळ मौज वाटते!!
असो.. यापुढे किमान सन्दर्भ पुस्तके निवडताना तरी अधिक आणि उचित पर्याय शोधा!... .. अर्थात ही माहिती पण तुम्हाला इन्टरनेटवर सापडणार नाही... त्यामुळे शरद'जींच्या बरोबरच चार अधिक लोकांना भेटा.. जवळच्या लायब्ररींना भेटी द्या...
:) आणि पुन्हा एकदा.....अभ्यास वाढवा... ;) ;) ;) ;)
सप्तचिरन्जीवी:-
(१) अश्वत्थामा ---
कपिलमुनींशी काही अंशी सहमत! "अश्वत्थामा" द्रोणाचार्यांचा एकुलता एक
मुलगा. शिवपुराणानुसार "अश्वत्थामा" शन्कराचा अन्श मानला जातो. प्रचन्ड
क्रोधी वृत्ती असल्यामुळे यास बर्याचदा अनेकांच्या रोषाला सामोरे जावे
लागल्याचा उल्लेख "महाभारत आदिपर्वात" आढळतो. जन्मतःच कपाळावर असलेल्या
तेजस्वी मण्यामुळे अश्व्त्थाम्यास अस्त्र, शस्त, रोग, नाग, राक्षस, देव
यांच्यापासून अभय प्राप्त झाले होते. द्रोणाचार्यांनी केलेल्या
शिवाराधनेनुसार व तपश्चर्येनुसार अश्वत्थाम्यास अमरत्वाचे वरदान मिळाले
होते. ब्रह्मास्त्र सोडण्याचे तन्त्र त्यास अवगत होते. पण ते तो परत घेऊ
शकत नव्हता. द्रौपदीचा भाऊ द्रुष्टद्युम्न व तिचे पाच पुत्र यांना
अश्वत्थाम्याने ठार केले. पण ते अतिशय चुकीच्या पद्धतीने..दिवसातील
युद्धाचा ठरलेला कालावधी सम्पल्यानन्तर.. पाच पुत्रांना पान्डव समजून
त्याने ठार मारले. अर्जुनावर ब्र्हमास्त्र सोडताना ते परत घेण्याची कला
अवगत नसतानाही सम्पूर्ण पृथ्वीचा नाश होऊ शकतो.. हा विचार याने केला नाही.
एक ब्राह्मण असूनदेखील त्याने केलेली कृत्ये हीन पद्धतीची होती. ना
क्षत्रियवृत्तीला शोभणारी.. ना ब्राह्मणांना शोभणारी... अश्वत्थामा दरिद्री
होता.. त्याच्याकडे बुद्धिमत्तेबरोबरच दैवी शक्तीचे वरदान होते.. पण ती
शक्ती ही त्याच्या वडिलांच्या तपोबलामुळे लाभली होती. त्यामुळे नवीन साधना
करून ती वृद्धिंगत करण्याची वृत्ती अश्वथाम्याकडे नव्हती. तसेच "नरो बा
कुन्जरो वा" च्या भ्रमामुळे द्रोणाचार्य मरण पावल्यानन्तर त्यांचे
अश्वत्थाम्याशी जोडलेले पुण्यही नष्ट झाले..आपल्या मुलांचे वध केल्यामुळे
व्यथित झालेल्या द्रौपदीने अर्जुनास अश्वत्थाम्यास ठार करण्यास सांगितले..
पण "अश्वत्थामा" चिरन्जीवी तसेच शिवाचा अन्श असल्यामुळे अर्जुनाने केवळ
अश्वत्थाम्याच्या केसाचे व त्याच्या कपाळावरच्या तेजस्वी मण्याचेही खन्डन
केले. त्यामुळे "चिरन्जीवी" असूनही कपाळावरच्या जखमेसाठी "अश्वत्थामा"वर
दारोदार तेल मागण्याची वेळ आली. तसेच त्या मण्याच्या नाशामुळे आणि युद्धात
अधर्मीपणमुळे त्याच्या हातून घडलेल्या पापांमुळे कोड, महारोग इ. सारख्या
अनेक व्याधी अश्वत्थाम्यास चिकटल्या. अनेक वर्षे याच स्थितीत राहण्याचे
भोगही त्याला लागले. त्यामुळे एक "चिरंजीवी" असूनही स्वतःच्या अत्यंत वाईट
जिणे त्याच्या नशीबी आले. परन्तु अश्वत्थाम्या'सारखे जिणे आपल्या वाट्यास
येऊ नये.. यासाठी त्याच्यातल्या शन्कराच्या अन्शाला नमस्कार करण्याची पद्धत
आहे. त्यामुळे नन्तर पश्चात्ताप पावलेल्या अश्वत्थाम्याला चिरन्जीवी मानून
सप्त चिरन्जीवींमध्ये गणले जाते.
(२) बळी --
केवळ "अतिरिक्त दानवृत्ती" इतके वर्णन करून बळीराजाचे वर्णन करताच येत नाही.
वामनपुराणानुसार "बलि-राजा" म्हणजे भगवान विष्णुच्या 'नरसिंह अवतारा'स कारणीभूत ठरलेल्या महान विष्णुभक्त भक्त प्रल्हादाचा नातू. दैत्यकुळाचा वंशज असणार्या बलि-राजाने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी, स्वर्ग यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. स्वर्गलोकाचे सर्व अधिकार त्याने स्वतःकडे घेतले होते. याचकाला विन्मुख न पाठवणे.. त्याने मागितलेले दान त्यास देणे हे बलिराजाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य होते. पण स्वतःच्या या दानी वृत्तीचा त्याला अत्यंत अभिमान होता.
किम्बहुना तो केवळ अभिमान नसून अहंकारही होता. सहसा सत्ययुगात असुर दैत्यादि लोक यज्ञ वगैरे करीत नसत. परन्तु बलीराजाने स्वर्गासकट त्रिलोकावर कायमचेच अधिपत्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने दैत्यकुलगुरु- शुक्राचार्यांच्या मदतीने अश्वमेध यज्ञ करण्यास सुरु केला. यावेळीही त्यने अतोनात दानधर्म केले. बलीराजाने स्वर्गावर स्वारी करून इन्द्रादि स्वर्गदेवतांना आधीच पदच्युत केले होते. त्यामुळे या अश्वमेध यज्ञामुळे स्वर्ग कायमचाच हातातून जाऊ नये म्हणून इन्द्राने महाविष्णुस प्रार्थना केली. त्यावेळी विष्णुने वामनावतार घेतला. हा स्रर्वांग सुन्दर बटूचा वामन अवतार म्हणजेच विष्णूचा पाचवा अवतार. हा वामनबटू काश्यप आणि अदिती'चा पुत्र असल्याचे काही ठिकाणी मानले जाते. हा वामनबटू जेव्हा बलीच्या यज्ञ ठिकाणी पोचला तेव्हा बलीराजा त्याचे सुन्दर रूप पाहून स्तिमित झाला. व पाहिजे ते दान मागण्याची त्याने बटूस विनन्ती केली. त्या वेळी शुक्राचार्यांनी बलीस तसे न करण्यास सांगितले. कारण शुक्राचार्यांनी महाविष्णुचे रूप ओळखले होते. त्यामुळे महाविष्णु या यज्ञात काहीतरी विघ्न आणून बलीचे त्रिलोकावर राज्य मिळवण्याचे स्वप्न उध्वस्त करेल, याची कुणकुण लागली होती. परन्तु एकदा दिलेला शब्द मागे घेने बलीच्या तत्वात बसणारे नव्हते. त्यामुळे त्याने वामनास दन मागण्याची विनन्ती केली. वामनबटूने बलीकडे फक्त ३ पावले जमीन मागितली. व बलीने ती देण्याचे मान्य केले. वामन बातूने पहिल्या पावलात स्वर्ग व्यापला. दुसर्या पावलात पृथ्वी व्यापली. या दोन्ही पावलातच बलीला महाविष्णुचे रुप समजून चुकले. आपल्या पूर्वजांच्या म्हणजे प्रल्हादाच्या भक्तीला प्रसन्न होऊन खाम्बातून प्रकट झालेला महाविष्णुचाच नरसिंहावतार आठवला. व बलीराजाने वामनबटूस तिसरे पाऊल ठेवण्यासाठी आपले मस्तक पुढे केले. आणि आपण दिलेले वचन पाळले. वामनाने तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवून त्याला खाली पाताळात गाडले. लौकिकदृष्ट्या "पाताळात गाडणे" म्हणजे एखाद्याचा नाश करणे असा जरी अर्थ असला तरी महाविष्णुने बलीचा नाश केलाच नाही. त्याच्यातल्या अहंकाराचा दैत्यवृत्तीचा नाश केला. व त्यास सप्तपाताळांपैकी- एका पाताळाचा म्हणजे- 'सुतल' नावाच्या पाताळाचा अधिपती बनवुन चिरन्जीवी केले. या घटनेच्या स्मृतीप्रीत्यर्थच कार्तिक शुद्ध प्रतिपदेला "बलिप्रतिपदा" सम्बोधले जाते. व दीपप्रज्वलन केले जाते. बलीराजाचे प्रतीकात्मक चित्र काढून त्याची पूजा केली जाते. अश्या प्रकारे महाविष्णुचा आशीर्वाद मिळवून बलीराजा चिरन्जीवी झाला.
(3) महर्षि व्यास / वेदव्यास :-
'सुधन्वा' नावाच्या राजापासून विचित्र पद्धतीने गर्भवती झालेल्या एका
माश्याच्या ( जो मासा पूर्वी एक अप्सरा होती.) पोटी एक मानवी कन्या व एक
मानवी पुत्र जन्मले. या माश्याला ज्या कोळ्याने पकडले, त्या कोळ्याने
मत्स्यपुत्राला सुधन्वा राजाच्या स्वाधेन करून कन्येस अपल्याजवळ ठेवले. हीच
कन्या मत्स्यगन्धा/ सत्यवती नावाने ओळखली जात असे. तिच्या शरीरास जरी
माश्याचा वास येत असला तरी तिचे सौन्दर्य अलौकिक होते. त्यामुळे पाराशर
ऋषींनी तिच्या सहवासाची इच्छा व्यक्त करून तिचे कौमार्य अबाधित ठेवून तीस
गर्भवती केले. तसेच तिच्या माश्याच्या गन्धाला दूर करून त्यास सुवासात
परिवर्तित केले. तसेच सत्यवतीच्या गर्भात वाढणार्या स्वतःच्या गर्भाला
दिव्य शक्ती देऊन पाराशर ऋषी निघून गेले. उचित समय आल्यावर सत्यवतीला
पुत्रपाप्ती झाली. व काही वेळातच तो पुत्र मोठा झाला. हा दिव्य पुत्र
जन्मतःच वेदांमध्ये पारन्गत होता. त्यामुळे अधिक अभ्यास व तपस्या
करण्यासाठी तो पुत्र द्वैपायन नामक द्वीपात निघून गेला. जाताना सत्यवतीला
म्हणजे आपल्या आईस त्याने वचन दिले, की जेव्हा गरज पडेल.. तेव्हा तो नक्की
येइल. याच पुत्राला "वेदव्यास"असे सम्बोधले जाऊ लागले. याचा वर्ण कृष्ण
असून ते द्वैपायनात तपस्येला निघून गेल्यामुळे त्यांना "कृष्ण्द्वैपायन"
असेही म्हणतात.
ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद असे वेदांचे आणि ऋचांचे विभाजन
व्यासांनी आपल्या शिष्यांच्या मदतीने केले. त्यामुळेच त्यांना 'वेदव्यास'
असेही म्हणतात. पैल, जेमिनी, वैशंपायन, सुमन्त इ. त्यांचे प्रमुख शिष्य
होते. पाचव्या वेदांच्या स्वरुपात त्यांनी अठरा "पुराणां"ची निर्मिती केली.
"वेदव्यास" यांच्यामध्ये ब्रह्मा आणि विष्णु या दोघांचेही अंश असल्याचे
मानले जाते. त्यामुळे ते चिरन्जीवी असल्याचे मानले जाते.
विचित्रवीर्य, चित्रांगद हे अम्बिका, अम्बालिकेचे पती पुत्र देण्यास असमर्थ
असल्याने सत्यवतीने आपल्या पुत्राला -वेदव्यासांना नियोगमार्गाने पुत्र
देण्यास विनन्ती केली. त्यानुसार पान्डु, धृतराष्ट्र हे राजकुमार व विदुर
या दासीपुत्राचे जन्म झाले. कौरव आनि पान्डव हे वेदयासांचेच वन्शज आहेत.
आपल्या दिव्य दृष्टीद्वारे वेदव्यासांना त्रैलोक्याचे, वर्तमान्-भूत-भविष्य
या तिन्ही काळांचे पूर्ण ज्ञान होते.
धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावरील महायुद्धाचे वर्णन सांगन्यासाठी
वेदव्यासांनीच संजयला दिव्य दृष्टी दिली होती. सर्वांत शेवटचे पुराण म्हणून
"महाभारत" त्यांनी लिहिले.
कलीयुगातील वाढत जाणारा अत्याचार, भ्रष्टाचार, अल्पायुष्य, अन्धश्रद्धा,
धर्मावरील अविश्वास इ. गोष्टी व्यासांना ज्ञात होत्या. व त्याचा उल्लेख
भागवत पुराणात आढळतो.
ग्रहपीडेपासून मुक्ती मिळवण्यासाठी वेदव्यासांनी रचलेले "आदित्यादि नवग्रह
स्तोत्र" सुप्रसिद्ध आहे. आजही चिरंजीवी 'वेदव्यास'यांचे अस्तित्व पवित्र
यमुना नदीच्या द्वीपात आढळते.
(४) कृपाचार्यः- महाभारत आदिपर्व आणि शल्यपर्वानुसार, गौतम ऋषींचा जो
पुत्र- 'शरद्वान' हा बाणासहितच जन्मला. त्यास ब्रह्मधर्मानुसर
वेदविद्येमध्ये अजिबात रुची नव्हती. पण तो धनुर्विद्येमध्ये अतिशय पारंगत
होता. त्याच्या या प्रावीण्यामुळे स्वर्गाचा राजा इन्द्र देखील भयभीत झाला.
व शरद्वानाच्या साधनेत अडथळा निर्माण करण्यासाठी इन्द्राने एका अप्सरेला
पाठवले. तिच्यामुळे विचित्र पद्धतीने शरद्वाना'ला एक पुत्र व एक कन्या
झाली. ते म्हणजेच "कृपी" आणि "कृप". 'कृप' देखील आपल्या वडिलांप्रमाणेच
धनुर्विद्या, शस्त्र-अस्त्र विद्येत पारन्गत होता. त्यामुळे भीष्माने
पान्डव-कौरवांना धनुर्विद्य शिकवण्यासाठी "कृप" यांना नियुक्त केले. आणि
'कृप'चे "कृपाचार्य" झाले. कृपाचार्यांची बहीण "कृपा" हिचा विवाह
द्रोणाचार्यांशी झाला होता. कृपाचार्यांनी पान्डव-कौरवांना दिलेल्या
धनुर्विद्येच्या बेसिक शिक्षणानन्तर द्रोणाचार्यांनी त्यांना पुढील शिक्षण
दिले. कृपाचार्य महाभारताच्या १८ दिवसांच्या युद्धात नाईलाजास्तव का
होईना.. पण कौरवांच्या बाजूने लढले. मुळात ते अतिशय नीतीमान होते. परन्तु
परिस्थितीमुळे व कौरवांच्या उपकारामुळे त्यांना प्रत्येक महत्वाच्या क्षणी
मूग गिळून गप्प बसावे लागले. चिरन्जीवी अश्वत्थाम्याच्या पान्डवांचा
अधर्मीपणे नाश करण्याच्या हट्टामुळे कृपाचार्य स्वतः चिरंजीवी असूनही शान्त
वृत्तीमुळे व कौरवांनी घातलेल्या बन्धनांमुळे त्यास विरोध करू शकले नाही.
अश्वत्थामा व कृपाचार्य दोघेही चिरन्जीवी असले तरी दोघांमध्ये जमीन
अस्मानाचा फरक होता. अस्त्र विद्येच्या अर्धवट माहितीमुळे अश्वत्थाम्याने
स्वत:चा नाश करून घेतला. अश्वत्थाम्याने पान्डवपुत्रांना ठार मारले.
अभिमन्यूची पत्नी -उत्तरेच्या पोटातील गर्भावर शस्त्र चालवून
अश्वत्थाम्याने धर्माविरूद्ध वर्तन केले. अर्थात श्रीकृष्णाच्या कृपेने तो
गर्भ पुनरुज्जीवीत झाला. तोच पुढे "जनमेजय" राजा म्हणून प्रसिद्धीस पावला.
पुढे युद्धानन्तर सर्व संहार झाल्यानन्तर शापामुळे व काढून घेतलेल्या
मण्यामुळे अश्वत्थामा बिकट परिस्थितीत जखमेला तेल लावण्यासाठी दारोदार
हिन्डत असतो. तर चिरन्जीवी कृपाचार्य नाईलाजामुळे का होईना पण घडलेल्या
पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी हिमालयात निघून गेले.
(५) बिभीषण-
कपिलमुनी आपण चिरन्जीवी 'बिभीषणा'चे वैशिष्ट्य सांगताना केवळ "भ्याड
वृत्ती" असा जो उल्लेख केला. तो अतिशय हीन आणि हिणकस असून आपल्याला
रामायणाबद्दल काडीइतकीदेखील माहिती नाही.. हेच सूचित करणारा आहे.
बिभीषण हा जरी रावणाचा सख्खा भाऊ असला तरी रावण आणि बिभीषणाच्या वृत्तीत जमीन अस्मानाचा फरक होता. अत्यन्त सात्विक आणि न्यायी असलेला बिभीषण प्रत्येक वेळी धर्माला अनुसरून वागलेला आहे. रावणाने सीताहरण केल्यानन्तरही सर्वप्रथम त्याची त्याच्या चुकीबद्दल कानउघडणी करणारा बिभीषणच होता. रावणाचा भाऊ असूनदेखील बिभीषण रावणाला न जुमानता रामभक्तीमध्ये रत असे. लन्केत प्रथम प्रवेश केल्यानन्तर हनुमानाला रावणाच्या राज्यात केवळ एकाच ठिकाणी रामनामाचा जप ऐकू येत होता. ब्राह्मणाचे रूप घेऊन मारुति जेव्हा त्या ठिकाणी गेला, तेव्हा बिभिषणाची व त्याची पहिली भेट झाली. वीर हनुमानाचा अपमान करून रावणने त्याच्या शेपटीस आग लावली तेव्हा मारुतिने केलेल्या लन्कादहनात सम्पूर्ण लन्का जळून गेली. फक्त बिभिषणाचे कुटीर मात्र रामनामामुळे सुरक्षित राहिले.
रामने रावणाशी प्रत्यक्ष युद्ध करण्याच्या आधी त्यास बर्याचवेळा
सुधारण्याची सन्धी दिली. हनुमानाला जेव्हा रामाने रावणाशी प्रथमतः बोलणी
करण्यासाठी लन्केला पाठवले, तेव्हा दरबारात रावणाने सेवकांना हनुमानाला
मारून टाकण्याची आज्ञा केली, तेव्हा "हनुमान हा रामाचा (पक्षी दुसर्या एका
राजाचा) दूत म्हणून येथे आलेला आहे, त्याच्याशी असे वर्तन करणे किन्वा
त्याला मारून टाकणे हे कोणत्याही राजाला शोभा देत नाही." असे रावणाला भर
दरबारात सुनावणारा "बिभीषण"च होता.
लन्कादहनानन्तर रावणाने बिभिषणाचा पदोपदी अपमान करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे माता केकसीच्या सान्गण्यानुसार बिभिषण रामसेनेस येऊन मिळाला.
बिभीषणाला रावणाविषयी आणि लन्केविषयी असलेल्या इत्थंभूत माहितीमुळेच रामाला
आणि वानरसेनेला लन्केवर स्वारी करणे सोपे झाले. रामाची पर्यायाने सत्याची,
न्यायाची साथ देणार्या व रावणाला दुष्कृत्यापासून वारंवार परावृत्त करू
पाहणार्या बिभिषणाला कुणी मूर्खच- भ्याड वृत्तीचा, गद्दार वगैरे म्हणू
शकतो.
'रावणाचा नाश होण्यासाठी त्याच्या पोटातल्या 'अमृतकूपी'चा नाश होणे गरजेचे
आहे' हे गुपित बिभिषणामुळेच रामाला कळले. व रामाला रावणाचा वध करणे शक्य
झाले.
रावणवधानन्तर माता सीतेला सुन्दर वस्त्रालंकार भेट देऊन मानाने तिला रामाकडे सुपुर्त करणारा वीर बिभिषणच होता. नंतर माता सीतेने अग्निदिव्य केले (म्हणजेच वेदवतीने कर्मसंकेतानुसार सीतेला रावणाने पळवायच्या आधी मागून घेतलेले सीतेचे रूप परत अग्निला दिले. व अग्निदेवतेत प्रविष्ट असलेल्या मूळ सीतेला परत आणले. व ही मूळ सीता रामाकडे आली. पुढे रामाची/ विष्णुची पत्नी होण्याची कामना ठेवणारी वेदवती पुढील जन्मी पद्मावती म्हणून जन्माला आली व तिरुपती बालाजीची पत्नी झाली.)
त्यानन्तर राम-सीता,लक्ष्मण यांच्यासह अगस्ति ऋषींची भेट घेऊन बिभिषण पुष्पक विमानातून अयोध्येस पोचला. रामाचा राज्याभिषेक झाल्यानन्तर बिभीषणास रामाने लंकेचा अधिकृत राजा म्हणून घोषित करून चिरंजीवी बनवले. व सन्मानाने पुन्हा श्रीलंकेस पाठवले. आजही तिथे बिभिषणाचे अस्तित्व मानले जाते.
(६)परशुराम ;-
"अविवेकी सूडवृत्ती" असे जे वर्णन कपिलमुनीनी परशुरामाचे केले आहे.. ते म्हणजे अविवेकाचा खरोखर कहर आहे!! :|
(७)हनुमानः- मारूतिचे वर्णन करणे म्हणजे ब्रह्मंडाचे वर्णन करण्यासारखे आहे.
पूर्वजन्मीची इन्द्रलोकीची अप्सरा असलेली अन्जनी वानरयोनीत जन्मल्यावर
सुमेरू पर्वतराजीचे वानरराज केसरीशी विवाहबद्ध झाली. तिची शंकरावर निस्सीम
भक्ती होती. दिवसरात्र ती शिवाराधनेत निमग्न असे. तिच्या भक्तीला प्रसन्न
होऊन शन्करांनी तिला आशीर्वाद दिला, की "तिच्या पोटी शन्कराचा अंश जन्माला
येईल. जो चिरन्जीवी आणि अकरावा महारुद्र असेल. काही दिवसांनी एक पायसरूपी
यज्ञप्रसाद जो अन्जनीच्या हातात आकाशातून पडेल.. तो तिने भक्षण करावा."
अयोध्येस दरशरथाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाद्वारे मिळालेला 'पायसा'चा प्रसाद प्रथम आपल्याला न देता कौसल्येला का दिला म्हणून राणी कैकेयी पायस तसंच हातात ठेवून रुसून बसली. त्यावर ईश्वरी सन्केतानुसार एक घार तिथे आली व तिने कैकेयीच्या हातातला प्रसाद हरण केला. आणि ती दक्षिण दिशेला उडाली. तिथे तो पायसरुपी प्रसाद तिच्या चोचीतून पडला व खाली प्रार्थना करत असलेल्या अन्जनीमातेच्या हाती पडला. तिने तो श्रद्धापूर्वक सेवन केला. व नवमासांती चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्य उगवत असताना शन्कराचा अन्श- मारुति जन्माला आला.
त्यामुळे त्या यज्ञप्रसादाच्या तीन भागांपैकी एक आख्खा भाग अन्जनीस
मिळाला. तर कैकेयीला सुमित्रा व कौसल्येने आपल्या पायसातला थोडा थोडा भाग
काढून दिल्यामुळे त्याचे विभाजन झाले. त्यामुळे हनुमानाकडे रामापेक्षा
जास्त शक्ती होती, सामर्थ्य होते. तसेच मारुति जन्मतःच "जितेन्दिय"
असल्यामुळे त्याला जन्मतःच सोन्याची लन्गोटी होती. सूर्य, ब्रह्मा, विष्णु,
देवी, वायुदेव, शिवपार्वती या सर्वांनी विविध शक्ती मारुति'स प्रदान
केल्या होत्या. या गुरुंनी सांगितलेल्या "जो कुणी तुझी लन्गोटी ओळखेल.. तोच
तुझा स्वामी असेल." या वचनानुसार रामाने सीताशोधाच्या वेळी झाडावर
बसलेल्या हनुमानाला पाहून लक्ष्मणाला सुवर्ण लन्गोटी'बद्दल सांगितले.
तेव्हा मारुतिने त्या क्षणापासून रामाचे दास्यत्व पत्करले. 'राम' हा
महाविष्णुचा सातवा अवतार होता.. तर हनुमान अकरावा रुद्र म्हणजेच शन्कराचा
अन्श होता. रामाशिवाय अनुमानाचे आयुष्य अपूर्ण होते. तर हनुमानाशिवाय
रामाचे जीवन अपूर्ण होते.
सीतेला शोधण्यासाठी, तिच्यापर्यन्त रामाचा निरोप पोचवण्यासाठी, रामाचा दूत
म्हणून रावणाकडे जाण्यासाठी हनुमान एकताच समर्थ होता. अहि-महिरावणाच्या
कैदेतून केवळ हनुमानामुळेच राम-लक्ष्मण सुखरूप बाहेर पडले. द्रोणागिरी
उचलून आणून लक्ष्मणाला संजीवनी औषधी देऊन त्याचे प्राण वाचवणे .. फक्त
मारुतिच करू शकला.
एका क्षणात कित्येक योजने पार करून जाण्याची शक्ती फक्त हनुमानाकडेच आहे.
'ब्रह्मांडा भोवती वेढे वज्रपुच्छे करू शके" हे अजिबात खोटे नाही.
त्रेतायुगात राम वनवासानन्तर पुनः अयोध्येला आल्यानन्तरही मारूतिने
त्याच्या चरणापाशीच राहणे पसन्त केले. रामावतार सम्पताना पुनः द्वापारयुगात
एकदा हनुमाना रामरूपात भेटण्यायाचे वचनही महाविष्णुंनी पूर्ण केले. तसेच
महाभारतातील १८ दिवस कुरुक्षेत्री चाललेल्या महायुद्धात श्रीकृष्णाने
(मागच्या जन्मीच्या श्रीरामाने) हनुमानाला पान्डवांच्या ध्वजावर स्थान
दिले.
शिवाजींचे गुरु- समर्थ रामदास स्वामी हे लहानपणापासूनच प्रभू रामचन्दांचे व
मारुतिचे नि:सीम भक्त होते. त्यांना कलीयुगात काही ४०० वर्षांपूर्वी
साक्षात मारुतिने सगुणरूपात दर्शन दिले होते. रामदासांनी लिहिलेले
"सन्कटनिरसनम् मारुति स्तोत्र- (भीमरुपी महारुद्रा)" अत्यन्त प्रभावशाली
आहे. मारुतिरायाचे अगदी तन्तोतन्त वर्णन आणि स्तवन या स्तोत्रात आहे.
सोळाव्या-सतराव्या शतकातल्या 'तुलसीदास' यांना देखील हनुमानाने दर्शन दिले
होते. त्यांनी लिहिलेले "हनुमान-चालिसा" नियमित वाचणार्या बर्याच जणांना
सन्क्टात असतानादेखील स्वतःभोवती एक सुरक्षा कवच असल्याचे जाणवते. रामभक्त
हनुमानाचे अस्तित्व आजही भक्तांना जाणवते.
*~*~*~*~*~*~*
नवरात्र, गणेशपूजन, वास्तुशान्ती इ. मन्गलप्रसन्गी सप्तचिरंजीवींना आवाहन
केले जाते व त्यांची पूजा केली जाते. हिन्दु धर्मानुसार एखाद्याचा वाढदिवस
हा तिथीनुसार साजरा केला जातो. त्यावेळी सप्तचिरन्जीवींची आठवण काढून श्लोक
म्हटला जातो. व वाढदिवस असणार्याला "चिरन्जीवी भव" असा आशीर्वाद दिला
जातो. लग्नपत्रिका छापतानादेखील मुलाच्या नावामागे "चिरन्जीव" व मुलीच्या
नावाआधी "चिरन्जीव सौभाग्यकंक्षिणी" असे लिहिले जाते. ज्यांना कधीही मरण
नाही अश्यांनाच "चिरंजीवी" असे म्हटले जाते.
रौपदीने अर्जुन मिळावा म्हणुन पाचही जणांशी लग्नाला संमती दिली हे चुकीचे वाटते. तिची संमती विचारण्यात आली होती पंरंतु त्याला फारशी किंमत होती असे वाटत नाही. काय करायचे हे कुंतीने आधीच ठरवुन ठेवले होते. माझे शब्द निष्फळ ठरण्यचा अधर्म माझ्या हातुन होउ नये असे बघा असा कावेबाज पणा कुंतीने केला यातच सगळे आले. काही ठिकाणी असाही उल्लेख आहे की पाच पती मिळणे यात द्रौपदीला उलट आनंदच वाटला.
माझ्या ज्ञानाप्रमाणे ह्या मागे दोन कारणे होती.
१) आजवर एकसंध राहिलेल्या पांडवांच्यात केवळ द्रौपदीमु़ळे फुट पडण्याची वेळ आलेली आहे हे लक्षात येताच कृष्णाने पुढाकार घेऊन कुंती व द्रुपदाशी चर्चा करुन तिचे ५ विवाह घडवून आणले.
२) गतजन्मात घोर तपश्चर्या करून द्रौपदीने ५ गुणांनी युक्त अशा पतीची कामना शंकराकडे* व्यक्त केली. त्यावेळी शंकराने तिला पुढील जन्मी तुला ह्या प्रत्येक गुणात श्रेष्ठ अशा एकेक पतीची प्राप्ती होईल असा आशिर्वाद दिला.
*शंकरच तो देव होता असे आत्ता आठवते आहे, कदाचित ब्रह्मदेव असण्याची देखील शक्यता आहे.
जाता जाता :-
तीला स्वाधीन करून घ्यावयाचा खरा मार्ग आपल्या पतीला आवडणार नाही असे आचरण पत्नीने कधीही न करणे हाच आहे. बसणे, जाणे,हावभाव वा अंत:करणचे निश्चय यापैकी कोणत्याही बाबतीत यत्किंचित देखील त्यांच्या मनाला लागण्यासारखे काहीही घडू नये यासाठी मी सदैव जपत असते. माझ्या पतींचे भोजन झाल्याखेरिज,त्यांनी विश्रांति घेतल्याविना मी कधीही भोजन व विश्रांतीची अपेक्षाही करत नाही. माझे पति कोठूनही आले तरी दासदासींऐवजी मीच उठून त्यांना आसन व उदक देऊन, मी त्यांचे अंत:करणपूर्वक स्वागत करते.घर व उपकरणे सदैव स्वच्छ राहतील,वेळेवर उत्कृष्ट अन्नाचे भोजन त्यांना मिळेल याची मी स्वत: काळजी घेते.खूप हसणे, खूप रागावणे हे मी चुकुनही कधी करत नाही. माझे पति खानापानात जी गोष्ट आणू इच्छित नाहीत, ज्या गोष्टींचा उपभोग ते घेत नाहीत त्या गोष्टी मी पूर्णपणे वर्जित केल्या आहेत .व्रतनियमांचे मी विनयपूर्वक, आळस न करता आचरण करते. मी नेहमी पतीपेक्षा जास्त निजणे,अधिक खाणे वा स्वत:चा थाटमाट करणे या गोष्टी टाळते. उदार अंत:करणाच्या कुंतीबद्दल कधीही वाईट बोलत नाही. ब्राह्मण, स्नातक,गडी माणसे, दासी हजारोंनी होत्या, त्या सर्वांकडे माझे पूर्ण लक्ष असे. पांडवांच्या आयव्ययाची मला पूर्णपणे माहिती होती. माझ्यावर कुटुंबांचा, राज्यातील अंत:पुराचा भार टाकून पांडव आपापल्या कामात गढून राहात. दिवस आणि रात्री पांडवांचे मन संभाळीत असता मला दिवस आणि रात्र सारखेच झाले आहेत. मी पतीच्या आधी उठते व नंतर झोपते.पतीसारखे सर्व जगात दैवत नाहे. त्याच्या प्रसन्नतेत सर्व इच्छा पूर्ण होतात व त्याच्या अप्रसन्नतेत सर्व इच्छांचा विघात होतो."
हा परिच्छेद वाचता वाचता किती गृहस्थ मिपाकरांचे डोळे पाणावतील नै ?
२) ला महाभारतात आधार आहे. आदीपर्वातल्या वैवाहिकपर्वात याचा उल्लेख येतो.
ऋषिकन्या शंकराला तपाच्या योगे प्रसन्न करते. शंकराकडून वर घेतांना मला
पुढच्या जन्मी गुणसंपन्न पती दे असे पाच वेळा म्हणते. शंकर पाच पती
मिळण्याचा आशिर्वाद देतो. कन्या म्हणते की मला पाच पती नकोत. एकच हवाय. मग
शंकर म्हणतो की आता माझ्या मुखातून वर निघून गेला असल्याने तू आता पाच
महाबलवान पतींची पत्नी होशील.
आली का पंचायत ?
खरे म्हणजे चुक माझीच आहे." याला महाभारतात आधार नाही " असा उद्धटपणा
करावयाचे कारण नव्हते. क्षमस्व. आता थोडेसे स्पष्टीकरण. मी लिहलेले चुक
नव्हे, लिहले हे चुक. माझ्याकडे चिपळुणकर आणि मंडळीने भाषांतरित केलेले
महाभारत आहे. इतरही भाषांतरे व प्रति मिळतात..प्रत्येकात काहीकाही फरक
असतो. उदा. कलकत्ता प्रत व हे भाषांतर यात बरेच फरक आहेत. असो. वरील मराठी
भाषांतर काय म्हणते ?
(१) अध्याय १९१, पान ३८५.यात कोठेही कृष्ण, कुंती व द्रुपद यांचेबरोबर
लग्नाची चर्चा करत नाही.तेथे द्रुपद हजरच नाही. पुढे चर्चा आहे ती व्यास व
द्रुपद यांच्यामधील आहे. (अ.१९६, पा.३९३.)
(२) ही कथा व्यास द्रुपदाला सांगत आहेत. पा.३९७. यात पाच गुण वगैरे काही नाही. इति अलम् .
लेखमाला सुरू करतांना एकच उद्देश होता. सर्वसाधारण वाचकाला थोडी माहिती करून देणे. मा.परा, मृत्यंजय, वल्ली, मृगनयनी इत्यादि बहुश्रुत, अभ्यासू सभासदांना यात नवीन काय मिळणार ? त्यांना एकच विनंती , माझ्या लिखाणात काही उणिवा, चुका आढळल्या तर अवष्य नजरेत आणाव्यात. (व प्रतिसादात काही महाभारताबाहेरचे आले तर तेही नमुद करावे.)
शरद
बरीच माहिती मिळाली, पण एक जयद्रथाने तिला पळवण्याचा भाग मी खरच कधी वाचला नाही. हे जरा नविन .
बाकि द्रौपदीची वेश्या म्हणुन बर्याचदा हेटाळणी झालेली दिसते महाभारतात. त्यालाच निगडीत अशी एक कहाणी.
हस्तिनापुरच्या महालात रोज सकाळी द्रौपदी अन दुर्योधन पत्नि भानुमती
तुळशीला पाणी घालताना भेटत, अन रोज भानुमती द्रौपदीला "काल कोण होता? " अस
खोचुन विचारत असे.
या विषयीची तक्रार तीने कृष्णाकडे केल्यावर कृष्णाने दुसर्या दिवशी हाच प्रश्न भानुमतीला फिरुन विचार असे सांगितले.
द्रौपदीने अस म्हणायचा अवकाश भानुमती गर्रकन वळुन निघुन गेली , पण जाताना
तिच्या हातातला गडु खाली पडला . तो उचलायची फिकिर ही न करता धावत जाणारी
भानुमती पाहुन द्रौपदीला आश्चर्य वाटले. तिने कृष्णा कडे खुलासा
मागितल्यावर कृष्णाने सांगितलेली कथा अशी की, दुर्योधनाचे आपल्यावरिल प्रेम
जरासुद्धा कमी होउ नये म्हणुन भानुमतीने एक वशिकरण तेल बनवुन घेतले होते.
रोज रात्री ती त्या तेलाने दुर्योधनाच्या डोक्याला मालीश करत असे. एक दिवस
तेल हाताच्या ओंजळीत ओतुन घेत असताना त्यातल थोड चुकुन खाली जमिनीवर
पडल, स्त्री स्वभावा नुसार भानुमतीने ते बोटांनी निरपुन घेतल. पण या
प्रकारात झाल काय की तिच्या या कृतीने शेषाच्या शीरी तीच्या हातुन मसाज
झाल्या सारख होउन , शेष तिच्या आसक्तीने प्रकट झाला. भानुमतीला त्याची
वासना पुरवावी लागली.
एकूण पंचकन्यांच्या राशिला बराच त्रास होता अस दिसतय, अन तो ही पुरुषांकडुनच.
सहमत .. टू अपेक्षा-अक्षय!..
मला माहित असलेल्या स्टोरीत 'काल कुणाची पाळी होती?'..हा प्रश्न दुर्योधन द्रौपदीस विचारीत असे.. मग पुढे शेषाकडून बायकोचा विनयभन्ग + अजून काही झाल्यावरही दुर्योधनाने पुन्हा दुसर्या दिवशी द्रौपदीस तोच प्रश्न विचारला, तेव्हा पान्चाली म्हणाले, की "काल ना.. शेषाची पाळी होती.." =)) =)) =)) ;)
द्रौपदी अग्निकन्या होती... अर्थात ती अयोनिज होती.
द्रौपदी आधी "स्वर्गलक्ष्मी" होती. (स्वर्ग लक्ष्मी- लक्ष्मीमातेचे एक
सुन्दर रूप). एका गाईच्या मागे पाच बैल धावत असताना "स्वर्गलक्ष्मी"
चेष्टेने हसली होती... तेव्हा त्या गोमातेने स्वर्गलक्ष्मीस शाप दिला, की "
तूही पाच जणांची होशील..आणि तुलाही सारे चेष्टेने हसतील...."
अर्थात द्रौपदी स्वतः स्वर्गलक्ष्मी असल्याने ती कुण्या ऐर्या गैर्या पाच जणांबरोबर सम्बन्ध ठेवणे शक्यच नव्हते. आणि पान्डव देखील ईश्वरी शक्तीचेच प्रकट रूप होते... धर्मराज युधिष्ठिराचे वडील- यमधर्म, भीमाचे वडील- वायुदेव, अर्जुन- इन्द्राचा अन्श होता... तर नकुल-सहदेव हे अश्विनीकुमारांचे अन्श होते. त्यामुळेच स्वर्गलक्ष्मीच्या द्रौपदीच्या रुपासाठी हे पाण्डव अत्यंत योग्य होते.
त्यामुळे आण्लेली भिक्षा पाच जणांत वाटून घ्या" हे कुन्तीमातेचे शब्द ही दैवी योजनाच होती...कुन्तीला असलेली वाचासिद्धी'देखील द्रौपदीला पाच जणांची होण्यास कारणीभूत ठरली...
स्वयंवरात अर्जुनाने माश्याचा डोळा फोडला असल्यामुळे द्रौपदीने त्यास मनापासून वरले होते. पण घरी गेल्यावर कुन्तीच्या आज्ञेनुसार तिला पाच जणांमध्ये स्वतःस वाटून घ्यावे लागले. याचा अर्थ ती एकाच वेळेस पाच जणांची बायको होती, असे नव्हे.
वर्षातील साधारण अडीच महिने प्रत्येकाला वाटून दिले गेले होते. त्या अडीच महिन्यांत ती त्या नवर्याशी एकनिष्ठ असायची. आणि बाकी नवरे त्यांची वेळ यीएपर्यंत तिला हात देखील लावत नसत व मातेप्रमाणे व्यवहार करीत असत.
एकाबरोबरचे अडीच महिने सम्पले की ती स्वतःला "अग्निकुंडा"मध्ये शुद्ध करून घेत असे. व दुसर्या नवर्याशी तितक्याच एकनिष्ठेने पत्नीधर्म निभावत असे. या पाच पांडवांव्यतिरिक्त तिच्या मनात इतर कुणाचाही विचार कधीच्च शिवला नाही.
एकदाच काय ते तिला वाटले होते, की ""या पाच पांडवांप्रमाणे जर "कर्ण" ही घोषित सर्वमान्य पान्डुपुत्र असता, तर कदाचित मी त्याचीही पत्नी झाले असते..."" पण तिच्या भावाने= भगवान कृष्णाने तिच्या मनात आलेला हा विचार पुढे वाढू नये आणि पुन्हा तिच्या मनी असे विचार येऊ नयेत.... यासाठी खूप छान आयडीया करून तो विचार समूळ नष्ट केला... "स्व. विठ्ठल उमप" यांचे प्रसिद्ध जाम्भूळ आख्यान हे याच स्टोरीशी रिलेटेड आहे.
अश्या प्रकारे दौपदी ही मनाने आणि शरीराने दोन्हींनी आपल्या पतींशी एकनिष्ठ होती.
त्यामुळेच पान्चाली- द्रौपदी या स्वर्गलक्ष्मी अग्निकन्येला महान पतिव्रतांमध्ये गणले जाते. :)
धन्यवाद अपर्णा अक्षय.
ही कथा पहिल्यांदाच ऐकली. अशीच एक कथा द्रौपदीच्या बलात्काराबद्दल आहे, ज्यात चक्क चक्क रोज वासुकी नागाकडून होणार्या बलात्कारापासून कर्ण तिचे रक्षण करतो असे आहे. भिल्ल महाभारता मधे ही कथा वाचता येईल.
लिंक :-
http://www.boloji.com/index.cfm?md=Content&sd=Articles&ArticleID=1194
स्वर्गा रोहण करताना द्रौपदी पडली (मेली) तेव्हा युधिष्ठीर म्हणतो , हीचे सर्वात जास्त प्रेम अर्जुना वर होते म्हणून ही सदेह स्वर्गात येउ शकत नाही ...
असेच भीम अर्जुन आणि इतर भावंडांच्या बाबतीत होते ...
अशी एक कथा आहे !!
अवांतर : पाचजणांशी प्रामाणिक राहणे याला 'एक'निष्ठ कसे म्हणायचे ?? शब्द्च्छल होतोय
बरीच नवी माहिती अलीकडच्या काळात महाभारताबद्दल मिपावर मिळत आहे.
पांचाली वर पूर्वी सहारा टीवी वर एक मालिका लागायची.
हि प्रमुख भूमिका मृणाल कुलकर्णी मोठ्या तडफेने साकारायची. पण अचानक ती मालिका बंद पडली.
आज ह्या लेखामुळे जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला.
महाभारत ह्या मालिकेची लोकप्रियता कळसाला पोहोचली होती. हे तर सर्वश्रुत आहे. पण त्यातील पात्रे सुद्धा आपल्या भूमिकेत पूर्णतः एकरूप झाली होती.
शाळेत अनेक वर्ष चिमण्या पाखरांसारखे बागडल्या वर शेवटच्या दिवशी सेंड
ऑफ ला जी काही अवस्था विद्यार्थ्यांची होते. तीच अवस्था महाभारतील सर्व
पात्रांची झाली
http://www.youtube.com/watch?v=1hDS1PhKn7A
द्रौपदीचे खरे प्रेम (लोवे अत फिर्स्त सिघ्त) अर्जुनावरच होते.. ;) पण अर्जुन पडला.. इन्द्रदेवाचा अन्श!!! तो इन्द्रदेव ज्याने अत्यन्त हीन आणि हिणकस पद्धतीने अहिल्येस बाटवले... :(
पण अर्जुनाच्या बरोबर श्रीकृष्ण असल्याने त्याची सदसदविवेक बुद्धी बर्यापैकी जागृत होती.
एकदा अर्जुना'वर अप्सरा- उर्वशी अत्यन्त लुब्ध झाली होती..आणि तिने
अर्जुनाबरोबर फ्लर्टिंग करायलाही सुरुवात केली होती.. पण अर्जुनाने काही
कारणास्तव तिस मातेसमान मानले.. व तो तिच्या पाया पडला.. ""अर्जुनाने
आपल्याला धिक्कारले"याचा उर्वशीला खूप राग आला.. तेव्हा तिने अर्जुनास "एक
वर्ष नपुंसक" होण्याचा शाप दिला.. अर्थात तो अर्जुनाच्या पथ्यावरच पडला..
या नपुंसकत्वाच्याच काळात पान्डव वेष बदलून विराट-राजाच्या आश्रयास
आलेले होते. तेथेच अर्जुन "बृहन्नडा" रुपात राहिला होता.. व आपल्या
होणार्या सुनेला (अभिमन्युच्या बायकोला) - उत्तरे'ला नृत्य कला शिकवली
होती. येथेच द्रौपदीच्या(सैरंध्रीच्या) रक्षणासाठी भीमाने (बल्लवाचर्याने)
याच राजाच्या मेव्हण्याचा- कीचकाचा वधही केला होता..
असो...
अर्जुनाने सुभद्रेबरोबर लग्न करावे, ही श्रीकृष्णाची इच्छा असल्याने त्यास दुर्योधन, बलराम कुणीच अडवू शकले नाही. पाताळलोकात चित्रांगदा तर नागलोकात "उलूपी" यांच्याशीही अर्जुनाने विविध कारणांसाठी लग्न केले..
तसेही द्रौपदीव्यतिरिक्त प्रत्येक पांडवाला १-२ बायका होत्याच...
धर्मराजा- देविका
भीम- पद्मिनी / जलन्धरा, हिडिम्बा
अर्जुन- उलुपी, चित्रांगदा, सुभद्रा
नकुल- करेनुमती
सहदेव- विजया
म्हणजे म्हटलं तर द्रौपदी सगळ्यांचीच होती.. किन्वा म्हटलं तर ती फक्त
स्वतःचीच - एक लवलवती शलाका होती ती महाभारताला कारणीभूत ठरलेली तेजस्वी
अग्निशिखा होती.
हॅट्स ऑफ फॉर हर!!! :)
कीचक
हा विराट'राजाच्या पदरी सेनापती असला, तरी तो त्याचा मेव्हणादेखील होता.
विराट राजाची पत्नी- "सुदेष्णा" हिचा कीचक भाऊ होता. (याचा उल्लेख -
ओरिजिनल महाभारत तसेच इतर कादम्बर्यांमध्येही आढळातो. - याज्ञसेनी, महासती
द्रौपदी, पांचाली, इ... )
पांडव अज्ञातवासात असताना स्वतःची ओळख कोणास सांगू शकत नव्हते. तेव्हा
द्रौपदी "सैरन्ध्री" या नावाने सुदेष्णेची दासी बनून राहिली होती. ती एकदा
सुदेष्णेची सेवा करीत असता तिथे सुदेष्णेस भेटायला तिचा भाऊ- "कीचक" आला व
सैरन्ध्रीस पाहताच तो तिच्या सौन्दर्यावर लुब्ध झाला..
एक्दा दोनदा त्याने सैरन्ध्रीवर बळाजबरी करण्याचा प्रयत्नही केला.. पण सैरन्ध्री / द्रौपदीने भीमास याची कल्पना देऊन भीमाकरवी कीचकाचा वध करविला.
पुढे एक वर्ष सम्पल्यावर सर्व पांडवांनी आपली खरी ओळख विराट राजास दिली.. आणि त्याची मुलगी "उत्तरा" हिचे अभिमन्यूबरोबर लग्न लाऊन दिले.
२००८ साली Dian Sastrowardoyo यांनी Drupadi या नावाने bahasa indonesia या त्यांच्या भाषेत एक चित्रपट प्रदर्शित केला. द्रौपदीची भूमिका,निर्मिती, आणि दिग्दर्शन पण त्यांचेच आहे तू नळीवर सहा मिनिटांची चित्रफीत उपलब्ध आहे ती अवश्य पहावी. दुवा खालीलप्रमाणे आहे. www.youtube.com/watch?v=FhazkwJzxQU
महाभारतातील व्यक्तिचित्रे-३ राजर्षि भीष्म
राजर्षि भीष्म
(आज तिसर्या भागाला सुरवात करण्याआधी एक गोष्ट सांगु इच्छितो. प्रतिसादात अनेकजण निरनिराळ्या गोष्टी देत असतात. काय होते, रामायण-महाभारत यांसारख्या ग्रंथावर लुब्ध होऊन बरेच लेखक त्या ग्रंथात नसलेल्या गोष्टींची भर घालत असतात. कीर्तनकार, पुराणिक, कादंबरीकार व ग्रामिण लेखक यांचा असल्या गोष्टींवर भर असतो व काही कथा लोकप्रियही असतात. उदा. जांभुळआख्यान. पण अश्या "ग्राम्य" गोष्टींमुळे महाभारतातील पात्रांवर अन्याय होतो. व अशीही समजुत होणे शक्य आहे की असे खरेच महाभारतात आहे.. प्रतिसादकर्त्यांच्या बहुश्रुतपणाबद्दल आदर बाळगून माझी नम्र विनंती आहे की हे मनोरंजक किस्से सांगतांना जर ही गोष्ट महाभारतात आहेच याची खात्री नसेल तर तसा उल्लेख केल्यास बरे होईल. उदाहरण म्हणून भानुमतीची गोष्ट घ्या.आदि कालापासून लोकधारणांमध्ये नाग हा पुरुषाचे प्रतिक मानला गेला आहे म्हणून अश्या गोष्टीत शेषाचा उल्लेख.होतो. ही गोष्ट लिहतांना मूळ कथानकातील संदर्भ तुटतात इकडेही दुर्लक्ष होते. खेडेगावात एका वाड्यात दोन भाऊ व त्यांच्या बायका एकत्र राहतात व तुळसीला पाणी घालतांना त्यांना एकमेकींच्या उखाळ्यापाखाळ्या काढता येतात. पण सम्राट कुळातील कौरव-पांडवांचे महाल निरनिराळे असतात इकडे लक्ष जात नाही. मग कृष्णही द्वारकेत असण्याऐवजी या "वाड्याच्या " पलिकडच्या गल्लीत मुक्कामाला असतो व द्रौपदी गार्हाणे घेऊन त्याच्याकडे जाते असे मानावे लागते. मनोरंजक किस्से द्यावयास माझी मुळीच हरकत नाही. पण त्यांची योग्य जागा माहीत असणे उचित. आणि महाभारतात अश्या गोष्टींचा खजिनाच आहे. उदा. माधवी व गालव. पाहिजे तर त्याही सांगू.)
राजर्षि भीष्म हे महाभारतकालीन योद्ध्यांमधील सर्वश्रेष्ठ धनुर्धर होते." हातात शस्त्र घेणार नाही " ही श्रीकृष्णाची प्रतिज्ञा त्यांनी दोनवेळा मोडावयास लावली. " मला सेनापति कर, मी त्यांना रथाखाली आणतो " असे श्रीकृष्णाला युधिष्ठिराला सांगावे लागले. परशुरामाशी त्यांनी तेविस दिवस युद्ध केले व त्याला पराभूतही केले. काशीराजाच्या राजधानीत त्यांनी एकट्याने सर्व राजमंडळाशी युद्ध करून त्यांना पराभूत केले व तीन राजकन्या जिंकून आणल्या. पण हा एक पैलू झाला. श्रीरामाप्रमाणे त्यांनीही पितृभक्तीमुळे राज्यावर पाणी सोडले व हे पुरेसे नाही म्हणून की काय आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली व ती शेवटपर्यंत पाळली.त्यामुळे कोणतीही अंतिम टप्प्याची प्रतिज्ञा म्हणजे "भीष्मप्रतिज्ञा " असे म्हणण्याचा प्रघात पडला. "रामबाण " सारखा. आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे त्यांचे धर्म, नीती, अर्थ, राजकारण, समाजकारण इ. संबंधी ज्ञान. युद्धानंतर भीष्मांची अंतिम घटिका जवळ आलेली पाहून व्यथित झालेले श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले " जे जे काही तुझ्या मनांत असेल ते ते त्यांना विचार. ध्रर्मार्थकाममोक्ष, सर्व विद्या,त्रैवर्णिकाम्ची सर्व कर्मे, चारही आश्रमांचे धर्म व राजधर्म यांविषयी सर्व काही त्यांना विचार. त्यांच्या बरोबरच सर्व ज्ञान लोप पावणार आहे." भीष्मांच्या ज्ञानाबद्दल हे श्रीकृष्णाचे मत आहे.
जन्म
ब्रह्मलोकांत गंगादेवी एकदा ब्रह्मदेवाच्या दर्शनास गेली असतांना वार्याने तिचा पदर उडू लागला असतांना सर्व सभासदांनी खाली माना घातल्या.पण महाभिष नावाच्या राजाने तिच्याकडे नि:शंकपणे पाहिले व गंगाही क्षणभर त्याच्याकडे पाहूं लागली. ब्रह्मदेवाने त्याला शाप दिला की "तू पुनश्च मर्त्यलोकी जा. तेथे गंगा तुला पत्नी म्हणून मिळेल पण ती तुझे अप्रिय करेल. त्याचा तुला राग आल्यावर तू परत येथे येशील ".त्याप्रमाणे त्याने कुरूवंशांत शांतनू म्हणून जन्म घेतला. हा अत्यंत बुद्धिमान, धर्मात्मा, सत्यसंघ होता. जीतेंद्रियता,ज्ञान,क्षमा, अभिजातता, तेज व सामर्थ्य हे त्याचे नैसर्गिक गुण होते. भीष्मांना आपल्या पित्याचा अतिशय अभिमान होता व पित्यावर त्याचे आंत्यंतिक प्रेम होते. ते आपल्याला "शांतनव" म्हणवून घेत.
इकडे गंगा पृथीवर येण्यासाठी निघाल्यावर वाटेत तिला अष्टवसू भेटले. वशिष्ठांनी शाप दिला म्हणून त्यांनाही मर्त्यलोकी जन्म घ्यावयाचा होता. त्यांनी गंगेला विनंती केली की आम्हाला मानवी स्त्रीच्या गर्भात जन्म घेण्याची इच्छा नाही. तेव्हा तू आम्हाला जन्म दे व लगेच पाण्यात बुडवून टाक.( देवही कसे डॅंबिसपणा करतात बघा. शापाप्रमाणे इथे जन्म घेतला पण भोग मात्र भोगावयास नकोत !) गंगेने त्याला मान्यता दिली पण ती स्त्रीसुलभ प्रेमाने व वात्सल्यतेने म्हणाली "माझ्यासारखी देवी पत्नी म्हणून मिळाल्यावर शांतनू निपुत्रिक मरता कामा नये. तुमच्या सर्वांचा अंश असलेला दीर्घायू पुत्र त्याला मिळालाच पाहिजे." वसूंनी त्याला मान्यता दिली. शांतनूला गंगा भेटल्यावर तिच्या दैवी सौंदर्यावर लुब्ध होऊन त्याने तिला मागणी घातली. ती म्हणाली " माझी एक अट आहे. माझ्या कोणत्याही कृतीला तू हरकत घेता कामा नये. नाही तर मी तत्काळ निघून जाईन." शांतनूने त्याला मान्यत दिली व त्यांचा विवाह झाला. नंतर मुलगा झाला की गंगा त्याला पाण्यात बुडवून टाके. शांतनूला काहीच बोलता येत नसे. आठव्या पुत्राच्या वेळी त्याने "निदान याला तरी बुडवू नकोस " अशी गंगेची प्रार्थना केली. गंगा म्हणाली " हा दीर्घायू पुत्र तुला मिळेल पण आपल्यात ठरल्याप्रमाणे मी मात्र निघून जाणार ". जातांना ती भीष्माला बरोबर घेऊन गेली.
शिक्षण
काही वर्षांनी शांतनू गंगेकाठी फ़िरत असतांना एक तरुण मुलगा बाणांनी प्रवाह रोखून धरत आहे असे त्याला दिसले. तो चकितच झाला. इतक्यात स्वत: गंगा तेथे प्रकट झाली व त्याला म्हणाली " हे राजा, हा मी घेऊन गेलेला तुझा मुलगा. स्वर्गात याने वसिष्ठ, देवगुरू बृहस्पति, असूरगुरू शुक्राचार्य व परशुराम यांच्याकडून शिक्षण घेतले आहे. हा दीर्घायु पुत्र आता तुझ्याबरोबर राहील." गंगा निघून गेली व शांतनू आनंदाने राजधानीत परतला. गंगादेवीचा पुत्र आणि या चार जगन्मान्य गुरूंकडे शिक्षण यामुळेच श्रीकृष्णांनी प्रशंसा करावी एवढे ज्ञान भीष्मांना प्राप्त झाले.
भीष्मप्रतिज्ञा
भीष्माला युवराज्याभिषेक करून शांतनू तसा मोकळा होता.गंगेकाठी फिरतांना त्याला एक लावण्यवति, जिच्या अंगाचा सुगंध सगळीकडे पसरला होता, त्याला दिसली. तो प्रेमात पडला व त्याने तिच्या बापाकडे जाऊन लग्नाकरिता मागणी घातली. बाप म्हणाला "हिचा मुलगा राज्याधिकारी होणार असेल तर मला मान्य आहे." शांतनूने अर्थात नकार दिला व तो परतला. पण त्याच्या वागणुकीत जरा फरक पडला. भीष्माने जरा चौकशी केल्यावर त्याला हा प्रकार कळला. तो वडिलांशी न बोलता परस्पर तिच्या बापाकडे गेला. बापाने परत तेच सांगितले. भीष्माने प्रतिज्ञा केली " मी राज्यावरील अधिकार सोडला. तुझ्या मुलीला जो पुत्र होईल तोच आमचा राजा होईल." आता बापाला आणखी लोभ सुटला. तो म्हणाला " आपण आपली प्रतिज्ञा पाळाल पण आपल्या मुलांचा काय भरोसा ?" भीष्माने लगेच दुसरी प्रतिज्ञा केली " मी आजपासून ब्रह्मचर्य पाळीन ! " या त्यागावर प्रसन्न होऊन शांतनूने त्याला वर दिला की " तू स्वेच्छामरणी होशील ".
दुर्दैवाचे आघात
सत्यवतीला शांतनूपासून दोन पुत्र झाले. शांतनू वारल्यावर मोठा राजा झाला
पण तो लवकरच एका युद्धात मरण पावला. धाकट्याला भीष्माने राज्यावर बसवले.
त्याच्याकरिता वधू म्हणून त्याने काशीराजाच्या तीन मुलींचे स्वयंवर होते
तेथे जाऊन अम्बा, अंबिका व अंबालिका या तिघींचे हरण केले. तेथे जमलेल्या
सर्व राजांचा त्याने पराभव केला. त्यातला एक शाल्व. घरी आल्यावर तिघींचा
विवाह करण्याचे ठरवल्यावर अंबेने त्याला सांगितले की तिचे शाल्वावर प्रेम
असून दोघांनी लग्न करावयाचे ठरविले होते. सगळ्यांशी विचारविनिमय करून
भीष्मांनी बरोबर ब्राह्मण, दासी वगैरे देऊन तिची रवानगी शाल्वाकडे केली.
मात्र शाल्वाने तिला स्विकारावयास नकार दिल्याने तिला काहीच मार्ग उरला
नाही. मग तिने परशुरामांची विनवणी केली. त्यांनी भीष्माला सांगितल्यावरही
तो आपल्या भावाकरिता अंबेला स्विकारावयास तयार झाला नाही. मग परशुराम-भीष्म
यांचे तेवीस दिवस युद्ध झाले. त्यांत भीष्मांचा जय झाला. या विजयाने
भीष्माचे नाव सर्व भारतात सर्वोत्तम योद्धा म्हणून झाले. जरासंधासारख्या
सम्राटालाही हस्तिनापूराकडे वाकडा डोळा करून पहावयाची हिम्मत झाली नाही.
अंबेला आता कोणीच त्राता उरला नाही. तिने कडक तप आचारावयास सुरवात केली.
शेवटी शंकराने तिला वर दिला कीं पुढील जन्मी ती भीष्मांचा वध करेल. ती
पुढील जन्मी द्रुपदाची मुलगी (शिखंडी) म्हणून जन्मली पण एका चमत्कारिक
योगाने तिचा प्रुरुष झाला. भीष्मांना ही गोष्ट माहीत असल्याने त्यांनी पुढे
शिखंडीशी युद्ध करावयाचे टाळले. या शिखंडीच्या पाठीमागे राहून अर्जुनाने
भीश्मांशी शेवतचे युद्ध केले. शांतनूचा धाकटा मुलगा विचित्रवीर्य याच्याशी
अंबिका व अम्बालिका या दोघींचा विवाह झाला. हा इतका कामी निघाला की तो
लवकरच क्षय होऊन मृत्यु पावला. आता वंशात पुत्रच नाही अशी अवस्था प्राप्त
झाली. सत्यवतीने भीष्मांसमोर दोन पर्याय ठेवले. त्यांनी राज्य स्विकारावे व
लग्न करून वंश वाढवावा किंवा नियोग पद्धतिने अम्बिका-अम्बालिका यांना
पुत्र द्यावेत. भीष्मांनी दोन्ही पर्यायांना ठाम नकार दिला नियतीचा खेळ पहा
: जिच्या करिता भीष्मांनी दोन प्रतिज्ञा केल्या तिच्यावरच त्यांनी आता
त्या मोडाव्यात असे सांगण्याची पाळी आली ! भीष्मांनी एक पर्याय पुढे ठेवला.
एखादा चांगला ब्राह्मण बघून त्याच्याकडून पुत्रप्राप्ती करून घ्यावी. नंतर
सत्यवती त्याला सांगते की तिला महर्षि पराशर यांच्यापासून एक पुत्र झाला
होता व तो म्हणजे महर्षि व्यास. नंतर भीष्मांच्या अनुमतीने सत्यवतीने
व्यासांना बोलावून घेतले व त्यांना नियोगाची आज्ञा दिली. व्यासांचा अवतार
पाहून राणीने डोळे मिटून घेतले ते उघडलेच नाहीत. धृतराष्ट्र आंधळाच जन्मला.
दुसरी अम्बालिका इतकी घाबरली की पांढरीफटक पडली. पांडू हा पांडुररंगाचा
झाला. तिसर्यावेळी अम्बिकेने आपण जाण्याऐवजी आपली दासीच पाठवून दिली !
तिला घाबरावयाचे कारणच नसल्याने तिने व्यासांचे स्वागत मनोभावाने केले.
व्यासांनी प्रसन्न होऊन तिला वर दिला की तुझ्या पोटी साक्षात यमधर्मच जन्म
घेईल. तो धर्मात्मा विदूर. जन्मांध असल्याने धृतराष्ट्राचा
सिंहासनावर अधिकार नव्हता. पांडूला राज्याभिषेक झाला. दासीपुत्र विदुर हा
विद्वान मंत्री होता. धृतराष्ट्राचे गांधारीशी लग्न झाले.पांडूला कुंती व
माद्री या दोन बायका होत्या. आता भीष्मांना नातवंडे खेळवत बसावयास
हरकत नव्हती. पण झाले काय ....
पांडूला मृगयेचा नाद. त्यामुळे धृतराष्ट्राला भीष्म व विदुर यांच्या मदतीने
राज्य कारभार बघावयास सांगून तो आपल्या दोन बायकांबरोबर वनातच वेळ काढी.
एकदा मृगया करतांना एका ऋषीला त्याचा बाण लागला व त्याने पांडूला शाप दिला
की संभोगासाठी तू बायकोला हात लावलास की तू मरशील. आता निपुत्रिक मरावयाचे
की काय ? त्याने कुंतीला सांगितले की नियोग पद्धतीने पुत्र प्राप्त करून
घे. कुंतीने त्याला दुर्वाससांचा वर सांगितला. आनंदाने पांडूने यमधर्माकडून
धार्मिक पुत्र मिळव असे तिला सांगितले. युधिष्ठिराचा जन्म झाला. पण एका
मुलाने कसे भागणार ? त्याच्या सांगण्यावरून कुंतीला भीम व अर्जुन हे पुत्र
झाले. पुढे कुंतीने नकार दिला म्हणून माद्रीने तिच्याकडून मंत्र घेतला व
तिला नकुल-सहदेव ही मुले झाली. गांधारीलाही दुर्योधनादि शंभर मुले झाली.
पांडूचा मृत्यु झाल्यावर माद्री त्याच्याबरोबर सती गेली व कुंती पाच
मुलांना घेऊन राजधानीला आली. भीष्मांनी कृपाचार्य व मग द्रोणाचार्य
यांसारखे श्रेष्ठ गुरूंकडून मुलांना शिक्षण दिले. द्रौपदी स्वयंवरानंतर
जेव्हा पांडव परतले तेव्हा कलह नको म्हणून राज्याची वाटणी करण्यात आली.
पांडव बाहेर निघून गेले म्हणून भीष्म, कृपाचार्य व द्रोणाचार्य कौरवांकडेच
राहिले व शेवटपर्यंत त्यांच्याच बाजूने लढले.
द्यूतप्रसंग
भीष्मांवर सर्वात जास्त गंभीर आरोप करण्यात येतो तो द्यूतप्रसंगी त्यांनी द्रौपदीची बाजू घेऊन कौरवांना शासन केले नाही म्हणून. सत्याची बाजू घेऊन त्यांनी असत्याचा मोड करावयास पाहिजे होते, ते गप्प बसले ही चुक अशी समजूत आहे. नक्की काय झाले ? द्यूत कपटाने खेळले जात आहे असे सर्वांनी सांगितले व तरीही युधिष्ठिर ते खेळला. त्यात तो हरला व त्याने स्वत: व स्वत:चे भाऊ दास आहोत हे कबूल केले.त्याने आपली बायको पणाला लावली व त्यातही तो हरला. त्या वेळी कौरवांनी त्याला सांगितले की " "मी दास नाही " असे तू सांग, आम्ही सर्वांना सोडून देतो." त्याला तो कबूल नाही. म्हणजे एखादा राजा स्वत: दास आहे असे कबूल करत असतांना इतरांनी काय करावयाचे ? द्रौपदीने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी दिलेल्या उत्तरात त्यांनी सांगितले की, "दास इतरांचा मालक नाही, पण त्याचा त्याच्या पत्नीवरील अधिकार नाहीसा होत नाही." हे त्या वेळच्या धारणांना धरून आहे. "मी अर्थाचा दास आहे" असे ते म्हणतात तेव्हा "अर्थ" याचा अर्थ पैसा असा घेणे चुकीचे आहे. ज्याने राज्याचा त्याग केला तो चार पैशांकरिता लाचार होईल असे समजणे चुकीचे वाटते. त्यांनी एकदा सांगितल्याप्रमाणे कुरूराज्याचा सेवक ही त्यांनी घेतलेली भुमिका आहे व अर्थ याचा अर्थ 'पुरुषार्थ", स्वत:चे ठरविलेले काम, असे त्यांना म्हणावयाचे असावे.
विराटपर्वात अर्जुन एकट्याने सर्व कौरवांचा पराभव करतो व त्यांना संमोहित करून त्यांची वस्त्रे आणावयास उत्तराला सांगतो, तो म्हणतो " बाबा रे, द्रोण, कर्ण, दुर्योधन इत्यादींची वस्त्रे आण, पण भीष्मांसमोरून गुपचुप जा, त्यांना एकट्यालाच या अस्त्राचा प्रतिकार कसा करावयाचा माहीत आहे." एकमेवाद्वितीय !
भीष्मपर्व
दुर्योधनाची युद्धाची भिस्त कर्णावर अवलंबून होती तरी त्याला भीष्मांचे श्रेष्टत्व चांगलेच माहीत होते. म्हणून सुरवातीलाच भीष्म-कर्ण यांच्यात वाद निर्माण झाल्यावर त्याने कर्णाला बाजूला करून भीष्मांनाच सेनापती केले. त्याच वेळी भीष्मांनी आपण काय करू व आपण काय करणार नाही याची स्पष्ट कल्पना दुर्योधनाला दिली. व पांडवांनी मागितलेला सल्ला त्यांना देईन हेही सांगितले. भीष्मांनी अवंचक युद्ध केले. तिसर्या व सातव्या दिवशी कृष्णाला आपली प्रतिज्ञा मोडावी लागली यातच त्यांच्या सरळ वृत्तीने केलेल्या युद्धाची खुण दिसते. शिखंडी हा प्रथम स्त्री होता व नंतर पुरुष झाला असल्याने मी त्याच्यावर बाण सोडणार नाही हे त्यांनी आधीही सांगितले होते. प्रत्यक्ष युद्धासंबंधी येथे काही लिहित नाही.
अंत
रथातून खाली पडल्यावर भीष्मांनी प्राण सोडावयाची तयारी केली. पण
त्यावेळी दक्षिणायण होते. उत्तरायणात प्राण सोडणे मान्य असल्याने त्यांनी
शांतनूने दिलेल्या वराचा उपयोग करण्याचे ठरविले व शारीरिक वेदना सहन
करावयाच्या पण प्राणत्याग नंतरच करावयाचे ठरविले. या वेळीही त्यांनी
दुर्योधनाची समजुत घालावयाचा प्रयत्न केला. कर्णाला त्याचा उगम सांगून
त्याचेही मन वळवण्याच्वा प्रयत्न केला. ते अशक्य आहे असे दिसल्यावर मोठ्या
मनाने त्याचे क्षत्रीयत्व, नैपुण्य मान्य करून केवळ कलह टाळण्यासाठी तुझा
अवमान करत होतो असेही कबूल केले. योग्य पद्धतीने लढावयास परवांगीही दिली.
वर सांगितल्याप्रमाणे या काळातच युधिष्ठिराने त्यांना आपल्या सर्व शंका
विचारल्या. महाभारतातला हा सर्वात महत्वाचा भाग. केवळ यामुळेच महाभारताला
"पंचमवेद" ही मान्यता प्राप्त झाली. अंतिम काळात त्यांनी योगमार्गाने
ब्रह्मरंध्राचा भेद करून प्राण अंतरिक्षात विलीन केले.
शरद
देवव्रताचा (भीष्म) बाप राजा शंतनू सत्यवती नावाच्या कोळीणीच्या प्रेमात पडला. पण सत्यवतीच्या बापाने लग्नाला नकार दिला करण सत्यवतीला होणाऱ्या मुलांचा सिहासनावर अधिकार असणार नाही कारण आधीच देवाव्रताचा जन्म झाला होता. लग्नाला नकार मिळाल्याने राजा शंतनू नाराज होता त्याच्या नाराजीचे कारण शोधून काढून देवव्रत सत्यवतीच्या वडिलांना भेटला आणि आजन्म ब्रह्मचर्याची भयानक (भीष्म) प्रतिज्ञा त्याने केली त्यावर खुश होऊन देवानी किंवा त्याच्या वडिलाने (इथे माझे जरा कन्फ्युजन आहे नक्की वर कोणी दिला) त्याला इच्छामरणाचा वर दिला (भीष्माला हवे तेंव्हाच त्याचा मृत्यू होईल). या वराचा फायदा भीष्माला पराशुरामाबरोबर झालेल्या युद्धात झाला, तसेच शेवटी शरशय्येवर भीष्म पडला तेंव्हा दक्षिणायन सुरु होते, भीष्माला उत्तरायणातच प्राणोत्क्रमणाची इच्छा होती, त्यामुळे परत उत्तरायण सुरु होईपर्यंत इच्छामरणाच्या वरामुळे त्याचे लगेच प्राणोत्क्रमण झाले नाही.
वर शन्तनुनेच दिला. परशुरामाबरोबर झालेल्या युद्धात ह्याचा कसा फायदा झाला हे जाणुन घ्यायला आवडेल. परशुराम चिरन्जिवी आणि भीष्म इच्छामरण प्राप्त झालेला असल्यामुळे नक्की काय झाले असेल? An Irresistible Force Meets An Immovable Object...
कोणता बाप आपल्या सद्गुणी मुलाला असा वर देईल? कामी पित्याने दिलेले हे वरदान पुढे सर्वनाशाला कारणीभूत झाले. अर्थात पुढे जे घडले त्याला भीष्म तेवढाच जबाबदार होता. आपण कोणत्या कारणाने प्रतिज्ञा केली आणि आता काय वाढुन ठेवले आहे ह्याचा सारासार विचार त्याने केला नाहि आणि 'सद्गुण-विक्रुती' च्या आहारी तो गेला. वसिष्ठ, देवगुरू बृहस्पति, असूरगुरू शुक्राचार्य व परशुराम यांच्याकडून शिक्षण घेतले ते फारसे उपयोगी पडले नाही असे दिसते.
महाभारत (टीव्ही) मधे तिनही मुले विचीत्रविर्याची दाखवलीत पराशराची नाहीत. मुळ महाभारत वगैरे काय म्हणतं?
त्याकाळच्या रूढींप्रमाणे राजाला संतती होत नसलीस त्यास पुत्रप्राप्तीचा अधिकार नियोगाद्वारे प्राप्त होत असे. ही पद्धत जगन्मान्य होती. नियोग शक्यतो दिराकडून केला जात असे. नियोगाद्वारे प्राप्त झालेली संतती राजाची संतती म्हणूनच ओळखली जात असे. तसे जर नसते तर तो नियोग नसून मग स्वैराचार ठरला असता.
प्रजेला नियोगाचा अधिकार होता का याबद्दल मात्र माहीत नाही.
नियोगाचा अधिकार सर्वांना होता. संतती शिवाय जर एखादी व्यक्ती मरण पावली तर त्याला मोक्ष मिळत नाही हा समज होता. त्यामुळे नियोगाद्वारे पुत्रप्राप्ती ही समाजमान्य पद्धती होती.
पुत्रप्राप्त्यी नसल्यामुळे पांडु कुंतीला काय म्हणातो बघा:
The wise expounders of the eternal religion declare that a son, O Kunti, is the cause of virtuous fame in the three
worlds. It is said that sacrifices, charitable gifts, ascetic penances,
and vows observed most carefully, do not confer religious merit on a
sonless man.
नियोगाबद्दल महाभारतकालीन विचार असे होते:
The religious institutes mention six kinds of sons that are heirs and kinsmen, and six other kinds that are not heirs but kinsmen. I shall speak of them presently. They are:
1st, the son begotten by one's own self upon his wedded wife;
2nd, the son begotten upon one's wife by an accomplished person from motives of kindness;
3rd, the son begotten upon one's wife by a person for pecuniary consideration;
4th, the son begotten upon the wife after the husband's death;
5th, the maiden-born son;
6th, the son born of an unchaste wife;
7th, the son given;
8th, the son bought for a consideration;
9th, the son self-given;
10th, the son received with a pregnant bride;
11th, the brother's son; and
12th, the son begotten upon a wife of lower caste.
On failure of offspring of a prior class, the mother should desire to have offspring of the next class.
In times of distress, men solicit offspring from accomplished younger brothers.
The self-born Manu hath said that men failing to have legitimate offspring of their own may have offspring begotten upon their wives by others, for sons confer the highest religious merit.
दुर्योधन आणि त्याचे ९९ भाऊ पहिल्या वर्गात मोडतात
पांडव दुसर्या वर्गात
तिसर्या वर्गाचे उदाहरण मला माहिती नाही
धृतराष्ट्र, विदुर आणि पांडु चौथ्या वर्गात मोडतात
कर्ण पाचव्या वर्गात मोडतो
सहाव्याचे उदाहरण मला माहिती नाही
७ व्या आणि नवव्या मधला फरक मला कळलेला नाही पण बभ्रुवाहन यापैकी एका गटात मोडतो
८ चे उदाहरण मला माहिती नाही
१० व्याचे उदाहरण मला माहिती नाही
११ ची उदाहरणे देण्याची अर्थातच गरजच नाही. भावाची मुले पण स्वतःची मुले मानली गेली आहेत
१२ चे उदाहरण म्हणजे युयुत्सु आणि विदुर
क्षत्रिय पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांची संतती देखील निम्न दर्जाची मानली जायची. त्यामुळे शुक्राचार्यांनी ययातिला आशिर्वाद दिला होता की त्याची मुले (देवयानीकडुन झालेली) निम्न दर्जाची मानली जाणार नाहित.
असो. खुपच विषयांतर झाले.
अगदी
एक एक व्यक्तिरेखा धरुन त्यांचा सुरुवातीपासुन शेवटपर्यंतचा महाभारतातला
सहभाग व्यवस्थित देता आहात, अन तो संग्राह्य देखिल आहे.
पण
पुन्हा पण आलाच, मला एक सांगा स्वतःच्या भावा साठी म्हणजे सत्यवतीच्या मुला
साठी अंबेला नाकारताना भिष्मान काय कारण दिल? हेच ना की अंबेन दुसर्याला
वरल्याने मी तुझा स्विकार करु शकत नाही? मग त्याच भिष्माने स्वतःच्या
पित्या साठी लग्ना पुर्वी पुत्र असलेली सत्यवती कशी काय स्विकारली?
अन आता तुमची निवेदनात्मक टिपः द्रौपदी हस्तिनापुरी एकाच घरात (महालात
म्हणा)राहिली नाही का? आणल होत स्वतः धृतराष्ट्रान लाक्षागृहा नंतर,
स्विकार केला होता पाचही पांडवांचा, अन तिथुनच वाटणी म्हणुन खांडववनाचा भाग
सुद्धा दिला होता. हा मान्य आहे की कृष्ण पलिकडच्या आळीत रहात नव्हता, पण
तो एकच सखा होता तिचा ज्याच्या समोर ती आपल शल्य उघड करु शकत होती.
अस म्हणतात की या जगात अशी एकही व्यक्तीरेखा नाही जिच वर्णन महाभारतात
नाही. त्यामुळे आम्ही सांगत असलेया कथा अगदी पार चाळकर्यांच्या (कौरव
पांडव चाळकरी होते या अर्थी) पायरीला नेउन बसवण्याच्या नक्किच नाहित.
स्त्री स्वभावानुसार खोचुन बोलण , अन ते ही ज्या काळी अनेक भार्या करण्याची
राजघराण्याची पद्धत होती त्या काळी पाच पति असणारी पांचाली , हे असणारच.
अगदी तुमच्या म्हणण्या नुसार महाभारत हे काव्य असेल तर अश्या मनुष्य स्वभावाला धरुन विणलेल्या कथांनी उलट ते समृद्ध होइल.
स्पष्ट बोलते मी राग नसावा.
__/\__
अपर्णा
पुन्हा पण आलाच, मला एक सांगा स्वतःच्या भावा साठी म्हणजे सत्यवतीच्या मुला साठी अंबेला नाकारताना भिष्मान काय कारण दिल? हेच ना की अंबेन दुसर्याला वरल्याने मी तुझा स्विकार करु शकत नाही? मग त्याच भिष्माने स्वतःच्या पित्या साठी लग्ना पुर्वी पुत्र असलेली सत्यवती कशी काय स्विकारली?
भीष्माची तिचे विचित्रविर्याशी लग्न लाउन द्यायची तयारी होती. पण तिला शाल्वाशीच लग्न करायचे होते. म्हणुन भीष्मांनी तिला सन्मानाने शाल्वाकडे पाठवुन दिले. शाल्वाने मात्र तिला दुसर्याने (म्हणजे भीष्माने) जिंकले असल्या कारणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. (शाल्वाला भीष्मांनी युद्धात हरवले होते आणि मगच तिघींचे अपहरण केले).
परत आल्यावर अंबेने भीष्मांशीच लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तिला विचित्रवीर्याशी लग्न करायचे नव्हते. आमरण ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केलेली असल्याने भीष्मांनी नकार दिला.
यानंतर अंबेने बर्याच राजांकडे मदत मागली भीष्मांना धडा शिकवण्यासाठी पण भीष्मांच्या भितीने तिला कोणीच मदत करेना. अखेर तिने परशुरामांकडे मदत मागितली. परशुरामांनी भीष्माशी युद्ध केले. ते २३ दिवस चालले. पण अखेर भीष्मांनी पार्श्वपा अस्त्र काढले. त्याचे उत्तर परसुरामांकडे नव्हते. त्या वेळेस नारदांनी मध्यस्थी करुन भीष्मांना अस्त्र मागे घेण्यास सांगितले. पण भीष्मांचा विजय झाला आहे हे बघुन परशुरामांनी अंबेला त्याऊप्पर मदत करण्यास असमर्थता दर्शवली.
अखेर अंबेने शिवाची आराधना केली आणि भीष्मांचा वध करण्याचे वरदान मागितले. भीष्मांना इच्छामरणाचे वरदान आहे हे जाणुन शिवाने तिला असे वरदान दिले की पुढच्या जन्मात तु भीष्मांच्या मृत्युला कारणीभूत ठरशील.
>>राहता राहिला सत्यवतीचा मुद्दा, तर पराशराने सत्यवतीला तुझे कौमार्य अबाधित राहील असाच वर दिला होत>>>>
पराशराला तिचा मोह झाला, अन सुगंधाच्या बदल्यात सत्यवती/मस्त्यगंधा वश ही
झाली , मग कौमार्य अबाधित कस राहिल? ती काय कुंती होती असा चलाखपणा
दाखवाय्ला. माझ म्हणन एव्हढच की हे जे सार मंत्रचळ आहे ते मोठ्या नामवंत
घराण्यांना लागु होत होत, कोळ्याची पोर सरळ सरळ व्यवहार करुन मोकळी होणार
ना? अन खर तेच सांगणार नाही का?
आता खर सांगायच तर मी जेम्व्हा महाभारताच्या या (म्हणजे मस्त्यगंधा प्रकरण)
भागात जाते तेंव्हापासुनच हे खरा बाप सोडुन भलत्याची पोर राज्यावर बसवायची
पद्धत सुरु झालेली निदान मला तरी जाणवते.
भीष्माचे मूळ नाव भीष्म नसून देवव्रत असे होते. आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची अवघड/भयानक म्हणजेच भीष्म प्रतिज्ञा केल्यामुळे त्यांचे नाव भीष्म झाले.
आता श्री शरद म्हणतात त्याप्रमाणे सांगोवांगीची गोष्ट (म्हणजे इंग्लिश भाषांतरीत महाभारतात मला काही ही गोष्ट सापडली नाही) - तरुणपणी देवव्रताने (भीष्म) एकदा सहज चाळा म्हणून जाता जाता बाणाच्या टोकाने एक सरडा उडविला तो नेमका कुंपणावर जाऊन पडला आणि त्याचाच परिपाक म्हणजे मृत्युसमयी भीष्मालाही शरशय्येवर पडावे लागले. (आता इथे परत शर शब्दावर श्लेष आला शर म्हणजे बाण इथे बी. आर. चोप्राचे महाभारत डोळ्यासमोर आणावे आणि दुसरा अर्थ शर म्हणजे एक प्रकारचे शर नावाचे गवत. अभ्यासकांच्या मते दुसरा अर्थ जास्त योग्य असावा.)
आज तिसर्या भागाला सुरवात करण्याआधी एक गोष्ट सांगु इच्छितो. प्रतिसादात अनेकजण निरनिराळ्या गोष्टी देत असतात. काय होते, रामायण-महाभारत यांसारख्या ग्रंथावर लुब्ध होऊन बरेच लेखक त्या ग्रंथात नसलेल्या गोष्टींची भर घालत असतात. कीर्तनकार, पुराणिक, कादंबरीकार व ग्रामिण लेखक यांचा असल्या गोष्टींवर भर असतो व काही कथा लोकप्रियही असतात. उदा. जांभुळआख्यान. पण अश्या "ग्राम्य" गोष्टींमुळे महाभारतातील पात्रांवर अन्याय होतो. व अशीही समजुत होणे शक्य आहे की असे खरेच महाभारतात आहे.. प्रतिसादकर्त्यांच्या बहुश्रुतपणाबद्दल आदर बाळगून माझी नम्र विनंती आहे की हे मनोरंजक किस्से सांगतांना जर ही गोष्ट महाभारतात आहेच याची खात्री नसेल तर तसा उल्लेख केल्यास बरे होईल.
माझ्यामते आजवर ज्यांनी ज्यांनी अशा काही कथा प्रतिसादात दिल्या, त्यांनी त्या कुठे वाचल्या, ऐकल्या अथवा त्या दंतकथा, लोककथा आहेत का ह्याचा व्यवस्थीत उल्लेख केल्याचे मला तरी स्मरते.
खरेतर अशा धाग्यांमुळे कित्येक लोककथा / दंतकथा मग त्या खर्या असोत वा कल्पित ह्या लोकांसमोर येत आहेत ह्यात आनंद नाही काय ?
बाकी विस्तारभयाच्या कल्पनेने हा लेख चक्क उरकल्या सारखा वाटला. तुमच्याकडून अजून भरपूर वाचायची इच्छा आहे.
महाभारतातील व्यक्तिचित्रे-४ महारथी कर्ण
महारथी कर्ण
महाभारत कोणामुळे घडले ? बरेच जण द्रौपदीचे नाव घेतील पण तो मान जातो कर्णाकडेच. उत्तुंग प्रतिभेच्या भगवान व्यासांनी प्रथम आपल्या डोळ्यासमोर श्रीकृष्ण व कर्ण यांची व्यक्तिचित्रे उभी केली, त्यांचे गुणावगुण ठरविले व मगच महाभारताची रचना केली. पाच सज्जन पांडव व शंभर दुर्जन कौरव यांच्यातील भांडणाकरिता महाभारताची गरज नव्हती ; जय नावाचा इतिहास त्याला पुरेसा होता. श्रीकृष्ण निर्माण करतांना त्यांनी कृष्णाला दैवी गुण दिले पण द्रौपदीला वस्त्रे पुरवणे, विश्वरूपदर्शन , जयद्रथवध व मृत अभिमन्युपुत्राला जिवित करणे एवढे सोडले तर महाभारतात कृष्ण दैवी चमत्कार दाखवत नाही. तो शूर आहे, अस्त्रज्ञ आहे, नीतीनिपुण आहे, धार्मिक आहे,,, पण सर्वात जास्त महत्वाचे तो फार "लवचिक" आहे. इथे सत्याचा विजय होण्यासाठी कपटाचा वापर करावा लागतो हे त्याला उत्तम माहीत आहे व तसे करण्याचा सल्ला तो देतोही. भीष्म, कर्ण जशी टोकाची भुमिका घेतात तशी घेणे त्याला मंजूर नाही. त्याचे लक्ष "अंतिम साध्या" कडे असते. जरासंधाशी सतरा वेळा युद्ध करूनही तो संपत नाही म्हटल्यावर लोकसंहार टाळण्यासाठी त्याने द्वारकेची वाट धरली व पुढे भीमाकडून द्वंदयुद्धात जरासंधाला मारवले. कर्णाचे रेखाचित्र उभे करतांना व्यासांनी हात सैल सोडला. भरपूर सद्गुण दिले, तसेच दुर्गुणही, अगदी टोकाचे. बरे हे करतांना नियतीचे फासे असे टाकले की तुम्ही त्याच्याकडे नायक म्हणून बघू शकता, खलनायक म्हणूनही !
कौंतेय कर्ण वाढला राधेय म्हणून. अंतापर्यंत तो सूतपुत्र म्हणूनच ओळखला
गेला. त्याची खरी ओळख त्याच्या आईला झाली तेव्हा उशीर झाला होता. रूढीचे
चटके त्याला लहानपणापासूनच बसले असावेत. असावेत असे म्हणावयाचे कारण तसा
उल्लेख महाभारतात सापडत नाही. सूत हे ब्राह्मण-क्षत्रियांएवढे उच्च वर्णाचे
नव्हते तरी फार खालचे असेही नव्हते व आर्थिक दृष्ट्या कर्णाचे दिवस
कष्टप्रद नक्कीच नसावेत. त्याचे युद्धकलेचे शिक्षण इतर सर्वसामान्य
मुलांसारखेच झाले व त्याने आपल्या नैसर्गिक गुणांनी व अपार कष्टाने त्यात
प्राविण्य मिळवले. पण ते इतरांच्या नजरेस आलेले दिसत नाही. शिष्यांच्या
गुणप्रदर्शनाच्या कार्यक्रमात त्याने आपले कौशल्य दाखविले व अर्जुनाला
आव्हान दिले तेव्हा त्याला कोणीही ओळखत नाही. ( कुंती ओळखते ते आपला मुलगा
म्हणून, चमकदार योद्धा महणून नव्हे)
शक्य आहे की त्याने या क्षणासाठी ते इतरांपासून मुद्दाम दडवून ठेवले होते.
कर्णाने अर्जुनाला आव्हान दिल्यावर तो योग्य द्वंद्वी आहे की नाही हा
मुद्दा निघतो. दुर्योधन कर्णाला अंग देशाचा राजा घोषित करतो व दोघांची आमरण
गाढ मैत्री होते. अर्जुन-कर्ण यांचे युद्ध सुरू होणार तेव्हड्यात अधिरथ
सूत तेथे येतो व कर्ण त्याला बाप म्हणून अभिवादन करतो. तो सूतपुत्र आहे हे
कळल्यावर युद्ध होतच नाही. हा एक नियतीचा खेळ. जरा वेळ टळली असती तर कर्ण
मेलाच असता कारण त्यावेळी अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र होते, कर्णाकडे नव्हते.
आता आपण प्रथम त्याचे गुणावगुण पाहू.
तो तेजस्वी, स्वकीयांवर प्रेम करणारा, परकीयांचा नाश करणारा,
बुद्धिवान,बलवान, कर्तृत्ववान व सुंदर होता. तो जन्मजात कवचकुंडले घेऊनच
आला.तो महान अस्त्रसंपन्न होता. त्याच्याकडे ब्रह्मास्त्र, भार्गवास्त्र,
परशुरामाने दिलेले माहेश्वर धनुष्य होते. असामान्य शौर्य, अलौकिक
दानप्रियता, सहनशीलता, समयज्ञता, दूरदर्शीपणा, गूणग्राहकता हे त्याचे इतर
काही गुण.
त्याचे अवगुणही पराकोटीचे होते. आत्मकेंद्रियता, अहंकार, अमर्याद
महत्वाकांक्षा, भांडखोरपणा, मत्सर, विशेषत: अर्जुनाचा व त्यामुळे
अर्जुनाच्या गुणग्राहक लोकांबद्दल,( भीष्म, द्रोण,कृप, अश्वत्थामा इ.)
तिटकारा हे त्याचे महत्वाचे दोष. स्वत:बद्दल सारखे प्रौढीने बोलणे हे
त्याच्या पाचवीला पुजले होते. यामुळे इतरांची समजुत घालत बसणे हे
दुर्योधनाचे एक कामच होऊन बसले होते ! या दोषांचा परिपाक म्हणजे त्याच्या
मनाचा हलकेपणा. द्युताच्या वेळी हा नीचपणा त्याला नराधम म्हणावे या टोकाला
पोचला . हे गुणदोष पुढील माहित्तीत स्पष्ट होतीलच.
अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र आहे, ते आपल्याकडे नाही व त्यामुळे तो आपल्यापेक्षा वरचढच राहणार हे ध्यानात घेऊन
कर्णाने द्रोणांकडे जाऊन ते शिकवावयाची विनंती केली. त्याच वेळी अर्जुनाचा
पराभव करण्यासाठी ते पाहिजे हेही सांगितले. द्रोणांनी त्याची इच्छा
कळल्यावर त्याला ते देण्याचे नाकारले. कारण मात्र दिले की मी फक्त क्षत्रिय
व ब्राह्मणालाच ते देतो. भडकलेल्या कर्णाने आता थेट परशुरामांकडेच जावयाचे
ठरविले. मात्र इथेही आपली जात आडवी येऊ नये म्हणून त्याने परशुरामांना
सांगितले की मी भार्गवगोत्री ब्राह्मण आहे.त्याची सेवावृत्ती, अपार
गुरुनिष्ठा, कष्ट करावयाची तयारी पाहून परशुराम प्रसन्न झाले. त्यांनी
कर्णाला सर्व अस्त्रे व आपले माहेश्वर धनुष्यही दिले. याच काळात
धनुर्विद्येचा सराव करत असतांना कर्णाच्या हातून एका ब्राह्मणाच्या गाईची
हत्या झाली. ब्राह्मणाने त्याला शाप दिला की " ज्याच्याशी तू स्पर्धा करत
आहेस, त्याच्याशी युद्ध करत असतांना तुझ्या रथाचे चाक पृथ्वी गिळून टाकील व
तुझा शत्रु तुझ्या अडचणीचा फायदा घेऊन तुझा शिरच्छेद करील ". एवढ्याने
कर्णाचे दुर्दैव संपले नाही. एके दिवशी तो व परशुराम हिंडत असतांना राम
थकून जाऊन कर्णाच्या मांडीवर डोके ठेऊन झोपले. तेव्हढ्यात एका किड्याने
कर्णाच्या मांडीला दंश केला. गुरुजींची झोप मोडू नये म्हणून कर्णाने किडा
हाकलला नाही. किड्याने कर्णाच्या मांडीला भोक पाडले व त्यातून रक्त वाहू
लागले. तरीही अपार वेदना सहन करित कर्ण स्तब्धच राहिला. रक्त वहात वहात
परशुरामांपर्यंत पोचले व ते जागे झाले. झाला प्रकार पाहून त्यांना संशय
आला. ते म्हणाले " ब्राह्मण इतक्या वेदना सहन करणे शक्य नाही, तू कोण आहेस
?" कर्ण म्हणाला " मी सूतपुत्र आहे. पण वेद देणारा गुरु बापच असतो. तुम्ही
मला धनुर्वेद दिला म्हणून तुम्ही माझे पिताच आहात. म्हणून मी तुम्हाला मी
भार्गवगोत्री ब्राह्मण असल्याचे सांगितले. " परशुराम रागावले पण कर्णाच्या
असीम गुरुनिष्ठेने प्रसन्नही झाले. ते म्हणाले " कपटाने मिळवलेले
ब्रह्मास्त्र मरणघटकेपर्यंत जवळ राहणे शक्य नाही. तेव्हा अंतिम काळी तू ते
विसरशील. पण तोवर तुला त्याचा उपयोग करता येईल." शापित अस्त्रे घेऊन कर्ण
परतला.
कलिंग राजाच्या मुलीच्या स्वयंवारात कर्णाने दुर्योधनाकरिता जमलेल्या राजांचा पराभव केला. त्या वेळी त्याने मल्लयुद्धात सम्राट जरासंधाचा पराभव केला. सर्व भारतात कर्णाचे नाव गाजवावयास हा एक विजय पुरेसा होता. राजसूय यज्ञाच्या वेळी भीमाला त्याने करभार देऊन बचाव केला. तो तसे न करता तर यादवांसमवेत भारतातील सर्व राजे युधिष्ठिराबरोबर त्याच्याशी लढावयास आले असते . तो भांडण न उकरता समयसुचकता दाखवितो. तसेच दुर्योधनासाठी केलेया दिग्विजयाच्या वेळी तो यादवांशी सामोपचाराने वागतो. नच तर त्याच वेळी पांडवांवरील अन्यायाने रागावलेल्या यादवांनी त्याला नाहिसे केले असते. ही त्याची राजकीय सुजाणता.
कर्ण आणि अर्जुन
कादंबर्या वाचून अशी समजुत होण्याची शक्यता आहे की कर्ण अर्जुनापेक्षा
जास्त शूर होता व केवळ कृष्णाच्या सहाय्याने अर्जुनाने कपटाने कर्णाला
मारले. साफ चूक. अर्जुन एकाही युद्धात हरलेला नाही.( भगवान शंकरांबरोबरचे
युद्ध सोडा, तो एक रडीचा डाव होता. आता तुम्ही टाकलेले प्रत्येक शस्त्र,
अस्त्र समोरचा गिळूनच टाकू लागला तर त्याला काय युद्ध म्हणावयाचे ? तरीही
अर्जुन धनुष्यही उरले नाही तेव्हा नि:शस्त्र युद्ध, मल्लयुद्ध करू लागला.)
कृष्ण नसतांनाही आणि कर्णाकडे कवचकुंडले असतांनाही अर्जुनाने कर्णाला
दोन्दा हरवले आहे.
आता आपण कर्णाने लढलेली युद्धे पाहू. शिकावू काळात द्रुपदाबरोबरची लढाई.
कौरवांबरोबर कर्णालाही पळून जावे लागले. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी
ब्राह्मण वेषातील अर्जुनाबरोबर झालेली लढाई. कर्णाला माघार घ्यावी लागते.
घोषयात्रेच्यावेळी चित्रसेन गंधर्वा बरोबर झालेली लढाई. चित्रसेनाच्या
दैविक अस्त्रांपुढे कर्णाची मानुष अस्त्रे टिकाव धरू शकली नाहीत.( असे
दिसते की एकाच अस्त्राचा प्रभाव सारखा नसावा. नाही तर अर्जुन सर्व अस्त्रे
पृथ्वीवर माहीत झाली असतांना परत तीच शिकण्यासाठी स्वर्गात गेला
नसता.माणसाकडून शिकले ते मानुष अस्त्र, देवाकडून शिकले की तेच दैविक
अस्त्र. दैविक अस्त्र जास्त पावरबाज !) कर्ण पळून जातो. गोग्रहणाच्यावेळी
अर्जुनाशी झालेली लढाई. कर्णाला तीन वेळा माघार घ्यावी लागते. शेवटी संमोहन
अस्त्रामुळे बेशुद्ध झाल्यावर उत्तर त्याचेही वस्त्र काढून नेतो. शेवटच्या
युद्धात कर्ण एकूण सात दिवस लढतो. तेवढ्यात तो सात्यकी, भीम, अभिमन्यु
एवढ्यांबरोबरच्या लढायांमध्ये हरतो, इन्द्राने दिलेली वासवी शक्ति नसती तर
तो घटोत्कचाबरोबरच्या लढाईत हरल्यातच जमा होता. दु:शासन वधाच्या वेळी भीम
सर्वांना आव्हान देतो की "या दुष्टाला मारून मी त्याचे रक्त पिणार आहे,
शक्य असेल तर याला वाचवा !" कर्ण समोर होता पण तो भीमाला आवरू शकला
नाही.तीच गोष्ट जयद्रथवधाच्या वेळी घडली. अर्जुनाने कर्णाला सांगितले " मी
नसतांना तुम्ही सर्वांनी अभिमन्यूला मारलेत. कर्णा, आज तुझ्यासमोर मी
तुझ्या पुत्राला ठार मारणार आहे, शक्य असेल तर त्याला वाचव." कर्ण आपल्या
पुत्राला वाचवू शकला नाही. यावरून कर्णाच्या शौर्याबद्दल शंका घेण्याचे
कारण नाही. वर दोन उदाहरणे दिली आहेत. तो अर्जुनाच्या बरोबरीचा योद्धा आहे
अशी कबूली त्याव्या दोन कट्टर विरोधकांनी दिली आहे. श्रीकृष्ण व भीष्म
यांनी. तेव्हा त्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. त्याने भीम, युधिष्ठिर, नकुल व
सहदेव यांना जिंकून जिवंत सोडून दिले आहे. घटोत्कचासारख्या केवळ अजिंक्य
राक्षसाला तोच मारू शकला. त्याचे व अर्जुनाचे युद्ध म्हणजे
इन्द्र-वृत्राचेच युद्ध असे कृष्ण म्हणतो. या सगळ्याचा अर्थ लावणे थोडे
अवघडच वाटते. व्यासांनी गणपतीला कोडी घातली, तसेच वाचकांना घातलेले हे एक
कोडे.
दानशूरता
जसा "रामबाण", जशी " भीष्मप्रतिज्ञा " तशी कर्णासारखी " दानशूरता " !
भारतीय इतिहासात दान देणे हा एक रक्तात रुजलेला भाग आहे. सर्वस्व देणारे
राजे कितीतरी सापडतील. परशुरामांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून ती कश्यपाला दान
दिली. आणि मग कश्यपाने जेव्हा सांगितले " आता फूट, माझ्या पृथ्वीवर तुला
जागा नाही "
तेव्हा निमुटपणे समुद्राला हटवून आपल्या आश्रमापुरती जागा मिळवली. पण नाव झाले ते एका कर्णाचेच.
सकाळी सूर्याची आराधना करतांना येणार्या याचकाने काहीही मागितले तरी ते
देण्याची कर्णाची प्रतिज्ञा. इन्द्राने याचा फायदा घ्यावयाचे ठरवून त्याची
कवचकुंडले मागावयाचे ठरविले. सूर्याला याचा पत्ता लागल्यावर
त्याने रात्री कर्णाच्या स्वप्नात येऊन त्याची कल्पना दिली व इन्द्राला
हाकलून दे असे सांगितले. कवचकुंडले दिल्यावर आपल्या जीवाला धोका आहे हे
माहीत असूनही कर्ण सूर्याला सांगतो की "मरण पत्करले, पण मी वचन मोडले ही
अपकीर्ती मला मान्य नाही ". शेवटी मिनतवारीने कर्णाने कबूल केले की मी
इन्द्राकडे अमोघ शक्ती मागेन. प्राणाची पर्वा न करता दिलेले हे दान एकमेव.
आत्मप्रौढी व भांडकुदळपणा
पहिल्यापासून पराकाष्टेची आत्मकेंद्रियता हा कर्णाचा मोठा दुर्गुण दिसून
येतो. त्यामुळे आत्मप्रौढी वाढली. तो कायमच मी किती श्रेष्ठ, अर्जुनाला मी
एकटाच संपवून टाकतो, अशा वल्गना करीत असतो. त्यामुळे दुर्योधनाला व
सामान्य सैनिकांना तो खरेच तसे करून दाखवेल अशी खात्री वाटत होती.
प्रत्यक्षात तसे जरी घडून आले नाही तरी त्याच्या वल्गना चालूच असत.
भीष्म-द्रोण-कृप यांना त्याची कल्पना असल्याने ते नेहमीच त्याचा फुगा फोडत.
कर्ण त्यांचावर तोंडसुख घेई व दुर्योधनाला निस्तारत बसावयाची पाळी येई. ऐन
युद्धाच्यावेळी अशा प्रसंगी अश्वत्थामा इतका भडकला की तो कर्णाला
मारावयासच निघाला होता ! भीष्मांनी त्याला अर्धरथी ठरवल्यावर त्याने भीष्म
मरेपर्यंत मी लढणारच नाही असे सांगितले व कौरवांचे नुकसानच केले.
समयसुचितपणा
भीष्मपतनानंतर सर्व सैनिक कर्णाला सेनापति हो म्हणत होते व दुर्योधनाचीही
तशीच इच्छा होती. पण बरोबरीच्या इतर राजांना ते पटणार नाही व ते मनापासून
युद्ध करणार नाहीत याची जाणिव असल्याने कर्णाने द्रोणांना सेनापति करावयास
सांगितले. तो म्हणतो " सर्व समान राजांपैकी एकाला सेनापती केले तर असंतोष
निर्माण होईल. त्या ऐवजी सर्वांचे गुरु असलेल्या द्रोणाचार्यांना सेनापती
करा." नेहमी द्रोणांचा अधिक्षेप करणार्या कर्णाने यावेळी योग्य राजकीय
खेळी केली.
गुणग्राहकता
भीष्मपतनानंतर कर्ण त्यांना वंदन करावयास गेला व ढसाढसा रडत त्याने शोक
व्यक्त केला. अखेरीस त्याने युधिष्ठिराची धर्मप्रियता व अर्जुनाचे
युद्धकौशल्यही मान्य केले आहे.
मित्रप्रेम
युद्धाच्या आधी श्रीकृष्णाने त्याला एकांतात तो कुंतीचा पुत्र आहे व तो
राज्याचा अधिकारी असून तो सिंहासनावर बसेल व पांडव त्याची सेवा करतील असे
सांगितले. पण कर्णाने त्याला स्पष्ट नकार दिला. दुर्योधना्ला सोडून सम्राट
होणे त्याने नाकारले. कुंतीला तो म्हणतो, " मला लहानपणीच मारून टाकले असतेस
तर बरे झाले असते. आता फार उशीर झाला आहे. " तरीही आईला शेवटी वचन देतो की
धर्म, भी, नकुल व सहदेव यांनी मी मारणार नाही, तुझे पाच पुत्र जिवंत
राहतील."
मनाचा हीनपणा
द्युतप्रसंगी तो इतका नीचपणे वागतो की चांडाळचौकडीत सर्वात हीन कोण हे ठरवणे कठीण जावे.
दु:शासनाच्या अधमपणाला प्रत्येक वेळी त्याचीच फूस आहे. बटकीशी बोलतांनाही
शरम वाटावी असे उद्गार तो काढतो. केवळ या एका प्रसंगामुळे त्याचा करूण
शेवटही कमीच झाला असे म्हणावे लागते. "वनात पांडव
असतांना तेरा वर्षे कशास थांबावयाचे ? आताच जाऊन कृष्णाला कळावयाच्या आधीच
ते असहाय्य आहेत तोवर त्यांचा निकाल लावून टाकू " असा मनाचा हलकेपणा तो
दाखवितो.
कर्णाबद्दल शोक व्यक्त करणार्या युधिष्टिराला नारद काय सांगतात ते पाहून इथे थांबू . " राजा, शोक आवर. तुझा भाऊ दुर्दैवी होता. कोणा एका व्यक्तीला (कुंतीला) दोष देण्यात अर्थ नाही. सर्व क्षत्रियांना युद्धात मृत्यु येऊन स्वर्ग मिळावा म्हणूनच दैवाने त्याची योजना केली होती."
शेवटचा अर्जुनावरचा लेख लिहून आपण महाभारतावरील लेखमाला थांबवू.
शरद
आता आपण कर्णाने लढलेली युद्धे पाहू. शिकावू काळात द्रुपदाबरोबरची लढाई. कौरवांबरोबर कर्णालाही पळून जावे लागले.
यात कर्ण होता हेच मान्य नाही. मूळ महाभारत हे मानले जाते ते याबाबत खुप संदिग्ध आहे. किंबहुना असे म्हणण्यास वाव आहे की या युद्धात कर्णाने भागच घेतला नाही. यात केवळ कौरव आणि पांदव होते.
घोषयात्रेच्यावेळी चित्रसेन गंधर्वा बरोबर झालेली लढाई. चित्रसेनाच्या दैविक अस्त्रांपुढे कर्णाची मानुष अस्त्रे टिकाव धरू शकली नाहीत.( असे दिसते की एकाच अस्त्राचा प्रभाव सारखा नसावा. नाही तर अर्जुन सर्व अस्त्रे पृथ्वीवर माहीत झाली असतांना परत तीच शिकण्यासाठी स्वर्गात गेला नसता.माणसाकडून शिकले ते मानुष अस्त्र, देवाकडून शिकले की तेच दैविक अस्त्र. दैविक अस्त्र जास्त पावरबाज !) कर्ण पळून जातो.
चित्रसेनाला अर्जुनानेही हरवले नाहीच. ती लुटुपुटीची लढाई होती. दोघेही आधी ठरल्याप्रमाणे लढले. चित्रसेन खोटेखोटेच हारला आणि मग दुर्योधनाला सोडवण्याचे श्रेय अर्जुनाने फुकट मिळवले.
शेवटच्या युद्धात कर्ण एकूण सात दिवस लढतो. तेवढ्यात तो सात्यकी, भीम, अभिमन्यु एवढ्यांबरोबरच्या लढायांमध्ये हरतो, इन्द्राने दिलेली वासवी शक्ति नसती तर तो घटोत्कचाबरोबरच्या लढाईत हरल्यातच जमा होता.
हे पण मान्य नाही. कर्ण त्या संपुर्ण लढाईत , जी बर्याच भागात विभागली गेली आहे, कारण मधुनच घटोत्कच अलंबुसाशी लढतो मग त्याला मारुन अश्वत्थाम्याकडे वळतो मग त्याला दुसर्यावर सोपवुन कर्णाकडे वळातो मग परत कर्णावर इतर जणा धावुन येतात तसे तो परत अश्वत्थाम्याकडे वळतो. त्यानंतर अश्वत्थाम्यावर इतर जण धावुन गेल्यावर आणी अश्वत्थाम्याने देखील त्याला परत फिरण्याचा सल्ला दिल्यावर तो परत कर्णाकडे वळतो. या सर्व प्रकारात तो ३-४ वेळा कर्णाशी लढतो आणि प्रत्येक वेळेस हारतो. कर्णाकडे वासवी शक्ती होती. त्याने ती वापरली. पण त्या व्यतिरिक्तही त्याच्याकडे इतर बरीच अस्त्रे होती ज्यामुळे एकास एक लढाईत तो घटोत्कचाला भारीच होता. पण साईड बिझिनेस म्हणुन अदृश्य होउन ज्या वेगाने घटोत्कच इतर कौरव सेना मारत होता ते बघता कर्णाकडे दूसरा पर्याय नव्हता.
दु:शासन वधाच्या वेळी भीम सर्वांना आव्हान देतो की "या दुष्टाला
मारून मी त्याचे रक्त पिणार आहे, शक्य असेल तर याला वाचवा !" कर्ण समोर
होता पण तो भीमाला आवरू शकला नाही.
ह्म्म. कदाचित मागुन बाण सोडुन भीमाचा हात उडवणे जमण्याइतपत कर्णाचा नेम चांगला नसावा.
तीच गोष्ट जयद्रथवधाच्या वेळी घडली.
हे खुपच अक्स्मात घडले. सर्व यौद्धे शस्त्रे खाली ठेवुन उतरले असणार. आणि अकस्मात अर्जुनाने पवित्रा बदलुन चितेवरुन जर बाण मारला तर तो रोखणे फारसे कोणाच्या हातात नव्हतेच.
अर्जुनाने कर्णाला सांगितले " मी नसतांना तुम्ही सर्वांनी
अभिमन्यूला मारलेत. कर्णा, आज तुझ्यासमोर मी तुझ्या पुत्राला ठार मारणार
आहे, शक्य असेल तर त्याला वाचव." कर्ण आपल्या पुत्राला वाचवू शकला नाही.
कर्ण त्यावेळेस इतरांशी लढत होता. वृषसेन स्वत: पराक्रमी होता. अर्जुनाने त्याला मारण्या आधी त्याने भीम. नकुल, सहदेव आणी द्रौपदीच्या पाचही मुलांना सहज हरवले होते आणि अर्जुन मध्ये पडला नसता तर बापाने जीवदान दिलेला नकुल त्या दिवशी वृषसेनाने टिपला असता. त्यामुळे कर्ण थोडाफार नि:शंक असावा.
यावरून कर्णाच्या शौर्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. वर दोन
उदाहरणे दिली आहेत. तो अर्जुनाच्या बरोबरीचा योद्धा आहे अशी कबूली त्याव्या
दोन कट्टर विरोधकांनी दिली आहे. श्रीकृष्ण व भीष्म यांनी.
युधिष्ठिराने देखील कैकवेळा. शिवाय तुम्ही भार्गव अस्त्राचा प्रयोग विसरलात बहुधा. अर्जुनाकडे त्याचे उत्तर नव्हते आणि तो चक्क पळून गेला. अर्थात महाभारतात हे मोठ्या खुबीने वेगळ्या भाषेत सांगितले आहे ही गोष्ट वेगळी.
यात कर्ण होता हेच मान्य नाही. मूळ महाभारत हे मानले जाते ते याबाबत खुप संदिग्ध आहे. किंबहुना असे म्हणण्यास वाव आहे की या युद्धात कर्णाने भागच घेतला नाही. यात केवळ कौरव आणि पांडव होते.
बा मृत्युन्जया, तू जे महाभारत संदर्भ म्हणून वापरतोस, जी प्रत मूळ
महाभारत म्हणून वापरली जाते त्या किसारी मोहन गांगुली कृत भाषांतरात हा
उल्लेख आहे. म्हणजे आपल्या सोयीचे ते घ्यायचे, गैरसोयीचे ते नाही असे
काहीसे आहे काय?
to afflict the hostile ranks with greater vigour. And careering over the
field of battle like a fiery wheel, king Drupada with his arrows smote
Duryodhana and Vikarna and even the mighty Karna and many other heroic
princes and numberless warriors, and slaked their thirst for battle.
चित्रसेनाला अर्जुनानेही हरवले नाहीच. ती लुटुपुटीची लढाई होती. दोघेही आधी ठरल्याप्रमाणे लढले. चित्रसेन खोटेखोटेच हारला आणि मग दुर्योधनाला सोडवण्याचे श्रेय अर्जुनाने फुकट मिळवले.
हेही तसेच, ही लुटुपुटीची लढाई होती हे कशावरून?
ठीक. जरी लुटुपुटीची असली तरी आधी झालेली चित्रसेन आणि कौरवांची तर खरीच होती ना. त्यात कर्णाने पळ काढला हे तरी सत्य ना?
पण त्या व्यतिरिक्तही त्याच्याकडे इतर बरीच अस्त्रे होती ज्यामुळे एकास एक लढाईत तो घटोत्कचाला भारीच होता.
या मुद्द्याशी सहमत.
कदाचित मागुन बाण सोडुन भीमाचा हात उडवणे जमण्याइतपत कर्णाचा नेम चांगला नसावा.
अभिमन्यू वधाच्या वेळी हाच कर्ण त्या सहा महारथ्यांमध्ये सामील होता. दु:शासनवधाच्या वेळचा भीमाचा आवेश पाहूनच तो स्तंभित झाला असावा.
अकस्मात अर्जुनाने पवित्रा बदलुन चितेवरुन जर बाण मारला तर तो रोखणे फारसे कोणाच्या हातात नव्हतेच.
मान्य. अर्जुनाला त्यावेळी रोखणे कुणाला शक्य नव्हतेच पण इतर जण त्यावेळी निशस्त्र असावेत हे विधान जरा धाडसीच आहे. महाभारतात याचा कसलाही उल्लेख नाही.
त्यामुळे कर्ण थोडाफार नि:शंक असावा.
सहमत. पण कर्णाच्या डोळ्यांदेखतच अर्जुनाने वृषसेनाचा वध केला.
युधिष्ठिराने देखील कैकवेळा
सहमत. किंबहुना कर्णाद्वारे पराभूत होउन लज्जित झालेल्या युधिष्ठिराने गांडीव फेकून दे असे त्राग्याने अर्जुनाला म्हटले होते. यावरून दोघांत पेटलेले भांडण कृष्णाने मोठ्या खुबीने सोडवले होते.
अर्जुनाकडे त्याचे उत्तर नव्हते आणि तो चक्क पळून गेला. अर्थात महाभारतात हे मोठ्या खुबीने वेगळ्या भाषेत सांगितले आहे ही गोष्ट वेगळी.
याबद्दल अधिक माहिती देशील काय?
to
afflict the hostile ranks with greater vigour. And careering over the
field of battle like a fiery wheel, king Drupada with his arrows smote
Duryodhana and Vikarna and even the mighty Karna and many other heroic
princes and numberless warriors, and slaked their thirst for battle.
बरोबर कर्णाचा उल्लेख आहे. पण हा कर्ण सुतपुत्र, राधेय कर्ण आहे असा कुठे उल्लेख आहे का? इतर सर्व ठिकाणी त्याचा उल्लेख son of Radha किंवा son of Vikartana किंवा suta's son असा येतो. त्यावेळेस या शंकेला जागा उरत नाही की तो "कर्ण" च आहे. पण जेव्हा असा उल्लेख नसतो तेव्हा जरा तपासून पहावे लागते.
का? तर त्याचे कारण असे आहे की महाभारतात ३ कर्ण आहेत. यापैकी वसुषेणाचे नाव कर्ण त्याने त्याची जन्मजात कुंडले इंद्राला दिल्यानंतर पडले. उरलेले २ कोण आहेत हे पाहिल्यास मौज वाटेल. पहिला होता युयुत्सु ज्याचे दूसरे नाव कर्ण होते आणि दूसरा होता धृतराष्ट्रपुत्र कर्ण . धृतराष्ट्र आणि गांधारीचा १८ वा पुत्र. धृतराष्ट्राची १०० मुले खालीलप्रमाणे:
"Vaisampayana said, 'O king, they are as follows: Duryodhana, and
Yuyutsu, and also Duhsasana; Duhsaha and Duhshala, and then Durmukha;
Vivinsati, and Vikarna, Jalasandha, Sulochna, Vinda and Anuvinda,
Durdharsha, Suvahu, Dushpradharshana; Durmarshana, and Dushkarna, and
Karna; Chitra and Vipachitra, Chitraksha, Charuchitra, and Angada,
Durmada, and Dushpradharsha, Vivitsu, Vikata, Sama; Urananabha, and
Padmanabha, Nanda and Upanandaka; Sanapati, Sushena, Kundodara; Mahodara;
Chitravahu, and Chitravarman, Suvarman, Durvirochana; Ayovahu, Mahavahu,
Chitrachapa and Sukundala, Bhimavega, Bhimavala, Valaki, Bhimavikrama,
Ugrayudha, Bhimaeara, Kanakayu, Dridhayudha, Dridhavarman, Dridhakshatra
Somakirti, Anadara; Jarasandha, Dridhasandha, Satyasandha, Sahasravaeh;
Ugrasravas, Ugrasena, and Kshemamurti; Aprajita, Panditaka, Visalaksha,
Duradhara, Dridhahasta, and Suhasta, Vatavega, and Suvarchasa;
Adityaketu, Vahvasin, Nagadatta and Anuyaina; Nishangi, Kuvachi, Dandi,
Dandadhara, Dhanugraha; Ugra, Bhimaratha, Vira, Viravahu, Alolupa;
Abhaya, and Raudrakarman, also he who was Dridharatha; Anadhrishya,
नीट बघता वरील यादीत ९८ च नावे आहेत. २ नावे व्यासांनी गाळली. इतर एके ठिकाणी दिलेली नावे बघा:
Janamejaya said, 'Please recite the names of Dhritarashtra's sons
according to the order of their birth.'
"Vaisampayana said, 'Their names, O king, according to the order of
birth, are Duryodhana, Yuyutsu, Duhsasana, Duhsaha, Duhsala, Jalasandha,
Sama, Saha, Vinda and Anuvinda, Durdharsha, Suvahu, Dushpradharshana,
Durmarshana and Durmukha, Dushkarna, and Karna; Vivinsati and Vikarna,
Sala, Satwa, Sulochana, Chitra and Upachitra, Chitraksha, Charuchitra,
Sarasana, Durmada and Durvigaha, Vivitsu, Vikatanana; Urnanabha and
Sunabha, then Nandaka and Upanandaka; Chitravana, Chitravarman, Suvarman,
Durvimochana; Ayovahu, Mahavahu, Chitranga, Chitrakundala, Bhimavega,
Bhimavala, Balaki, Balavardhana, Ugrayudha; Bhima, Karna, Kanakaya,
Dridhayudha, Dridhavarman, Dridhakshatra, Somakitri, Anudara;
Dridhasandha, Jarasandha, Satyasandha, Sada, Suvak, Ugrasravas, Ugrasena,
Senani, Dushparajaya, Aparajita, Kundasayin, Visalaksha, Duradhara;
Dridhahasta, Suhasta, Vatavega, and Suvarchas; Adityaketu, Vahvashin,
Nagadatta, Agrayayin; Kavachin, Krathana, Kunda, Kundadhara, Dhanurdhara;
the heroes, Ugra and Bhimaratha, Viravahu, Alolupa; Abhaya, and
Raudrakarman, and Dridharatha; Anadhrishya, Kundabhedin, Viravi,
Dhirghalochana Pramatha, and Pramathi and the powerful Dhirgharoma;
Dirghavahu, Mahavahu, Vyudhoru, Kanakadhvaja; Kundasi and Virajas.
Besides these hundred sons, there was a daughter named Duhsala.
यात १०२ नावे आहेत. कारण? कर्णाचे नाव २दा आहे. आता ज्याचे नाव २ दा घेतले तो व्यासांना किती महत्वाचा वाटला असेल बघा. :P
थोडक्यात सांगायचे तर धृतराष्ट्राचा एक मुलगा कर्ण नावाचा होता आणि तो द्रुपदाविरुद्ध निंसंशय लढला असणार.
आता तु दिलेला परिच्छेद बघ रे जरा:
Duryodhana and Vikarna and even the mighty Karna and many other heroic princes
इथे काय म्हटले आहे? दुर्योधन, विकर्ण, कर्ण आणि इतर बरेच राजपुत्र. याचा अर्थ पहिले ३ राजपुत्र होते. कर्ण राजपुत्र होता का?
आता पुढचा परिच्छेद वाचः
And Duryodhana and Karna and the mighty Yuyutsu, and
Duhsasana and Vikarna and Jalasandha and Sulochana,--these and many
other foremost of Kshatriya princes of great prowess, vied with
one another in becoming the foremost in the attack.
यात फक्त ७ लोकांची नावे दिली आहेत. इतरांची का नाहित? जन्माच्या क्रमांकानुसार ही नावे नाहित. दुर्योधन दु:शासन आणी युयुत्सु समजु शकतो कारण ते तिघे सगळ्यात मोठे. पण मग मधुनच जलासंध आणि सुलोचन का आले? अर्थ सरळ आहे. कौरवांकडुन फक्त हे ७ च जण लढले. इतर ९३ कौरव लढलेच नाहित. दुर्योधनाने त्यांना जमेस धरले नव्हते. जसे पांडवांनी युधिष्ठिराला जमेस धरले नाही आणी त्याला युद्धभूमीपासून दूरच रहायला सांगितले.
बर आता हे वाक्य पहा "these and many other foremost of Kshatriya princes"" these शब्दातुन काय सूचित होते? की पहिले ७ जण राजपुत्र होते. कर्ण राजपुत्र होता का?
आता तु म्हणशील की ७ च जणांची नावे लिहिली आहेत कारण ते ७ जण सर्वात पराक्रमी होते. तर खालचा परिच्छेद वाचः
And amongst those hundred and one, eleven, viz., Duhsasana, Duhsaha, Durmarshana, Vikarna, Chitrasena, Vivinsati, Jaya, Satyavrata, Purumitra, and Yuyutsu by a Vaisya wife, were all Maharathas
जय, सत्यव्रता, पुरुमित्र, दुर्मशणा, चित्रसेन, विविसांती, दःसहा हे सात जण महारथी होते. म्हणजे इतरांपेक्षा अधिक चांगले यौद्धे. नावेच लिहायची तर यांची लिहिली असती. पण ते लढलेच नाहित म्हणुन त्यांची नावे नाहित.
तर थोडक्यात सांगायचे तर त्या युद्धात ज्या लोकांनी भाग घेतला त्यात कर्ण नावाचा एक राजपुत्र होता आणि राधेचा मुलगा राजपुत्र नसल्यामुळे त्या युद्धात तो हारला असे म्हणताच येणार नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे भीष्म आणि द्रोण आयुष्यभर कर्णाला त्याचे दोष दाखवत खिजवत राहिले. त्यात त्यांनी चित्रसेन गंधर्वाकडुन झालेला पराभव त्याला प्रत्येक वेळेस आठवुन दिला. एकदाही त्यांनी द्रुपदाकडुन तो हारला हे सांगितले नाही.
महाभारतात इतर सर्वत्र कर्ण कधी कधी हारला हे सर्व पात्रे सांगत राहतात. द्रुपदाकडुन हारल्याचे मात्र कुठलेच उदाहरण नाही
दिग्विजयादरम्यान कर्णाने द्रुपद, द्रुष्टद्युम्न, सत्यजित, शिखडी, उत्तमौजा, युधामन्यु इत्यादी सर्व महारथी, अतिरथी असताना द्रुपदाला हरवले. तेव्हा तो एकटा होता. मग इतर लोक मदतीला असताना तो द्रुपदाकडुन इतका सहजी कसा हरेल?
हेही तसेच, ही लुटुपुटीची लढाई होती हे कशावरून?
हे घे. हा चित्रसेन अर्जुनाचा मित्रच होता. त्याला अर्जुनाबद्दल ममत्व होते आणि त्यानेच अर्जुनाला नाच शिकवला जो त्याला नंतर अज्ञातवासात उपयोगी पडला:
After some time, when Arjuna had obtained all the weapons. Indra
addressed him in due time, saying, 'O son of Kunti, learn thou music and
dancing from Chitrasena. Learn the instrumental music that is current
among the celestials and which existeth not in the world of men, for, O
son of Kunti, it will be to thy benefit. And Purandara gave Chitrasena as
a friend unto Arjuna. And the son of Pritha lived happily in peace with
Chitrasena. And Chitrasena instructed Arjuna all the while in music;
दोघे मित्र होते त्यामुळे ते खरेखुरे लढलेच नाहित.
ठीक. जरी लुटुपुटीची असली तरी आधी झालेली चित्रसेन आणि कौरवांची तर खरीच होती ना. त्यात कर्णाने पळ काढला हे तरी सत्य ना?
ऑं ??? हे कधी अमान्य केले मी. हारलाच की तो. त्याने पळ काढला नाही असे मी कुठे लिहिले आहे काय?
दोघे मित्र होते त्यामुळे ते खरेखुरे लढलेच नाहित.
पटत नाही.
कारण लढाईत पांडवांनी बरेच गंधर्व मारले होते.
hen Arjuna whose ire had been provoked, aiming at the angry Gandharvas,
prepared to hurl against them his celestial weapons. And in that
encounter, the mighty Arjuna, by means of his Agneya weapon, sent ten
hundreds of thousands of Gandharvas to the abode of Yama. And that
mighty bowman, Bhima, also, that foremost of all warriors in battle,
slew, by means of his sharp arrows, Gandharvas by hundreds. And the
mighty sons of Madri also, battling with vigour, encountered hundreds of
Gandharvas, O king, and slaughtered them all. And as Gandharvas were
being thus slaughtered by the mighty warriors with their celestial
weapons, they rose up to the skies, taking with them the sons of
Dhritarashtra.
लुटुपटूची किंवा मैत्रीपूर्ण लढाई झाली असती तर गंधर्वांची इतकी प्राणहानी झाली नसती.
हारलाच की तो. त्याने पळ काढला नाही असे मी कुठे लिहिले आहे काय?
हे वाचः
'O Dhananjaya, without stirring from my own abode I became acquainted
with the purpose of the wicked Duryodhana and the wretched Karna in
coming hither. The purpose was even this,--knowing that
ye are exiles in the forest and suffering great afflictions as if ye had
none to take care of you, himself in prosperity, this wretch
entertained the desire of beholding you plunged in adversity and
misfortune. They
came hither for mocking you and the illustrious daughter of Drupada. The
lord of the celestials also, having ascertained this purpose of theirs,
told me, 'Go thou and bring Duryodhana hither in chains along with his
counsellors. Dhananjaya also with his brother should always be protected
by thee in battle, for he is thy dear friend and disciple.' At these
words of the lord of the celestials I came hither speedily.
इंद्राने चित्रसेनाला असे सांगुनच पाठवले होते की त्याने युद्धात पांडवांना नेहमीच मदत करावी आणि त्यांचे रक्षण करावे. ज्या अर्जुनाचे रक्षण करायला पाठवले आहे त्याला मारायची काय बिशाद होती चित्रसेनाची? तो आलाच होता मूळात त्यांना मदत करायला आणी दुर्योधनाला अद्दल घडवायला. तो कशाला त्याच्याशी खरेखुरे युद्ध करेल?
पटत नाही. कारण लढाईत पांडवांनी बरेच गंधर्व मारले होते. लुटुपटूची किंवा मैत्रीपूर्ण लढाई झाली असती तर गंधर्वांची इतकी प्राणहानी झाली नसती
त्यानंतर चित्रसेन युधिष्ठिराच्या सांगण्यावरुन दुर्योधनाला सोडुन देतो आणि परत फिरतो. मग काय लिहिले आहे ते बघः
And the lord of the celestials then, coming to that spot, revived those Gandharvas that had been slain in the encounter with the Kurus, by sprinkling the celestial Amrita over them.
चित्रसेनाला माहितीच होते की कितीही मरोत परत जिवंत होणारच आहेत. तो कशाला त्याची चिंता करेल?
अभिमन्यू
वधाच्या वेळी हाच कर्ण त्या सहा महारथ्यांमध्ये सामील होता.
दु:शासनवधाच्या वेळचा भीमाचा आवेश पाहूनच तो स्तंभित झाला असावा.
असेल असेल. पण अभिमन्यु वधाचा संदर्भ समजला नाही.
मान्य. अर्जुनाला त्यावेळी रोखणे कुणाला शक्य नव्हतेच पण इतर जण
त्यावेळी निशस्त्र असावेत हे विधान जरा धाडसीच आहे. महाभारतात याचा कसलाही
उल्लेख नाही.
मित्रा युद्ध संपले होते की नाही? सर्व जण अर्जुनाच्या वर जाण्याची प्रतिक्षा करत होते. तिथे कशाला कोणी शस्त्रे घेउन उभे राहिल? महाभारतात उल्लेख नाही हे साहजिक आहे. त्यात सगळे यौद्धे रोज शौचाला जायचे असाही उल्लेख नाही आहे. पण म्हणुन ते जायचे नाहित काय रे?
सहमत. पण कर्णाच्या डोळ्यांदेखतच अर्जुनाने वृषसेनाचा वध केला.
सहमत. पणा इथे कर्ण हारलेला नाही आहे. अर्जुनाच्या डोळ्यादेखत दृष्टद्युम्नाने द्रोणांना मारले. त्याने तसे करु नये असे अर्जुनाला वाटत होते. पण हे सगळे निमिषार्धात घडते. त्यात हस्तक्षेप करुन ते रोखण्याचा अवसर कोणाला मिळत नाही. अर्जुनाने काय वृषसेनाला मारताना कर्णाला टाइम प्लीज दिला होता असे वाटते आहे का तुला?
असेल असेल. पण अभिमन्यु वधाचा संदर्भ समजला नाही.
ते तुझ्या ह्म्म. कदाचित मागुन बाण सोडुन भीमाचा हात उडवणे जमण्याइतपत कर्णाचा नेम चांगला नसावा. या प्रतिसादाला उद्देशून आहे.
म्हणजे जो कर्ण अभिमन्यू वधाच्या अधर्मात सामील होता तो भीमाला भ्याडपणे
मागून वार करून मारूही शकत होता, पण एकंदरीत भीमाचा आवेश पाहून गळाठून
गेलेला असावा.
सर्व जण अर्जुनाच्या वर जाण्याची प्रतिक्षा करत होते. तिथे कशाला कोणी शस्त्रे घेउन उभे राहिल?
सर्व जण रणक्षेत्रात होते. रथी जरी शस्त्रे रथात ठेऊन खाली उतरले असतील तरी पदातींजवळ शस्त्रे असतीलच. शस्त्रत्याग शिबिरात गेल्यावरच होत असावा.
अर्जुनाने काय वृषसेनाला मारताना कर्णाला टाइम प्लीज दिला होता असे वाटते आहे का तुला?
मी कुठे म्हटलय की कर्ण हरला. पण तो वृषसेनाला वाचवू शकला नाही हे खरेच. जरी निमिषार्धात ते घडले असेल तरी अर्जुनाने कर्णाच्या डोळ्यांदेखत त्याचा वध केला ही वस्तुस्थिती कायम राहतेच.
म्हणजे
जो कर्ण अभिमन्यू वधाच्या अधर्मात सामील होता तो भीमाला भ्याडपणे मागून
वार करून मारूही शकत होता, पण एकंदरीत भीमाचा आवेश पाहून गळाठून गेलेला
असावा.
तो अधर्म कसा? एकासमोर अनेक ही उदाहरणे तर बरीच आहेत की.
पण एकुण कर्ण भीमाच्या आवेशाने स्तंभित झाला होता हे मान्य करण्यासारखे.
सर्व जण रणक्षेत्रात होते. रथी जरी शस्त्रे रथात ठेऊन खाली
उतरले असतील तरी पदातींजवळ शस्त्रे असतीलच. शस्त्रत्याग शिबिरात गेल्यावरच
होत असावा.
कर्ण रथी होता की नाही? पदातींकडे शत्रे असुन काय उपयोग? ते फक्त मरण्यापुरते होते. त्यांच्या शस्त्राचा अर्जुनासमोर काय पाड?
मी कुठे म्हटलय की कर्ण हरला. पण तो वृषसेनाला वाचवू शकला नाही
हे खरेच. जरी निमिषार्धात ते घडले असेल तरी अर्जुनाने कर्णाच्या
डोळ्यांदेखत त्याचा वध केला ही वस्तुस्थिती कायम राहतेच.
अर्रे कर्णासमोर भीमाने दुर्योधनाचे ३१ भाऊ मारले. ३१. ही वस्तिस्थिती जास्त दारुण आहे मग :)
अर्रे कर्णासमोर भीमाने दुर्योधनाचे ३१ भाऊ मारले. ३१. ही वस्तिस्थिती जास्त दारुण आहे मग Smile
पुत्रवधाचं दु:ख जास्त का मित्राच्या भावांच्या वधाचं?
शिवाय मित्राच्या ३१ भावांचा डोळ्यांसमोर वध होत असतानाही हा महान वीर काही
करू शकला नाही. कुंतीला वचन दिल्याप्रमाणे अर्जुन सोडून इतर पुत्रांचा वध
करणार नाही ते ठीकच, पण गेलाबाजार भीमाचा पराभव करून त्याला पळवून
धार्तराष्ट्रांना तरी वाचवू शकला असता हा कर्ण.
मला वाटते इथे नंबर महत्वाचा. एकापाठोपाठ ३१ लोकांना मारले रे त्याने. त्यावेळेस कर्ण भीमाला न मारण्याच्या हेतुन सौम्यपणे लढत होता मात्र भीम पुर्ण ताकदीनिशी लढत होता असा उल्लेख आहे महाभारतात.
कोणाच्या डोळ्यादेखत दुसर्याला मारणे यावरुन त्या यौद्धाचा पराजय झाला हा निष्कर्ष नाही काढता येणार (कारण अर्जुनाने आधी त्यच्याशी युद्ध केले आणि मग तो जेव्हा निशस्त्र झाला तेव्हाच कर्णाला आव्हान दिले. त्यात कर्णाल खिजवण्याचाच हेतु जास्त होता. कर्णाला त्याच्या मुलाला वाचवण्याची काही संधी देण्याचा आवेश नव्हता. एका क्षणात बाण मारुन अर्जुनाने ते कामे केले सुद्धा) त्यामुळे वृषसेनाबाबत तसे नाही म्हणता येणार. पण एकापाठोपाठ ३१ यौद्धे मारले जातात तेव्ह असे म्हटले जाउ शकते. अर्थात त्यावेळेस कर्ण भीमाला न मारण्याच्या हेतुन सौम्यपणे लढत होता हा प्रतिवाद त्यालाही आहेच.
अर्जुनाकडे त्याचे उत्तर नव्हते आणि तो चक्क पळून गेला. अर्थात महाभारतात हे मोठ्या खुबीने वेगळ्या भाषेत सांगितले आहे ही गोष्ट वेगळी.
याबद्दल अधिक माहिती देशील काय?
हे वाचः
Bidding the troops stay on the field after having assured them upon
his truth and by an oath, the mighty Karna of immeasurable soul fixed on
his bow-string the weapon known by the name of Bhargava. From that
weapon flowed, O king, millions and millions of keen arrows in that
great battle. Entirely shrouded with those blazing and terrible arrows
winged with feathers of Kankas and peacocks, the Pandava army could not
see anything. Loud wails of woe arose from among the Pancalas, O king,
afflicted, in that battle, with the mighty Bhargava weapon. In
consequence then of elephants, O king, and steeds, by thousands, and
cars, O monarch, and men, falling on all sides, deprived of life, the
Earth began to tremble. The vast force of the Pandavas became agitated
from one extremity to another. Meanwhile Karna, that scorcher of foes,
that foremost of warriors, that tiger among men, while consuming his
foes, looked resplendent like a smokeless fire. Thus slaughtered by
Karna, the Pancalas and the Cedis began to lose their senses all over
the field like elephants during the conflagration in a forest. Those
foremost of men, O tiger among men, uttered loud roars like those of the
tiger. Loud became the wails of woe, like those of living creatures at
the universal dissolution that were uttered by those crying combatants
struck with panic and running wildly on all sides, O king, of the field
of battle and trembling with fear. Beholding them thus slaughtered, O
sire, by the Suta's son, all creatures, even beasts and birds, were
filled with fear. The Srinjayas then, thus slaughtered in battle by the
Suta's son, repeatedly called upon Arjuna and Vasudeva like the spirits
of the dead within Yama's dominions calling upon Yama to
rescue them.
भार्गवास्त्रामुळे संपुर्ण पांडव सेना हतबल झाली होती. हजारोनी सैनिक मरत होते, बेशुद्ध पडत होते. त्यावेळेस अर्जुन सोडुन त्यांना कोणीही वाचवु शकेल असे त्यांना वाटत नव्हते.
Hearing those wails of the troops slaughtered with Karna's shafts,
and beholding the terrible bhargava weapon invoked into existence
Kunti's son Dhananjaya said unto Vasudeva these words, "Behold, O
Krishna
of mighty arms, the prowess of the bhargava weapon! It cannot, by any
means, be baffled! Behold the Suta's son also, O Krishna, filled with
rage in this great battle and resembling the Destroyer himself, in
prowess and employed in achieving such a fierce feat! Urging his steeds
incessantly, he is repeatedly casting angry glances upon me! I will
never be able to fly away from Karna in battle! The person that is
living, may, in battle, meet with either victory or defeat. To the man,
however, that is dead, O Hrishikesha, even death is victory. How can
defeat be his that is dead?"
पण इथे तर अर्जुन चक्क घाबरलेला आहे. त्याच्याकडे भार्गवास्त्रावर उपाय नाही. कर्ण आपल्याकडे रागाने बघतो आहे यामुळे तर तो अजुनच घाबरलेला आहे. मला युद्धातुन पळूनही जाता येत नाही आहे रे असे तो कृष्णाला अगदी कळवळून सांगतो आहे बघ.
Thus addressed by Partha, Krishna replied unto that foremost
of intelligent men and chastiser of foes, these words that were suitable
to the occasion, "The royal son of Kunti hath been deeply wounded and
mangled by Karna. Having seen him first and comforted him, thou wilt
then, O Partha, slay Karna?" Then Keshava proceeded, desirous of
beholding Yudhishthira, thinking that Karna meanwhile, O monarch, would
be overwhelmed with fatigue! Then Dhananjaya, himself desirous of
beholding the king afflicted with arrows, quickly proceeded on that car,
avoiding the battle, at Keshava's command
कृष्णाने त्याची अवस्था ओळखुन त्याला चक्क रणांगण सोडुन युधिष्ठिराकडे जायला सांगितले. तेवढ्यावेळात कर्ण दमेल मग येउन त्याच्याशी युद्ध कर म्हणुन सांगतो. तेवढ्या वेळात अर्थात भार्गवास्त्र पण करायची तेवढी हानी करुन शांत होइल. उपाय असाही काहिच नाही. इथे मरणार्या सैन्याला सोडुन अर्जुन चक्क पळुन गेला. पण कर्ण जेव्हा हारतो तेव्हा तो पळुन जातो. अर्जुन मात्र " युद्ध avoid करतो." आहे की नाही मज्जा. आणि शेवटचे ३ शब्द तर अप्रतिम.
"at Keshava's comman""
म्हणजे कृष्ण म्हट्ला म्हणुन केले. कृष्ण म्हटला शिखंडी आडुन बाण मार. आम्हे मारला. कृष्ण म्हटला सैरभैर झालेल्या निशस्त्र द्रोणाला मारा. आम्ही मारले. कृष्ण म्हटला भूरिश्रव्याचा हात मागुन तोड. आम्ही तोडला. कृष्ण म्हणला निशस्त्र, पदाती, चाक भूमीतुन बाहेर काढायचे म्हणुन युद्ध न करणार्या कर्णाला मार म्हणुन आम्ही मारले. कृष्ण म्हणाला पळून जा (सॉरी सॉरी. कर्णाकडे नंतर बघ असे म्हणाला नाही का तो) म्हणून आम्ही बॅटल अव्हॉईड केली. कृष्ण म्हटला की सगळे कसे धर्मानुसार केल्यासारखे वाटते. वाटते म्हणजे तसे ते असतेच.
Arjuna said,
'They called me Dhananjaya because I lived in the midst of wealth, having subjugated all the countries and taking away their treasures.
They called me Vijaya because when I go out to battle with invincible kings, I never return (from the field) without vanquishing them.
I am called Swetavahana because when battling with the foe, white horses decked in golden armour are always yoked unto my car.
They call me Falguna because I was born on the breast of the Himavat on a day when the constellation Uttara Falguna was on the ascendent.
I am named Kiritin from a diadem, resplendent like the sun, having been placed of old on my head by Indra during my encounter with the powerful Danavas.
I am known as Vibhatsu among gods and men, for my never having committed a detestable deed on the battle-field.
And since both of my hands are capable of drawing the Gandiva, I am known as Savyasachin among gods and men.
They call me Arjuna because my complexion is very rare within the four boundaries of the earth and because also my acts are always stainless.
I am known among human beings and celestials by the name of Jishnu, because I am unapproachable and incapable of being kept down, and a tamer of adversaries and son of the slayer of Paka.
And Krishna, my tenth appellation, was given to me by my father out of affection towards his black-skinned boy of great purity.'
>>>एक सिंपल अंडरस्टँडिंग आहे, जे युद्धशून्य स्थितीतच शक्य आहे
>>>युद्ध व्यर्थ आहे हा विचार मनात रूजवणं, स्वतःच्या आणि जमेल तितक्या सर्वांच्या.
---- मला हा विचार अत्यंत अनावश्यक विचार वाटतो. आत्ता युद्धशून्य स्थिती
आहे असे मानू (फक्त आपल्या घरचं कुणी काश्मिरमध्ये मेलेलं नाही/तिकडे नाही
म्हणून ), मग युद्धशून्य स्थितीत युद्ध व्यर्थ आहे असे म्हणत बसण्यात काय
हशील?
>>>`भविष्यकालीन किंवा काल्पनिक प्रसंगातून युद्धप्रवृतीला
दुजोरा' की `युद्धविराम (या काल्पनिक असला तरी) शांततेची शक्यता निर्माण
करू शकणार्या विचाराचा अंगीकार आणि प्रसार' असा अप्रोच विधायक ठरेल.
---- अहो, जी गोष्ट सध्या नाहीच तिच्याबद्दल कशाला कसल्या अप्रोचचा अंगीकार आणि प्रसार करायचा?
>>>त्यात तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला पटला तर तुम्ही अनेक लोकांपर्यंत हा विचार पोहोचवू शकाल
---- मी अजाबात पत्रकार नाही, फक्ते कधीकाळी पेपरमध्ये भाषांतरकार होतो.
>>>तिच्याबद्दल कशाला कसल्या अप्रोचचा अंगीकार आणि प्रसार करायचा?
>>>युद्धशून्य स्थिती आहे म्हणून विचार करण्याचं स्वास्थ्य आहे आणि...
--- विचार करण्याचं स्वास्थ्य जरुर असेल, पण जी गोष्ट या क्षणी नाहीच तिच्याबद्दल, तिच्या निराकरणाच्या दिशेनेही असो, अगदी अचूक विचार करणेदेखील उगाच अस्वस्थ असल्याचे लक्षण आहे.
>>>`युद्धप्रवण प्रवृती' जी आता, या क्षणी मनात आहे तिचा निरास
`युद्ध व्यर्थ आहे' या बोधातून करता येईल आणि एकदा तो झाला की युद्धाची
शक्यता मावळेल.
--- सर्व प्रकारचे 'बोध' हे स्वत:च्या मनाने अस्तित्वात नसलेल्या
गोष्टीबद्दल, त्या गोष्टींची कल्पना करुन बांधलेले पत्त्यांचे बंगले
आहेत. बोध नावाचं जे काही असेल ती प्रत्येकासाठीच अत्यंत वैयक्तिक गोष्ट
आहे, ते हस्तांतरणीय, Negotiable Instrument कदापिही नाही, त्यामुळे ना
बोधाचा अंगीकार होऊ शकतो, ना प्रसार!
त्यामुळेच तर युद्ध कथात रस आहे आणि `युद्धस्य कथा रम्य:' म्हटलय
>सर्व प्रकारचे 'बोध' हे स्वत:च्या मनाने अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल, त्या गोष्टींची कल्पना करुन बांधलेले पत्त्यांचे बंगले आहेत.
`युद्धप्रवण प्रवृती' आहे म्हणून तर युद्धाचं समर्थन, घटनांचा उहापोह आणि जमल्यास उदात्तिकरण आहे.
>बोध नावाचं जे काही असेल ती प्रत्येकासाठीच अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे, ते हस्तांतरणीय, Negotiable Instrument कदापिही नाही, त्यामुळे ना बोधाचा अंगीकार होऊ शकतो, ना प्रसार!
बोधाचा अर्थ `अंडरस्टँडिंग'किंवा `आकलन' असा आहे. युद्ध व्यर्थ आहे हा बोध कुणालाही होऊ शकतो आणि त्याचा प्रसारही होऊ शकतो.
वास्तविकात युद्ध ही राजकिय चाल आहे आणि त्यात सामान्य माणूस ओढला जातो. जर सामान्य माणूस युद्धविन्मुख झाला तर सत्ताधार्यांकडे सेनाबलच राहणार नाही आणि प्रत्येक सूज्ञाला युद्धापेक्षा शांतताच प्रिय आहे
संजय यांचं म्हणणं पटतंय आणि यकुचेही मुद्दे दुसर्या बाजूने विचार केला तर बरोबरच वाटतात. थोडक्यात आमचा बेंबट्या झाला आहे..
मुद्दाम प्रतिसाद अशासाठी की अनिष्ट वळणावर जाणारा वाद, गुद्दागुद्दी, व्यक्तिगत ऑफेन्स-डिफेन्स असे काही न होता उचितरित्या उत्तम चर्चा चालली आहे. मुद्दे मांडले खोडले जरुर जाताहेत पण ग्रेसफुली आणि रिस्पेक्टफुली..
चर्चा / वाद कसे चालावेत याचे उत्तम उदाहरण. ( विशेषतः यकु नामक आरडीएक्सचा समावेश असताना.. ;))
संजय यांचं म्हणणं पटतंय आणि यकुचेही मुद्दे दुसर्या बाजूने विचार केला तर बरोबरच वाटतात. थोडक्यात आमचा बेंबट्या झाला आहे..
मुद्दाम प्रतिसाद अशासाठी की अनिष्ट वळणावर जाणारा वाद, गुद्दागुद्दी, व्यक्तिगत ऑफेन्स-डिफेन्स असे काही न होता उचितरित्या उत्तम चर्चा चालली आहे. मुद्दे मांडले खोडले जरुर जाताहेत पण ग्रेसफुली आणि रिस्पेक्टफुली..
चर्चा / वाद कसे चालावेत याचे उत्तम उदाहरण. ( विशेषतः यकु नामक आरडीएक्सचा समावेश असताना..
हॅहॅहॅ थँक्यू हो गवि,
पण आता जे आहे ते सांगतो..
संजय क्षीरसागर यांच्याशी कदाचित पुढे होऊ शकणार्या चर्चांमध्ये मी तुम्हाला अपरिहार्यपणे नाराज करणार आहे.
१. संजय क्षीरसागर हे आत्मज्ञान झालेले, किमान तसं माझ्या वाचनात आलेले आंतर्जालावरील एकमेव सक्रिय सदस्य आहेत, So I assume there must be something rare about Sanjayji, so I will leave no stone unturned ;-)
अनिष्ट वळणावर जाणारा वाद, गुद्दागुद्दी, व्यक्तिगत ऑफेन्स-डिफेन्स
2. कितीही मर्यादा ओलांडायची नाही म्हटलं तरी संजयजींच्या बाबतीत मात्र
अपरिहार्यपणे 'व्यक्तीगत' व्हावं लागणार आहे; आत्मज्ञान झालेला माणूस
व्यक्तिमत्त्वाच्या पार असतो असं म्हणतात त्यामुळं मी शिवीगाळ करीत नसेन तर
संजयजींची यासाठी काहीच हरकत नसेल असं मी मानतो.
3. संजयजींचे जालावरील म्हणणे समजावून घेण्यासाठी त्यांच्या
'व्यक्तीत्वासंबंधातील' पैलुंना जाणून घेण्यासाठी/ कदाचित पुढे जाऊन
म्हणेन की त्याबद्दल माझे अंदाज/निरीक्षणे/ मे बी निष्कर्ष सुद्धा
सांगण्याकामी मला 'व्यक्तीत्वा'ला अपरिहार्यपणे स्पर्श करावा लागणार आहे.
यावर तुमचा 'गविकाकांचा सल्ला' हवाय ;-)
>>>युद्धप्रवण प्रवृती' जी आता, या क्षणी मनात आहे
>>>त्यामुळेच तर युद्ध कथात रस आहे आणि `युद्धस्य कथा रम्य:' म्हटलय
---- :) मला वाटते जगातल्या कुठल्याही गोष्टीचा कुठेही संबंध लावणं सहज शक्य आहे, कारण सगळं ओपन एंडेड आहे. त्यामुळे विचार, तर्काला/विचाराला कुठल्याही दिशेने जाण्यास वाव मिळाला म्हणून अर्थवहनाची ती एकच दिशा अस्तित्त्वात आहे असं मी म्हणणार नाही
>>>`युद्धप्रवण प्रवृती' आहे म्हणून तर युद्धाचं समर्थन, घटनांचा उहापोह आणि जमल्यास उदात्तिकरण आहे.
---- महाभारतातील युद्धाच्या विषयावर वर चर्चा आहे म्हणून चर्चा करणारे
सगळे युद्धाचे समर्थक किंवा उदात्तीकरण करणारे लोक आहेत असं मला वाटत नाही,
आणि असा अंदाजही मी लावणार नाही.
>>>बोधाचा अर्थ `अंडरस्टँडिंग'किंवा `आकलन' असा आहे. युद्ध
व्यर्थ आहे हा बोध कुणालाही होऊ शकतो आणि त्याचा प्रसारही होऊ शकतो.
----- पटत नाही! बुद्ध झाले, महावीर झाले - यांना बरेच मोठे बोध झाले होते
म्हणे, आणि त्यांचा प्रसारही त्यांनी केला होता. पण बुद्धाचा जन्मदेश
भारतही हजारो वेळा युद्धाला बळी पडला, त्यानंही युद्धे केली आणि बुद्धाची
शिकवण ज्या देशात गेली तो जपानसारखा देशही जगातल्या पहिल्या अणुबॉम्बला बळी
पडला.
त्यामुळं अंडरस्टॅडींग, आकलन, बोध या संकल्पना मला अत्यंत अनाकर्षक वाटतात.
>>>वास्तविकात युद्ध ही राजकिय चाल आहे आणि त्यात सामान्य
माणूस ओढला जातो. जर सामान्य माणूस युद्धविन्मुख झाला तर सत्ताधार्यांकडे
सेनाबलच राहणार नाही आणि प्रत्येक सूज्ञाला युद्धापेक्षा शांतताच प्रिय आहे
----- :)
सरळसोट दुनियादारीकडे पाहून मांडलं गेलेलं हे फार सहज सोपं तत्त्वज्ञान
आहे, पण त्याचा प्रॅक्टीकली काडीचाही उपयोग होताना दिसत नाही, कारण तो तसा
होऊ शकत नाहीच. त्यामुळं कितीही चांगल्या असल्या तरी उपयुक्तता नसलेल्या
(आणि हजारो वर्षांपासून रंगीत तालीम होऊन गेलेल्या) गोष्टींचं ओझं
अंगीकारणे किंवा प्रसारित करणे अत्यंत रखरखीत गोष्ट आहे.
होतात म्हणून संदर्भ तोच ठेऊन इथे प्रतिसाद दिला आहे.
>महाभारतातील युद्धाच्या विषयावर वर चर्चा आहे म्हणून चर्चा करणारे सगळे युद्धाचे समर्थक किंवा उदात्तीकरण करणारे लोक आहेत असं मला वाटत नाही
निदान त्यांना युद्धकथेत रस आहे हे उघड आहे
>पण बुद्धाचा जन्मदेश भारतही हजारो वेळा युद्धाला बळी पडला, त्यानंही युद्धे केली आणि बुद्धाची शिकवण ज्या देशात गेली तो जपानसारखा देशही जगातल्या पहिल्या अणुबॉम्बला बळी पडला.
यानं युद्धाचं समर्थन होत नाही, खरं तर प्रत्येक युद्धाची निष्पत्ती "युद्ध व्यर्थ होतं" हेच दाखवते
.....वास्तविकात युद्ध ही राजकिय चाल आहे आणि त्यात सामान्य माणूस ओढला
जातो. जर सामान्य माणूस युद्धविन्मुख झाला तर सत्ताधार्यांकडे सेनाबलच
राहणार नाही
>सरळसोट दुनियादारीकडे पाहून मांडलं गेलेलं हे फार सहज सोपं
तत्त्वज्ञान आहे, पण त्याचा प्रॅक्टीकली काडीचाही उपयोग होताना दिसत नाही
= जर सामान्य माणसानं साथ दिली नाही तर कोणतीही विचारप्रणाली मूळच धरू शकत नाही.
प्रत्येक प्रणालीवर दोन्ही बाजूनं बोलता येईल आणि त्यात व्यक्तिगत हेतू दर्शवता येईल पण शांतता ही एकमेव चिज अशीये की ती सर्वांसाठी विधायक आहे, मग ते सजीव असोत, पर्यावरण असो की पुढची पिढी असो.
माझं फक्त एकच सांगणंय की तुम्ही युद्धविन्मुख व्हा आणि इतरांना तो विचार देण्याचा प्रयत्न करा. युद्ध हे सामुहिक द्वंद्व आहे आणि जर समुहाची इच्छा नसेल तर युद्ध अशक्य आहे.
युद्धोत्तेजकता हा जसा राजकिय मताप्रणाली जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न आहे तसाच युद्धविन्मुखता हा जागतिक शांततेसाठी केलेला प्रयत्न आहे
युद्ध हे सामुहिक द्वंद्व आहे आणि जर समुहाची इच्छा नसेल तर युद्ध अशक्य आहे.
इज इट?
आत्तापर्यंतच्या प्रमुख युद्धांमधे दोन्ही बाजूंच्या सामान्य जनतेपैकी (मासेस / समूह) किती जणांची इच्छा "युद्ध योग्य आहे" ,"युद्ध व्हावं" अशी होती?
युद्ध हा पॉवर गेम आहे आणि पॉवरमधे आलेल्या मूठभरांच्या महत्वाकांक्षेपोटी जन्म घेतो आणि चालतो असं वाटतं.
>>>>निदान त्यांना युद्धकथेत रस आहे हे उघड आहे
---- वावगे काहीही नाही. युद्धकथेत रस आहे म्हणून खरोखरचं युद्ध करुन पाहु असं कुणी म्हणणार नाही.
>>>>>पण बुद्धाचा जन्मदेश भारतही हजारो वेळा युद्धाला
बळी पडला, त्यानंही युद्धे केली आणि बुद्धाची शिकवण ज्या देशात गेली तो
जपानसारखा देशही जगातल्या पहिल्या अणुबॉम्बला बळी पडला.
>>>>यानं युद्धाचं समर्थन होत नाही, खरं तर प्रत्येक युद्धाची निष्पत्ती "युद्ध व्यर्थ होतं" हेच दाखवते
---- मुळात युद्धाच्या समर्थनार्थ भूमिका घेऊन मी चर्चा करीत नाहीय.
Nothing is new under the sun. युद्धे व्यर्थ आहेत असंही म्हणता येईल,
युद्धे सार्थक ठरली असेही म्हणता येईल. मग दोन्ही प्रकारच्या घिस्यापिट्या
कॅसेटी वाजवण्यात काय अर्थ?
>>>>जर सामान्य माणसानं साथ दिली नाही तर कोणतीही विचारप्रणाली मूळच धरू शकत नाही.
----- मी सामान्य माणूस आहे आणि बुद्ध, महावीर आणि आता संजय क्षीरसागर यांची 'युद्धे व्यर्थ आहेत' या विचारप्रणालीला युद्धाचे समर्थन न करताही माझ्यात मूळ धरु देत नाहीय! मूळ धरु न शकणार्या विचारप्रणालींना (युद्धे व्यर्थ आहेत, पण तीच सगळीकडे चालू आहेत) सामान्य माणसाची साथ हवी असणे हे ती विचारसरणीच मूळात अप्रासंगीक असल्याचे लक्षण आहे.
>>>>प्रत्येक प्रणालीवर दोन्ही बाजूनं बोलता येईल आणि त्यात
व्यक्तिगत हेतू दर्शवता येईल पण शांतता ही एकमेव चिज अशीये की ती
सर्वांसाठी विधायक आहे, मग ते सजीव असोत, पर्यावरण असो की पुढची पिढी असो.
----- हे केवळ एक 'इश्वर अल्ला तेरे नाम' टाइप विधान आहे. युद्धांमध्ये
तोफांचे आवाज चालू असताना आणि सैनिकांच्या शरीरांच्या चिंधड्या उडत
असतानाही (ही वेगळी गोष्ट) तिथे मध्येमध्ये शांतता असतेच. शांततेतच
युद्ध होतं. तुम्ही युद्धादरम्यानही असणार्या आणि त्या शांततेतच युद्ध
सुरु असणार्या शांततेला शांतता मानत नाही काय?
>>>>माझं फक्त एकच सांगणंय की तुम्ही युद्धविन्मुख व्हा आणि
इतरांना तो विचार देण्याचा प्रयत्न करा. युद्ध हे सामुहिक द्वंद्व आहे आणि
जर समुहाची इच्छा नसेल तर युद्ध अशक्य आहे.
----- ज्या दिवशी ट्वीन टॉवरवर विमानं धडकली किंवा मुंबईत अतिरेकी घुसले
त्या दिवशी अफगणिस्तान मधल्या लोकांची आणि अनुक्रमे पाकिस्तानमधल्या
लोकांची सामुहिक युद्धाची इच्छा होती काय? काही युद्धखोर गट असतील, ते
मात्र ' तुम्ही युद्धविन्मुख व्हा' हे ऐकून घेऊ शकणार नाहीत, आणि युद्ध
शक्य झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे.
>>>>युद्धोत्तेजकता हा जसा राजकिय मताप्रणाली जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न आहे तसाच युद्धविन्मुखता हा जागतिक शांततेसाठी केलेला प्रयत्न आहे
----- अत्यंत भाबडा, 'हे असं करु नका' एवढंच सांगणं असलेला हा प्रयत्न यशस्वी होवो अशा शुभेच्छा.
तुम्ही युद्धाचं समर्थन करत नाही म्हटल्यावर माझा हेतू साध्य झालाय!
>युद्धे व्यर्थ आहेत असंही म्हणता येईल, युद्धे सार्थक ठरली असेही म्हणता येईल.
मला युद्धमिमांसेत रस नाही, मला फक्त इतकंच सांगायचंय की "मानवी प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हा आदिमानवी पर्याय आहे"
>मूळ धरु न शकणार्या विचारप्रणालींना (युद्धे व्यर्थ आहेत, पण तीच सगळीकडे चालू आहेत) सामान्य माणसाची साथ हवी असणे हे ती विचारसरणीच मूळात अप्रासंगीक असल्याचे लक्षण आहे
प्रत्यक्ष युद्ध खेळणारे सामन्यजनच असतात.
>शांततेतच युद्ध होतं. तुम्ही युद्धादरम्यानही असणार्या आणि त्या शांततेतच युद्ध सुरु असणार्या शांततेला शांतता मानत नाही काय?
अजिबात नाही, मी युद्धशून्य शांततेचा पुरस्कर्ता आहे
>ज्या दिवशी ट्वीन टॉवरवर विमानं धडकली किंवा मुंबईत अतिरेकी घुसले त्या दिवशी अफगणिस्तान मधल्या लोकांची आणि अनुक्रमे पाकिस्तानमधल्या लोकांची सामुहिक युद्धाची इच्छा होती काय? काही युद्धखोर गट असतील, ते मात्र ' तुम्ही युद्धविन्मुख व्हा' हे ऐकून घेऊ शकणार नाहीत, आणि युद्ध शक्य झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे
हा युद्धाचाच सिलसिला आहे आणि मला तेच सांगायचंय की युद्ध मग ते खुलं असो की छुपं गैर आहे.
आणि परत एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की माझा फोकस एरिया तुम्ही आहात, हा तुमच्या-माझ्यातला संवाद आहे. "तुम्ही युद्धविन्मुख व्हा" मग ती लाट हळूहळू पसरत जाईल.
>अत्यंत भाबडा, 'हे असं करु नका' एवढंच सांगणं असलेला हा प्रयत्न यशस्वी होवो अशा शुभेच्छा
परवा अर्धवटरावनी स्वतःच्या मुलाचा एक किस्सा लिहीला होता. तो मुलाला खेळवत होता, त्याच्या एका हातात वाघाचं चित्र आणि दुसर्या हातात हरिण आहे, वाघ हरणाच्या पाठीमागे लागलाय आणि तो झडप घालणार इतक्यात त्याच्या मुलानी हरणाचं तोंड वाघाकडे वळवलं आणि म्हणाला "पप्पी, पप्पी"!
माझा विश्वास तितकाच भाबडा आहे आणि प्रत्येकाला शांतताच हवीये हे मला माहितीये कारण ते त्याच स्वरूप आहे .
>>>>तुम्ही युद्धाचं समर्थन करत नाही म्हटल्यावर माझा हेतू साध्य झालाय!
------ नाही. युद्धे होण्याचं समर्थन करीत नसलो तरी, 'युद्धे व्यर्थ आहेत'
या घोषाचीही निरर्थकता मी मला दिसते, त्यामुळंच एवढे प्रतिसाद दिले आहे.
>>>>मला युद्धमिमांसेत रस नाही, मला फक्त इतकंच सांगायचंय की "मानवी प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हा आदिमानवी पर्याय आहे"
---- एवढंच सांगून चालणार नाही, ते लोकांनी ऐकायला आणि मानायला हवं अशी इच्छा आहे की फक्त बोलतच रहाण्याची इच्छा आहे?
>>>>मूळ धरु न शकणार्या विचारप्रणालींना (युद्धे व्यर्थ
आहेत, पण तीच सगळीकडे चालू आहेत) सामान्य माणसाची साथ हवी असणे हे ती
विचारसरणीच मूळात अप्रासंगीक असल्याचे लक्षण आहे
>>>>प्रत्यक्ष युद्ध खेळणारे सामन्यजनच असतात.
----- आणि ते 'युद्धे व्यर्थ आहेत' असं ते मानत नाहीत, आणि 'युद्धे व्यर्थ
आहेत' हे नुसतं सांगण्यावेगळा काही उपाय असल्याचं बहुधा तुम्ही मानत नाही.
>>>शांततेतच युद्ध होतं. तुम्ही युद्धादरम्यानही असणार्या आणि
त्या शांततेतच युद्ध सुरु असणार्या शांततेला शांतता मानत नाही काय?
>>>>>अजिबात नाही, मी युद्धशून्य शांततेचा पुरस्कर्ता आहे
----- अशी युद्धशून्य शांतता ना कधी अस्तित्त्वात होती, ना आता सध्या आहे ना पुढेही कधी असेल.
>>>>>हा युद्धाचाच सिलसिला आहे आणि मला तेच सांगायचंय की युद्ध मग ते खुलं असो की छुपं गैर आहे.
----- नुसतं सांगत रहाण्यापेक्षा काही वेगळा उपाय तुमच्याकडे आहे काय?
सांगायला काय बरेच लोक बर्याच गोष्टी सांगत रहातात, पण आपण सांगत
असलेल्या या गोष्टी पूर्वीही सांगून झाल्या आहेत, आणि ही लागू पडणारी
उत्तरे नव्हेत हे काळानं दाखवून दिलं आहे, आता नवी उत्तरं शोधावी लागणार
आणि जे उत्तर प्रॅक्टीकली लागू पडत नाही ते सरळ कचर्यात फेकून द्यायला हवं
असं मला वाटतं.
>>>>>आणि परत एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की माझा फोकस एरिया तुम्ही आहात, हा तुमच्या-माझ्यातला संवाद आहे. "तुम्ही युद्धविन्मुख व्हा" मग ती लाट हळूहळू पसरत जाईल.
------ मुळात तुमची इथे भेट होण्याआधीही मी युद्धावर जाण्याची शक्यता नव्हतीच. त्यामुळं या संवादातील तुमच्या म्हणण्यावरुन युद्धविन्मुख होण्याचा प्रश्न नाही. लाट वगैरेबद्दल मी काही सांगू शकत नाही.
>>>>>अत्यंत भाबडा, 'हे असं करु नका' एवढंच सांगणं असलेला हा प्रयत्न यशस्वी होवो अशा शुभेच्छा
>>>>>माझा विश्वास तितकाच भाबडा आहे आणि प्रत्येकाला शांतताच हवीये हे मला माहितीये कारण ते त्याच स्वरूप आहे .
------- पुन्हा एकदा शुभेच्छा. :)
>युद्धे होण्याचं समर्थन करीत नसलो तरी, 'युद्धे व्यर्थ आहेत' या घोषाचीही निरर्थकता मी मला दिसते, त्यामुळंच एवढे प्रतिसाद दिले आहे.
>एवढंच सांगून चालणार नाही, ते लोकांनी ऐकायला आणि मानायला हवं अशी इच्छा आहे की फक्त बोलतच रहाण्याची इच्छा आहे?
>आणि ते 'युद्धे व्यर्थ आहेत' असं ते मानत नाहीत, आणि 'युद्धे व्यर्थ आहेत' हे नुसतं सांगण्यावेगळा काही उपाय असल्याचं बहुधा तुम्ही मानत नाही.
>अशी युद्धशून्य शांतता ना कधी अस्तित्त्वात होती, ना आता सध्या आहे ना पुढेही कधी असेल.
>नुसतं सांगत रहाण्यापेक्षा काही वेगळा उपाय तुमच्याकडे आहे काय? सांगायला काय बरेच लोक बर्याच गोष्टी सांगत रहातात, पण आपण सांगत असलेल्या या गोष्टी पूर्वीही सांगून झाल्या आहेत, आणि ही लागू पडणारी उत्तरे नव्हेत हे काळानं दाखवून दिलं आहे, आता नवी उत्तरं शोधावी लागणार आणि जे उत्तर प्रॅक्टीकली लागू पडत नाही ते सरळ कचर्यात फेकून द्यायला हवं असं मला वाटतं.
>मुळात तुमची इथे भेट होण्याआधीही मी युद्धावर जाण्याची शक्यता नव्हतीच. त्यामुळं या संवादातील तुमच्या म्हणण्यावरुन युद्धविन्मुख होण्याचा प्रश्न नाही. लाट वगैरेबद्दल मी काही सांगू शकत नाही.
>पुन्हा एकदा शुभेच्छा
= इंटरनेटवर मी फक्त सांगू शकतो आणि विचार हा एच्छिक कृत्याचा स्त्रोत आहे हे सर्वज्ञात आहे.
युद्धाला प्रवृत्त करणं असो की युद्धापासून विन्मुख करणं असो शेवटी सर्व संवादावर अवलंबून आहे.
एखादं वक्तव्य आणि रूजवलेली धारणा युद्धाला प्रवृत्त करते तर मग युद्ध व्यर्थ आहे ही धारणाच ते पटलेल्या प्रत्येकाला युद्धविन्मुख करेल हे निर्विवाद आहे.
उत्तरच नसलेल्या प्रश्नांना खरोखर सार्थक, प्रॅक्टीकल उत्तर नाही हे मान्य न करता खूबीने दिलेली बगल आवडली नाही.
उलट युद्धावर जाण्याविषयी मी वर पुरेशा प्रमाणात भूमिका मांडलेली असूनही पुन्हा युद्धाला प्रवृत्त किंवा विन्मुख करण्यात
संवादाचा तकलादू दुवा कायम ठेवण्याच्या इच्छेतून तर तुम्हीही
रजनीशांप्रमाणेच (कदाचित त्यांच्या विचारांच्या छायेत तुम्हाला तथाकथित
आत्मज्ञान झाल्यामुळे असेल ) फक्त प्राप्त आयुष्यात 'टाईम कंज्युम' करुन
मागे गबाळ सोडण्यावरच भर देणार आहात काय असा प्रश्न पडला आहे.
तूर्तास रजा घेतो.
धन्यवाद.
>संजय क्षीरसागर यांच्याशी कदाचित पुढे होऊ शकणार्या चर्चांमध्ये मी तुम्हाला अपरिहार्यपणे नाराज करणार आहे.
= कुणीच नाराज होऊ नये अशी अपेक्षा आहे कारण उद्विग्नतेतून उद्विग्नताच निर्माण होते.
मी लिहीन ती खुली आणि मोकळी चर्चा असू द्या, तो "सहप्रवास" झाला तर सर्वांना उपयोगी आणि आनंदाचा होईल
>१. संजय क्षीरसागर हे आत्मज्ञान झालेले, किमान तसं माझ्या वाचनात आलेले आंतर्जालावरील एकमेव सक्रिय सदस्य आहेत, So I assume there must be something rare about Sanjayji, so I will leave no stone unturned
= मी स्वत:ला कोणत्याही प्रकारे विषेश समजत नाही.
माझं आकलन तुमच्याशी शेअर करून "तुम्ही सत्य आहात" हे सांगण्याचा माझा प्रयत्न राहिल
>अनिष्ट वळणावर जाणारा वाद, गुद्दागुद्दी, व्यक्तिगत ऑफेन्स-डिफेन्स
2. कितीही मर्यादा ओलांडायची नाही म्हटलं तरी संजयजींच्या बाबतीत मात्र अपरिहार्यपणे 'व्यक्तीगत' व्हावं लागणार आहे;
आत्मज्ञान झालेला माणूस व्यक्तिमत्त्वाच्या पार असतो असं म्हणतात त्यामुळं
मी शिवीगाळ करीत नसेन तर संजयजींची यासाठी काहीच हरकत नसेल असं मी मानतो.
= सत्य समजलेल्या व्यक्तीनं आपण "केवळ व्यक्ती नाही" हे जाणलेलं असलं तरी रोजच्या जगण्यात त्याला व्यक्ती म्हणूनच जगावं लागतं.
संसारिक आणि शारीरिक विवंचना, वादविवाद, जवाबदार्या, नातेसंबंध, मित्रमैत्रिणी हे सर्व काही इतरांसारखच असतं फक्त सत्य गवसल्यानं तो स्वच्छंद जगतो आणि त्याचा मूड लाईट असतो इतकंच
>3. संजयजींचे जालावरील म्हणणे समजावून घेण्यासाठी त्यांच्या 'व्यक्तीत्वासंबंधातील' पैलुंना जाणून घेण्यासाठी/ कदाचित पुढे जाऊन म्हणेन की त्याबद्दल माझे अंदाज/निरीक्षणे/ मे बी निष्कर्ष सुद्धा सांगण्याकामी मला 'व्यक्तीत्वा'ला अपरिहार्यपणे स्पर्श करावा लागणार आहे.
= कुणाही सत्याप्रत पोहोचलेल्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाचा अॅनॅलिसिस, त्याचं प्रसंगोत्पात वागणं, त्याची शैली, यांचा उहापोह किंवा अनुसरण करून तुम्ही सत्याप्रत पोहोचू शकत नाही; तर त्या व्यक्तीचा निराकाराचा बोध आणि त्यानं त्याचा हरप्रसंगी कौशल्यानं केलेला उपयोग तुम्हाला सत्याची (किंवा स्वत:ची) उकल घडवू शकतो.
असो, हा प्रतिसाद शरदच्या पोस्टशी विसंगत आहे पण तो दुसरीकडे देता येणं शक्य नसल्यानं इथे दिला गेलायं त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो.
महाभारतातील व्यक्तिचित्रे-५ अर्जुन
महाधनुर्धर अर्जुन
महाभारतातील सर्वश्रेष्ठ धर्नुर्धर कोण ? भीष्मच. पण त्यांनी स्वत:च
दुर्योधनाला सांगितल्याप्रमाणे " बाबा रे, मला हरविणारे या त्रिभुवनात कोणी
नाही, पण आज मी वृद्ध झालो आहे व तरुण अर्जुनाकडे सर्व दिव्यास्त्रे आहेत.
तेव्हा त्याच्या तोडीचा आज तरी कोणी दिसत नाही." हा एकच दाखला अर्जुनाचे
अद्वितीय स्थान सिद्ध करतो. हे स्थान त्याने अपार मेहनत, एकाग्रता,
गुरुनिष्ठा, इत्यादी गुणांनी मिळवले आहे लहानपणापासून धनुर्धारी व्हावयाचा
ध्यास त्याने घेतला व गुरूकडून विद्या मिळवावयाची ठरवल्यावर त्याने कधीच
मागे वळून पाहिले नाही. अगदी पहिल्यांदी द्रोणांनी एकशे पाच जणांना गोळा
करून विचारले " मी तुम्हाला विद्या दिल्यावर माझे एक काम आहे ते तुम्ही
करणार का ?" एकट्या अर्जुनाने " हो " म्हटले. द्रोण सर्वांना पाणी आणावयास
सांगतात पण सर्वांना लहान तोंडाचे कमंडलू व फक्त अश्वत्थाम्याला मोठ्या
तोंडाचा. हे ध्यानात आल्यावर आपला कमंडलू वारुणास्त्राने भरून अर्जुन,
द्रोण आपल्या मुलाला शिकवतात ते शिकू लागला. नदीत जलविहाराकरत्ता गेले
असतांना मगरीने द्रोणांचा पाय पकडला. स्वत:ची सुटका करावयास सम्रर्थ असूनही
द्रॊण " सोडवा, सोडवा " असे ओरडू लागले. इतर मुले गोंधळून इकडेतिकडे पळू
लागली. फक्त अर्जुनाने बाण सोडून मगरीला मारले. रात्री अंधारात सरावाने घास
तोंडातच जातो हे पाहून अर्जुन रात्रीचा अंधारात सराव करू लागला. हे सर्व
पाहून व त्याची गुरुनिष्ठा पाहून द्रोणांचा तो लाडका शिष्य झाला व त्यांनी
स्वत:च्या मुलाप्रमाणेच त्याला सर्व अस्त्रे दिली. भास पक्षाची गोष्ट
सर्वांना माहित आहेच.
आज मला अर्जुनाच्या संग्रामांमधील कौशल्याबद्दल थोडक्यात सांगावयाचे आहे.
द्रौपदी स्वयंवर, गोग्रहण, अठरा दिवसांचे युद्ध सगळ्यांना माहित असते.पण
स्वर्गात इन्द्र व इतर देवतांकडून दिव्यास्त्रे मिळवल्यावर इंद्राच्या
सांगण्यावरून त्याने निवातकवच व देवांनाही अजिंक्य असलेले पौलोम-कालकंज
दैत्यांचा वध करून देवांना गुरुदक्षिणा दिली. हे सर्व विजय त्याने स्वत:चे
धैर्य व आत्मविश्वास यांच्या जोरावर मिळवले. तो नेहमीच अपराजित राहिला का ?
एका लढाईची माहिती पुढे आपण बघणार आहोतच पण आयुष्यातील शेवटची लढाई तो फार
लज्जास्पद रीतीने हरला. सर्व यादव यादवीत एकमेकांशी लढून मेले, कृष्ण
गेला, द्वारका बुडाली व मागे राहिल्या यादव स्त्रीया व लहान मुले.
स्त्रीयांना घेऊन आणावयास अर्जुन गेला. असंख्य स्त्रीयांना घेऊन एकटा
अर्जुन चालला आहे असे पाहून अभीर गुंडांनी त्याच्यावर हल्ला चढवला व ते
स्त्रीयांना पळवून नेऊ लागले. ध्यानात घ्या, सैनिक नव्हेत, हातात
लाठ्याकाठ्या असलेले गुंड ! रागावून त्यांच्यावर प्रतिहल्ला करावयास
अर्जुनाने गांडिव धनुष्यास प्रत्यंचा चढवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला
कळले की त्याच्या दंडातील ताकदच नाहिशी झाली आहे. महाप्रयासाने त्याने
प्रत्यंचा चढवली खरी पण त्याला एकही अस्त्र आठवेना. त्याने नुसते बाण सोडून
गुंडांना मारावयास सुरवात केली आणि आश्चर्य म्हणजे अक्षय भात्यातले बाणच
संपले ! हताश अर्जुनाने आपल्या डोळ्यांनी ही पळवापळवी पाहिली व जमल्या
तेव्हड्या स्त्रियांना घेऊन तो परतला. ही त्याची शेवटची लढाई.
गुणविशेष
नर ऋषीचा अवतार मानलेल्या अर्जुनावे वर्णन महाभारतात असे केले आहे :"
... अभिजात शोभा, शील, रूप, व्रत, दम, बल, वीर्य, प्रतिभा इत्यादिकांनी
युक्त असलेला, ज्याच्या शरीरावर विद्या, ऐश्वर्य यांचे तेज झळकते, अतिशय
शूर, क्षमाशील, अंत:करणाला मत्सराचा स्पर्शही नसलेला, बुद्धिमत्तेचे सर्व
गुण असलेला, अहंकार नसलेला, आपल्याविषयी व आपल्या श्रेष्ठतेविषयी काहीही न
बोलणारा, सर्वांना प्रिय वाटणारा..." आपण यांतील काहींची माहिती घेऊ.
इंद्रप्रस्थात असतांना एके रात्री एका ब्राह्मणाच्या गायी चोर चोरून नेऊ
लागले. त्याच्या आरड्याओरड्याने अर्जुन जागा झाला व शस्त्रे आणावयास
शस्त्रागारात गेला. त्याने तेथे धर्म व द्रौपदीला एकांतात पाहिले. शस्त्रे
घेऊन त्याने चोरांना मारून ब्राह्मणाच्या गायी परत दिल्या. पांडवांत असे
ठरले होते की एकाने दुसरा भाऊ व द्रौपदी यांना एकांतात पाहिले तर पहिल्यने
बारा वर्षे वनवासात ( इंद्रप्रस्थाबाहेर) जावयाचे. युधिष्ठिराचा विरोध
असतांनाही अर्जुनाने धर्माशी कपट करावयाचे नाकारले व तो बाहेर पडला.
फ़िरतफ़िरत तो गंगेत स्नानाला गेला असतांना त्याच्यावर भाळून उलूपी नावाच्या
नागकन्येने त्याला चक्क पळवून पाताळात नेले. तेथे तिच्या आर्त विनवणीवरून
त्याने तिच्याशी विवाह केला व एक रात्र तेथे राहून सकाळी परत गंगाकाठी आला.
नंतर तो मणिपूर राज्यात गेला असता तेथील राजकन्या चित्रांगदा त्याच्या
दृष्टीस पडला. त्याचे मन तिच्यावर बसले व राजाकडे त्याने तिची मागणी केली.
राजाने सांगितले की हिचा पहिला पुत्र वंशवृद्ध्यर्थ मला देणार असशील तर
मला मान्य आहे. ते कबूल करून चित्रांगदेशी विवाह करून अर्जुन तेथे तीन
वर्षे राहिला. तेथे बभ्रुवाहनाचा जन्म झाला. मुलाला व बायकोला तेथे ठेवून
तो परत बाहेर पडला. नंतर प्रभासक्षेत्री त्याची व कृष्णाची गाठ पडली व
दोघे द्वारकेला गेले. तेथे सुभद्रेच्या प्रेमात पडला.मग कृष्णाच्या संमतीने
सुभद्राहरण करून त्याने सुभद्रेशी विवाह केला.
चतुराई
बारा वर्षे झाल्यावर आता इंद्रप्रस्थात परतावयाचे होते. आणि एक मोठा प्रश्न
अर्जुनासमोर उभा राहिला. सुभद्रा व द्रौपदी यांची गाठ कशी घालून द्यावयाची
? मोठ्या चतुराईने सुभद्रेला गोपीवेष घालून त्याने द्रौपदीकडे पाठविली.
अतिशय नम्रतेने तिने द्रौपदीला नमस्कार करून सांगितले, " माझे नाव भद्रा,
मी आपली दासी आहे ". प्रसन्न झालेल्या द्रौपदीने उठून कृष्णभगिनीला आलिंगन
दिले. दोघींचे प्रेम जुळलेले पाहून सर्वच आनंदित झाले. कुंतीचे नकुल-सहदेव
यांवर प्रेम होते तसेच द्रौपदीचे अभिमन्युवर होते व " पांडवांना लढाई नको
असेल तर अभिमन्युला पुढे करून माझे पाच पुत्र कौरवाशी लढतील, आईच्या
अपमानाचा बदला ते घेतील " असे तिने आत्मविश्वासाने पांडवांना ठणकाविले !
शील
अर्जुनाने द्रौपदीशिवाय आणखी तीन विवाह केले म्हणून " हलकट, कामी इंद्राचा
मुलगा " (तो दुसरे काय करणार) अशी टीका एका प्रतिसादात केली गेली. पण
पुढील दोन उदाहरणांवरून उलटेच दृष्य समोर येते.
अर्जुन अस्त्रे संपादन करण्यासाठी स्वर्गात गेला असता एके दिवशी इंद्राच्या
दरबारात अप्सरांचा नाच चालू होता. त्या वेळी अर्जुन उर्वशीकडे अनिमिष
दृष्टीने पहात आहे असे इंद्राला दिसले. त्याचे मन उर्वशीवर गेले आहे अशा
समजुतीने इंद्राने तिला रात्री अर्जुनाकडे जावयास सांगितले. तीलाही तेच
पाहिजे होते. रात्री मोठा शृंगार करून ती अर्जुनाच्या महालात गेली.
गोंधळलेल्या अर्जुनाने तिचे स्वागत करून " मी आपली काय सेवा करू ?" असा
प्रश्न विचारला. त्यावर तिने येण्याचा उद्देश सांगितला. डोळे मिटून, कानावर
हात ठेवून अर्जुन म्हणाला " छे,छे. ही पुरुरव्याची पत्नी, म्हणजे
कुरुवंशाची जननी , असे मनात आल्याने, लहान मुलाने आईकडे पहावे, तसे मी
तुमच्याकडे पहात होतो. पृथ्वीवर कुंती किंवा माद्री, स्वर्गात शची, तसे
किंवा त्याहूनही जास्त मला आपण आईसारख्या अहात." उर्वशीने त्याला
सांगण्याचा प्रयत्न केला की " पृथ्वीवरील नाती इथे लागू नाहीत. कुरुवंशातील
तुझ्या पूर्वजांनी आमचा उपभोग घेतला आहे." पण अर्जुन काहीच ऐकावयास तयार
नाही हे पाहिल्यावर संतापून तिने अर्जुनाला "तू षंढ होशील" असा शाप दिला.
अर्जुनाने सकाळी इंद्राला सर्व प्रकार सांगितल्यावर त्याने तो शाप एका
वर्षापुरता मर्यादित केला व " याचा उपयोग तुला अज्ञातवासात होईल" असे
सांगितले.
दुसरा प्रसंग आहे विराटाला पांडवांची ओळख पटल्यानंतरचा. आपण पांडवांना
दासासारखे वागवले व अर्जुनाने आपले राज्य वाचविले याबद्दल उतराई व्हावे
म्हणून तो म्हणाला " आमच्या कुलाचा व कुरु कुलाचा विवाहसंबंध जुळून येवो.
मी माझी मुलगी उत्तरा अर्जुनाला देतो." एक तरूण, सुंदर राजकन्या पदरात पडत
असतांना अर्जुनाने उत्तर काय दिले बघा : तो म्हणतो " राजा, विवाहसंबंध
जुळून यावेत हे उत्तमच. पण मी उत्तरेला पत्नी म्हणून स्विकारत नाही. ती
माझी स्नुषा म्हणून मी तिला स्विकारतो. माझा मुलगा, कृष्णाचा भाचा,
अभिमन्यु हा तुझ्या मुलीला योग्य वर आहे. तो तरुण, सुस्वरूप, थोर योद्धा
आहे." विराटाने "असे का ?"
विचारल्यावर अर्जुन म्हणाला " राजा, तुझी मुलगी एक वर्ष माझ्याकडे शिक्षण
घेत होती. आम्ही एकत्र अंत:पुरापासून सर्वत्र वावरत होतो. आता आमचे लग्न
झाले तर लोक शंका घेतील. शिष्या म्हणजे मुलगी व मी स्नुषा व मुलीत फरक धरत
नाही. उत्तरा माझी स्नुषाच होईल ". राजाने अनेक स्त्रीयांशी लग्ने करणे हा
त्या काळी रिवाज होता. त्यावरून शील ठरत नाही. उर्वशीसारखी अप्सरा वा तरुण
राजकन्या नाकारण्यात खरी परिक्षा आहे.
दूरदर्शीपणा
सर्वश्रेष्ठ धनुर्धर असूनही अर्जुनाच्या ठिकाणी विलक्षण दूरदर्शीपणा होता.
पहिला नमुना तो व दुर्योधन कृष्णाकडे मदत मागावयास गेले तेव्हाचा. कृष्णाने
मी लढणार नाही व दुसर्या बाजूला दहा हजार यादव लढवय्ये असा प्रस्ताव
दिला. अर्जुनाने लगेच कृष्णाची निवड केली. दुर्योधन आनंदाने योद्धे घेऊन
गेल्यावर कृष्णाने कारण विचारल्यावर अर्जुन म्हणाला, " मी सगळ्यांना जिंकू
शकतो पण तू जेथे असशील तेथेच यश व कीर्ती जाणार, मला त्यांची इच्छा आहे."
अर्जुनाची निवड किती अचुक होती हे युद्धातील कृष्णाच्या कामगिरीवरून लक्षात
येते. दुसरा आहे अर्जुन अश्वमेध यज्ञानिमित्त अश्वाबरोबर हिंडत असतानाचा.
त्याने तेथून युधिष्ठिराला निरोप पाठवला की अग्रपूजेच्या वेळी तंटा
उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी. राजसूय यज्ञाच्या वेळी शिशुपालवध झाला
होता. तसे काही घडू नये म्हणून ही काळजी. गंमत म्हणजे हा निरोप कृष्णाबरोबर
पाठवलेला आहे !
अपार करुणा व मानवतावाद
एवढ्या युद्धांत लाखो माणसे मारावी लागली तरीही अर्जुनाचे हृदय करुणेने भरलेले होते. रात्री शिबीरात
पांडवपुत्रांची, पांचालांची हत्या करून अश्वत्थामा पळून गेला. द्रौपदीच्या
आक्रोशाने भी्म त्याला मारावयास निघाला. अश्वत्थाम्याकडील ब्रह्मशिरस
अस्त्रामुळे भीमाचा निभाव लागणार नाही हे माहीत असल्याने त्याच्यामागून
कृष्ण-अर्जुन निघाले. अश्वत्थामा त्यांना बघून घाबरला व त्यने "पांडवांच्या
नाशाकरिता : म्हणून अस्त्राचा प्रयोग केला. प्रतिकारार्थ अर्जुनाने त्याच
अस्त्राचा प्रयोग केला पण प्रथम " अश्वत्थाम्याचे कल्याण असो " असे म्हणून
"फक्त अस्त्र निवारणार्थ " अस्त्र टाकले. गुरुपुत्राबद्दलचे प्रेम व
सर्वसंहारक विनाश नको म्हणून ही काळजी. नंतर नारद व व्यास यांच्या
सांगण्यावरून त्याने अस्त्र मागेही घेतले. अश्वमेध यज्ञाच्या वेळी त्याने
जास्तीतजास्त सामोपचाराने घेतले. त्याच्या इतर गुणांबद्दल लिहण्यासारखे
बरेच आहे पण बभ्रुवाहनाची गोष्ट सांगून थांबूया.
अश्व मणिपूरच्या राज्यात आल्यावर बभ्रुवाहन नजराणा घेऊन वडिलांना भेटावयास आला. अर्जुनाला ते पसंत
पडले नाही. तो बभ्रुवाहनाला म्हणाला " मी घरगुती कामासाठी आलो नाही,
क्षत्रीय राजा असा वागत नाही .क्षात्रधर्माप्रमाणे वाग." बभ्रुवाहन खट्टु
झाला. नागकन्या उलूपीला हे सहन झाले नाही. जमीन फाडून ती वर आली व
बभ्रुवाहनाला म्हणाली " बाळा, मी तुझी आई आहे. माझे ऐक. तुझ्या पित्याला
क्षात्रधर्माची आवड आहे ना, मग लढ त्याच्याशी. तेणे करूनच तो तुझ्यावर
संतुष्ट होईल." मातेचे उत्तेजन मिळाल्यावर महातेजस्वी बभ्रुवाहनाने लढाई
करावयचे ठरविले व नंतर झालेल्या घनघोर युद्धात दोघांनी एकमेकांना पाडले.
दोघे पडलेले पाहून चित्रांगदा उलूपीला म्हणाली " तू मुलाकडून पतीला
मारवलेस व तरीही शोक करत नाहीस हे कसे ?.पुत्र मेल्याचा मला फर शोक नाही पण
त्याने पतीचे असे आतिथ्य केले हे अतिशोककारक आहे ". इतक्यात निचेष्ट
पडलेला बभ्रुवाहन जागा झाला व उलूपीला म्हणाला "मी पित्याचा वध केला याचे
प्रायश्चित्त म्हणून मी आजच येथे प्राण देणार." उलूपी म्हणाली , " मुला,
शोक सोड. तूच काय, जगातील कोणालाही हा जिष्णु अजिंक्य आहे. मी माझ्या
मोहिनी मायेचा प्रयोग केला होता. ""अधर्माने भीष्मांना मारले याचे निरशन
केल्याशिवाय पार्थाचा जीव गेला असता तर त्याला नरकात पडावे लागेल असे
वसूंनी व गंगेने ठरविले होते. त्या पासून सुटका मिळावी म्हणून माझ्या
पित्याने त्यांची प्रार्थना केली. तेव्हा ते म्हणाले, मणिपूरच्या तरुण
राजाने याला जमीनीवर पाडले म्हणजे तो पापमुक्त होईल. आता हा मृतसंजीवनी मणि
घे व तुझ्या पित्यच्या हृदयावर ठेव. म्हणजे पार्थ जिवंत झाल्याचे तुझ्या
दृष्टीस पाडेल.
आणखी काही पात्रांची ओळख करून द्यावी अशी काही मित्रांनी विनंती केली
आहे पण मी पडलो मुळचा कथेकरी बुवा. गोष्टी सांगावयाची आवड. लेख किती लिहणार
हो ? श्री. अपर्णा अक्षय यांनी अचुकपणे सांगितल्याप्रमाणे "परिक्षेतील
उत्तरपत्रिका " कशास लिहावयाच्या ? पण एक चांगली गोष्ट म्हणजे श्री
मृत्युंजय
यांनी पुढील लेख लिहण्याचा मानस व्यक्त केला आहे. तेव्हा धर्म, दुर्योधन,
भीम (व श्रीकृष्णही!) त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनातून वाचावयास मिळतीलच.
हां, पण एक नक्की, कुणाला महाभारतातील गोष्टी ऐकावयाच्या असतील (उदा.
जयद्रथ) तर सांगा, मला आवडेल.
शरद
आभीर
(अभीर चुकून टंकले गेले) महाभारतातील उल्लेख देतो ...स्त्रीयांना घेऊन
निघालेल्या अर्जुनाला वाटेत पंचनद नावाचा देश लागला. तेथे त्याने मुक्काम
केला.त्या ठिकाणी आभीर नामक रानटी लोकांची वस्ती होती.या हजारो अनाथ
स्त्रीयांचे संरक्षणास एकताच वीर आहे असे पाहून त्यांचे तोंडास पाणी
सुटले... मग ते हजारों दस्यु (आभीर) आपल्या काठ्या सरसावून यादवमंडळींवर
धावून आले....
आज आभीर लोकांची वस्ती उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजराथ व सौराष्ट्र या भागात आहे. हे वृत्तीने गवळी आहेत.
शरद
सर्वश्रेष्ठ नर आणि धनुर्धराचं तितकंच सुंदर व्यक्तिचित्रण. अर्जुन असा होता म्हणून तर द्रौपदीचं सर्वात जास्त प्रेम अर्जुनावर होतं. पांडवांचा वंश पुढे चालवला गेला तोही अर्जुनाच्या नातवाकडून. कृष्णाने गीता सांगितली तीही अर्जुनालाच. कृष्णाच्या पायाशी बसून तो जागा व्हायची वाट पाहणारा आणि एकाग्रतेने विद्याभ्यास करणारा अर्जुन नेहमीच मोहवतो.
तुम्ही व्यक्तिचित्रं इथे थांबवताय तर तो तुमचा निर्णय, आम्हाला तर आणखी वाचायला नक्कीच आवडली असती. असो. इतर गोष्टी सांगणं मात्र सुरू ठेवा ही विनंती!
>>या महाभारत कथांचं आजच्या काळात प्रयोजन काय?
हा कसला प्रश्न आहे? त्या हिशेबाने शिवाजीमहाराज, पेशवे, गांधीजी,
टिळक, इ. कोणाच्याच कथांचे आजच्या काळात प्रयोजन ते काय? तो काळ आता
नाहीच राहिला. त्याचप्रमाणे सहित्य, ललित लेखन, इत्यादी तद्दन
अनुत्पादक गोष्टींचा उपयोग तरी काय?
कविता लिहून का कुठे फॅक्टरीत उत्पादन होते? तेव्हा जगात फक्त शेती आणि
इंजिनिअरिंग व डॉक्टरकी शिकवा, फक्त त्याचीच चर्चा करा, कारण आजच्या काळात
बाकी कशाचाच उपयोग/प्रयोजन नाही आणि निरुपयोगी गोष्टींवर चर्चा करून फुकटचा
वेळ का वाया घालवताय?
बाकी मुख्य म्हणजे उत्सुकता हे प्रयोजन आहे. आणि मानवी जीवन हे कुठल्याही काळात इतर सर्व कालखंडांपेक्षा वेगळे असते तसेच सारखे देखील असते. त्यामुळे जीवनातील त्याच त्या समस्यांवर तोडगा त्या जुन्या काळि लोकांनी कसा काढला, हे पाहणे उद्बोधक ठरते. पण मूलतः महाभारत असो किंवा अन्य कुठलीही कथा असो, "दर्जेदार टाईमपास" हे अशा गोष्टींचे एकमेव प्रयोजन आहे.
अशा टनावारी गोष्टी असतात, की ज्यांची उपयुक्तता अन्न-वस्त्र-निवारा-मैथुन यांच्या भाषेत सांगता सांगता येत नाही. पण तरीही त्या गोष्टी नि:संशयपणे आवश्यक असतात. पण त्यासाठी जर गिर्हाईक आणि मतदार या भूमिका व अन्न-वस्त्र-निवारा-मैथुन ही चौकट सोडून आयुष्याकडे पाहता येत असले, तर ठीक आहे. नसेल जमत तर कोण काय करणार बापडा? तरीही कोणी जर अशा इंटँजिबल गोष्टींची उपयुक्तता उगीच खोदून काढू लागला, तर माझी जाम सटकते.
हा कसला प्रश्न आहे? त्या हिशेबाने शिवाजीमहाराज, पेशवे, गांधीजी, टिळक, इ. कोणाच्याच कथांचे आजच्या काळात प्रयोजन ते काय? तो काळ आता नाहीच राहिला. त्याचप्रमाणे सहित्य, ललित लेखन, इत्यादी तद्दन अनुत्पादक गोष्टींचा उपयोग तरी काय?
कविता लिहून का कुठे फॅक्टरीत उत्पादन होते? तेव्हा जगात फक्त शेती आणि इंजिनिअरिंग व डॉक्टरकी शिकवा, फक्त त्याचीच चर्चा करा, कारण आजच्या काळात बाकी कशाचाच उपयोग/प्रयोजन नाही आणि निरुपयोगी गोष्टींवर चर्चा करून फुकटचा वेळ का वाया घालवताय?
डोक्याला खुपच शॉट लावून घेता ब्वॉ तुम्ही. :)
बाकी मुख्य म्हणजे उत्सुकता हे प्रयोजन आहे. आणि मानवी जीवन हे कुठल्याही काळात इतर सर्व कालखंडांपेक्षा वेगळे असते तसेच सारखे देखील असते. त्यामुळे जीवनातील त्याच त्या समस्यांवर तोडगा त्या जुन्या काळि लोकांनी कसा काढला, हे पाहणे उद्बोधक ठरते. पण मूलतः महाभारत असो किंवा अन्य कुठलीही कथा असो, "दर्जेदार टाईमपास" हे अशा गोष्टींचे एकमेव प्रयोजन आहे.
किती छान उत्तर दिलंत माझ्या प्रश्नाचं. मग याच्या आधीचा आणि नंतरचा परिच्छेद का बरे वाकडयात शिरुन लिहिलात?
अशा टनावारी गोष्टी असतात, की ज्यांची उपयुक्तता अन्न-वस्त्र-निवारा-मैथुन यांच्या भाषेत सांगता सांगता येत नाही. पण तरीही त्या गोष्टी नि:संशयपणे आवश्यक असतात. पण त्यासाठी जर गिर्हाईक आणि मतदार या भूमिका व अन्न-वस्त्र-निवारा-मैथुन ही चौकट सोडून आयुष्याकडे पाहता येत असले, तर ठीक आहे. नसेल जमत तर कोण काय करणार बापडा? तरीही कोणी जर अशा इंटँजिबल गोष्टींची उपयुक्तता उगीच खोदून काढू लागला, तर माझी जाम सटकते.
अशी सटकत जाऊ देऊ नका. सटकली की माणूस विचार करण्याची क्षमाता गमावून बसतो. आणि हो, अन्न-वस्त्र-निवारा-मैथुन ही मुलभूत गरजांची चौकट आजच्या काळात बरीच रुंदावली आहे हो. याच्यात निदान थाळी* दुरदर्शन आणि भ्रमणध्वनी या दोन गोष्टी तरी आता समाविष्ट करायला हव्यात. (शहरी भागासाठी आंतरजाल अधिक हवं याच्यात.)
* हा शब्द रिनिभाकाघासं (रिकामटेकडे निवृत्त भाषांतर काशी घाला संघ) यांच्याकडून प्रेरणा घेऊन बनवलेला आहे.
>>किती छान उत्तर दिलंत माझ्या प्रश्नाचं. मग याच्या आधीचा आणि नंतरचा परिच्छेद का बरे वाकडयात शिरुन लिहिलात?
कारण तुमचा प्रश्न प्रामाणिकपणे विचारला गेला नव्हता अशी मला आलेली शंका. पण तुमच्या या प्रतिसादावरून तुमचा प्रश्न प्रामाणिक होता, हे सहजच सिद्ध झाले, सबब आता सरळात जातो ;)
सुंदर अभ्यासपूर्ण लेख.
स्वर्गारोहणासाठी महाप्रस्थान करणार्या अर्जुनाचे जेव्हा हिमालयात पतन होते तेव्हा भीम युधिष्ठिराला म्हणतो ह्या पराक्रमी अर्जुनाने थट्टेत सुद्धा कधी खोटे बोलल्याचे आठवत नाही मग याचे असे पतन का व्हावे. ह्यावर युधिष्ठिर म्हणतो की अर्जुनाला आपल्या शौर्याचा फार अभिमान असे. एकाच दिवसांत मी सर्वांचा संहार करीन असे हा म्हणत असे पण याने असे केले नाही. इतर धनुर्धरांना हा कधीही खिजगणीत धरत नसे.
महाभारतातील व्यक्तिचित्रे इतक्यातच थांबवू नका ही विनंती.
अधिक लिखाण वाचावयास नक्कीच आवडेल.
अतिशय छान लेख ! महाभारता मधे एक अर्जुन व भीम यांच्या वरच पुर्ण युद्धाचा भार होता . दुसरे म्हणजे भगवदगीता आपल्या पर्यंत पोहचविण्याचा मान अर्जुनाकडेच जातो . सख्य भक्तीचे अर्जुन हा मुर्तिमंत उदाहरण होय . त्याने पुर्ण आयुष्यात कधीही कोणत्याही युद्धातुन पाठ दाखवली नाही . आजही एकाग्रता म्हणजे अर्जुन असेच मानले जाते ते काही उगाच नाही
ज्ञानेश्वरीतील खालील ओळी अर्जुनाचे दैवी गुणसामर्थ्य व्यक्त करतात. नारायणाने प्रत्यक्ष पित्याला वसुदेवाला, मातेला देवकीला जे गुज सांगीतले नाही, भावाला बलरामाला जे कधी बोलला नाही एवढेच नाही तर देवी लक्ष्मी इतकी निकट असूनही तिच्याशी जे गुज कधी जे श्रीविष्णू बोलले नाही ते गुज अर्जुनांस सांगीतले. जे थोर योगी जाणू शकत नाहीत, जे वेदांना आकळले नाही ते निजस्वरुप श्रीविष्णू सख्या पार्थास सहज दाखवून गेले.
ते वेळी संजयों रायातें म्हणे । अर्जुन अधिष्ठिला दैवगुणें । जे अतिप्रीती नारायणें । बोलिजतु असे ॥ ७ ॥
जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगे माते देवकीसी । जें न संगेचि बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंसी बोलत ॥ ८ ॥
देवी लक्ष्मीयेवढी जवळीक । तेही न देखे या प्रेमाचे सुख । आणि कृष्णस्नेहाचें पिक । यांतेचि आथी ॥ ९ ॥
सनकादिकांच्या आशा । वाढिनल्या होत्या कीर बहुवसा । परी त्याही येणें माने यशा । येतीचिना ॥ १० ॥
या जगदीश्वराचें प्रेम । एथ दिसतसे निरुपम । कैसें पार्थें येणें सर्वोत्तम । पुण्य केलें ॥ ११ ॥
हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती । मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ॥ १२ ॥
एर्हवीं हा योगिया नाडळे । वेदार्थासी नाकळे । जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना ॥ १३ ॥
तें हा निजस्वरूप । अनादि निष्कंप । परी येणे मानें सकृप । जाहला असे ॥ १४ ॥
हा त्रैलोक्यपटाचि घडी । आकाराची पैलथडी । कैसा याचिये आवडी । आवरला असे ॥ १५ ॥
यात अजुन त्याला गांडिव कस प्राप्त झाल याचा उल्लेख ही गरजेचा होता.
खांडववन दहनाच्या वेळी अग्नी ब्राह्मणरूप धारण करून कृष्णार्जुनांकडे येऊन भुकेपोटी खांडवभक्षणाची मागणी करतो. पण हे वन इंद्राद्वारे संरक्षित असल्याने कृष्णार्जुन अग्नीकडे शस्त्रांत्रांची मागणी करतात. तेव्हा अग्नी वरूणाकडून त्याचे गांडीव धनुष्य, दोन अक्षय्य भाते आणि नंदीघोष रथ अर्जुनाला प्रदान करतो तर कृष्णाला चक्र (हे सुदर्शन चक्र नव्हे. तसा उल्लेख खांडवदाहपर्वात नाही) आणि कौमोदकी गदा हे मिळते.
>>>आयुष्यातील शेवटची लढाई तो फार लज्जास्पद रीतीने हरला. सर्व यादव यादवीत एकमेकांशी लढून मेले, कृष्ण गेला, द्वारका बुडाली व मागे राहिल्या यादव स्त्रीया व लहान मुले. स्त्रीयांना घेऊन आणावयास अर्जुन गेला. असंख्य स्त्रीयांना घेऊन एकटा अर्जुन चालला आहे असे पाहून अभीर गुंडांनी त्याच्यावर हल्ला चढवला व ते स्त्रीयांना पळवून नेऊ लागले. ध्यानात घ्या, सैनिक नव्हेत, हातात लाठ्याकाठ्या असलेले गुंड ! रागावून त्यांच्यावर प्रतिहल्ला करावयास अर्जुनाने गांडिव धनुष्यास प्रत्यंचा चढवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कळले की त्याच्या दंडातील ताकदच नाहिशी झाली आहे. महाप्रयासाने त्याने प्रत्यंचा चढवली खरी पण त्याला एकही अस्त्र आठवेना. त्याने नुसते बाण सोडून गुंडांना मारावयास सुरवात केली आणि आश्चर्य म्हणजे अक्षय भात्यातले बाणच संपले ! हताश अर्जुनाने आपल्या डोळ्यांनी ही पळवापळवी पाहिली व जमल्या तेव्हड्या स्त्रियांना घेऊन तो परतला. ही त्याची शेवटची लढाई
मनुष्य बली होत नही, समय होत बलवान
भिल्लन लुटी गौपीका, वही अर्जुन वही बाण.
याचा सोर्स कुणी सांगू शकेल का..?
महाभारत.. माझा दृष्टीकोन
गाभा:
महाभारत ... माझा दृष्टीकोन
भारतातील लाखों लोक गेली शेकडो वर्षे महाभारत वाचत/ऐकत आले आहेत. या
वाचक/श्रोत्यांचा या कथेकडे पाहण्याचा दृष्टीकोन सारखा नसतो. चला तर , या
वाचकांची ( मी वाचक म्हणत असलो तरी वाचक/श्रोते यांचे गुणोत्तर १: १०००
याच्यापेक्षा निराळे नसावे, ते बाजूला ठेवूं.) थोडी वर्गवारी करावयाचा
प्रयत्न करू..
(१) भाविक .... लिहलेले खरेच घडले यावर निनांत श्रद्धा असलेले.(म्हणजे एकोणविसाव्या शतकांपूर्वेचे सगळेच व आता ९० टक्के)
(२) विद्वान .... असे लोक भांडारकर (किंवा तत्सम) संस्थेमध्ये काम करतात.
यांची संख्या लाखांत एक म्हणा) संशोधन हा एकमेव उद्देश. कथेशी देणेघेणे
शून्य ! काही वेळा सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक माहिती गोळा करणे हा ही
उद्योग असू शकतो.
(३) विद्वान व कवी मनाचे.... हे विद्वान असतातच. ते अभ्यासही भरपूर करतात.
पण (२) मधील व्यक्तींपेक्षा त्यांच्याकडे एक अवयव जास्त असतो. सहृदय, रसिक
कवीमन. हे लोक महाभारत हे एक काव्य आहे असे समजून व्यासांना दोन ओळींमध्ये
काय सांगावयाचे आहे याचा शोध घ्यावयाचा प्रयत्न करीत असतात. सहज समोर
येणारी दोन उदाहरणे म्हणजे दुर्गा भागवत व इरावती कर्वे. यातील एक पोटविभाग
म्हणजे नगण्य विद्वत्ता व थातूरमातूर अभ्यास याच्या जोरावर कथा-कादंबरी
पाडणारे लेखक. दोन ओळींमध्ये आपल्याला वाटेल ते घुसडणारे.
(४) आजची आंग्लशिक्षित पिढी....यांचा कशावरच विश्वास नसतो.(चुकलो,
विकीसोडून) महाभारतातील सगळ्या कथा फालतूक, असंभव व आजच्या घडीला अजिबात
उपयोगी नाहीत असा यांचा दावा. अभ्यास जवळजवळ नाही.
(५) मी (व माझ्यासारखी थोडी काही)
म्हणजे काय ? मी (१) मध्ये नाही कारण १८ औक्षहिणी भरतील इतकी सैनिक, घोडे,
हत्ती इ. भारतात असतील असे मला वाटत नाही. कृष्णाने मेलेले मुल जिवंत केले
मला पटत नाही, ,,, मी भाविक नाही.(२) मधील विद्वानांकडे बघतांना आपली टोपी
पडणार नाही इतके अंतर मी नेहमीच ठेवतो. आदर आहे, लॉ कॉलेज रोडने जातांना मी
मान झुकवतोही. पण ती दुसर्या गृहावरची माणसे ! (३) मधील लोकांबद्दल
आपुलकी आहे, त्यांची पुस्तके (विकत घेऊन ) वाचत होतो. काव्यरति हा आम्हाला
जोडणारा दुवा.पण भरपूर अभ्यास ही माझ्यासारख्या आळश्याला झेपणारी गोष्ट
नव्हे. शिवाय या विदुषी दोन ओळींमध्ये काय शोधतील याचा पत्ता मलाच काय पण
व्यासांनाही लागणार नाही ( हा माझा एक अंदाज). आता राजवाडे यांच्या "भारतीय
विवाहसंस्थेचा इतिहास " हे पुस्तक वाचणारे ( माफ करा, मला त्यावर लिहणारे
असे म्हणावयाचे आहे) बरेच महाभाग जालावर आहेत; त्यांनी कर्वे बाईंचे
'युगांत " वाचावे, great entertenment guaranteed. जास्त मजा हवी असेल तर
दुर्गाबाईंचे "व्यासपर्व "हे बरोबर वाचावे. दोघीजणी द्रौपदीच्या पैलूंवर
इतका प्रकाशझोत टाकतात की आपलेच डोळे दिपून जावेत. मी द्रौपदी सभेत
न सा सभायत्र न सन्ति वृद्धा !
वृद्धा न ते ये न वदन्ति धर्मम् !!
धर्मो न वै यत्र च नास्ति सत्यम् !
सत्यं न तद्य्च्छलनानुविद्धम् !!
असे म्हणाली यावरच खुश.म्हणजे (३) मध्येही मी नाहीच. (४) बद्दल म्हणाल त्यांच्यात व माझ्यात generations gap आहे. म्हणजे मी out. ही नेति नेति पद्धत सोडून मी महाभारताकडे कसे बघतो त्या कडे वळू.
गेली साठहून जास्त वषे मी महाभारत वाचत आहे. निखळ आनंदाकरिता. शालेय कालात भीष्मपर्व, द्रोणपर्व, कर्णपर्व भुरळ घालत. नंतर सुरवातीपासून असलेल्या निरनिराळ्या कथा वाचण्यात आनंद मिळू लागला. नल-दमयंती, सावित्री यांच्या कथा महाभारतातील वाचा, तुम्हालाही त्या निराळी अनुभुती देतील. उदाहरण म्हणून शकुंतला कथा घ्या. का ? तर कालिदासाने त्यावर नाटक लिहले व आपल्याला त्याचीच माहिती असत्ते. आता कालिदास नाटक लिहतांना एक स्वप्नसृष्टी निर्माण करतो. शाप, अंगठी वगैरे वगैरे. व्यासांची शकुंतला जमीनीवर उभी आहे. तिच्या दरबारातल्या भाषणात राग, उपरोध आहे पण अगतिकताही आहेच. राजाला मुलगा हवा आहे म्हणून तो शकुंतलेला स्विकारतो. व्यासपर्व वा युगांत वाचल्यावर एक निराळीच दृष्टी लाभली. पण लवकर वाटू लागले की "गड्या, यातील काहीच भाग आपल्यासाठी आहे. त्यांची संशोधनाची वाट आपण चोखाळू शकणार नाही. या गोष्टींकडे दुसर्याही दृष्टीने बघता येते एवढेच शिकावयाचे."
मग संध्याछाया दिसू लागल्यावर शांतीपर्वाची गोडी लागली. आपल्या तुटपुंज्या वाचनावरून उपनिषदे व शांतीपर्वातील साम्यांकडे लक्ष गेले. पण हे थोडे दिवसच. आपला पिंड कथेकडेच.
मग जाणवावयाला लागले की जर मला महाभारतापासून आनंद मिळवावयाचा असेल तर मला परत शालेय जीवनांत प्रवेश करावयास पाहिजे. म्हणजे काय ? म्हणजे मला आज कळते की सूर्यापासून कुंतीला मुलगा होणे शक्य नाही. तो दुर्वासापासून झाला असणे शक्य आहे. पण असे कळल्यावर मी महाभारत वाचण्यात गंमत काय उरली ? अशा शे-दोनशे घटना जर मी दरवेळी " हे अशक्य ", " हे अशक्य " म्हणत वाचणार असेन तर न वाचणेच उत्तम. जर "अरेबिअन नाईट्स" वाचावयाचे असेल तर मी आठव्या शतकातल्या अरबस्थानात गेलेच पाहिजे तसेच महाभारत वाचावयाचे असेल, त्यातून आनंद मिळवावयाचा असेल तर, मला पाच हजार वर्षांपूर्वीच्या भारतातच जायला पाहिजे. त्या वेळच्या वातावरणात, सामाजिक-कौटुंबिक-राजकीय समस्यांत समरस व्हावयास पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की मी भाविक झाले पाहिजे, मी १२ वर्षांचा मुलगा झालो पाहिजे. पण युद्धपर्व वाचतांना अर्जुनातल्या भात्यातले बाण संपत नव्हते यावर माझा विश्वास पाहिजे. नसेल तर व्यास माझ्यासाठी नाही, कालिदास माझ्यासाठी नाही, गांधीही नाहीत व गाडगेबुवाही नाहीत ! त्यांचे विश्व व माझे विश्व निराळे. माझ्यासाठी उरतात फक्त इन्कमटॅक्स रिटर्न्स, विजेची बिले व वैकुंठच्या विद्युतदाहिनीत आता सत्तर रुपये द्यावे लागणार नाहीत याचा आनंद !!
शरद
आजची आंग्लशिक्षित पिढी....यांचा कशावरच विश्वास नसतो.(चुकलो, विकीसोडून) महाभारतातील सगळ्या कथा फालतूक, असंभव व आजच्या घडीला अजिबात उपयोगी नाहीत असा यांचा दावा. अभ्यास जवळजवळ नाही.
खरे आहे. त्यात काही अपवाद वगळता (मी पण आंग्लशिक्षित आहे पण कॉन्व्हेंट मध्ये शिकलेलो नाही ....)
महाभारत व इलीयड मधले साम्य ... त्यांचा काळ..
पुर्वी मी दहा भागात महाभारत वाचलेले (लेखक मुळीच आठवत नाहीत - अभ्यंकर का कोणी होते) आठवत आहे तसेच शेवडे गुरुजींचे महाभारतातील १६ पात्रांवरची प्रवचन फार उद्भोदक असायची. त्यातल्या गीते ने तर अजूनच आजरामर झाले आहे. महाभारत हा जय नामक इतिहास आहे अशी माहिती आहे. आता प्रत्येक वाक्याला कोणी पुरावा मागत फिरणार असेल व तो नसेल तर हे सगळे थोतांड आहे व म्हणून वाचण्या लायक नाही तर मग काय बोलायचे. राम जन्म झाल्याचा पुरावा नाही म्हणून राम जन्म भूमी ही आयोध्या कशावरुन हे विचारणारे लोक अनेक. तसेच महाभारताचे देखील. कोठचीही गोष्ट खुप पुर्वीची झाली की इतिहास बनतो व त्याहून जुनी झाली की मीथ बनते. मीथ बनली की त्यात काळाच्या ओघात ब-याच गोष्टींचा भरणा होतो व एके दिवशी कोणी नास्तिक, कोणी क्रिटीक हे सगळे थोतांड आहे असे म्हणत फिरतो.
महाभारतातील पात्रांवर आलेले गेले काही तुमचे लेख मी अजुन वाचले नाहीत पण हा लेख आवडला.
आमच्याकरता तुम्ही गटक्रमांक २ किमान ३ मधे आहात.
तुम्हाला स्वताला ते मान्य नाही म्हणजे, जर महाभारतकार व्यास हे ओरीजीनल महान म्हणले तर पुढे आलेले सगळे गटक्रमांक १ किंवा ४ , ५. थोडक्यात नंतर विद्वान कोणीच नाही. पण असे तर होउ शकत नाही. कोणतरी लिडर हवेच ना सगळेच कसे अनुयायी? पूर्वी एस एम एस ने नसेल पण आवाजी/लिखाणी मतदानाने समाजात अन्य काही लोकांची निवड तज्ज्ञ म्हणून करतातच . थोडक्यात तुमच्यासारखे लोक कालौघात क्रमांक २ व ३ मधे मोडले जातात.
यापुढचे लोक कदाचित लाईक बटण क्लिक्स, ट्विटर फॉलोअरशीपने इ. मार्गाने क्रमांक २ व ३ मधे स्थानापन्न होतील.
महाभारत हा इतिहास आहे कि काल्पनिक काव्य ?
इतिहास म्हणावा तर बर्याच गोष्टींचे स्पष्टीकरण मिळत नाही ...
कालखंड..सुपर पॉवर, देव , पाताळ लोक , स्वर्ग लोक ... पांडवांचे एकूण आयुष्य.. कृष्ण ..( विमाने ?? )
आणि संपूर्ण काल्पनिक म्हणावे तर .. हिंदू धर्मश्रद्धा तसे मानत नाही ..
आपण कृष्णाला देव मानतो..गीता आपला पूजनीय ग्रंथ आहे ( धर्म ग्रंथ आहे कि
नाही ?? )
आणि भारतामधील भौगोलिक वर्णने बर्यापैकि जुळतात..
अगदी द्वारका सुद्धा सापडते..
त्यामुळे महाभारत हे फार मोठे गुढ आहे ..
खरे काय आणि खोटे काय ...काय कळत नाय !!
माझ्या प्रतिसादात मिथ व इतिहासा बद्दल हेच दिले आहे..कोठचीही गोष्ट खुप पुर्वीची झाली की इतिहास बनतो व त्याहून जुनी झाली की मीथ बनते. मीथ बनली की त्यात काळाच्या ओघात ब-याच गोष्टींचा भरणा होतो व एके दिवशी कोणी नास्तिक, कोणी क्रिटीक हे सगळे थोतांड आहे असे म्हणत फिरतो.
..............There is a dual between mythology and history. In India there are many historical facts which have become myths over a period of thousands of centuries as our ‘way of life’ is very old. There were no records of history kept in those times. History was never officially documented nor was there any necessity felt at that time. The history though which was never documented some how was kept alive from many folklores, many legends that got evolved over a period of time. The lines between the history and mythology have blurred. The epics Ramayana and Mahabharata were actually an earlier attempt in documenting the history in a different form. ..............
पुर्ण लेख येथे
http://www.rashtravrat.blogspot.in/2010/09/making-peace-with-history.html
(२) विद्वान .... असे लोक भांडारकर (किंवा तत्सम) संस्थेमध्ये काम करतात. यांची संख्या लाखांत एक म्हणा) संशोधन हा एकमेव उद्देश. कथेशी देणेघेणे शून्य ! काही वेळा सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक माहिती गोळा करणे हा ही उद्योग असू शकतो.
+१.
त्याच्याही पुढे जाउन कधी कधी स्वतःमधला द्वेषही हे इतिहासात जमा करतात.
कारण १८ औक्षहिणी भरतील इतकी सैनिक, घोडे, हत्ती इ. भारतात असतील असे मला वाटत नाही.
जर आपली गणित संख्या इतक्या आकड्या पर्यंत पोहोचु शकते तर असेलही बापडे! पण एक गोष्ट आहे, की कोणत्याही गोष्टीच महात्म्य ठसवण्या साठी थोडा फार अतिशयोक्तीचा प्रयोग केला जातो. अन महाभारतात तर तो ठायी ठायी दिसतो.
कृष्णाने मेलेले मुल जिवंत केले मला पटत नाही,
परवाच एक जन्मतः मृत म्हणुन डिक्लेअर केलेल बाळ, अगदी छोट्याश्या कॉफिन मध्ये घालुन जवळ जवळ १५ तासा नंतर चर्च मध्ये नेल होत. त्याच्या आईला एकदा उघडुन बाळ बघावस वाटल म्हणुन कॉफिनच लॉक तोडुन उघडल तर आत बाळ जिवंत होत.वंडर बेबी म्हणुन ही न्युज टी. व्ही . वर होती. अर्थात ज्याच्या त्याच्या जन्माची दोरी! कावळा बसायला अन फांदी तुटायला म्हणतात तस असाव काहीस...
उदाहरण म्हणून शकुंतला कथा घ्या. का ? तर कालिदासाने त्यावर नाटक लिहले व आपल्याला त्याचीच माहिती असत्ते. आता कालिदास नाटक लिहतांना एक स्वप्नसृष्टी निर्माण करतो. शाप, अंगठी वगैरे वगैरे. व्यासांची शकुंतला जमीनीवर उभी आहे. तिच्या दरबारातल्या भाषणात राग, उपरोध आहे पण अगतिकताही आहेच. राजाला मुलगा हवा आहे म्हणून तो शकुंतलेला स्विकारतो
अगदी ! अगदी! हाच दृष्टीकोण मी कुंतीच्या बाबतीत इच्छीते. आता परत विषय निघालाच आहे तर थोडस स्प्ष्टीकरण देण्याचा माझा प्रयत्न.
स्वतः व्यास हे मस्तगंधेच्या पोटी आलेले अस लिखित आहे. ते वयाच्या १२ वर्षा
पर्यंत आपल्या आई कडे रहात होते. जेंव्हा त्यांना आपल्या जन्मा बद्दल कळल
तेंव्हा ते आईच घर सोडुन ज्ञानार्जाना साठी अन तपःसाधने साठी निघुन गेले.
आता या गोष्टीत कुठेही त्यांच्या जन्माबद्दल, एखाद मिथक आहे का? नाही. कारण
मस्त्यगंधेला तश्या असत्याचा आधार घ्यावा लागणारी पार्श्वभुमी ( बडेजाव,
मोठ घराण, कौमार्य) नाही. ती आहे तस वास्तव जगते आहे. पण कुंती ही एक
राजकन्या. तिच्या कौमार्याशी सार्या घराण्याची, पुर्वजांची ,
सताधार्यांची अन तसच एका अतिथी म्हणुन आलेल्या ऋषीची प्रतिष्ठा निगडीत
होती.
माझ्यासाठी उरतात फक्त इन्कमटॅक्स रिटर्न्स, विजेची बिले व वैकुंठच्या विद्युतदाहिनीत आता सत्तर रुपये द्यावे लागणार नाहीत याचा आनंद !!
नका हो इतके निरस शब्दात आमच वास्तव मांडु .
लेखाचा बाज अतिशय उत्तम . पण एक गोष्ट मात्र आहे, या सार्या इतिहासाच्या उहापोहात नेहमीच "मी' पण बाजुला ठेवाव. एका बालकाच्या दृष्टीकोणातुन अमेझिंग असणार्या गोष्टी, एका तरुणाला त्यातुन मिळणारा रोमँटीसिझम, एका स्त्रीला त्यात जाणवणारा एखादा बोचरा कोपरा( का नाही? महाभारताच सार खापर द्रौपदीच्या अन रामायणाच सितेच्या माथी फोडतात माणस बोलता बोलता) अन एखाद्या वयोवृद्धाला जाणवणारा हताऽऽश पणा(भिष्माची व्यक्तीरेखा), त्या त्या व्यक्तीच स्व्-अनुभवाच वलय घेउन घडत असत. अन हेच महाभारताच यश आहे.
बाकि माझ्या 'विदुराच' काय झाल?
कारण १८ औक्षहिणी भरतील इतकी सैनिक, घोडे, हत्ती इ. भारतात असतील असे मला वाटत नाही.
आकडा खुपच कमी सांगितलात. युधिष्ठिराच्या म्हणण्याप्रमाणे १६६ कोटी २० हजार यौद्धे लढले आणि त्यापैकी २४०,१६५ जीवानिशी वाचले .
अर्थात जेव्हा अक्षौहिणीचे वर्णन वाचले जाते आणि त्याची बेरीज केली जाते तेव्हा ती ४५ लाखांच्या आसपासच पोचते. त्यामुळे हा एवढा अतिप्रचंड आकडा युधिष्ठिराने कुठुन शोधून काढला हे तो कथाकारच जाणो.
बाकी मला तुमची लेखमाला आवडली. मी स्वतः देखील पाचव्या श्रेणीतला आहे. सहजराव म्हणाले तसे तुम्ही मात्र दुसर्या श्रेणीत मोडता. तुमचे वाचन आणि महाभारताचे ज्ञान नक्क्कीच एका चांगल्या अभ्यासकाच्या तोडीचे आहे.
महाभारत खरेच घडुन गेले यावर माझा विश्वास आहे. त्यातल्या तपशीलात थोडाफार गोंधळ असु शकतो पण त्याचे अस्तित्वच नाकारण्याचे काही कारण मला तरी दिसत नाही.
महाभारतातील कथा -१.
( महाभारतातील काही कथा द्यावयाचा विचार आहे.गोष्ट सुरस व मनोरंजक असेलच पण त्यातून आजही काही विचार करावयास लागावे असे सापडेल.)
मांडव्य ऋषी
मांडव्य ऋषी मोठे तपस्वी होते. रानातील आपल्या झोपडीबाहेरील झाडाखाली ते
एकदा मौनव्रत धारण करून तप करीत बसले होते. शेजारच्या राजधानीत चोरी करून
काही चोर पळून रानात आले. मागे राजाचे शिपाई पाठलाग करत होते. चोर झोपडीत
लपून बसले. शिपाई मागून आले व मांडव्यांना विचारू लागले की "चोरांना पाहिले
का ?" मौनव्रत असल्याने माडव्य काही बोलले नाहीत. शिपायांना संशय आला.
त्यांनी झोपडीत तपास केला व चोरांना पकडले. धनही मिळाले. मांडव्य काही
बोलला नाही म्हणजे तोही चोरांचा साथीदार असला पाहिजे असे समजून त्यालाही
पकडून राजधानीत नेले. राजाला कळवल्यावर त्याने चौकशी न करता सगळ्यांना
सुळावर चढवण्याची शिक्षा दिली. सुळावर चढवल्यावरही काही न बोलता मांडव्य
वेदपठन करत तपच करत होते. काही दिवसांनी रक्षकांच्या ध्यानात आले हा एकच
वेदना होत असतांनाही ओरडत नाही व इतके दिवस अन्नपाण्याशिवाय जिवंत आहे.
त्यांनी राजाला त्याप्रमाणे कळविले व राजा घाईघाईने तेथे आला व आपली चूक
लक्षात आल्यावर हात जोडून मांडव्यांना म्हाणाला "अज्ञानाने माझ्या हातून
चूक झाली, मला क्षमा करा." माडव्यांनी "तुझी काही चूक नाही" असे सांगितले.
मग त्यांना सुळावरून खाली उतरवले व सूळ काढण्याचा प्रयत्न केला. पण सुळाचे
टोक पोटात अडकून बसले होते ते निघेना. शेवटी शूळ तोडून काढला व टोक तसेच
पोटात राहिले. त्याच्या वेदना सहन करत मांडव्य तपश्चर्या करत राहिले व
त्यांनी तपाने प्राप्त होणारे सर्व दुर्लभ लोक प्राप्त करून घेतले. मग एकदा
यमध्रर्माच्या सभेत जाऊन त्यांनी धर्मराजाला विचारले " प्रभो, माझ्या
हातून जाणूनबुजून तर काही अपराध घडला नाही, तर मग कोणत्या नकळत घडलेल्या
अपराधामुळे मला सुळावर चढण्याची शिक्षा मिळाली ? " यमधर्म म्हणाला "
लहानपणी तू एका पतंगाच्या पृच्छाला काडी टोचली होतीस.त्याचे हे फळ. लहानसे
दान केले तरी त्याचे नोठे फल मिळते तसे स्वल्प अधर्माचे फल मोठे दु:ख
देणारे मिळते. "
मांडव्य म्हणाले " धर्मा ! जन्मापासून बारा वर्षेपर्यंत जीवाच्या हातून जे
काय होते त्याबद्दल तो जबाबदार नाही. या वयात त्याच्या हातून पातक होतच
नाही. धर्मशास्त्रज्ञ या वयातील कृत्ये हिशेबातच घेत नाहीत. असो. माझा
अपराध लहान असतांना तू मला ही असह्य पीडा होईल असा दंड केलास म्हणून
मनुष्यजातीच्या शूद्र वर्णात तुला जन्म प्राप्त होईल. मी आजपासून असा
धर्मफलाचा उदयकारी नियम बांधून देतो की यापुढे चौदा वर्षेपर्यंत घडलेल्या
दुष्कृत्याबद्दल जीवास दंड असू नये, कारण ते त्याचे दुष्कृत्य अज्ञानजन्य
असल्याने पापकारक होत नाही,."
(१) मांडव्यांनी वयोमर्यादा १२ पासून १४ पर्यंत वाढवली. आज जगभर असेच बालागुन्हेगारांबद्दल कायदे आहेत. पण आज (कलीयुगांत) परिस्थिती बदलेली दिसते. पुण्यात बालगुन्हेगारांनी जाणीवपूर्वक एका मुलाचा खून केला व नंतर खंडणीही वसूल केली ! बातम्या वाचतांना असे अनेक गुन्हे निदर्शनास येतात. हे गुन्हे अज्ञानजनक नसतात. मग आता उलटे पाऊल टाकणे गरजेचे आहे का ?
(२) हस्तिनापुरातील दासीला व्यासांपासून झालेला मुलगा म्हणजे यमधर्माचा अवतार, विदूर. दासीपुत्र म्हणून हा सूत. याला राज्याचा अधिकार नाही. हा अर्थ व धर्म या दोन्ही शास्त्रांमध्ये निपुण होता.पण हा राजा होऊ शकला नही. अंध व कपटी धृतराष्ट्राने राज्याधिकार भोगला व विदूर शेवटपर्यंत मंत्रीच राहिला.लहानपणच्या पांडवांना कौरवांपासून वाचविण्यात याचा मोठा भाग होता. लाक्षागृहाची कल्पना यानेच युधिष्ठिराला दिली व भुयार खणणारा माणुसही पुरवला. "दुर्योधनाचा त्याग कर" असे त्याने वारंवार धृतराष्ट्राला बजावले. तेरा वर्षे कुंती याच्याच घरात राहिली. युद्धानंतर धृतराष्ठ्र-गांधारी व कुंती वनात निघाली तेव्हा हा त्यांच्याबरोबर वनात गेला तेथेच त्याने आपला प्राण सोडला. त्या वेळी युधिष्ठिर तेथे होता. विदुराने आपले डोळे त्याच्या डोळ्यात मिळवून योगबलाने आपले प्राण युधिष्ठिराच्या प्राणात व आपली इंद्रिये युधिष्ठिराच्या इंद्रियात मिळवून टाकली.
(३) डॉ. इरावती कर्वे यांच्या मते विदुर हा युधिष्ठिराचा बाप. पण हे
पटत नाही. व्यास हे फार रोखठोक लिहणारे लेखक आहेत. त्यांना तसे सुचवावयाचे
असते तर त्यांनी तसे सरळ लिहले असते. पण दुसर्या एका विचारसरणीने हे
बरोबरही वाटते. विदुर हा यमधर्माचा अवतार व युधिष्ठिर हा कुंतीला
यमधर्मापासून झालेला
मुलगा. तेव्हा हे नाते जुळतेही.
शरद
विदूर हा (व्यासांच्या महाभारताप्रमाणे अधिकृत) यमधर्माचा अवतार होता हे माहीत नव्हते.
विदुर हा यमधर्माचा अवतार व युधिष्ठिर हा कुंतीला यमधर्मापासून झालेला मुलगा. तेव्हा हे नाते जुळतेही.
त्या संदर्भात मग तत्कालीन राजनियमांनुसार, युधिष्ठीर देखील मग शूद्र ठरतो (कारण विदूर शूद्र). तसे असेल तर त्याला राज्य कसे मिळाले. त्याचाच जास्त विस्तार केल्यास लक्षात येते की मग आईचे कूळ-जात-पात मुलाला मिळायची का? कारण व्यास तर शूद्र नव्हते अथवा क्षत्रिय नव्हते आणि त्यांचा अधिकृत पुत्र विदूर मात्र आईच्या जाती-कर्मामुळे शुद्र ठरला अथवा धॄतराष्ट्र-पंडू सारखा त्यांच्या आईंच्या जन्म-लग्न जातीमुळे क्षत्रिय ठरला.
अतिअवांतरः लहानपणी तू एका पतंगाच्या पृच्छाला काडी टोचली होतीस.त्याचे हे फळ. याचा अर्थ महाभारतकालात (अथवा कथा खरी धरली तर त्याही आधी) भारतात पतंग होते? मी ऐकल्याप्रमाणे मांडव्यऋषींनी लहानपणी पक्षांना त्रास दिला होता अशी देखील गोष्ट असावी...
विदुर असो वा युधिष्ठिर, दोन्ही संतती नियोगाद्वारे झाल्या होत्या.
नियोगकर्त्याला पिता म्हणून त्याचे नाव लावता येत नसे.
व्यासांना घाबरल्यामुळे ऐनवेळी अंबिकेने स्वत:ऐवजी तिच्या दासीला
व्यासांसमोर उभे केल्यामुळे विदुर शूद्रयोनीत निपजला. अन्यथा क्षत्रिय झाला
असता. अर्थात नियोग दासीशी झाल्यामुळे रूढार्थाने तो अंबिकेचा अथवा
विचित्रवीर्याचाही पुत्र होऊ शकला नाही. (मांडव्य ऋषींच्या शापामुळे
यमधर्माचा अवतार इतकाच काय तो यमाशी संबंध).
युधिष्ठिर शुद्र ठरू शकत नाही कारण कुंती व पांडू दोघेही क्षत्रिय होते. व दोघांच्याही संमतीने नियोग झाला होता.
विकास'जी...
या संदर्भात मग तत्कालीन राजनियमांनुसार, युधिष्ठीर देखील मग शूद्र ठरतो (कारण विदूर शूद्र). तसे असेल तर त्याला राज्य कसे मिळाले. त्याचाच जास्त विस्तार केल्यास लक्षात येते की मग आईचे कूळ-जात-पात मुलाला मिळायची का? कारण व्यास तर शूद्र नव्हते अथवा क्षत्रिय नव्हते आणि त्यांचा अधिकृत पुत्र विदूर मात्र आईच्या जाती-कर्मामुळे शुद्र ठरला अथवा धॄतराष्ट्र-पंडू सारखा त्यांच्या आईंच्या जन्म-लग्न जातीमुळे क्षत्रिय ठरला.
हे तत्कालीन "राजनियम" काय होते... ते सांगू शकाल का?
आणि वेदव्यास हे शूद्र नाहीत. ते पाराशर ऋषींचे पुत्र असल्याने "ब्राह्मण" पित्याचे पुत्र आहेत. त्यांची आई 'सत्यवती' ही मत्स्यकन्या होती. परन्तु तिचे वडील एक क्षत्रिय राजा होते. आणि सत्यवतीचे पालनपोषण एका कोळ्याच्या घरी झाले होते. त्यामुळे महर्षि व्यासांचे वडील ब्राह्मण तर आई क्षत्रिय होती... त्यामुळे ते ब्राह्मण आणि क्षत्रिय रक्ताचा मिलाप आहेत! :)
अतिअवांतरः लहानपणी तू एका पतंगाच्या पृच्छाला काडी टोचली होतीस.त्याचे हे फळ. याचा अर्थ महाभारतकालात (अथवा कथा खरी धरली तर त्याही आधी) भारतात पतंग होते? मी ऐकल्याप्रमाणे मांडव्यऋषींनी लहानपणी पक्षांना त्रास दिला होता अशी देखील गोष्ट असावी...
"पतंग" हा एक कीड्याचा प्रकार आहे. :)
हे तत्कालीन "राजनियम" काय होते... ते सांगू शकाल का?
"दासीपुत्र म्हणून हा सूत. याला राज्याचा अधिकार नाही. हा अर्थ व धर्म या दोन्ही शास्त्रांमध्ये निपुण होता.पण हा राजा होऊ शकला नही." असे मूळ लेखात जे लिहीले होते त्या संदर्भात मी "तत्कालीन राजनियम" असे म्हणले होते.
आणि वेदव्यास हे शूद्र नाहीत. ते पाराशर ऋषींचे पुत्र असल्याने "ब्राह्मण" पित्याचे पुत्र आहेत. त्यांची आई 'सत्यवती' ही मत्स्यकन्या होती. परन्तु तिचे वडील एक क्षत्रिय राजा होते. आणि सत्यवतीचे पालनपोषण एका कोळ्याच्या घरी झाले होते. त्यामुळे महर्षि व्यासांचे वडील ब्राह्मण तर आई क्षत्रिय होती... त्यामुळे ते ब्राह्मण आणि क्षत्रिय रक्ताचा मिलाप आहेत!
मी जाती मानत नाही आणि आपण देखील वरील माहिती देताना केवळ पुर्वीच्या काळातली/कथांमधली म्हणून दिली असावी (पक्षी: आज तशीच लागू करत नसाल) असे गृहीत धरतो.
"पतंग" हा एक कीड्याचा प्रकार आहे.
हे तत्कालीन "राजनियम" म्हणजे फार मोठा विनोदच असावा.
धृतराष्ट्र जन्मजात आंधळा म्हणून राज्य सांभाळायला नालायक ठरवला गेला आणि पांडुला राजा बनवण्यात आले. पुढे हाच पांडु जेंव्हा शापदग्ध होऊन वनात निघून गेला तेंव्हा मात्र सगळ्यांना लगेच धृतराष्ट्र राजा म्हणून चालून गेला. तेव्हा कुठलेही नियम वैग्रे आड आले नाहीत. पण ह्याच धृतराष्ट्राची मुले मात्र वारस नाहीत, वार्स फक्त पांडुची मुले.
कथा माहिती असली तरी काही भाग विसरले जातात. त्यांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! विदुर दासीचा मुलगा असला तरी मंत्री होऊ शकला. त्याला राजपुत्रांसारखंच शिक्षण मिळालं होतं. त्याची योग्यता मोठी होती आणि तो मोठा भगवत्भक्त होता. मग विदुर अगदी गरीब होता अशा कथा नंतर का प्रसृत झाल्या असाव्यात? (संदर्भः विदुराघरच्या कण्या श्रीकृष्णाने खाल्ल्याची कथा).
१४ वर्षांपर्यंत बालक समजण्याचा मुद्दा आहे, तो त्या काळाप्रमाणे आहे. तेव्हा ८ व्या वर्षी मुलांचं शिक्षण सुरू होत असे. आणि २० व्या वर्षी संपत असे. १४ वर्षे म्हणजे अर्धे शिक्षण पूर्ण झालेली मुलं. आता आपण मुलांना ५ व्या वर्षीच शाळेत घालतो. म्हणजे ३ वर्षे आधीच त्यांचा जगाशी संबंध येऊ लागतो. १४ वर्षांची मुलं साधारण १० वीत गेलेली असतात. आणि त्याना बर्यापैकी समजही आलेली असते. तेव्हा या बालवयाच्या मर्यादेचा फेरविचार करावा असं तुम्ही म्हणताय ते योग्यच आहे!
इतनी
छोटिसी बातची (म्हणजे माझ्या दृष्टीने छोटिसी...) इतनी मोठी सजा...
अर्धवटराव, आपले कर्म आठवा... आणि काय काय सजा मिळु शकते याचा विचार करा (
विचारानेच अंगात कापरं भरलय :( )
अश्या वेळी आपण (सोयिस्कररित्या) विज्ञानाचा आधार घेतो बॉ... आयला, तिथे
पुनर्जन्म वगैरे प्रकारच नाहि... म्हणजे या जन्मातल्या चुकांची शिक्षा
पुढील जन्मी वगैरे वगैरे भोगायचा प्रश्नच येत नाहि (ओह्ह्ह्ह्ह... व्हॉट
अ रिलीफ :) ) बाकि राहिली या जन्मातल्या कायदे कानुनची भिती.... हा
हा हा.. हटा सावन कि घटा.. इथे आपल्याला भारतीय असण्याचा फायदा होतो
(त्याचा अभिमान देखील वाटतो ) साला... इथं पब्लीक चोर्या, दरोडे, लाच,
खुन, बलात्कार... जे काय करण्यासारखं म्हणुन ते सर्व करतात आणि आरामात
जगतात... आपण तर फार सौम्य त्यामानाने :)
अर्धवटराव
कथा फार छान आहे... पण एक शंका... (छिद्रांन्वेषीपणा जात नाहि) मौनव्रतधारी ऋषी "त्यात तुझी चुक नाहि" असं कसं म्हणाले राजाला ?? आणि तसं म्हणण्याचा काहि पर्याय उपलब्ध होते , तर सुळावर चढण्यापुर्वीच का नाहि सांगितलं तसं ? एक तर त्यांची साधना सुळावर चढल्यानंतर काहि दिवसांनी संपली असावी, किंवा दुसर्या कुठल्या चुकीची शिक्षा म्हणुन त्यांना ऐनवे़ळी आपली बाजु मांडता आलि नसावी... कि अजुन काहि???
अर्धवटराव
एकुण अस आहे तर. मांडव्यांच्या शापान यमधर्मास व्याप!! पण फक्त विदुरांच अस काहीच वेगळ कथानक नाही का महाभारतात?
काय मजा आहे ना? मृत्यु! ज्याच भय सार्या जगास, तो सर्वात धर्मान वागणारा,
किंवा धर्माचा स्वामी असावा? ज्याच्या घावान अनेक जण आक्रोशत फिरतात तो
सर्वात धर्मशिल किंवा धर्म मानला जावा! मला खरच भारतिय पुराण कथांच कौतुक
वाटत. नुसत काळ वा पांढर अस काही नसतच , अस आपण ठरवुच शकत नाही .
महाभारतातील कथा - २
या कथा देण्यामागचा उद्देश केवळ मनोरंजन एवढाच नाही. ते पाहिजेच, पण या कथांचा वर्तमान कालाशी काय संबंध येतो, हे तपासणे महत्वाचे. मागील कथेत आपण पाहिले की मांडव्याने वयोमर्यादा १२ वरून १४ केली. माझी अपेक्षा होती की मिपा वाचक आज ती १६ वरून १४ वर न्यावी का यावर मते देतील. या हजारो वर्षांत सामाजिक बदल नक्कीच घडले आहेत. त्याचे प्रतिबिंब प्रतिसादात दिसले पाहिजे. असो. चुक माझी, मी स्पष्टपणे तसे विचारले नव्हते. आज प्रश्न सरळ विचारणार आहे व आपला प्रतिसाद अपेक्षित आहे.
युधिष्ठिर भीष्मांना प्रश्न विचारतो " पितामह, स्त्रीपुरुषांच्या संयोगात वैषयिक सुख अधिक कोणाच्या ठिकाणी आहे ? " गंमत पहा, पुरुषाने किंवा स्त्रीने कुणीही, काहीही उत्तर दिले तरी ते अपूर्णच, एकतर्फीच राहणार. जरा विचार करा, आपले मत ठरवा व मगच भीष्मांनी सांगितलेले उत्तर वाचा. भीष्म म्हणाले, " या विषयी एक गोष्ट सांगतात "
प्राचिन काळी अंगारवन नावाचा एक राजर्षि होता. त्याला पुत्र नसल्याने त्याने पुत्रप्राप्तीसाठी "अग्निष्टुत" नावाचा यज्ञ केला. त्याने त्याला शंभर पुत्रांची प्राप्ती झाली. पण या यज्ञाची एक गोची होती. या यागात फ्क्त अग्नीचे हवन असते. इंद्राला काहीच भाग मिळत नाही. त्यामुळे इंद्र असा यज्ञ करणार्यावर रागावलेला असतो. इंद्राने अंगारवनाचे व्यंग शोधावयाचा प्रयत्न केला पण इंद्रियनिग्रही राजाकडे तसे काही दिसेना. एके दिवशी राजा रानात मृगयेकरिता गेला असतांना त्याची व सेवकांची चुकामुक झाली. त्याला तेथे एक मनोहर सरोवर दिसले. त्यात स्नान करून तो बाहेर आला तर त्याला आपण स्त्री झालो आहोत असे दिसून आले. हा इंद्राच्या कोपाचा प्रभाव. आपणास स्त्रीरूप प्राप्त झाले आहे असे पाहून त्यास मोठी लज्जा उत्पन्न झाली.त्याची इंद्रिये व्याकुळ झाली व तो मोठ्या चिंतेत पडला. आपल्या शंभर बलवान पुत्रांसमोर जाऊन आता काय सांगावयाचे ? शेवटी तो राजधानीत गेला व विस्मयात पडलेल्या सर्वांना घडलेली हकिगत सांगून म्हणाला " मी आता वनात जातो. मुलांनो ,तुम्ही धर्माने राज्यकारभार चालवा."
तो वनात एका आश्रमात गेला व तेथील एका तपस्व्याबरोबर त्याने विवाह केला. त्याला (किंवा तिला म्हणा) शंभर मुले झाली. मग ती त्या शंभर पुत्रांना घेऊन राजधानीत गेली व पहिल्या पुत्रांना म्हणाली की तुम्ही एकमेकांचे भ्राते आहात हे लक्षात घेऊन तुम्ही सर्वांनी एकोप्याने राज्याचा उपभोग घ्या. ती परत वनात गेली. इंद्र वैतागला. तो म्हणाला, मी अंगारवनावर अपकार केला की उपकार ? मग त्याने ब्राह्मणाचे रूप घेतले व तो राजधानीत गेला. तिथे त्याने मुलांत फूट पाडली. पहिल्या मुलांना तो म्हणाला " तुम्ही राजपुत्र. ही दुसरी यतीची मुले. तुम्ही कसले भ्राते ? यांचा राज्यावर काहीच हक्क नाही." असा कलह लावून दिल्यावर त्या सर्वांत भांडणे सुरू झाली व एकमेकाशी लढून सर्वजण मृत्युमुखी पडले. ही बातमी कळल्यावर ती तपस्विनी सारखी रडू लागली. तेव्हा तेथे ब्राह्मणाचे रूप घेऊन इंद्र आला व त्याने ती का रडते ते विचारले. तिने आपली दोनशे मुले मेल्यामुळे मी रडते असे सांगितले. मग कठोर शब्दात इंद्र म्हणाला " मी इंद्र आहे. तुझ्या यज्ञात मला हवन नसल्याने मी रागावून हे भांडण घडवून आणले." हा ब्राह्मण देवाधिदेव इंद्र आहे हे कळल्यावर त्याला साष्टांग नमस्कार घालून राजर्षि म्हणाला " कृपा कर. मी यज्ञ केला तो पुत्र मिळवण्याकरिता. मला तुला दुखवावयाचे नव्हते. " तेव्हा इंद्र संतुष्ट झाला व तिला म्हणाला " मी तुझे शंभर पुत्र जिवंत करतो, कोणते ते सांग. तू पुरुष असतांना झालेले की स्त्री असतांना झालेले ?" तपस्वनीने हात जोडून सांगितले " मी स्त्री असतांना झाले ते." इंद्राने कारण विचारल्यावर ती म्हणाली " इंद्रा, स्त्रीच्या ठिकाणी स्वभावत: अधिक प्रेम असते, तसे पुरुषांच्या ठिकाणी असत नाही : ह्यास्तव मी स्त्रीरूप असल्यावर मला जे पुत्र झाले त्यांनाच तू जिवंत कर." इंद्र प्रेमळपणे म्हाणाला " मी तुझे दोनशेही पुत्र जिवंत करतो. आता तुला आणखी काय मागावयाचे आहे ? तुला स्त्री रहावयाचे आहे की पुरुष व्हावयाचे आह ? स्त्री म्हणाली " मी स्त्री रूपच पसंत करते. मला पुरुषरूपाची इच्छा नाही " इड्राने का म्हणून विचारल्यावर ती म्हणाली "देवाधिदेवा, स्त्रीया किंवा पुरुष ह्यांच्या संयोगामध्ये नित्य स्त्रीयांच्या ठिकाणी अधिक प्रेम वसत असते, ह्यास्तव, इंद्रा, मी स्त्रीरूपच अधिक मानते. इंद्राला नमस्कार करून ती वनात निघून गेली.
म. व्यासांनी आपले मत दिले. तुमचे मत काय ?
शरद
आजच्या राजकारण्यांचा महागुरू
आजचा कोणीही राजकारणी पुढारी घ्या. तो काय करतो ? निवडणुका जवळ आल्या की मत मागावयास जनतेकडे जातो व भरपूर आष्वासने देतो. मते मिळून निवडून आल्यावर जनतेला विसरून जातो. त्याच्याकडे जाऊन " कामाचे काय झाले ? " विचारले की तो म्हणतो " पुढील वर्षी नक्की होणारच !" मग एकवचनी राहून हीच रेकॉर्ड परत परत लावतो व फारच अंगावर येते आहे असे वाटले तर दुसरे एखादे काम करून मुख्य विषय बाजूला सारतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सगळे असेच का वागतात ? कारण त्यांचा महागुरू एकच आहे, हरिश्चंद्र. तुम्ही म्हणाल " ऑं, हे काय सांगता. आम्ही तर लहानपणापासून स्वप्नात दिलेले वचन खरे करणार्या हरिश्चंद्राची. गोष्ट ऐकत आलो आहोत. त्या करिता तो बायको-मुलगा यांना विकतो व स्वत: डोंबाकडे नोकरी पत्करतो. राजा रवीवर्मा यांचे सुरेख चित्र अजून डोळ्यासमोर आहे." बरोबर आहे, त्यावेळी तुम्ही लहान होता. आता मोठे झाला आहात ना ? मग ऐका तर "व्यवहारी" राजाची गोष्ट.
राजा हरिश्चंद्राला मुल होत नव्हते. म्हणून त्याने वरुणाची प्रार्थना केली. वरुण म्हणाला "तुला मुलगा होईल पण तू मला त्याचा बळी दिला पाहिजेस." हरिश्चंद्राने विचार केला, मुल तर होऊ दे, मग बघू काय करावयाचे ते. त्याने कबूल केले व वरुणाच्या प्रसादाने त्याला मुलगा झाला. काही दिवस वाट बघून, बळी मिळत नाही असे पाहून वरुण आला व म्हणाला "काय झाले ?" राजा म्हणाला, "अजून मुलगा लहान आहे, दात येऊ देत, मग देतो की." "ठीक आहे" म्हणून वरुण गेला. काही दिवसांनी परत आला. अशाच काही सबबी काढून राजाने वेळ मारून नेली. बघता बघता मुलगा सोळा वर्षाचा झाला. हा इरसाल राजपुत्र बापाला म्हणाला " तुम्ही कोण मला बळी देणार ? मला नाही या घरांत रहावयाचे." तो घर सोडून गेला. वरुण आल्यावर राजा म्हणाला " काय करू, मुलगा घर सोडून गेला. त्याला कसे काय बळी देणार ?" वरुण भडकला. राजाला एक असाध्य रोग होण्याचा शाप देऊन निघून गेला.
मुलगा घर सोडून गेला खरा पण त्याला राज्य सोडावयाचे नव्हते. त्याने विचार केला की आपल्या ऐवजी दुसरा एखादा पर्यायी बळी शोधू. चौकशी करता करता एक गरीब ब्राह्मण तिनशे गायी घेऊन आपल्या मुलाला विकावयाला तयार झाला. तो म्हणाला "मी मोठा मुलगा देणार नाही". त्याची बायको म्हणाली "धाकटे मुल आईला प्रिय असते. मी त्याला देणार नाही." मधला शुन:शेप म्हणाला "आपण निमुटपणे जावे हेच बरे". तो राजपुत्राला म्हणाला, "चल बाबा, मी येतो." त्याला घेऊन राजपुत्र राजधानीकडे निघाला. वाटेत एका मुक्कामात त्यांना विश्वामित्र भेटले. शुन:शेप रडत रडत त्यांच्या पाया पडला व म्हणाला " मला आईवदील नाहीत. त्यांनी मला विकून टाकले, आता तुम्हीच माझे वडील." विश्वामित्रांना दया आली. ते म्हणाले " या दोन ऋचा घे. बळी देण्याकरिता खांबाला बांधले की मग या म्हण."
सगळे राजधानीत आले. राजपुत्राने बापाला सगळी हकिगत सांगितली. हरिश्चंद्राने वरुणाला बोलावून घेतले . म्हणाला "राजपुत्राऐवजी हा बळी घे." वरुणही म्हणाला, "ठीक आहे. मला क्षत्रीय बळी ऐवजी ब्राह्मण बळी चालेल." यज्ञाची तयारी झाली. शुन:शेपाला खांबाला बांधले. पण हा ब्राह्मण बळी द्यावयास कोणी तयार होईना. तेव्हा परत त्याच्याच बापाला बोलाविले व तोही आणखी तिनशे गायी घेऊन या कामालाही तयार झाला. पण यावेळी शुन:शेपाने विश्वामित्राने दिलेल्या दोन ऋचा म्हटल्या व त्याचे बंध गळून पडले. वरुणाने प्रसन्न होऊन त्याला सोडून दिले, राजाला रोगमुक्त केले व तो निघून गेला. शुन:शेपाचा बाप त्याला म्हणाला "चल आपल्या घरी, आपण आता श्रीमंत झालो आहोत." शुन:शेपाने नकार दिला व तो पुढे विश्वामित्रांचा मुलगा म्हणूनच ओळखला जाऊ लागला.
बोला. हरिश्चंद्राने स्वताला व आपल्या मुलाला वाचवले की नाही ? त्या राजाचा कित्ताच आजचे राजकारणी गिरवतात, हो की नाही ? म्हणून मी हरिश्चंद्राला "महागुरू" म्हणतो.
शरद
शरदजी,
शुनःशेपाने बळी जाताना प्रजापतीचा धावा केला. प्रजापतीने त्याला अन्य
देवतेचा धावा करण्यास सांगितले. असे करता करता अखेर उषादेवतेच्या
प्रार्थनेनंतर त्याचे पाश गळून पडले व हरिश्चंद्राचा पोटशूळही बरा झाला.
शुनःशेपाने वडिलांकडे जाण्यास नकार दिला. विश्वामित्राने शुनःशेपाच्या
हातून यज्ञ पूर्ण करुन घेतला. विश्वामित्राने शुनःशेपाचे नामकरण देवरात
(देवांनी परत केलेला) असे केले.
विश्वामित्राच्या ऋचांमुळे शुनःशेप मुक्त झालेला नाही. ही कथा ऋग्वेदात आहे.
"शत्रुघ्न"च्या निमित्ताने
श्री. मृत्युंजय यांचा "शत्रुघ्न" हा लेख वाचकांना आवडला व त्यावर प्रतिसादही भरपूर आले. रामायणातील एका अप्रसिद्ध म्हणावे अशा व्यक्तिचित्रावर लेख मीही प्रथमच बघत होतो. लेख मलाही आवडला पण वाचतांना जाणवले कीं वाल्मिकी रामायण व हा लेख यांतील तपशिलात फरक आहेत. मग रामायण काढून हे सर्ग परत वाचले. पण हे तपशीलातील फरक किरकोळ आहेत व एकूण लेखावरील त्यांच्या प्रतिपादनात त्यांनी फरक पडत नाही. शिवाय जर श्री. वल्ली यांच्यासारखी अधिकारी,अभ्यासू व्यक्ती ( हे तर संदर्भ म्हणून थेट वाल्मिकी रामायणातील संस्कृत श्लोकच देतात, मानले !) जर काही बोलत नसेल तर ते दुरुस्त करण्यातही काही हशील नव्हता. हा लेख लिहण्यामागे तो उद्देशही नाही. असा फरक कां पडतो हे जरा खुलासेवार लिहण्याकरिता हा लेखप्रपंच.
रामायण-महाभारत ही महाकाव्ये वाल्मिकी-व्यासांनी लिहली असली तरी आतां ती केवळ त्यांचीच उरलेली नाहीत. त्यांवर माझा, तुमचा, आसेतुहिमालय भारतातील प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. नाही कसा ? माझी वाचनाची आवड या ग्रंथांनीच वाढवली; मी घरांत आई-वडीलांशी, बाहेर ओळखी-अनोळखी व्यक्तींशी कसे वागावे हे हे ग्रंथच (कळत-नकळत) ठरवतात; काही चुकले तर त्याची बोचणी यांच्यामुळेच लागते; थोडक्यात सीता, राम, कृष्ण, कर्ण, अर्जून, रावण आणि कंस हे ही... या ग्रंथातील व्यक्तिचित्रे रहात नाहीत, ती माझ्या अवतीभवती वावरणारी माणसेच असतात. आणि गंमत म्हणजे गेली शेकडो वर्षे हा पगडा भारतातील सर्व व्यक्तींवर पडला, विद्वान व अडाणी दोहोंवर. अडाण्यांचे सोडा, त्यामुळे झाले तर भलेच होते पण विद्वानांनी एक नवीनच भानगड निर्माण केली.
पूर्वी ग्रंथ हाताने लिहून घ्यावे लागत. त्यांत लिहतांना चुका होत. तेही फारसे महत्वाचे नव्हते. पण लेखक जरासा विद्वान व थोडासा प्रतिभाशाली असेल तर तो त्याला योग्य वाटेल ते घुसडवून देऊं लागला. तेही स्थल-कालबाधित. म्हणजे पाचव्या शतकातील मल्याळी लेखक द्रौपदीस्वयंवरातील लग्नात पगती उठवू लागला ते केरळातील त्या काळच्या पंगतींना अनुसरून. मग त्याचा मेळ काश्मीरमधील लेखकाच्या वर्णनाशी कसा जुळणार ? झाले असे कीं महाराष्ट्रात महाभारताची "निलकंठ" प्रत प्रचलित आहे तर बंगालमध्यें "कलकत्ता" प्रत. दोहोंत भरपूर फरक. भांडारकर संस्थेतील विद्वानांना या समस्येला तोंड देतांना काही दशके झगडावे लागले. लॉ कॉलेज रस्त्याने जातांना अजूनही मान खाली झुकते, आपोआप.
यात आणखी भर दोघांची. पहिली स्थानिक लेखकांची. मराठी "जांभुळाख्यान" हे एक उदाहारण. व्यासांच्या महाभारताशी काही संबंध नसलेले. किंबहुना त्यातील द्रौपदीच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध. पण त्यावरही विश्वास ठएवणारे भेटतातच. दुसरी भर पाश्चिमात्य भाषांतरकारांची. त्यांच्या संस्कृत भाषेवरील प्रभुत्वाबद्दल मला काही बोलावयाचे नाही.थोर माणसे.पण एक मोठा फरक पडतो तो येथील समाजातील चालीरितींमुळे व भाषेतील संकेतांमुळे. तुमच्या आमच्या बाबतीत हे नैसर्गिकपणे उपजत होतात; बाहेरच्यांना लक्षात येणे दुरापास्तच,.या विषयातील ज्ञान मिळवणे फार अवघड आहे. त्यामुळे जर तुम्ही रामायण-महाभारताचे इन्ग्रजी भाषांतर वाचत असाल तर काही त्रुटी अनिवार्य आहेत. उदा. म्हणून " आज दारावरून वरात गेली " याचे इंग्रजीत भाषांतर करून बघा. बहुदा श्री. मृत्युंजय यांच्या लेखातील तपशीलातील फरक यामुळे असावा.
अवांतर:
( मला असे वाटते की कर्णावरील एखाद्या कादंबरीवरून "कर्ण अर्जुनाहून धनुर्विद्येत जास्त प्रवीण होता" किंवा रामाने शूर्पणखेवर (किंवा सीतेवरही !) अन्याय केला असे ठरवावयाच्या आधी वाल्मिकी रामायण - व्यासकृत महाभारत वाचा. म्हणजे संस्कृत वाचा असे नाही. पण पं. सातवळेकर यांचे रामायण ( संस्कृत-मराठी दोन्हीही एकेठिकाणी) व सर्वश्री दातार-द्रविड-फफे यांनी भाषांतर केलेले व श्री. उपासनी यांनी तपासलेले (१९१०) महाभारत तुम्हाला जास्त बरोबर माहिती देईल. (हीच कां? मी गेली साठ वर्षे हीच वाचत आहे म्हणून !) व मगच कुणावर अन्याय झाला हे ठरवा. सीतेवर अन्याय झाला तसा रामावरही झाला. पण हे दोघेही तक्रार करतांना दिसत नाहीत. आणि शत्रुघ्नावर अन्याय झाला म्हणजे काय झाले ? त्याला अयोध्येचे राज्य मिळणार नव्हतेच. खरे म्हणजे कुठलेच. मिळणार नव्हते. रामाने मथुरेचा राजा म्हणून अभिषेक करतो असे म्हटल्यावर तो अचंबित होऊन म्हणतो " हे कसे शक्य आहे ? मोठा भाऊ असतांना धाकटा राजा कसा होईल ? तो राजा झाला पण तो अपवाद होता. त्यानंतर मात्र सर्वांना, लहानमोठ्यांना राज्ये मिळाली.)
शरद
हं. अन्याय केला असे ठरवावयाच्या आधी वाल्मिकी रामायण - व्यासकृत महाभारत वाचा हे सांगता सांगता आमचं आयुष्य संपून गेलं. असो.
मागे कधीतरी आम्ही एका जैन मुनीच्या सहवासात पाचव्या शतकातील एक संस्कृतमधील महाभारताची प्रत वाचली होती ज्यामधे गीता सांगून झाल्यावर एक श्रमण रणांगणावर येऊन उपदेश करतो ज्यामुळे पांच पांडव युद्ध सोडून जैन व्रत आचरण करुन हिमालयात निघून जातात. त्यामुळे भीमाने दुर्योधनाची मांडी फोडून त्याच्यावर अन्याय केला ही विचारवंती ओरड नवे कोणते रुप घेईल हा आम्हाला प्रश्न पडला आहे. आम्हाला तसेही उत्तर न मिळणारे प्रश्न नेहमीच पडत असतात. ते ही असो.
वाल्मिकी रामायणाबद्दल सांगावेसे वाटते ते असे की लवणासूराचा वध आणि शत्रुघ्नाला मथुरेचा राज्याभिषेक का प्रसंग मूळात उत्तरकांडातील आहे. आणि उत्तरकांडाला बर्याच संशोधकांनी प्रक्षिप्त मानलेले आहे. साहजिकच उत्तरकांडातील तपशीलांतील फरक हे वेगवेगळ्या प्रतींमध्ये किंचीत बदललेले दिसून येतात.
महाभारतात जे वनपर्वात 'रामोपाख्यान' आलेले आहे ते राम सीतेसह परत येऊन
अयोध्येचा राजा बनतो इथवरच आहे. रामोपाख्यान महाभारतकारांनी तेथेच संपवले
आहे. माझ्यामते रामायणातील प्रसंगांचा हा सर्वात जुना उल्लेख आहे.
परत द्रोणपर्वातसुद्धा रामाचा उल्लेख षोडशराजकीय आख्यानांत आला आहे.
वाल्मिकी रामायण आणि महाभारतातील रामोपाख्यान यात तसे काही फरक आहेत.
त्यामुळे रामायणाचा काळ जरी महाभारताच्या आधीचा असला तरी प्रत्यक्ष
रामायणाची संहिता ही महाभारताची रचना झाल्यावर लिहून झाली असावी असे
मानायला निश्चितच वाव आहे.
बाकी अवांतराबद्दल- मृत्युन्जयाच्या शत्रुघ्नावरच्या लेखातसुद्धा शत्रुघ्नावर अन्याय झाला असा सूर मला कुठेही दिसला नाही. एका तुलनेने दुर्लक्षित व्यक्तिमत्वाचा घेतलेला वेध असेच त्याचे स्वरूप असे मला वाटले.
अरेरे. शत्रुघ्नाचा धागा वाचनमात्र झाला. नाहितर शरदकाकांचा प्रतिसाद आणी त्यावरचे उपप्रतिसाद मिळुन दीडशतक झाले असते ;)
असो. शत्रुघ्नाचा धागा हा त्याच्या कामगिरीचे मुल्यमापन करण्यासाठी होता. त्यावर अन्याय झाला असा सूर कुठे लागलाच असेल तर तो लेखाचा दुय्यम गाभा होता. बहुधा मी शत्रुघ्न सिन्हांबद्दल बोलत नसुन रामायणातल्या शत्रुघ्ना बद्दल बोलतो आहे हे लक्षात न आल्याने काहीए लोकांनी शतकी धाग्यासाठी मदत केली असावे असे वाटते ;).धागा वाचनमात्र झाला नसता तर दत्ताजी शिंदेच्या "बचेंगे तो और भी लढेंगे" च्या धर्तीवर अजुन चर्वितचर्वण केले असते हे ही तितकेच खरे.
"कर्ण अर्जुनाहून धनुर्विद्येत जास्त प्रवीण होता"
जास्त प्रविण होता हे चुकीचे असले तरी कमी प्रविण होता असे म्हणणे म्हणजेदेखील लारा सचिन पेक्षा कमी प्रविण फलंदाज आहे असे म्हणण्यासारखे आहे असे नमूद करु इच्छितो. लवकरच त्यावरही एक धागा येइल. :)
दुर्योधन : महाभारत काय म्हणते ?
श्री.मृत्युंजय यांचा दुर्योधनावरील लेख वाचून थोडी निराशा झाली..
रामायण व महाभारत हे आपले नुसते धार्मिक ग्रंथच नव्हेत तर सांस्कृतिक धन
आहे. त्यावर आपले विचार अवष्य मांडावेत पण तसे करतांना " ग्रंथात असे आहे
पण मला त्यातून हा अर्थ लावावा असे वाटते " असे लिहले पाहिजे. दुर्गा भागवत
वा इरावती कर्वे या महाविदुषी देखील हाच मार्ग चोखाळतात. याने दोन गोष्टी
साधतात. वाचकाला ग्रंथात काय आहे व मग तुम्हाला काय म्हणावयाचे आहे ते
सापेक्ष कळते. नच, तुम्ही मांडता ते ग्रंथात आहेच अशी चुकीची समजुत होऊं
शकते. श्री. मृत्युंजय यांच्या लेखातील पुढील विधानांचे पुरावे मला
महाभारतात सापडले नाहीत. (संपूर्ण महाभारत, भाषांतर : राजिवडेकर-भानू-दातार
आठल्ये ; तपासणारे : उपासानी-अभ्यंकर) मी कलकत्ता प्रत वाचलेली नाही, तेथे
असे असेल तर संदर्भ द्यावा)
श्री. मृत्युंजय यांनी काही ठाम विधाने केली आहेत व काही ठिकाणी आपली मते
दिली आहेत. पहिल्या बाबतीत त्यांनी पर्व-अध्याय यांचा संदर्भ द्यावा व
दुसर्या बाबतीत ही मते नोंदवतांना त्यानी कशाचा आधार घेतला तेही स्पष्ट
करावे. " महाभारतात आधार नसेल तरीही माझे मत " असे म्हणावयासही हरकत नाही.
(1) भीष्मांचा आदर्श अंबा-अंबालिका प्रकरणात कसाला लागतो.
(२) हजार पापे करणारा युधिष्ठिर
(३) more humane म्हणजे नक्की काय ? व त्याचा महाभारतात संबंध काय ?
(४) स्वतःच्या पोराचा जीव जायचा वेळ येइतो सर्वांकडे दुर्लक्ष करणारी, कोण ? कशी ?
(५) डोके फोडणारा-हातपाय तोडणारा बाल वयातील भीम
(६) कौरवांचा एक एक महिन्या नंतरचा ज्न्म (असे फक्त दु:शीलेबद्दल लिहले आहे)
( ७) राजाचा मोठा मुलगा तोच राजा होणार, धृतराष्ट्र राजा केव्हा झाला ?
( ८) युद्धप्रसंगीही दुर्योधनाने कुरुवंशातल्या बहुतेक सगळ्या सदस्यांना आपल्या बाजुने ओढले. हे कोठून आणले ?
( ९) दुर्योधन म्हणजे दु: युधम अर्थात युध्दात जिंकता येण्यास दुर्धर /
अवघड असणारा. अर्जुन, अभिमन्यु, सात्यकी, घटोत्कच,... यांच्याबरोबरच्या
युद्धात नुसता हरणाराच नाही तर पळून जाणारा जिंकण्यास दुर्धर ?
( १०) प्रजाहितपालक दुर्योधनाचा अधःपात सुरु झाला द्रौपदी वस्त्रहरण
प्रकारात. ही सुरवात म्हणावयाची तर बालवयातच भीमाला पाजलेले विष व
लाक्षागृहात पांडवांना जाळण्याचा केलेला प्रयत्न, यांचे काय ?
(११ ) द्युतप्रसंगी कर्णाने त्याला द्युतापासुन परावृत्त करण्याचा आणि सरळसरळ युद्ध करण्याचा सल्ला दिला होता संदर्भ ?
(१२) योग्य राजकीय खेळ्या खेळुन याद्वांची सेनाच काय तर कृष्णाची चतुरंग
सेनाही स्वतःकडे जमा केली. शल्यासारख्या पांडवांच्या आप्तालाही आपल्या
बाजुने ओढले. फक्त कृतवर्मा स्वत: कौरवांकडे गेला, अंतर्गत भांडणांमुळे.
शल्याची तर चक्क फसवणुक करण्यात आली. याला "योग्य" खेळी म्हणावयाचे ?
असो. वरील मुद्दे काढावयाचे कारण जन्म सदाशिव पेठेत गेला. दुर्योधन खलनायकच
आहे व त्यात सारवासरवी करण्यास वावही नाही. त्याच्या जमेची बाजूला
युधिष्ठिराच्या स्पर्धेतून आलेला, दानशूरपणा. उत्कृष्ट प्रजापालन,
दूरदर्शीपणा, धोरणीपणा व नेतृत्व. नमुद करावयास पाहिजे त्याचे अलौकिक
धैर्य. श्री. मृत्युंजय यांच्या नजरेतून निसटलेला त्याच्या आयुष्यातील
एकमेव दैदिप्यमान क्षण म्हणजे सरोवरातून बाहेर आल्यावर युधिष्ठिराने
मूर्खपणाने त्याला सांगितले की "तू आम्हा पाचांपैकी कुणाशीही लढ.’ धर्म,
अर्जुन,.नकुल, सहदेव यांचेपैकी कोणीही त्याच्या समोर क्षणभरही जिवंत राहू
शकला नसता.. पण त्याने निवडले भीमाला.. जेथे लोकांनी थरकांपावे तेथे त्याने
दाखविलेल्या असामान्य धैर्यानेच त्याला सद्गति मिळालेली आहे.
शरद
माझ्या परीने ह्यातल्या काही प्रश्नांची महाभारतातील संदर्भासहीत आणि काही संदर्भाशिवाय उत्तरे.
(1) भीष्मांचा आदर्श अंबा-अंबालिका प्रकरणात कसाला लागतो.
भीष्माने स्वतःसाठी जरी अंबा, अंबिका, अंबालिकेचे हरण केले नसले तरी त्या प्रकरणात स्वयंवरातील इतर राजांकडून भीष्माला बोल लागलेलाच आहे. अगदी काही राजे तर हा म्हातारा आपले शुभ्र केश, सुरकतलेला चेहरा घेऊन येथे कशाला आला आहे शिवाय हा ब्रह्मचर्याव्रताचे निष्ठेने पालन करतो यची किर्ती आज धुळीस मिळाली म्हणायची असेही भीष्माला म्हणालेले आहेत.
(२) हजार पापे करणारा युधिष्ठिर
ह्यात मुख्यतः स्वतः दास असताना द्रौपदीला पणाला लावणे, अर्जुनाने जिंकलेल्या द्रौपदीला पाचांची पत्नी करण्यास आग्रह दर्शवणे आणि नरो वा कुञ्जरो वा हे उल्लेख असावेत.
(५) डोके फोडणारा-हातपाय तोडणारा बाल वयातील भीम
भीमाने आपल्या अफाट ताकदीच्या बळावर कौरवकुमारांना त्रास द्यायला सुरुवात केली याचे महाभारतात लै उल्लेख आहेत. अगदी त्यांचे केस ओढत ओढत फरफटत बुक्क्या मारत नेणे, त्यांना आपल्या बगलेत दाबून त्यांचा जीव अर्धमेला होईतो पाण्यात बुडवणे, मुले झाडावर फळे तोडण्यास चढली असता झाड गदागदा हलवून फळांसकट पोरांना झाडावरून खाली पाडणे.
(६) कौरवांचा एक एक महिन्या नंतरचा ज्न्म (असे फक्त दु:शीलेबद्दल लिहले आहे)
सहमत
( ७) राजाचा मोठा मुलगा तोच राजा होणार, धृतराष्ट्र राजा केव्हा झाला ?
पांडूनंतर धृतराष्ट्राच्या अभिषेकाचा जरी प्रत्यक्ष उल्लेख महाभारतात नसला तरी राजा मात्र तोच झाला होता. ह्याचे कैक उल्लेख महाभारतात आहेत. उदा. पांडवांना वारणावतात जाण्याची अनुज्ञा देणे, हस्तिनापुराची फाळणी करून खांडवप्रस्थ पांडवांना देणे, द्युताचे आमंत्रण, शेवटी भीमार्जुनांच्या प्रतिज्ञेने भयभीत होऊन द्रौपदीने तीन वर प्रदान करून पांडवांची दास्यमुक्ती. युद्धारंभी विदुर, भीष्म, कृष्ण यांछे धृतराष्ट्राला समजावणे व दुर्योधनापुढे हतबल असल्याची राजाची बतावणी.
( ८) युद्धप्रसंगीही दुर्योधनाने कुरुवंशातल्या बहुतेक सगळ्या सदस्यांना आपल्या बाजुने ओढले. हे कोठून आणले ?
कुरुवंशावतील बहुतेक सर्वच सदस्य कौरवांच्या बाजूने लढले. शांतनुचा बंधु बाल्हिक, त्याचा पुत्र सोमदत्त, पौत्र भूरीश्रवा हे त्यातले काही प्रमुख योद्धे. पांडवांच्या बाजूला कुरुवंशातले युयुत्सु सोडून कुणीच नव्हते.
( ९) दुर्योधन म्हणजे दु: युधम अर्थात युध्दात जिंकता येण्यास दुर्धर / अवघड असणारा.
तसेही महाभारतात अर्जुन सोडून कुणीच अपराजित नाही. त्यामुळे ह्या पदव्या तशा फक्त नामापुरत्याच.
(११ ) द्युतप्रसंगी कर्णाने त्याला द्युतापासुन परावृत्त करण्याचा आणि सरळसरळ युद्ध करण्याचा सल्ला दिला होता संदर्भ ?
माझ्या मते हा उल्लेख महाभारतात नाही. घोषयात्रेप्रसंगावेळच्या दुर्योधनाच्या लज्जास्पद पराभवानंतर प्रायोपवेशन करू पाहणार्या दुर्योधनाला कर्ण परावृत्त करतो आणि युद्ध करून जिंकायचा सल्ला देतो असे काहीसे आहे.
(१२) योग्य राजकीय खेळ्या खेळुन याद्वांची सेनाच काय तर कृष्णाची चतुरंग सेनाही स्वतःकडे जमा केली
कृष्णाच्या स्वतःच्या नारायणी चतुरंग सेवेचा उल्लेख हा नक्कीच प्रक्षिप्त आहे. ह्या सेनेचा उल्लेख नंतर अगदी पुसटसा येतो अगदी जेमतेम एक दोनच ठिकाणी. प्रमुख यादवांनी आपापले मैत्रभाव स्मरून कौरवपांडवांची बाजू पत्करली. कृतवर्म्याचे कृष्णाशी तसेही स्मयंतक मणी प्रकरणापासून काहीसे शत्रुत्वच होते तसेच तो बलरामाच्या बाजूचा. साहजिकच तो आपल्या भोजवंशीयांसकट दुर्योधनाकडून लढला तर सात्यकी हा अर्जुनाचा शिष्य आणि कृष्णाचा परमभक्त. साहजिकच शिनीकुलाने पाण्डवांची बाजू घेतली.
बाकी महाभारतानुसार दुर्योधन पूर्णपणे खलनायकच होता ह्यात कसलीही शंका नाही.
चर्चा जरा ट्रॅकवर ठेवा राव! शरद म्हणत आहेत की मूळ महाभारतात असे संदर्भ नाहीत. ठीक आहे ना! महाभारताच्या खूप संहिता वापरात आहेत. सगळ्यात वेगवेगळं काही ना काही सापडेल. तेही ठीक. प्रत्येकजण आपल्या प्रतिभेने त्यात भर घालतो. महाभारतातलं कोणतेही पात्र एखाद्या प्रसंगी तसं का वागलं असेल यावर कारणं शोधतो. तेही ठीक आहे. पण त्याचवेळी मूळ प्रमाण महाभारत म्हणून जे काही मानलं गेलंय त्यात असं असं लिहिलंय हे माहित असावं असं वाटणं काही चूक नाही.
धृतराष्ट्र अभिषिक्त राजा कधीच नव्हता. त्यामुळे दुर्योधनाचा राज्यावर दावा कधीच योग्य म्हणता येणार नाही असं मीही वाचलं आहे. पंडु वनात गेल्यावर त्याचा विश्वस्त म्हणून धृतराष्ट्राने रामाच्या भरताप्रमाणे राहणे अधिक उचित ठरले असते. कारण पंडुने संन्यास नक्कीच घेतला नव्हता आणि कशीही असोत त्याला मुले पण झाली होती. त्यामुळे धृतराष्ट्राचा राज्यावर हक्क राहिलाच नव्हता. अर्थात पंडुने किंवा पांडवांनी रामाप्रमाणे राज्याची वाटणी केली असती तर काही प्रश्न नव्हता. अर्थात महाभारत हे रामायण नव्हे! त्यामुळे त्यात हाडामांसाची वाटणारी सर्व गुणदोषांनीयुक्त माणसे आपल्याला बघायला मिळतात. आधीच्या प्रथा आणि आदर्श बाजूला ठेवून वेगळेच काही घडलेले महाभारतात अनेक जागी वाचायला मिळते.
रामायण आणि महाभारत हे दोन्ही माझ्या मते काल्पनिक होते. एवढं संशोधन वगैरे करून काय साधतं हा मला पडलेला प्रश्नच आहे. त्यात ऊर्जा, वेळ, पैसा खर्च करून काय साध्य होणार आहे? पुराण, इतिहास भविष्य घडवण्यासाठी वापरावे पण संशोधनावर वर्तमानातली ऊर्जा खर्च करून, वितंडवाद घालून काही साध्य होत असेल असे वाटत नाही. असो. हे एक माझे मत; चुकीचे असू शकेल. मला राजू श्रीवास्तवच्या एका विनोदी सादरीकरणातला प्रसंग आठवला. मुंबईमधले भाई गुन्हेगारी सोडून सत्संगाचा व्यवसाय करायचे ठरवतात. कमी कष्टात भरपूर पैसा आणि मान मिळवून देणारा तो एकमेव व्यवसाय आहे असे त्या गुंडांचे मत असते. एक स्टेज बांधून आणि बंदूकधारी गुंड जागोजागी बसवून मुख्य भाई प्रवचन सुरु करतो. त्यांची नावे पण विचित्र असतात. बाबू जलेला, पप्पू काणा, बबन कुर्ला अशी. मुख्य भाई सुरु करतो, "प्रथम अध्याय शुरु कर रेला हूं...जब द्रौपदी का चीर हरण होरेला था, द्रौपदी प्रार्थना करेली थी...कुंभकर्ण द्रौपदी का चीर खिंच रहा था पर चीर था की खतम होने का नाम ही नही लेरेला था...क्युंकी द्रौपदी की रक्षा कर रहे थे सुदर्शनचक्रधारी भगवान गणेश...". एक भक्त उठतो आणि म्हणतो, "क्षमा कीजिये महाशय, वह कुंभकर्ण नही थे, दु:शासन थे और द्रौपदी की रक्षा भगवान गणेश ने नही, भगवान कृष्ण ने की थी, महाभारत मुझे कंठस्थ है..."
नंतर भाई त्या अभ्यासू श्रोत्याला मागे बोलावून घेतो आणि विचारतो, "द्रौपदी का चीर हरण दु:शासन के बदले कुंभकर्ण करेंगा तो तेरे बाप का क्या जायेंगा?" आणि मग त्या श्रोत्याची धुलाई होते हे सांगणे न लगे! :-)
अतिशयोक्ती आणि विनोद सोडले तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ;-)
बाकी राजू श्रीवास्तवने काही काही प्रसंग छान रंगवले आहेत. बातम्या वाचणारी तर्हेवाईक माणसे, मोठ्या लग्नात जेवणाची होणारी गंमत वगैरे प्रसंग खूप गंमतीदार आहेत. युट्युबवर आहेत. अवश्य बघा.
श्रीमन्महाभारत - उपसंहार
प्रत्येक गोष्टीला लोकप्रिय होण्यास तिचा काळ यावा लागतो. उदा. मुंबईतला लालबागचा राजा, सिद्धीविनायक, पुण्यातील दगडुशेट गणपती वा शिर्डीचे साईबाबांचे मंदीर. आजकाल मिपावर चलती आहे "महाभारता"ची चांगली गोष्ट. चार लोक महाभारत वाचणार असतील, त्यातही संपूर्ण (अर्थात मराठी भाषांतर) तर सोन्याला सुगंधच. शिवाय भागवत-कर्वे-कुरुंदकर सोबतीला असतील तर वा-ह-वा ! आज मी यांच्या जोडीला आणखी एका विद्वानाच्या पुस्तकाची भर घालू इच्छितो. भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या "श्रीमन्महाभारत-उपसंहार" या अमूल्य खंडाची.
चिपळुणकर आणि मंडळी यांनी संपूर्ण महाभारताचे भाषांतर १९०४ ते १९१८ या
कालांत पुरे केले. त्याचा उपोद्घात ह,ना.आपटे यांनी लिहला व उपसंहार
चिं.वि.वैद्य यांनी. उपसंहार आहे ५८० पानांचा, हो, ५८० पानांचा." काय आहे
?" या खंडात ? खरा प्रश्न" काय नाही ?" असा पाहिजे. आज याची ओळख करून
देतांना थोडी निराळी पद्धत वापरणार आहे. मी फक्त वैद्यांनी केलेल्या १८
प्रकरणांची अनुक्रमणिका देणार आहे. त्यांनी प्रत्येक प्रकरणात निरनिराळे
विषय घेतले व त्या विषयावर संपूर्ण महाभारतात काय आले आहे ते दिले आहे.
लक्षात घ्या, एक लाख श्लोकात दिलेली एका विषयाची माहिती एकत्र
करावयाची.....आणि असे विविध विषय. छाती दडपूनच जाते.
प्रस्ताव पृ.१-४.
प्र. १ महाभारताचे कर्ते--पृ.५-३८
प्र. २ महाभाअताचा काल -- ३९-७२
प्र. ३ भारतीय युद्ध काल्पनिक आहे काय ? -- पृ. ७३-७९
प्र. ४ भारती युद्धाचा काळ --पृ.८०-१२८
प्र. ५ इतिहास कोणत्या लोकांचा --पृ.१३०-१५७
प्र. ६ वर्णव्यवस्था,आश्रमव्यवस्था आणि शिक्षणपद्धति -- पृ.१५८-१८६; १८७-१९३; १९४-२०६
प्र. ७ विवाहसंस्था -- पृ. २०४-२३१
प्र. ८ सामाजिक परिस्थिति --पृ.२३२-२७८
अन्न --२३२-२४७
वस्त्रभूषणे --२३८-२६२
रीतिभाती --२६३-२७८
प्र. ९ राहकीय परिस्थिति --पृ. २७९-३२६
प्र.१० सैन्य व युद्ध -- पृ.३२७-३४७
प्र.११ व्यवहार व उद्योगधंदे --पृ. ३४८-३६१
प्र.१२ भूगोलिक माहिती -- पृ.३६२-३९२
प्र.१३ ज्योतिर्विषयक ज्ञान --पृ. ३९३-४१०
प्र.१४ वाङ्मय व शास्त्रे -- पृ. ४११-४२४
प्र.१५ धर्म --पृ.४२५-४५९
प्र.१६ तत्वज्ञान --पृ.४५३-४९४
प्र.१७ भिन्न मतांचा इतिहास -- ४९४-५३५
प्र.१८ भगवद्गीता विचार --पृ. ५३६५७६
परिषिष्ट --पृ.५७७-५८०
मासल्यादाखल "धर्म" या प्रकरणात काय काय आहे ? वैदिक धर्म, वैदिकान्हिक, संध्या होम, मूर्तिपूजा, तेहदीस देवता, शिव व विष्णु, शिवविष्णु-भक्तिविरोधपरिहार, स्कंद, दुर्गा, श्राद्ध, आलोकदान व बलिदान, दानें, उपवास, तिथि, जप, अहिंसा, आश्रमधर्म, अतिथिपूजन, साधारण धर्म, आचार, स्वर्गनरककल्पना, इतर लोक, स्वर्गाचे गुणदोष, प्रायश्चित्त, प्रायश्चित्ताचे प्रकार, पापांचे अपवाद, संस्कार, आशौच असो.
भागवत-कर्वे व वैद्य यांच्यात फरक काय ? पहिल्या प्रथम "कवियत्री" आहेत. त्यांना काय "भावले" ते त्यांच्या लिखाणाचा गाभा आहे. भावना प्रथम. व्यासांना न लिहिता काय सांगावयाचे आहे याचा मागोवा घेणे यांत त्यांना रस. वैद्य प्रथमपासून शेवटपर्यंत वैज्ञानिक."हे असे आहे" असे म्हणतांना त्यांच्याकडे पुराव्यांचा पाया असतो. इरावतीबाईंशी पंगा घेणे तसे सोपे."मला आवडले /पटले नाही" म्हटले, संपले. वैद्यांशी बोलतांना आपल्याला माहीत असते कीं आपला "तेवढा" अभ्यास नाही. द्या सोडून.
एक शतकापूर्वीचे पुस्तक. त्या तोलामोलाच्या विद्वानांनी नवीन काही
लिहिले असेलही . पण ते तुकड्यातुकड्यात असणार व आपल्यासारख्या छोट्या
माणसांपर्यंत ते एकत्रपणे पोचणे जरा अवघडच. तेव्हा आतातरी तुम्हाला
महाभारताचा अभ्यास करावयाचा असेल तर अशी पुस्तके वाचनात पाहिजेत.
शरद
अहल्येची रामायणातील दुसरी कथा
श्री. विवेक पटाईत यांचा अहल्येवरचा लेख वाचावयाला सुरवात केल्यावर
सुखावलो होतो. श्री. विवेक मूळ रामायणावरून, तेथील संदर्भ देऊन, लिहत
असल्याने "कादंबरीती"ल व्यक्तीचित्रे वाचतांना खटकणारे वाचावे लागणार नाही
असे वाटत होते. पण पुढे पुढे गेलो तसे जाणवले की "अरे, हे तर आपण
वाचलेल्या "रामायणा"तील नाही." आता रामायण व महाभारत यांचे खंड हाताशीच
असतात. बालकांड, सर्ग ४८-४९ वाचावयास सुरवात केली आणि काहीच जुळेना.
वैतागलोच. मिपा बंद असल्याने त्यांचा लेख समोर ठेवून तपासणेही शक्य नव्हते.
पण शेवटी त्यांनीच आमच्या बंद कुलुपाची चावी दिली. "हरि अनंत, हरिकथा
अनंता" त्यांचे "वाल्मीकि रामायण" निराळे व माझ्याकडील " वाल्मीकि रामायण "
वेगळे. माझ्याकडे पं. सातवळेकर यांनी संपादित केलेले स्वाध्याय मंडळ,
पारडी यांनी छापलेले रामाय़ण (संस्कृत व मराठी भाषांतर) प्रथम प्रकाशन १९५८ ९
खंड ही पुस्तके आहेत. वरदा प्रकाशन यांनी हेच भाषांतर प्रसिद्ध केले आहे.
श्री विवेक त्यांच्याकडील रामायणाची माहिती देतीलच. आता तुम्ही म्हणाल "
तुमच्याकडील पुस्तकांचे कळले हो, इथे त्याचा काय संबंध ? पुस्तकांची
जाहिरात करावयाची ही जागा नाही." मान्य. संबंध असा की श्री. प्रसाद प्रसाद
लिहतात त्याप्रमाणे श्री. पटाईत यांची गोष्ट, आपणास माहीत असते त्या मराठी
गोष्टीपेक्षा, निराळी आहे व मी जी गोष्ट सांगणार आहे ती आणखीनच निराळी आहे.
मी संस्कृत श्लॊक देत नाही, त्याची गरज दिसत नाही. भाषांतर विश्वसनीय आहे,
विश्वास ठेवा.(सदाशिव पेठेतील संशयखोरांनी घरी येऊन पुस्तक बघावे !)
(विश्वामित्र रामाला आश्रमाची माहिती देत आहेत )
हा आश्रम महात्मा गौतम ऋषींचा होता. पूर्वी त्या गौतममुनींनी
अहल्येसहवर्तमान अनेक संवत्सरसमुहपर्यंत तपश्चर्या केली. एकदा गौतममुनि
आश्रमांत नाहीत, अशी संधी साधून सहस्रनयन इंद्र गौतममुनींचा वेष घेऊन
आश्रमात आला आणि अहल्येला म्हणाला, "हे सुंदरि, तुझ्याशी समागम करावा अशी
माझी इच्छा आहे " हे रामा, हा गौतमाचा वेष धारण करून आलेला इंद्र आहे, हे
जाणूनही, प्रत्यक्ष देवराज इंद्रही आपल्या सौंदर्यावर लुब्ध होऊन आला आहे
याचे कौतुक वाटून व देवांच्या समागमाचे सुख कसें असतें, हें पहावे , म्हणून
त्या दुर्मति स्त्रीने त्याच्याशी रममाण होण्याचे मनांत आणिले. (समागम
झाल्यावर) प्रसन्न मनाने ती त्या इंद्राला म्हणाली, "हे सुरश्रेष्ठा, मी
कृतकत्य झालें, आता आपण येथून त्वरित जा आणि गौतममुनीपासून आपण स्वत:चे व
माझे सर्वप्रकारे रक्षण करा." इंद्र पर्णकुटिकेतून गौतमाची मनांत भीति
बाळगून लगबगीने बाहेर पडत आहे तो महामुनी गौतम आश्रमांत प्रविष्ट होतांना
त्याच्या दृष्टीस पडले. आपला वेष धारण करणार्या दुराचारी इंद्राला पाहून
गौतममुनि क्रोधाने त्याला म्हणाले, "हे दुर्बुद्धे, माझा वेष धारण करून
ज्याअर्थी तूं हें निंद्य कृत्य केले आहेस त्या अर्थी वृषणरहित होशील."
इंद्राचे वृषण तत्क्षणी भूमीवर गळून पडले. याप्रमाणे इंद्राला शाप दिल्यावर
गौतममुनींनी आपल्या भार्येलाही शाप दिला कीं, "इतर कसल्याही प्रकारचा आहार
न करतां केवळ वायुभक्षण करून व भस्मात पडून राहून आपल्या कृतकर्माचा
पश्चात्ताप करीत तूं हजारो वर्षे या ठिकाणीच वास्तव्य कर, व कोणत्याही
प्राण्याच्या दृष्टीस न पडता (कोणासही तोंड न दाखवता) तू येथेच आश्रमामध्ये
पडून रहा. राम जेव्हा या वनांमध्ये येईल, तेव्हाच हे दुराचारिणी
लोभमोहरहित बनलेली अशी तूं त्याच्या आदरतिथ्याने शुद्ध होऊन आनंदाने माझ्या
समीप प्राप्त झाली असतां पूर्ववत सर्वांच्या दृष्टीस पडण्यायोग्य होशील",
आता दोन गोष्टींमधील महत्वाचे फरक बघा.
(१) इंद्र गौतमांना घाबरत होता. गौतम नाहीत तेव्हाच तो वेष पालटून येतो इद्राला शासन करण्याइतके तपोबल गौतमाकडे होते.
(२) इंद्राला अहल्येने ओळखले होते. तिचे कृत्य जाणीवपूर्वक होते. ती
"कृतकृत्य" झाल्याचे स्वत: म्हणते व इंद्राने स्वत:ला व तिलाही गौतमाचे
क्रोधापासून वाचवावे असे म्हणते.
(३) अहल्येने स्वत: पश्चात्ताप करत, कोणालाही तोंड न दाखवता एकांतवासाची शिक्षा भोगावयाची आहे. इथे लोकापवादाशी संबंध नाही.
(४) शाप वृषण गळून पडण्याचा आहे. सहस्रभगाचा नाही. अहल्या प्रथम ही त्याला सहस्रनयन म्हणत आहे.
(५) अहल्येने रामाचे आदरतिथ्य करून शुद्ध व्हावयाचे आहे. मिठी मारणे केवळ अप्रस्तुतच नव्हे तर अनाचरणीय आहे.
वरील सर्व गोष्टींचा विचार केला तर पं. सातवळेकर यांनी दिलेली गोष्टच जास्त सुसंगत, पटणारी वाटते.
आणखी एक गंमत. रामायणाच्या उत्तरकांडात अहल्येची गोष्ट परत येते.तेथे इंद्र
अहल्येवर बलात्कार करतो व त्याला त्याचे फळ भोगावे लागते असे म्हटले आहे.
पण ही उघड उघड प्रक्षिप्त कथा आहे.
अहल्येची कथा थोड्याफार फरकांनी लिंगपुराण, गणेशपुराण, ब्रह्मपुराण,
पद्मपुराण स्कंदपुराण, अध्यात्मरामायण, आनंदरामायण, यां ठिकाणी आहे. पण
शरदबुवांचा वेळ संपला आहे.
शरद
अहल्या उद्धाराची कथा बालकांडच्या ४८ आणि ४९ या दोन सर्गात आहे. (३३ +
२२=५५ श्लोकांमध्ये आहे) आपण ही कथा संपूर्णपणे वाचली नाही आहे. ४९ सर्गातील १३-२२ श्लोक वेगळीच कथा सांगतात. (पुन्हा एकदा वाचा)
आपल्याला माहितच आहे आपले ग्रंथ श्रुती आणि स्मृतीवर आधारित होते.
काळानुसार त्यात बदल होत गेले. अश्यावेळी रामायण रचण्याचा वाल्मिकींचा मूळ
हेतू -अन्याय करणार्यांना दंड हा मिळालाच पाहिजे मग तो दशरथ असो व रावण २.
सबका साथ, सबका विकास- मग जनाजातीय असो, शिकलेले बुद्धिमान .पण
शस्त्रधारी ब्राह्मण (राक्षस) मानव इत्यादी - लक्षात घेऊन मी ४९ सर्गाच्या १३-२२ श्लोकांच्या आधारावर कथा रचली आहे.
याच सर्गातल्या १७ आणि १८ श्लोकात राम आणि लक्ष्मणाने अहल्येचे चरण
स्पर्श केले आहे. (सर्व प्रकाशित वाल्मिकी रामायणांत हेच सापडेल- पुन्हा
एकदा वाचा). नंतर शास्त्रीय रीतीने अहल्येने राम आणि लक्ष्मण यांचे पाद्य,
अर्घ्य अर्पित करून त्यांचे स्वागत केले. देवतागण प्रसन्न झाले
(१९) का? कारण स्वर्गीय देवता एका निर्दोष स्त्रीवर लागणारा कलंक धुऊ शकत
नव्हते. त्या साठी पृथ्वीवर राज्य करणारा राजाच लागतो. गौतमच्या अधीन राहणारी अहल्या तपाच्या शक्तीने विशुद्ध स्वरूपाला प्राप्त झाली. (२०) अर्थात गौतमाने अहल्येचा त्याग केला नव्हता.
ते तिथेच त्या आश्रमात होते. तिचे निर्दोषत्व समाजाने स्वीकार केल्यावर
गौतमाने आनंदाने तिचा स्वीकार केला. महातेजस्वी महातपस्वी गौतम अहल्या
पुन:प्राप्त करून सुखी झाले (२१) आणि पत्नीसह तपस्येला सुरुवात केली.
माझा प्रयत्न मूळ कथा शोधण्याचा होता. ४८ आणि ४९ सर्गातील आधीचे श्लोक
बहुधा नंतरच्या काळात जोडले गेले असतील. बहुधा स्त्रीच दोषी आहे, पुरुष
नाही (निर्भया कांडच्या अपराध्यांचे ही हेच म्हणणे आहे) हे सिद्ध
करण्यासाठी.
रामाने राक्षसी ब्राह्मणी सत्ते विरुद्ध समाजाच्या दलित आणि शोसित वर्गाला
एकत्र केले होते. आपण विचार करा शबरीचे उष्टे बोर खाणारा राम 'शंबूक वध'
करू शकत होता का?
कॅलिफोर्निया विद्यापीठातील इंडोलोजी व संस्कृत चे प्राध्यापक आर .पि.
गोल्ड्मान यांनी रामायणाचे इंग्लिश मध्ये भाषांतर केले आहे. त्यासाठी
त्यांनी बडोदा येथील Oriental Institute ने प्रसिद्ध केलेल्या रामायणाला
प्रमाण मानले आहे. या बडोदा रामायण आवृत्ति विषयी खालील माहिती जालावर
मिळते .
During 1951 to 1975, a Critical Edition of the great epic-Valmiki-
Ramayana was prepared and published by the Oriental Institute in seven
voluminous books, incorporating seven Kandas namely: Bala, Ayodhya,
Aranya, Kishkindha, Sundara, Yuddha and Uttara,with the help of more
than 25 assistants, working for 25 years, and with the financial
assistance from U.G.C. The Bare Text containing only the constituted
text of the Valmiki-Ramayana is also separately published in one book.
The Pada-Index of the Valmiki-Ramayana is published in three different
volumes.
इंद्राने बलात्कार केला ही माहिती होती, मग कालांतराने त्यात अहिल्येच्या
सहभागाची (म्हणजे तीला वाटलेल्या आकर्षणाची) कथा वाचली गेली.
तेंव्हाही अन आताही पडलेला एकच प्रश्न; जर एखादा योगी, मुनी, देव, राक्षस,
राजा, योद्धा एखाद्या स्त्रीवर आसक्त झाला आणी त्याने त्या स्त्री ला मागणी
घातली, वा तो कसला विवाह? गुपचुप करायचा? तसला विवाह केला, वा तसेच
तिच्याबरोबर संबंध ठेवले तर त्याबद्द्ल इतका उहापोह उठत नाही. उलट
स्वसामर्थ्याने वा स्वतःची पर्सनॅलीटी वापरुन वा मस्त्यगंधे सारखं तेथे धुक
बिक निर्माण करुन, वा कुंती सारख वराबिराच्या नावाखाली त्या स्त्रीचा भोग
घेतला याची वाहवा होत असे आणि आहे. पण अहिल्येने मात्र अश्या एखाद्या सुंदर
दैदिप्यमान पुरुषाचा शरीरसुखासाठी विचार केला याची मात्र तिच्या
बिभस्तनेत, परिनीती व्हावी? स्त्रीला कामसुखासाठी दुसर्या कोणाचाही विचार
करण्याची मुभा नसावी?
अहल्येने आपले स्वातंत्र्य जपताना गौतमांचा विश्वासघात केला. जिथे मामला दोघांतच असेल तिथे असले काही प्रश्न येत नाहीत. पण आपल्या पत्नीने इंद्र आपल्याहून सुंदर आहे म्हणून आपल्याशी प्रतारणा केली हे गौतमाला अतिशय दु:खकारक वाटले असणार. शिवाय कथेनुसार अहल्येला गौतमाच्या रागाची भीती वाटली, त्याला दुखवल्याबद्दल तिला खेद वाटल्याचे कुठे दिसत नाही. हा स्वार्थीपणा झाला. अशी फसवणूक करण्यापेक्षा अहल्या सरळ गौतमाला सांगून त्याला सोडून गेली असती तर ते बरे झाले असते. पण तिला एकीकडे इंद्र हवा वाटला तर दुसरीकडे गौतमाची पत्नी म्हणूनही मोठेपणा हवा वाटला. जेव्हा तिसर्या माणसाला विनाकारण दुखवण्याचा प्रसंग येईल तेव्हा स्वतःचे निवड स्वातंत्र्य जरा मुरड घालून बाजूला ठेवणे श्रेयस्कर असे मला वाटते. अर्थात इतर कोणाचे वेगळे मत असू शकतेच.
हे वास्तवावर आधारित कथानक वाटत नाही. त्यातील बहुतांश सर्वच व्यक्तिरेखा
ह्या समाजाला नैतिक(?) वळण लावण्याच्या दृष्टीकोनातून निर्माण केल्या
गेल्या आहेत. रामायणात तत्कालीन समाजात (आणि आजही) प्रचलित असलेल्या पुरुषी
वर्चस्वाची झाक स्पष्ट दिसून येते.
रामाने जर युद्धानंतर सीतेला कोणतेही आढेवेढे न घेता स्वीकारले असते तर
रामाला खरोखरच महानायकाचा किंवा ईश्वरी पुरुषाचा दर्जा प्राप्त झाला असता
काय?
शूर्पणखा राक्षसकन्या नसून जर अप्सरा असती तर लक्ष्मणाला तिचे नाक कापता आले असते काय?
अहिल्येला रामाचा पदस्पर्श नाकारण्याचे स्वातंत्र्य होते काय?
कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ, कोण नीतिमान आणि कोण अनैतिक, कोण जगण्यायोग्य
आणि कोण मारण्यायोग्य ह्याची अचूक मांडणी करण्यासाठी रामायणातील पात्रे सरळ
काळ्या-पांढऱ्या रंगांमध्ये रंगवली आहेत. त्यांना वास्तवातील राखाडी छटेचा
स्पर्श देखील नाही. तत्कालीन सामाजिक विचारधारांचे प्रतिबिंब म्हणूनच
रामायणाकडे पाहता येईल.
श्री राम मर्यादापुरषोत्तम होते. माता समान ऋषीपत्नीला चरण स्पर्श करणे मर्यादाच विरुद्ध आहे. वाल्मिकी रामायणात रामाने अहल्येचा चरण स्पर्श केला आहे.
राघवौ तु तदा तस्याः पादौ जगृहतुर्मुदा ।
स्मरन्ती गौतमवचः प्रतिजग्राह सा हि तौ
(बालकांड ४९/१५)
श्री राम आणि लक्ष्मण यांनी अहल्येचा चरणांना स्पर्श केला. (श्री
तुलसीदासाच्या रामायणाचा प्रभावामुळे व दूरदर्शन वर पाहिलेल्या मालिकांमुळे
रामायण न वाचल्यामुळे हा भ्रम निर्माण झाला आहे).
या कथेत रुपकार्थ का बरे घेतला जात नाही?
तो काळ आर्य-अनार्य संघर्ष व संक्रमण काल समजल्यास व त्यात व्यक्ति विशिष्ठ नावे न घेता मूळ वैदिकांना अभिप्रेत रुपके जुळवुन बघा ना...
राम हा एक न्यायप्रिय शूर राजा होता. ('देव' नव्हे, तर त'माणूस')
आर्य-अनार्य संकरा दरम्यानचा हा काळ समजुया. (बघा हं, वेदोक्त देव वा
जागतिक स्तरावर आर्य रंगाने गोरे होते तर राम 'श्यामल' आहे)
या उत्तर भारतीय आर्य-अनार्य संयुक्त वंशाच्या (आणि जेताच नाव मिरवत
असल्यामुळेच आर्य नामाभिधानित) राजाचा दक्षिणेकडचा प्रवास , उत्तर-दक्षिण
संस्क्रुति मिलनाचे विवरण म्हणजे रामायण होय.
त्याच्या खूप पूर्वीची मध्य भारतातील क्रुषी संस्क्रुति काही काळ लोप पावलेला, कमी लोकसंख्येचा, भकास व ओसाड वा खडकाळ प्रांत, तेथिल जमिन म्हणजे 'अहल्या' नव्हे काय? (हल म्हणजे नांगर) यामागे इंद्राचे भोगकर्म वा बलात्कार म्हणजे खुप पुर्वीचे आर्यांचे आक्रमण व तदद्देशियांचा निर्वंश कारण असावे. (बघा हं, वेदांत इंद्र हे आर्य समूहनायकाचे पद आहे, अनार्यांची नगरे-पुर नष्ट करतो म्हणुन 'पुरंदर' म्हटले आहे...)
तसेच, इंद्र हा पर्जन्याचा नियंत्रक देवता हा उत्तर वैदिक विचार मानल्यास कदाचित अतिव्रुष्टी वा जलप्रलय व नंतर सरस्वती नदी आटल्याप्रमाणे अफाट दुष्काळ ही एक नैसर्गिक दीर्घापत्तिही त्या प्रदेशाला 'अहल्या' अर्थात क्रुषीसाठी अयोग्य करु शकते.
येथे रामाचा पदस्पर्श म्हणजे उपरोक्त अधिक बुद्धिमान नागर लोकांचा प्रवेश व त्यांनी सहयोगाने केलेला त्या प्रांताचा विकास नव्हे का? कदाचित रामाच्या याच सहकारी व्रुत्तीमुळे तेथिल व इतरकडील मध्य व दक्षिण भारतीय जनता त्याला सामील झाली... (त्यांना वानर हे ज्ञातिनाम समजावे)
अहल्येची कथा ही रुपकार्थ समजा, राम नावाच्या चांगल्या राजाने केलेला संस्क्रुति मिलाप लक्षात येईल.
प्रतिसाद अपेक्षित .....!
अहल्या व शूर्पणखा खरेच अन्यायग्रस्त स्त्रीया ?
अहल्या व शूर्पणखा अन्याय झाला कां ?
"अहल्येची दुसरी गोष्ट" यावरील सर्वश्री स्पंदना, अवतार व पैसा यांच्या प्रतिसादांवरून जास्त माहिती देण्याची गरज वाटते. म्हणून नवीन धागा काढत आहे. दोघींवर अन्याय झाला असे बरेच जणांना वाटते. बर्याच वेळी मूळ गोष्टच माहीत नसते. ती वाचल्यानंतरही जर तुमचे मत निराळे असेल तर तसे मांडावयास हरकत नाही. पण एक नक्कीच लक्षात ठेवावयास हवे की वाल्मीकि-व्यास या उत्तुंग प्रतिभेच्या महान लेखकांनी त्यांच्या काळास अनुसरून लिहलेल्या लिखाणावर आपण आपल्या कुवतीप्रमाणे आजच्या काळास अनुसरून मत देत आहोत. माझे महाभारतावरील मत हे "शरद याचे, त्याचे घरातील वातावरण शिक्षण, वाचन, पुण्यातील वास्तव्य" अशा बर्याच गोष्टींवर आधारलेले मे २०१५ चे मत असते. उद्या ते तसे असेलच असे अजिबात नाही. म्हणून मी माझे मत देऊं नयेच कां ? तसे अजिबात नाही अह्ल्या व शूर्पणखा यांच्या बाबतीत रामायणात पुरुषी वर्चस्वाची झाक दिसते कां एवढ्यापुरते मर्यादित.
अहल्या :
(१) ब्रह्मदेवाने विश्वातील स्रर्व सौंदर्य गोळा करून अह्ल्या निर्माण केली
व ती गौतमाच्या आश्रमात "ठेव" म्हणून ठेवली. सर्व लोकपाल जिच्या
प्राप्तीकरता धडपडत होते तिच्या, त्या अहल्येच्या, मोहांत गौतम पडला नाही
म्हणून ब्रह्मदेवाने स्वत: त्यांचे लग्न लावून दिले. गौतम कोणत्याही
अप्सरेच्या मोहात पडणारा लंपट नव्हता.
(२) अहल्येचा "ज्येष्ठ" पुत्र शतानंद हा जनकाचा पुरोहित होता. म्हणजे अह्ल्या अनेक पुत्र असलेली "लेकुरवाळी" होती.
(३) तपोनिष्ट व इंद्रियदमन करणार्या नवर्याला, काही मुले झाल्यावर,
अहल्येने फसवले आहे. त्याबद्दल तिला चूक न वाटता आनंदच वाटतो व इंद्राने
गौतमाच्या कोपापासून आपणास वाचवावे असेही ती म्हणते.
(४) कोणत्याही काळात, अगदी आजच्या my choice काळातही, हे नीतीमत्तेला धरून
नाही व अह्ल्येला शिक्षा झाली तर तक्रार करण्याचे कारण नाही. यात पुरुष
संस्कृतीच्या वरचष्म्याचा प्रश्न उद्भवत नाही.
(५) गौतमाने "तपाने शुद्ध झाल्यावर, माझ्याबरोबर नांदशील" असे सांगण्याचा
मोठेपणा दाखविला आहे. शतानंदानेही "मातेचे दुराचरण आपण रामाला सांगितले ना व
रामदर्शन झाल्यावर माझ्या मातेचा माझ्या पित्याशी समागम झाला ना ?" असे
विश्वामित्राला विचारले आहे. आजच्या काळातही असा मनाचा मोठेपणा पहावयास
मिळतो कां ?
(६) आता पुरुषांना अशा प्रसंगी काय शिक्षा झाली ? असा प्रश्न विचारला आहे.
प्रथम रावणाचे उदाहरण घ्या. त्रैलोकातील सुंदर स्त्रीयांवर बलात्कार करणे
हा उद्योग. एकदा एक अप्सरा कुबेराचा मुलगा नलकुबेर याच्याशी संकेत करून
त्याच्याकडे निघाली असतांना रावणाच्या नजरेस पडली. तिने त्याला विनवणी केली
की मी तुझ्या पुतण्याकडे पूर्वसंकेताने जात आहे, मला सोड. त्याने ऐकले
नाही. नंतर ती रडत रडत नलकुबेराकडे गेली. नलकुबेराने रावणास शाप दिला की
"रावण इच्छा नसलेल्या स्त्रीवर बलात्कार करेल तर त्याच्या डोक्याचे तुकडे
होतील". तेव्हापासून रावणाने तसले उद्योग थांबविले. सीतेला लंकेत नेल्यावर
या भीतीनेच ती वाचली.
रावणासारख्या क्रूरकर्म्याचे सोडा. माझ्या वाचनात ऋषींचे असे वर्तन दोनतीन
ठिकाणीच आले. एक विश्वामित्र व अप्सरा. या ठिकाणी अप्सरा त्यांना मोह
पाडण्यासाठी योजल्या आहेत.. त्याला बळी पडल्याने फार दोष देण्याचे कारण
नाही. दुसरे उदाहरण पराशर-सत्यवती. पराशर सत्यवतीवर मोहित झाल्यावर त्याने
तिला उत्तम वर देऊन वश केले आहे. अंधार निर्माण करून तिचा संकोच नाहिसा
केला, तिच्या अंगाचा माशांचा वास घालवून तिला सुगंधी केले व प्रसुत
झाल्यावर परत कन्यावत्वही दिले. इथेही बलात्कार नाही. एखादे उदाहरण रहिले
असेल तर श्री. वल्ली सांगतीलच.
आता शूर्पणखेचा विचार करूं
शूर्पणखा ही रावणाची बहीण. तिचे लग्न मधु नावाच्या एका दानव राजाशी झाले.
रावणाने त्रैलोक जिंकण्याच्या नादात मधूवर स्वारी केली व युद्धात त्याला
मारून टाकले. मग या विधवा बहीणीची कटकट लंकेत नको म्हणून तिला दंडकारण्य़ात
पाठवून दिले व तेथे खर नावाच्या एका राक्षस सेनापतीला, हा त्याचा भाऊ,
तिच्या दिमतीस दिले. तेथे शूर्पणखा स्वच्छंदपणे विहरत असे.
राम-लक्ष्मण-सीता दंडकारण्यात रहावयास आल्यावर ही सहज त्यांच्या आश्रमापाशी
आली. रामाला पाहिल्यावर ती कामातूर होऊन त्याच्या प्रेमात पडली व तिने
त्याची चौकशी केली. आदीकवी वाल्मीकि काय म्हणतात ते बघा .."विक्राळ मुख,
मोठे पोट, विरूप नेत्र, ताम्रवर्ण केस, कुरूप मुद्रा, भयंकर स्वर, उग्र
स्वभाव, वृद्ध वय, कुटिल भाषण, अतिशय दुष्ट वर्तन्यांनी युक्त असलेली ती
राक्षसी कामाधिन होऊन उत्कृष्ट मुख, कृश उदर, विशाल नयन, सुंदर केस ,सुरूप
मुद्रा, मंजुळ स्वर, सौम्य स्वभाव, तरुण वय, सरल भाषण, न्यायाला धरून
असलेले वर्तन असलेल्या रामाला म्हणाली "तूं कोण ?, येथे कशाला आला आहेस ?"
सरळ स्वभावाच्या रामाने तिला उत्तर दिले की " दशरथ राजाच्या आज्ञेवरून मी
राम, हा माझा भाऊ लक्ष्मण व ही माझी पत्नी सीता..वनात राहण्यासाठी आलो
आहोत." तो नंतर तिला "तूं कोण ?" असेही विचारतो. इथपर्यंत सगळे सौजन्याने
चालले होते.
यावर शूर्पणखा त्याला उत्तर देते " मी इच्छेप्रमाणे रूप धारण करणारी,
शूर्पणखा नावाची, रावणाची बहीण आहे. तू माझा चिरकाल भर्ता हो. सीतेचा तुला
काय उपयोग ? ही विरूप, दुराचारी, पोट खपाटीला गेलेली मनुष्य जातीची भार्या व
तुझा भाऊ यांना मी भक्षण करून टाकीन व नंतर विषयोपभोगाची इच्छा धरून आपण
संचार करू." मग राम न रागावता थट्टा करण्याच्या उद्देशाने म्हणाला, " बाई ग
, माझा विवाह झाला आहे. सवतीचे जीवन तुजसारखीला बेकारच. तेव्हा तू माझ्या
ऐवजी लक्ष्मणाशीच विवाह कर." रामाला सोडून शूर्पणखा लक्ष्मणाला म्हणाली "
माझ्या सारखी श्रेष्ठ स्त्री तुझ्या रूपाला योग्य भार्या आहे." मग लक्ष्मण
म्हणतो " मी तर दास. माझ्या ऐवजी हा रामच तुला योग्य.. तुझ्या सारख्या
सुंदर स्त्रीला सोडून हा कशाला या कुरूप मानवी स्त्री बरोबर संसार करेल?"
मूर्ख शूर्पणखेला ते पटले व ती रामाला म्हणाली " या तुझ्या भार्येवरील
प्रेमाने तू माझा अव्हेर करत आहेस. तिला मी तुझ्या समक्ष भक्षण करून टाकीन व
मग तू सवत नाहिशी झालेल्या माझ्याबरोबर संचार कर." असे म्हणून ती सीतेला
खावयास तिच्या अंगावर धावून गेली. मग रामाने लक्ष्मणाला सांगितले कीं ’तू
हीला विरूप करून टाक ".मग लक्ष्मणाने कान व नाक कापून टाकले. स्त्री म्हणून
ठार केले नाही.
वरील वर्णनावरून लक्षात येईल की शूर्पणखेला शिक्षा ती सीतेला खावयास निघाली म्हणून केलेली आहे. तिच्यावर अन्याय झालेला नाही.
शरद
आर्य आणि अनार्य संघर्ष- हे आंग्ल इतिहासकारांनी आपल्या डोक्यात डोक्यात टाकलेली मूर्खतापूर्ण संकल्पना आहे.
रामायण वाचा - वास्तवात इथे संघर्ष ब्राह्मण रावण आणि इतर जाती क्षत्रिय +
निषाद, शबर, भिल्ल, वानर (अर्थात मंडळ कमिशन). पण आंग्ल इतिहासकारानी याला
उत्तर (आर्य) दक्षिण (अनार्य) या संघर्षाचे रूप दिले, त्याना देशावर राज्य
करायचे होते. बिना रामायण वाचता. तोच इतिहास शिकून आपले अतिविद्वान
इतिहासकार त्यांचे वाक्य ब्रह्मवाक्य मानून सत्य कळत असून ही पाहत नहीं.
बाकी विशेष मी शौनक गोत्रीय ब्राह्मण आहे. अर्थात माझे पूर्वज (???)
कदाचित रावणाच्या राज्यात मोठ्या पदावर असण्याची शक्यता नकारता येत नाही.
शिवाय युद्धात त्यांचा रामाच्या हस्ते वध ही झाला असण्याची शक्यता नकारता
येत नाही.
हा संघर्ष या युगात ही आहे कांग्रेस (ब्राह्मण) विरुद्ध इतर पक्ष.
मग रामाने लक्ष्मणाला सांगितले कीं ’तू हीला विरूप करून टाक ".मग लक्ष्मणाने कान व नाक कापून टाकले. स्त्री म्हणून ठार केले नाही. वरील वर्णनावरून लक्षात येईल की शूर्पणखेला शिक्षा ती सीतेला खावयास निघाली म्हणून केलेली आहे. तिच्यावर अन्याय झालेला नाही.
बरोबर आहे, शिक्षा योग्यच झाली. काही प्रश्न छिद्रान्वेषी वृत्तीने मनात उद्भवतातच, त्याचे कृपया निराकरण करावे:
१. राम आणि लक्ष्मण दोघेही तिच्याशी चेष्टेच्या सुरातच बोलत होते म्हणजे त्यांच्या दृष्टीने तिच्याकडुन धोका नव्हता. तिची भाषा प्रथमपासुनच आक्रमक होती.
२. राम अणि लक्ष्मणाने शुर्पणखेला म्हणे मारले नाही कारण ती स्त्री होती. मग त्राटिका कोण होती? एखाद्या स्त्रीला कान नाक कापुन विद्रुप करणे ही तिला ठार मारण्यापेक्षा जास्त क्रूर चेष्टा नाही काय?
३. जो राम वालीला "वानर" म्हणुन मारतो तो एका राक्षसीणीला "स्त्री" कसा काय मानतो म्हणे?
४. जर शुर्पणखा सीतेसाठी भविष्यात धोका ठरु शकली असती तर तिला मारुन टाकणे योग्य नव्हते काय? तिला विद्रुप केले असता ती परत सीतेवर हल्ला करुच शकली असती. त्याऐवजी तिचे हात पाय कापणे जास्त योग्य ठरले नसते काय? तिला विद्रुप करणे हे केवळ तिला तुच्छ लेखुन तिची जागा दाखवुन देण्याचा विचार वाटतो. विश्वामित्र राम-लक्ष्मण यांना यज्ञरक्षणाकरिता घेऊन जात असतांना
त्राटिकेने त्यांच्यावर हल्ला केला. विश्वामित्रांनी रामाला त्राटिकेला
मारावयास सांगितले. पण रामाने "ही स्त्री, हिचा वध कशाला ?" म्हणून तिचे
नाक-कान कापले. मग ती अदृश्य होऊन दगडफेक करू लागल्यावर विश्वामित्रांनी
"ही दया दाखविण्याची वेळ नव्हे " असे सांगितल्यावर मग रामाने तिचा वध केला.
त्या काळी स्त्रीचा वध करण्याऐवजी नाक-कान कापणे जास्त कडक शिक्षा मानली
जात असावी. दोषीला ठार मारण्याऐवजी नाक-कान कापलेले चालते बोलते ध्यान समोर
असेल तर इतर लोकांना धाक बसेल. काय ?
( हे राम. मी रामायणामधील गोष्टीच सांगत बसलो तर सुभाषितांचे काय करणार. जाऊं द्या.)
मग रामाने लक्ष्मणाला सांगितले कीं ’तू हीला विरूप करून टाक ".मग लक्ष्मणाने कान व नाक कापून टाकले. स्त्री म्हणून ठार केले नाही. वरील वर्णनावरून लक्षात येईल की शूर्पणखेला शिक्षा ती सीतेला खावयास निघाली म्हणून केलेली आहे. तिच्यावर अन्याय झालेला नाही.
+१ सहमत ..
पण ..
मी ज्या वेगवेगळ्या कथा वाचल्या .. त्या पैकी एका कथाकाराच्या मते शूर्पणखा ही रावणाची बहीण असून , त्याच्याच प्रमाणे रूपवान होती.
दुसर्या कथेत सांगतात की ती राक्षसी असल्याने, मायावी रूप धारण करून आली होती.
आणखी एका कथेत म्हणले आहे, की तिच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशात परकीय
आल्याचे कळले म्हणून ती राम आणि लक्षमणांना जाब-सवाल करण्याच्या हेतूने
तिथे आली, आणि शस्त्रसज्ज असलेल्या दोघांना पाहून , त्यांच्यावर चाल करून
आली.
आता खरे-खोटे काय ते रामजाणे.
नंतर ती रडत रडत नलकुबेराकडे गेली. नलकुबेराने रावणास शाप दिला की "रावण इच्छा नसलेल्या स्त्रीवर बलात्कार करेल तर त्याच्या डोक्याचे तुकडे होतील". तेव्हापासून रावणाने तसले उद्योग थांबविले. सीतेला लंकेत नेल्यावर या भीतीनेच ती वाचली.
कथा वाल्मिकी रामायणात आहे काय?
याबद्दल खट्टा मिठा ब्लॉगवर काही वाचले होते.
राम कोण देशीचा? : भाग 1
राम कोण देशीचा? - भाग 2
राम कोण देशीचा? - भाग ३
१. अहिल्येचे लग्न एका अश्या माणसाशी झाले होते ज्याला तिच्या सौंदर्याशी काडीमात्र घेणे देणे नव्हते. त्यांच्या नैतिकतेचे आणि निरलसतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. पण जगतसुंदरीचे एका अश्या माणसाबरोबर लग्न लावुन देउन त्याच्याशी संसार करायला भाग पाडावे का? गौतम ऋषींसाठी अहिल्या काय आणि शूर्पणखा काय एकच होती. तिने त्यांची निर्लेपपणे सेवा केली म्हणजे झाले.
२. अहिल्या एका इंद्रियदमन करणार्या पुरुषाबरोबर संसार करत होती. यात त्या व्यक्तीचा अध्यात्मिक आलेख, मनोनिग्रह, विषयवासनांवरचा विजय या गोष्टी नि:संशय प्रशंसेस पात्र ठरतात मात्र असे करताना ही व्यक्ती आपल्या संसारधर्माशी प्रतारणा करते आहे काय आणि पत्नीला विषयसुख देण्यास कमी पडते आहे काय याचा विचार आपण करतो आहोत की नाही?
हो. इंद्रियदमन करणार्याने स्वतः एकट्या नावेत बसावे, उगा तयारेएला पाणी
भरा, स्वैपाक करा, पाय चेपा, पूजेची तयारी आणी झोपडीची स्वच्छता करायला
सुंदर्या कशाला हव्यात?
वर आणी मोठेपणा तो केव्हढा? पुरुष ना तो?
आणि ती मस्त्यगंधा पराशर तर एकदमच हुकली आहे. कौमार्य परत कस काय येत ब्वा?
त्या पोरीच्या शरीराच्या स्पर्शभावना सुद्धा पुसल्या जातात काय?
मग आजकाल जे लहाण मुलींवर बलात्कार होतात त्यांच्यावर सर्जरी केली अन त्याचा खर्चापानी दिला की त्यो मानुस येकदम महान होणार का काय?
ते शंभर शकले प्रकरण मागाहून चिकटवले आहे. उगाचच रावणाला सहानुभूती मिळू नये म्हणून. पुराणकथा अशाच बनतात. आपल्या मताला सोयिस्कर तसे रचत जातात आणि तेच सत्य म्हणून खपवत जायचे धंदे म्हणजे पुराणकथा आणि किर्तने.
किर्तनकाराची प्रत्येक गोष्ट जणू देवाच्याच तोंडातून ऐकतोय असा विश्वास असणार्या भोळ्याभाबड्या जनतेचं समजू शकतं पण...
अजूनही पारंपारिक कथाकथनामध्ये स्त्रीने नवर्याची दासी बनून राहावे असेच प्रवचन सीतेचे दाखले देऊन वाचाळ किर्तनकार करत असतात. 'सुशिक्षीत व सुसंस्कृत' प्राध्यापकांना असे किर्तन करतांना मी स्वत: ऐकले आहे.
झाला एकदाचा जीव परत जागा.
तर माझ म्हणन काय होतं माहिताय का?
एव्हढच म्हणन होतं की स्त्रीला जर काम भावना झाली तर ती वाईट कशी काय मानली जाते.
थांबा जेवुन येते.
माझ्या प्रश्नाचे उत्तर तुअम्च्या पराशर उत्तरातच दडले आहे.
एका माणसाला एका स्त्रीची कामना होते अन तो महान ठरतो तुमच्या मते, पण
एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषाची कामना केली की तिच्या जबाब्दार्या,
तिचे पुत्र (ते ही पुन्हा पुरुषच. इस्लाम मातेला सुद्धा स्त्री म्हणुन कमी
दर्जाची आणीकनरकाचे द्वार मानतो. आईला सुद्धा बडवायला त्यांना मुभा आहे. मग
अहिल्येचा पुत्र त्याला अपवाद कसा? ) याची आठवण होते.
जाऊ दे. मी फक्त एकाच गोष्टीने वैतागले होते, अन ते म्हणजे अहिल्येबद्द्ल
विवेक पटाईत नी लिहीलेली कथा (जी च्या पुष्ठ्यर्थ ते श्लोक सुद्धा देतात)
अरे ही अशी ही वेगळी आहे का म्हणुन सोडुन देण्या ऐवजी वर्षानुवर्षे
सर्वांना माहित असलेली कथा पुन्हा रंगवुन सांगायची गरज नव्हती. त्याच
ठिकाणी आम्ही सुद्धा ही कथा माहित नसल्याचे सांगितले होतेच.
मुळात अहिल्या म्हणजे काय सामानाची गासडी होती काय की खूप लोकांची नजर आहे म्हणून गौतमाच्या घरात टाकून ठेवायला? कोणाचा विश्वास आणि कोणाचा घात?
गौतमांचा त्याग करून निघून जायला अहल्या स्वतंत्र होती. गंगा, ऊर्वशी इ. स्त्रियांनी नवर्याला सोडून स्वतंत्र राहिल्याच्या गोष्टीही आहेतच. पण लग्नाचे फायदे पाहिजेत आणि बाहेर मजाही पाहिजे असे करून नवर्याचा विश्वासघात करणे चूकच. जसे दुष्यंताने शकुंतलेचा गैरफायदा घेऊन मग पाठ फिरवणेही चूकच.
बरोबर आहे. तिने त्याग करायला हवा होता.
पण एक प्रश्न असा पडतो की समजा तिचा त्याग करायचा विचार बिचार काही नाही
आणि अचानक नवरा नसताना तिला इंद्र दिसला आणि तिला तो आवडला तर तिने आधी
जाऊन घटस्फोटाचा अर्ज करावा की या क्षणाचा आनंद घेऊन मग नवर्याचा त्याग
केला तर चालेल? गौतमाने शाप न देता "ठीके, तू लग्न मोडले आहेस, आपला आता
काही संबंध नाही" एवढे म्हणून तिला सोडले असते तर पुरले नसते काय? की
आपल्या मालकीच्या व्यक्तीने मला न सांगता निर्णय घेतला याचे दु:ख इतके असते
की पार शाप देणे/जीव घेणे इथपर्यंत जावे लागते?
त्या काळात लग्नाचा विछेद ही आतासारखी वर्षानुवर्षे चालणारी गोष्ट नव्हती. त्यातही गौतमांनी शाप हा इंद्राला दिलेला दिसतो. अहल्येला एकांतवास आणि पश्चात्ताप स्वतःच स्वीकारावा अशी समज दिली आहे ती इंद्राला दिलेल्या शापासारखी भयंकर नाही. शिवाय केल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप झाल्यानंतर पुन्हा तिच्यासोबत रहायची इच्छाही गौतमांनी तिथेच सांगितली आहे.
"इतर कसल्याही प्रकारचा आहार न करतां केवळ वायुभक्षण करून व भस्मात पडून राहून आपल्या कृतकर्माचा पश्चात्ताप करीत तूं हजारो वर्षे या ठिकाणीच वास्तव्य कर, व कोणत्याही प्राण्याच्या दृष्टीस न पडता (कोणासही तोंड न दाखवता) तू येथेच आश्रमामध्ये पडून रहा. राम जेव्हा या वनांमध्ये येईल, तेव्हाच हे दुराचारिणी लोभमोहरहित बनलेली अशी तूं त्याच्या आदरतिथ्याने शुद्ध होऊन आनंदाने माझ्या समीप प्राप्त झाली असतां पूर्ववत सर्वांच्या दृष्टीस पडण्यायोग्य होशील",
मालकीच्या समजलेल्या व्यक्तीने तसेच प्रेमाच्या व्यक्तीने असा काही निर्णय घेतला तर आजही लोक कोणत्याही थराला जातात. स्त्रियांना मालकीची वस्तू समजायला नेमकी कधी सुरुवात झाली असावी हे शोधणे इंटरेस्टिंग ठरेल.
हम्म! अहिल्येला फार कडक शिक्षा नाही केली हे खरेच आहे. ते हजार वर्षे
वायुभक्षण वगैरे करणे भस्मात लोळणे व रामाने येऊन पावन करणे ही पोएटिक
लिबर्टी दिसतेय.
मुळात इंद्र देखणा वगैरे असला तरी नवरा म्हणून गौतम अहिल्येलाही हवेच होते
असे दिसतेय. पण एकदा लग्न केल्यावर दुसर्या पुरुषाचे क्षणिकही किंवा
तात्पुरतेही आकर्षण वाटता कामा नये असा साधा सोपा सरळ नियम तिने नजरअंदाज
का केला असावा कोण जाणे? विकनेस ऑफ फ्लेश, दुसरं काय?
पण एकदा लग्न केल्यावर दुसर्या पुरुषाचे क्षणिकही किंवा तात्पुरतेही आकर्षण वाटता कामा नये असा साधा सोपा सरळ नियम तिने नजरअंदाज का केला असावा कोण जाणे?
असं मी कुठे म्हटलंय? आकर्षण वाटलं तर "माय चॉईस" म्हणून कबूल करा! फसवाफसवी कशाला?
बाकी ते हजार वर्षे वायुभक्षण, रामाने पावन करणे वगैरे मूळ कथेत दिसत नाही.
रामाला भेटून त्याचा आदरसत्कार कर असे सांगितलेले दिसते आहे. राम हा
एकवचनी, एकपत्नी म्हणून नावाजला गेल्याने त्याच्याबरोबर अहल्येचे काही
बोलणे व्हावे अशी योजना दिसते आहे. मर्त्य माणसाला वायुभक्षण वगैरे करून
जिवंत रहाणे शक्य नाही हे कोणीही सांगेल.
मनीषा यांच्या प्रश्नाबद्दलः अहल्येने गौतमाला शिक्षा दिलीच आहे. फक्त ती उघडपणे बोललेली नाही इतकेच. अहल्या गौतमांबरोबर असमाधानी असेल तर तिने तसे स्वतःला आणि गौतमांना फसवत न रहाता सरळ निघून जायचे होते. ती तसे करत नाही. एवढेच माझे म्हणणे. हा धागा आणि चर्चा अहल्येच्या वागण्याबद्दल आहे. गौतम आणि इतर ऋषी म्हटलेल्या लोकांनी स्त्रियांवर कसे अन्याय केले याबद्दल जरूर एखादा धागा काढा. तिथेही त्याबद्दल चर्चा करू! :) बाकी ही कथा वाल्मिकी कधीच्या काळी लिहून गेले. त्यात कित्येकांनी आपल्याला वाटेल तशी भर घातली. त्यात लिहिलेल्या पात्रांनी तेव्हा असे का केले किंवा का केले नाही यावर आता आपंण चर्चा करून कथेत काहीही बदल होणार नसतोच.
मनीषा यांच्या प्रश्नाबद्दलः अहल्येने गौतमाला शिक्षा दिलीच आहे. फक्त ती उघडपणे बोललेली नाही इतकेच. अहल्या गौतमांबरोबर असमाधानी असेल तर तिने तसे स्वतःला आणि गौतमांना फसवत न रहाता सरळ निघून जायचे होते. ती तसे करत नाही.
स्वतःला आणि गौतमाला अहिल्या फसवते आहे? कधी ? कुठे?
फसवणूक कधी असेल? जेव्हा ती खूप काळ इंद्राबद्दलचे प्रेम म्हणा, आकर्षण
म्हणा .. दडवून ठेवून गौतमाचा संसार करत असेल तेव्हा . पण इथे तसे काहीच
नाही. या प्रसंगाच्या आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा ती तनामनाने गौतमांचीच
पत्नी आहे.
इथे सांगितलेल्या कथेप्रमाणे बघीतले तरी .. तिला क्षणिक मोह होऊन ती इंद्राच्या अधीन झाली असा उल्लेख आहे. म्हणजे इंद्राचा मोह मनात बाळगून ती गौतमांच्या संसारात वावरत नव्हती. आणि ही घटना घडून गेल्यावर सुद्धा तिला इंद्राचा मोह असल्याचा कुठे उल्लेख अढळत नाही. किंबहूना इंद्र तिथे असतानाच गौतमांचे तिथे आगमन होते आणि मग तिची शिक्षा सुरू होते. म्हणजे तिचा आणि गौतमांचा संसार तिथेच समाप्त होतो. मग अहिल्या फसवाणूक कधी आणि कशी करणार?
मला जी कथा माहीती आहे, त्याप्रमाणे पाहिले तर इंद्र हा गौतमांचाच छद्मं वेष धारण करून आला. म्हणजे ती तिच्या पती समवेत आहे असेच समजत होती. आणि गौतम ऋषी आश्रमात परतल्यावर सत्याचा उलगडा झालेला दिसतो. म्हणजे यात तर फक्तं तिचीच फसवणूक दिसते आहे.
समजा असे मानले की गौतमांना अहिल्येची वागणूक पसंत नाही. म्हणजे ते
फिर्यादी आहेत (आजकालाच्या परिभाषेनूसार) मग न्याय करायचा अधिकार त्यांनाच
कसा प्राप्तं होतो?
म्हणजे तक्रार करणारेच गुन्हा सिद्ध करणार आणि तेच न्यायनिवाडा करून शिक्षा पण तेच देणार? हा अजब प्रकार वाटतो.
फक्तं 'असमाधानी आहे', या कारणासाठी कुणीच आपला संसार मोडत नाही, -- अगदी या काळात सुद्धा. पुराण काळात तर असे करणे केवळ अशक्यच .त्यामुळे तिने संसार सोडून निघून जायला हवे, अन्यथा ती तिच्या पतीची फसवणूक असेल, हा सल्ला अगदीच अस्थानी वाटतो आहे.
अवांतर : श्रीराम जेव्हा अहिल्या आश्रमात येतात तेव्हा त्यांचे एकवचनी आणि एकपत्नी असण्याचे गुण सिद्ध झालेले नसतात. किंबहूना ते अहिल्याउद्धारानंतर सीता स्वयंवरासाठी जाणार असतात. म्हणजे त्यांना श्रीराम हा ईश्वरी अवतात असल्याचे (अंतर्ज्ञानाने) आधीच माहीत झाले असणार.
त्याप्रमाणे पाहिले तर इंद्र हा गौतमांचाच छद्मं वेष धारण करून आला. म्हणजे ती तिच्या पती समवेत आहे असेच समजत होती. आणि गौतम ऋषी आश्रमात परतल्यावर सत्याचा उलगडा झालेला दिसतो. म्हणजे यात तर फक्तं तिचीच फसवणूक दिसते आहे.
कथा इथेच पुन्हा एकदा वाचा. :)
क्षणिक मोह असेल तरी तिला स्वतःला आवरता आले नाही. इंद्र हा इंद्र आहे हे माहीत असतानाच अहल्या त्याच्यासोबत रत झाली. यानंतरही आपले चुकले, किंवा आपल्याला मोह झाला असे ती कबूल करत नाही, तर "गौतमांच्या रागापासून आपल्याला वाचव" अशी ती इंद्राची विनवणी करते. ही तिची स्वतःची आणि गौतमांची फसवणूकच आहे.
(ताजा कलमः या कथेकडे तुम्ही आजच्या स्त्रीवादी भूमिकेतून पहात आहात तर मी कोणत्याही दोन माणसातील विश्वासघात या दृष्टीने पहात आहे. काळाच्या ओघात स्त्री आणि पुरुषाचे नाते बदलत आले आहे, मात्र प्रेम, द्वेष इ. मानवी भावना आणि वागणुकीची काही मूल्ये सतत टिकून राहिली आहेत. एकाच कथेकडे बघण्याच्या आपल्या मूळ दृषीकोनातच प्रचंड फरक असल्याने कितीही काथ्या कुटला तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही. तस्मात मी इथेच थांबते. धन्यवाद.)
आता गौतमाने अहल्येच्या चुकीची काय शिक्षा द्यावी या बद्दल एखाद्याचे मत निराळे असू शकते. अपराध व त्यावरील शिक्षा स्थळकाळावर अवलंबून असते. हजारो वर्षांपूर्वी भारतील शिक्षा व आजची शिक्षा निराळी असणारच व आजही भारतात मान्य असलेली फाशी अमेरिकेत अमान्य आहेच. आपण गौतमाचे चुकले असे म्हणणे गौतमावर नव्हे तर वाल्मीकींवर अन्याय करणे आहे. त्यांनी कथा लिहली; तुम्हाला निराळे म्हणावयाचे असेल तर "मला असे वाटते कारण .... " असे लिहणे योग्य; उत्तर देण्यास असमर्थ असलेल्या वाल्मीकि यांना चूक म्हणणे मला बरोबर वाटत नाही.
तीच गोष्ट शूर्पणखेबाबत. जर एखादी अनोळखी बाई अनाहूतपणे तुमच्या घरी येऊन तुमच्या बायकोला खाऊन टाकते असे म्हणाली तर तुम्ही तिची थोडी थट्टा करावयास काय हरकत आहे ? आणि शूर्पणखेचा थट्टेबद्दल राग नाहीच आहे. आता ती फक्त सीतेला खाण्या ऐवजी तिच्या बरोबर लक्ष्मणाला खाणार आहे व मग सवत न राहिल्यामुळे सुखाने रामाबरोबर विहार करणार आहे !
नाक-कान कापावयाच्या ऐवजी तिला ठार मारणे कसे योग्य ठरणार ? रामायणात तिचा रोल पुढे तिने लंकेत जाऊन रावणाला सीतेला पळवून आणावयास प्रेरित करणे असा आहे. ठार मारणे यांत बसत नाही हो. तिला ठार मारणे म्हणजे पटकथेत हिरोने बदल सुचवणे झाले; काय ?
मनिषाताई, प्रतिसाद तुम्हाला दिला असला तरी बर्याच वाचकांचे असे गैरसमज झाले असावेत असे वाटते. सर्वांना निरनिराळे लिहणे म्हणजे परत सर्वश्री लिहणे आले; नकोच ते.
शरद
(तुमचे रस्त्यात पडलेल्या पाकीटाचे उदाहरण अंमळ अस्थानी वाटते आहे (सॉरी बर्का आगाऊपणाबद्दल) रस्त्यातले पाकीट बेवारस असते,म्हणजे त्याक्षणी तरी त्याच्या मालकाचा पत्ता नसतो. ते पोलीस कडे जमा करणे हे सज्जन पणाचे लक्षण , पण खिशात टाकले तर चोरी ठरत नाही. तुमच्या कथेत कुणीच अनाथ किंवा बेवारस नाही. )
पैसा ताईंच्या मते ती असमाधानी होती, तिला परपुरूषाचा मोह होता तरीही ती गौतमाची पत्नी म्हणून वावरत होती, ही फसवाफसवी आहे. तर तिने संसार सोडून निघून जायला हवे होते.
या अक्षेपाला माझे उत्तर होते.
तसही, अहिल्येच्या चुकीला गुन्हा समजून तिला इतकी मोठी शिक्षा देणे हा तिच्यावर झालेला अन्यायच आहे. त्या मुळे तिच्या बाबतीत जे झाले ते सर्वश्री योग्यच होते या तुमच्या मताशी मी सहमत नाहीच.
म्हणजे अहिल्ये बरोबर विवाह करून , तिच्याकडून सर्वं सांसारीक कर्तव्ये पूर्ण करण्याची अपेक्षा करायची.
आणि स्वतः विवाहीत असूनही स्त्री सुखाचा त्याग करून , पुण्य संपादन केले म्हणून महर्षी पदास पोहोचल्याचा अभिमान मिरवायचा .
यात तुम्हाला कुठे दुट्टप्पीपणा अढळला नाही?
ही अहिल्येची फसवणूक वाटली नाही ?
याचा अर्थं मी अहिल्येला योग्यं ठरवत नाहीये . फक्तं इतकच म्हणायचय चूक दोघांची असताना शिक्षा फक्तं अहिल्येला भोगायला लागली. आणि आश्चर्यं हे की ज्याने पहिल्यांदा चूक केली, तोच शिक्षा देतो आहे .
भारतीय संस्कृती महान आहे.
रामायणाची feminist आवृत्ती म्हणजे Sita Sings the Blues हा नितांतसुंदर Animationपट. सर्वांनी जरूर पहावा अशी शिफारस करतो. हा आंतरजालावर मोफत उपलब्ध आहे.
अमेरिकेतील काही हिंदू संघटनांनी धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत याला विरोध केला होता हे आधीच सांगून ठेवतो. संवेदनशील हिंदूनी पहाणे टाळावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा